Shyamli
| |
| Thursday, August 23, 2007 - 4:29 am: |
| 
|
शलाका,काय जिवघेणं लिहितेस दरवेळेला डोळ्यांना काय आणि कवितेला काय........सुपर्ब
|
सर्वांचेच मनःपूर्वक धन्यवाद . हो .. शलाका ह्या दोन ओळींवर एक मेलच लिहीणार होतो .. उशीर झाला . रिअली सुपर्ब . मागे मी कुठल्यातरी कवितेत " स्वप्नांना डोळे फुटले " अशी ओळ लिहीली होती . पण ती कविता लिहील्या दिवसापासून तो कागद मला सापडत नाहीये . तुझ्या ओळीमुळे निदान आठवण तरी झाली . धन्यवाद . सुधीर .. तुझा पुढचा " पोएम डे " कधी आहे ?
|
अतिरेक व्यवस्थित होतं शब्दांचं दळणवळण अन निर्विवाद होतं दोन्ही देशातलं ऐक्य .. कुठूनतरी सामंजस्याची सीमा ओलांडून दाखल झाली एक दोन अतिरेकी वाक्यं .... लगोलग काटेरी कुंपण आलं अन प्रतिहल्ल्याची तयारी सुरू झाली दोन अतिसावध देशात . आता सर्वत्र अतिरेकी हिंडतात निर्व्याज शब्दांच्या वेषात !!!!
|
Zaad
| |
| Thursday, August 23, 2007 - 6:56 am: |
| 
|
अतिरेक अतिसुंदर रे!!! आणि तिथीवरील भाष्यही....
|
वैभवा, दोन्ही कविता फारच सुंदर! सुधीर 'डेज' आवडली...
|
पाऊस जोराचा... आकांताचा... वेळ रात्रीची... एकांताची पाऊस जोराचा... आकांताचा... खिडकीच्या काचेवर त्वेषानं आपटणारे थेंब घरात जरी येत नसले तरी हृदयात खोलवर शिरत रहातात आणि घराबाहेरचे वादळवारे आता मनातही वेगानं फिरत रहातात आठवतोय आपल्या छोट्याशा खोलीतला तुझा कालपरवाचाच सहवास... आठवतायत गालांवर अजून रेंगाळणारे तुझे हळुवार, उबदार श्वास... अन आठवतोय या वादळावर असलेला तुझा निस्सीम अनाहत विश्वास... वारं पुन्हा घोंघावायला लागतं... मी उठतो, खिडकी घट्ट बंद करतो पडदे पूर्ण ओढून घेतो अन पांघरुणात शिरून झोपायचा प्रयत्न करतो थेंबांचा काचेवरचा आवाज आता येईनासा होतो... मी सुस्कारा सोडून डोळे मिटतो हळूच डाव्या कुशीवर वळतो सवयीनं माझा हात शेजारच्या जागेवर जातो... अन इतका वेळ तटवून ठेवलेला पाऊस अलगद पापण्यांतून वहायला लागतो.... वेळ असते रात्रीची... एकांताची अन पाऊस असतो विरहाचा... आकांताचा...
|
Shyamli
| |
| Thursday, August 23, 2007 - 11:39 am: |
| 
|
आहा एकदम दोन मस्त कविता, आवडला अतिरेक आणि पाऊसही
|
Chinnu
| |
| Thursday, August 23, 2007 - 2:18 pm: |
| 
|
प्रसाद, डोळ्यातला पाऊस कविता आवडली!
|
Mankya
| |
| Friday, August 24, 2007 - 3:33 am: |
| 
|
वैभवा .. प्रत्येक शब्द तंतोतंत अगदी ! क्लाSSSSस ! प्रसाद .. काचेवर त्वेषानं आपटणारे थेंब .. अगदी समर्पक अन प्रभावी ! आकांत .. शब्दच आरपार गेला हा मांडणीमूळे ! सही ! माणिक !
|
Jo_s
| |
| Friday, August 24, 2007 - 4:43 am: |
| 
|
धन्यवाद, वैभव अतिरेक खासच प्रसाद "विरहाचा आकांत" एकदम टचींग
|
पाशा .. येह क्या हाल बना लिया है . कुछ ( अंगठा तोंडाशी नेत ) लेते क्यूं नहीं ? भावना ( तिकडे ) पोचल्या असतीलच . आता तिकडे एखादी solid sad tune compose होणार .
लंडनमधल्या कार्यक्रमासाठी best luck आणि दादा कोंडकेचं विडंबन घ्यायला विसरू नकोस . मला तर ते आठवल नाही तरीही हसू येतं
|
माझं जाऊ दे ... माझं जाऊ दे तुझं बोल वाटलं नव्हतं सारं फोल ? संशयाचा तळ गाठाया गेली होतीस जेव्हा खोल ? माझं जाऊ दे तुझं बोल सुटला ना प्रश्नांचा तोल ? पूर्ण जाहले वर्तुळ तेव्हा उत्तर नव्हतं आलं गोल ? माझं जाऊ दे तुझं बोल हत्यार झाले जेव्हा बोल टिपूस सुध्दा दिसला नाही सुकली नव्हती आतील ओल ? माझं जाऊ दे तुझं बोल समजलो होतो जे अनमोल किंमत केलीस जेव्हा त्याची झालं नव्हतं मातीमोल ? माझं जाऊ दे तुझं बोल च ! जाऊ दे !!!!!
|
Daad
| |
| Friday, August 24, 2007 - 6:18 am: |
| 
|
वैभव, दोन्ही सुंदरच. माझं जाऊदे- एकदम हमरी तुमरी (हा खरच मराठी शब्द आहे का? मला तरी हा, मी हिंदी बोलायचे तशातला वाटतो.) वर की रे! मस्तच. अतिरेकी- 'आता सर्वत्र अतिरेकी हिंडतात निर्व्याज शब्दांच्या वेषात !!!! ' विकेट घेतलीस, जियो! प्रसाद, ते आकांताचा-एकांताचा एकदम भिडलं.
|
Psg
| |
| Friday, August 24, 2007 - 6:21 am: |
| 
|
वैभव, मस्त! आवडली कविता.. सोप्या शब्दात कमाल आशय, आणि तोही लयीत!
|
Chetnaa
| |
| Friday, August 24, 2007 - 6:44 am: |
| 
|
तिनही कविता खुपच सुंदर.... पार भिडल्या मनाला...
|
Mankya
| |
| Friday, August 24, 2007 - 8:26 am: |
| 
|
वैभवा ... अरे हे वाक्य केवढं सहज म्हणून जातो आपण पण तू ना ....! आतील ओल .. मस्त रे ! अगदी स्पर्शून गेलं रे ! माणिक !
|
Shyamli
| |
| Friday, August 24, 2007 - 11:36 am: |
| 
|
वा गुर्जी तुम्ही भांडतापण कवितेत का हो? बाकी माणिकला अनुमोदन................... कित्येक वेळा बोलून जातो, माझं जाऊ दे तुझं बोल आणि ते शेवटचं "च! जाऊ दे... तर लै खास " हे असं कवितेत तूच म्हणावस.
|
Chinnu
| |
| Friday, August 24, 2007 - 4:15 pm: |
| 
|
सुकली नव्हती आतली ओल? वैभवा रडविलसं! कविता आवडली.
|
Jo_s
| |
| Saturday, August 25, 2007 - 4:23 am: |
| 
|
वैभव, मस्तच कविता फिरत्ये भोवती गोल इतका साधलाय उत्तम तोल शब्द सुचेना उपमेलाही बोल झाले सारेच् अबोल
|
Zulelal
| |
| Monday, August 27, 2007 - 5:41 pm: |
| 
|
पूर्व लाजरी सोनेरी पहाट फुलला दिवस निळा प्रकाश... भारवले ढग विजांच्या रेषा काळे पक्षी जग भकास... निजला दिवस सरला साज कुंद हवा सांज उदास... हसरा चंद्र लखलख चांदण्या चमचम तारे धुंद आकाश...
|