Antara
| |
| Wednesday, September 05, 2007 - 4:52 pm: |
| 
|
सांगा की मग हि चिन्हे आणि त्याचा अर्थ! इथे न लिहिण्यासारखे असे का म्हणता? इथे कुनी लहान, अज्ञान थोडेच आहे. नवीन माहिती मिळेल, एवधाच हेतू. आईने कारल्याच्या वेलाखालून जायच नाही? तसंच एक, लग्नात कार्ल्याचा वेल अन चान्दीच्या लवंगा का देतात ते ही मुलाच्या आईला?तांदळाचे धूण म्हणजे काय? ते का ओलांडायच नाही? मला तर काहि क्लु लागत नाही आहे
|
Dineshvs
| |
| Wednesday, September 05, 2007 - 4:56 pm: |
| 
|
अज्जुका, ही प्रतीकं खुप चतुराईने योजली आहेत एवढं खरे. अंतरा, खरेच नाही इथे लिहिता येणार.
|
Ajjuka
| |
| Wednesday, September 05, 2007 - 5:39 pm: |
| 
|
अंतरा, वस्तूंच्या आकारावरून समजून जा. याहून काही इथे लिहिणे योग्य नाही. हे मी आधीपण कुठेतरी सांगितलं होतं. बहुतेक दागिन्यांच्यासंबंधी काहीतरी चर्चा होती. आणि हो ४-५ वर्षापूर्वीच्या हितगुज दिवाळी अंकात मी एक लेख लिहिला होता सालंकृत नावाचा. त्यात केला होता उल्लेख या प्रतिकांचा.
|
Tiu
| |
| Wednesday, September 05, 2007 - 6:29 pm: |
| 
|
आवडली कथा. वाचुन खुप छान वाटलं... विचार positive असले की ते असे बोलण्यातुन, लिहिण्यातुन, वागण्यातुन दिसुन येतात! excellent दिनेशदा...
|
Runi
| |
| Wednesday, September 05, 2007 - 7:15 pm: |
| 
|
दिनेशदा कथा आवडली या तिच्या फॉर्म मुळे जास्तच आणि त्यानंतरचे तुमचे विश्लेषण पण.
|
Farend
| |
| Wednesday, September 05, 2007 - 8:04 pm: |
| 
|
दिनेश मलाही कथा आवडली, खूप भाबडी पण वाटली नाही. 'सरोगेट' पणा नंतर त्या बाईने पैसे न मागता आपल्या दुसर्या मुलीचे आयुष्य व्यवस्थित जावे याचा विचार करणे किंवा तिचे उपकार असलेल्या आणि त्या दुसर्या मुलीचा लळा लागलेल्या जोडप्याने ती मागणी मान्य करणे आणि नंतर त्या मुलांना त्यांची खरी आई भेटण्याची गरज त्या जोडप्याला वाटणे ही चांगुलपणाची उदाहरणे असली तरी प्रत्यक्षात अजिबात घडू न शकणारी वाटत नाहीत. फक्त एक शंका: मी कहाण्यांचे पुस्तक बघून बरेच दिवस झालेत, पण मला त्या अशा स्तोत्रासारख्या (प्रत्येक ओळीनंतर १|| असे) लिहिलेल्या बघितल्याचे आठवत नाही.
|
Maanus
| |
| Wednesday, September 05, 2007 - 9:21 pm: |
| 
|
ही पोवाडा style आहे ना हो दिनेश? एक गाव बारा भानगडी मधे असे एक गाणे आहे चित्रपटाच्या शेवटी. सरोगेट मदर्स मुळे जुळे तिळे होण्याचे प्रमाण खुप असते. मधे तर ६ वैगेरे च्या पन cases झाल्यात.
|
Bee
| |
| Thursday, September 06, 2007 - 7:19 am: |
| 
|
भल्या माणसा ही पोवाडा नाही पोथी ईष्टाईल आहे.. तु कधी बसला नाहीस का कुठल्या व्रत उद्यापनाच्या पुजेला..
|
R_joshi
| |
| Thursday, September 06, 2007 - 8:45 am: |
| 
|
दिनेश कथेची शैली आणि विषय दोन्ही उत्कृष्ट
|
Chetnaa
| |
| Thursday, September 06, 2007 - 1:08 pm: |
| 
|
दिनेशदा, शैली छानच... कथेचा फ़ॉर्म बघु चटकन जुनी पोथी वगैरे नजरे समोर आली आणि पहिल्या १-२ वाक्यातच अगदी आधुनिक जगात घेऊन गेली... छान आहे कथा आणि डोळे उघडणारी आहे... खरंच किती वेगळे प्रश्न निर्माण होताहेत आजच्या तरुणाईपुढे.... पुढच्या कथेचा फ़ॉर्म कसा असेल याची उत्सुकता निर्माण झालिय...
|
Disha013
| |
| Thursday, September 06, 2007 - 7:25 pm: |
| 
|
दिनेशदा,खुप भावुन गेली कथा.
|
Dineshvs
| |
| Friday, September 07, 2007 - 5:09 am: |
| 
|
फ़रेंड अगदी बरोबर तसे आकडे नसतात. तसे आकडे स्त्रोतात असतात. या माध्यमात वाचताना सोपे जावे म्हणुन मी आकडे टाकले. माणुस, या प्रयोगासाठी, एकापेक्षा जास्त स्त्रीबीजे मिळाली तर हवीच असतात. जेव्हा कृत्रिम रित्या स्त्रीबीजे निर्माण करायची असतात, त्यावेळी मल्टिओव्ह्युलेशनसाठी फ़र्टीन सारखी औषधे वापरतात. यामुळे खुप वेळा मल्टिपल प्रेग्नन्सी दिसते. पण ती अश्या सिलेक्टिव्ह केसेस मधे नाही.
|
Jo_s
| |
| Friday, September 07, 2007 - 5:14 am: |
| 
|
दिनेश, विश्लेषण छानच, एकदम पटलं. सुधीर
|
Bhagya
| |
| Tuesday, September 11, 2007 - 2:00 am: |
| 
|
छान लिहिलय! आयटी त काम करणार्या जोडप्यांना एकमेकांसाठीच वेळ नसतो- मुले दूरच राहिली.
|