|
Milya
| |
| Tuesday, August 21, 2007 - 5:33 am: |
| 
|
चाल : आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो प्रेरणा : मनोगत वरचे भोमेकाकांचे विडंबन - आताशा मी फक्त बकाणे चिवड्याचे भरतो विषय : चावून चोथा झालेला.. म्हणजेच नवी बाटली जुना माल तरीही विडंबन करायचे कारण : विषयाला ग्लास मास अपील आहे असे वाटले म्हणून आताशा मी फ़क्त बकाणे चकण्याचे भरतो प्याले भरणार्या वेटरला लगेच थांबवितो || वास नको मज कुठलाही अन भास नको आहे बॉटल कसली मुळात मजला ग्लास नको आहे ह्या मद्यांशी अवघ्या परवा करार मी केला मी प्यावे ना त्यांना; त्यांनी पिऊ नये मजला विवाहनामक बेडीमधला कैदी घाबरतो | आता आता बाटली केवळ औषध साठवते द्राक्षे बघता वाईन नाही, 'आसव' आठवते आता कुठल्या दिलखुष गप्पा उनाड मित्रांशी आता पार्टी पूर्वीगत ना रंगीत नि हौशी उद्विगतेने दारूवरची गीते मी रचतो | खाते जेव्हा सतत बायको नवर्याचा भेजा उडून जाती स्पिरिटप्रमाणे पेल्यातिल मौजा बारा महिने दारी श्रावण, येतो मुक्कामा हरेक दिन मग ड्राय डे परी, सुका नि रिक्कामा पिण्याविना मी; बिनपाण्याची मासोळी होतो आताशा मी फ़क्त बकाणे चकण्याचे भरतो ~मिलिंद छत्रे
|
Yog
| |
| Tuesday, August 21, 2007 - 5:46 am: |
| 
|
khi khi khi...ग्लास अपिल खास आहे 
|
वा वा वा मिल्या... समस्त बुधवारकर नवर्यांच्या व्यथेला वाचा फ़ोडलीस रे तू
|
Arun
| |
| Tuesday, August 21, 2007 - 5:51 am: |
| 
|
मिल्या : छानच आहे रे .........
|
Kandapohe
| |
| Tuesday, August 21, 2007 - 6:31 am: |
| 
|
मिल्या छानच. फक्त खालील ओळीत जरा गडबड वाटली. मी प्यावे ना त्यांना; त्यांनी पिऊ नये मजला >>> विवाहनामक बेडीमधला कैदी घाबरतो >>>
|
Monakshi
| |
| Tuesday, August 21, 2007 - 6:57 am: |
| 
|
मिल्या सहीच रे मस्त
|
Zakasrao
| |
| Tuesday, August 21, 2007 - 11:41 am: |
| 
|
मिल्या मस्तच रे ही समस्त बुधवारकर असलेल्या आणि नंतर कैदी झालेल्यांची व्यथा आहे.
|
Daad
| |
| Tuesday, August 21, 2007 - 10:13 pm: |
| 
|
मिल्या मस्तच! खाते जेव्हा सतत बायको नवर्याचा भेजा उडून जाती स्पिरिटप्रमाणे पेल्यातिल मौजा बारा महिने दारी श्रावण, येतो मुक्कामा ...... व्वा!
|
मिल्या .. प्रास्ताविकही छान "ड्राय डे परी" वाचल्यावर म्हटलं ही कोण परी आता ? 'ओलेती' ह्या प्रसिद्ध चित्रासारखं तिला 'सुकेली' असं नावही दिलं मी मनातल्या मनात
|
मिल्या , " बिनपाण्याची " ? सही .
|
Abhi_
| |
| Wednesday, August 22, 2007 - 10:27 am: |
| 
|
मिल्या सही...
|
Athak
| |
| Wednesday, August 22, 2007 - 10:40 am: |
| 
|
पाण्याविना मासोळी ग्लासाशिवाय बुधवारकरी मिल्या , बुधवारचे invitation अन घरच्या बॉसच्या परवानगीचे काय करणार
|
Amruta
| |
| Wednesday, August 22, 2007 - 2:28 pm: |
| 
|
आता आता बाटली केवळ औषध साठवते द्राक्षे बघता वाईन नाही, 'आसव' आठवते कुठ्ली कुठ्ली आसव पितोस रे हल्ली?? मस्तच जमलय
|
Chinnu
| |
| Wednesday, August 22, 2007 - 3:24 pm: |
| 
|
विवाहनामक बेडीमधला कैदी आणि ड्राय डे परी सहिच! राहुला, 'सुकेली' कोटी छान!
|
Milya
| |
| Thursday, August 23, 2007 - 11:54 am: |
| 
|
धन्यवाद सर्वांना... योण्णा तो अरुण मोड काढून टाका बघु.. आणि त्या 'सुकेली' ला तुम्ही दोघेही जरा 'अकेली'.. 'सोडा' बघु वैभव : बिनपाण्याची खटकले का? प्रश्णचिन्ह टाकले आहेस म्हणून विचारले... आधी मी पाण्यावाचून लिहीणार होतो पण एक मात्रा वाढत होती अमृता : बघ ना आजकाल नुसती 'आसवे'च प्यायला लागतात बघ
|
नाही रे मिल्या खटकले नाही .. उलट तो metaphor सर्वात जास्त आवडला . प्रश्नचिन्ह टाकायचं कारण म्हणजे " बिनपाण्याची " " नीट ' वाचलं तर बरेच अर्थ निघतात मला ते interesting वाटलं म्हणून ते सही अस म्हटलंय . चू. भू. अजिबातच दे. घे. नाही . रागावला असशील तर त्या निमित्ताने फोन तरी करशील . Now stop being a blue baby एक पिवळा धमक स्माईली टाक .
|
Aavli
| |
| Sunday, August 26, 2007 - 11:24 am: |
| 
|
फारच अप्रतिम मिलिन्द लगे रहो,,,
|
Ashwini
| |
| Sunday, August 26, 2007 - 1:52 pm: |
| 
|
मिल्या, मस्त जमले आहे.
|
Milya
| |
| Tuesday, September 04, 2007 - 5:06 am: |
| 
|
चाल : संदीपची कविता - दाढी काढून पाहिला, दाढी ठेवून पाहिला | ब्रेक लावून पाहिला, ट्रेस काढून पाहिला बग परंतु कोडमधला, आहे तस्सा राहिला बग पकडण्या डीबगरचे, जाळे अलगद लाविले पण छुपा रुस्तुम तरीही, हाती नाही लागला फ़िक्स कर हा बग लगेचच, बॉसने फ़र्माविले फ़ॉल्ट दुसर्याच्या मॉड्युलचा, म्हणत झटकून टाकिला फ़िरून दुनिया पण परतला, बग तो माझ्या अंगणी री-प्रोड्यूस ना होई म्हणुनी, क्लोज करुनी टाकला चिवट टेस्टरने तरीही, परत त्याला उघडले 'कोड फ़्रीझ' ची सबब देऊन, लांबणिवरती टाकला पाहुनी हा आळस माझा, बॉसने फटकारले राग सारा बॉसवरचा, की-बोर्डवरती काढिला एक छोट्या बगमुळे मज, कस्टमरने चावले शेवटी फ़ीचर म्हणोनी, डिलिव्हरी मध्ये घातला ब्रेक लावून पाहिला, ट्रेस काढून पाहिला
|
एक छोट्या बगमुळे मज, कस्टमरने चावले शेवटी फ़ीचर म्हणोनी, डिलिव्हरी मध्ये घातला ...मिल्या,खी खी खी
|
|
|