Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 29, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » श्रावण » कथा कादंबरी » अनुभूती » Archive through August 29, 2007 « Previous Next »

Daad
Wednesday, August 22, 2007 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ, अशी वळणं वळणं देत कथा फुलवणं तुझा हातखंडा, हे परत एकदा सिद्ध झालं!
मस्तय! आता, गुणी सुमॉसारखी पुढचं लिहायला घे बघू! माझी बा ssss य ती!


Sneha21
Wednesday, August 22, 2007 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्लिज सुपरमोम आता लवकर पुर्न करा कथा

Ana_meera
Wednesday, August 22, 2007 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेहेमीप्रमाणे गुपचूप वाचत आहे. comment न देताSS
चांगली कथा आहे, पण please supermom आपण नेहेमीप्रमाणे लवकर पूर्ण कराल?


Supermom
Wednesday, August 29, 2007 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हेमंतला हाताला धरून आधार देत देतच मी आतमधे नेऊन निजवलं. ताप उतरवायची औषधं त्याला आधी दिली. गुंगीत तो बराच वेळ कण्हत होता. फ़ॅमिली डॉक्टरला फ़ोन केला.
'ताप किती आहे बघ आधी...' तिनं सांगितलं.
'एकशेतीन आहे. थोडा जास्तच...'
'आत्ता तू ताप उतरवायचं औषध दिलंयस न. तीन चार तास वाट बघ. पुन्हा चढायला लागला तर घेऊन ये दुपारी...'
फ़ोन बंद करून मी हेमंतकडे वळले. त्याला एव्हाना झोप लागली होती. डोक्यावरचे विस्कटलेले केस नि तापानं लालसर झालेला चेहरा यानं तो अगदीच बापुडवाणा दिसत होता बिचारा.

त्याच्या अंगावर हलकेच पांघरूण टाकून मी स्वैपाकघरात आले.

काय अवस्था होती स्वैपाकघराची. जागोजागी पडलेली खरकटी भांडी, भाज्यांच्या साली, भरून वाहणारी कचर्‍याची बास्केट... शी.. माझ्याच्याने बघवेचना. माझ्या मनाच्या भावनिक आंदोलनांमधे किती किती दुर्लक्ष झालं होतं घराकडे.....
बाकीच्या खोल्यांमधे जाऊन बघितलं. थोड्याफ़ार फ़रकाने अगदी हीच अवस्था होती. फ़ुलदाण्यांमधली सुकलेली फ़ुलं,अर्धवट उघडे ड्रॉवर्स,कपाटांवर साचलेली धूळ...देवा देवा......

आत जाऊन एक जुना शर्ट चढवून आले मी, अन साफ़सफ़ाईला सुरुवात केली. एकेका खोलीपासून सुरुवात करत सार्‍या घराचा कायापालट करायला सुरुवात केली. सगळं पूर्ण झालं तोवर अगदी घामाघूम झाले होते. पण घर मात्र एकदम सुरेख दिसत होतं. गॅलरीतून गुलाबाची दोन टवटवीत फ़ुलं काढून आणली,अन फ़्लॉवरपॉटमधे सजवली. एकदम फ़्रेश वाटायला लागलं होतं मला आता.

हेमंतच्या खोलीत डोकावले. त्याचा ताप उतरला नव्हताच.उलट तो अजूनच गळून गेल्यासारखा दिसत होता. झटपट आंघोळ करून तयार झाले, अन गाडी काढलीच. त्याला दवाखान्यात घेऊन गेले. औषध, अन थोडं सामान, भाजी, येतानाच आणली.
घरी आलो अन औषध देऊन त्याला झोपायला लावलं मी. किती असहाय, थकलेला वाटत होता तो या क्षणी. माझे डोळे भरून आले.

तेवढ्यात फ़ोन खणखणला. भारतातून आईंचा फ़ोन होता. थोडं बोलून, मी कॉर्डलेस हेमंतच्या हातात नेऊन दिला.

'अग हो, आता बरा आहे मी. तिनं औषधं आणलीत आज. .... अग, थोडा वीकनेस आलाय ना, म्हणून आवाज थकलेला वाटतोय....'

'अं, नाही, कांचनच्या लग्नाला येणं नाही जमणार आई. मला सुट्टी मिळणं अशक्य वाटतंय.... अग दादा नि वहिनी आहेत ना....काळजी कशाला करतेस?'

थोडं इकडचं तिकडचं बोलून त्यानं फ़ोन ठेवला.

'हे काय, कांचनच्या लग्नाला नाही जाणार आपण?...'

हातानं त्याच्याजवळ थोपटत त्यानं मला जवळ बसायची खूण केली...

'राणी, आधी तुला नीट बरं वाटू दे. तुझं दुखणं काय आहे याचा थोडा जरी सुगावा घरी लागला ना, तर तुलाच खूप त्रास होईल. विश्वास ठेव माझ्यावर. मी पूर्ण विचार करूनच घेतोय हा निर्णय....'
एवढं बोलून, थकून जाऊन त्यानं डोकं उशीवर टेकवलं.

'बरं. ते पाहू नंतर. झोप बघू तू आता....'

त्याचं पांघरूण सारखं करून मी बाहेर आले. हातात वाफ़ाळत्या कॉफ़ीचा कप घेऊन बाहेर बाल्कनीत जाऊन बसले खरी, पण मन विचारात गढून गेलं होतं.


अपूर्ण.


Supermom
Wednesday, August 29, 2007 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'किती गोष्टी घडून गेल्या होत्या या काही दिवसात. अन या सार्‍यात हेमंत किती काळजी घेत होता माझी. केवळ माझं दुखणं कोणाला कळू नये म्हणून तो एकुलत्या एका बहिणीच्या लग्नाला न जाण्याचा निर्णय घेत होता. माझ्या काळजीनं किती बेजार झाला होता तो. ऑफ़िस, घरचं सगळं बघून वर माझे मूड्स सांभाळत होता. नवा देश, नवं वातावरण, याचं त्याच्या मनावर दडपण नसेल का येत?'

'लहानपणापासून आपल्याकडे पुरुषाला खंबीर व्हायचंच शिक्षण दिलं जातं. त्यानं बायको मुलांची काळजी घ्यावी म्हणून. घराचा आधारस्तंभ व्हावं म्हणून. पण त्याच्या मनाची काळजी नको का घ्यायला कुणीतरी? आपलं दुखणं तो जगापासून लपवतोय. त्यावर पांघरूण घालतोय सतत. आपण वेळ आली की चिडचिड करतो त्याच्यावर. त्यानं कोणाजवळ बोलायचं हे? किती त्रास होत असेल त्याच्या मनाला. कितीही खंबीर असला, तरी जीवघेण्या वादळात कोसळायचा धोका अगदी मोठ्या वृक्षालाही असतोच की.'

'आपल्या या दुखण्यानं, या सततच्या मानसिक दडपणानं तर आजारी नसेल ना पडला तो? छे.... फ़ारच चुकतंय आपलं. आपल्यालाही खंबीर व्हायला हवंय आता. डॉक्टर ब्राऊननं सांगितलंय, 'मनात उदासवाणे विचार आले की बाहेर फ़िरायला जायचं, आपलं मन रमेल, आपल्याला आवडेल अशा कामात स्वत ला गुंतवून टाकायचं..'.

'येऊ नये ते दुखणं आलं खरं, पण आता त्यावर उपाय करायला हवाय. हा सुखाचा संसार, असा समजून घेणारा नवरा हे सारं उध्वस्त होण्यापासून वाचवायला आपणही प्रयत्न करायला हवेतच.'

'आयुष्यात नेहमीच मनासारखं दान पडतं असं नाही. पण एक दान मनाविरुद्ध गेलं म्हणून हताश व्हायचं नसतं, उलट उरलेला डाव कसा सावरता येईल हे बघायचं असतं. पुढचं दान मनासारखं पडण्याची वाट बघायची असते..'

'आपल्याला जिवापाड जपणार्‍या नवर्‍याला आपणही साथ द्यायला हवी. खंबीर होऊन, या वादळातून बाहेर पडण्यासाठी दोघांनी एकमेकांना हात द्यायला हवा.....'

किती तरी दिवसांनी मन जरा शांत वाटत होतं. हातातल्या कॉफ़ीसारखाच माझ्या मनावर समाधानाचा हलकासा तवंग पसरला होता.

तीनचार दिवसात ताप उतरून हेमंत ऑफ़िसला जाऊ लागला. यावेळी डॉक्टर ब्राऊनच्या अपॉइंटमेन्टला मी एकटीच जाईन असं त्याला सांगितलं होतं. एरवी तो मला कधीच एकटं जाऊ देत नसे. पण त्यादिवशी त्यालाही खूप काम होतं, नि सुट्टी घेतल्याने झालेला बॅकलॉग भरून काढायचा होता. म्हणून त्यानंही जाऊ दिलं मला.

डॉक्टर ब्राऊनशी मी अगदी मनमोकळं बोलले. मनातले सारे प्रश्न विचारून टाकले. सगळ्यात मुख्य म्हणजे माझं मन दुबळं असल्याने हे झालं का हा प्रश्न होता माझा.

'नो नो डिअर. स्वतः ला मुळीच दोषी समजू नकोस... मेंदूच्या काही भागातलं केमिकल द्रव्य कमीजास्त झाल्याने घडतं हे. त्याची परिणिती आहे ही. अन डिप्रेशन मधे पेशंटचा दोष काहीच नाही. शरीराच्या दुखण्यासारखंच हे मनाचं दुखणं. नियमित औषधानं अगदी पूर्ण बरी होशील तू...'

बराच वेळ त्यानं मला समजावलं. माझं मन आता पिसासारखं हलकं झालं होतं.

घरी येऊन मी छान तयार झाले. अगदी नव्या पद्धतीची केशरचना, नवा ड्रेस. हेमंत घरी आला तेव्हा मी त्याची वाटच बघत होते. त्याची आवडती साबुदाण्याची खिचडी नि वेलची घातलेली कॉफ़ी तयार ठेवून.

माझ्याकडे बघून आश्चर्याचा धक्काच बसला त्याला.
'खाऊन घे नि लवकर तयार हो. आपल्या नेहमीच्या तळ्याकाठच्या जागी फ़िरायला जाऊया...'

'आज अचानक काय झालं...?' वाक्य अर्धवटच ठेवून त्यानं माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं.

त्याचं माझ्यावरचं प्रेम, माया, याची अनुभूती नव्यानेच झाल्यासारखं वाटत होतं मला.

'मला बरं व्हायचंय हेमंत... गोळ्याही नियमित घेतेय मी.. नि यापुढेही घेणार आहे. मला अगदी नीट बरं व्हायचंय. तुझ्यासाठी... आपल्या दोघांसाठी...'
वाक्य अर्धवटच सोडून मी त्याच्या कुशीत शिरले.

फ़ुलदाणीतली गुलाबाची फ़ुलं मजेत डुलत होती.


समाप्त.



Itgirl
Wednesday, August 29, 2007 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त सुपर मॉम :-) आवडली कथा खूप :-)

Zakki
Wednesday, August 29, 2007 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, वा बरं वाटलं कथा वाचून.

मला बाकी काही कळत नाही, ज्यांना असे वाटते की त्यांना कळते, ते लोक येऊन टीकात्मक लिहितीलच. त्याच्या आधी मी सांगतो. मला ही कथा आवडली.

असा शहाणपणाचा विचार करणारी बायको ज्याला लाभते तो पुरुष धन्य.


Zelam
Wednesday, August 29, 2007 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ नेहमीप्रमाणेच छान.
अहो झक्कीकाका असा समंजस नवरा जिला लाभतो ती स्त्रीही धन्यच.


Anupama
Wednesday, August 29, 2007 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप आवडली कथा. तुमच्या पुढच्या कथेची वाट पाहत आहे. :-)

Arch
Wednesday, August 29, 2007 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ, मला तुझ्या कथा नेहेमी आवडतात. तुझे कथांचे शेवट +ve असतात. आणि काय ग, तुझ्या गोष्टीतली सगळीच्च जोडपी एकमेकांना समजाऊन घेणारी कशी काय? :-)

Supermom
Wednesday, August 29, 2007 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स मित्रमैत्रिणींनो.
आर्च, जगात बरंच काही negative असतं. निदान आपल्या गोष्टी तरी दुसर्‍याच्या मनाला आनंद देणार्‍या, positive असाव्या असं वाटतं मला. नि तसा प्रयत्नही करते मी. कितपत सफ़ल होते देवालाच ठाऊक.

अन माझ्या गोष्टीतली जोडपी नेहमीच गोड गोड नाही वागत ग. भांडतात, पण पुन्हा ते विसरतातही. शेवटी एकमेकाला समजून घेत सोबत राहणं म्हणजेच संसार. भांडणं असली, तरी ती गोड शिर्‍याबरोबर तिखट लोणचं खावं, तितक्याच प्रमाणात हवी.


Chinnu
Wednesday, August 29, 2007 - 6:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सु. मॉ. परत एकदा fantastic! गोष्ट. धन्यवाद.

Prajaktad
Wednesday, August 29, 2007 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगात बरंच काही negative असतं. निदान आपल्या गोष्टी तरी दुसर्‍याच्या मनाला आनंद देणार्‍या, positive असाव्या असं वाटतं मला. नि तसा प्रयत्नही करते मी. कितपत सफ़ल होते देवालाच ठाऊक.

>>>>>>>कथा तर आवडलिच ! पण,वरचा संपुर्ण परिच्छेद जास्त आवडला.उत्तम विचारसरणी असली की ति लेखनात नकळतच उतरते.

Prajaktad
Wednesday, August 29, 2007 - 6:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ ! हीच कथा तुकड्यात न येता जरा सलग (पटकन)पुर्ण झालि असती तर जास्त आवडली असती. आत्ताही आवडलि आहेच!! पण,आटोपती घेतल्यासारखी वाटते..कदाचित हे फ़क़्त मलाच वाटत असेल..ऽसो २ सुपरकिड्सला सांभाळुन हेही नसे थोडके!..

Manuswini
Wednesday, August 29, 2007 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का ग आर्च, एकमेकांना समजून घेणारी जोडपी कमी असतात काय?

सुमॉ, गोष्ट छान आहे पण रागवू नकोस, मला ही आर्च सारखा जवळपास प्रश्ण होता, की खर्‍या life मध्ये खरेच असे होते काय? कीती गोड, गोड सगळे?


Supermom
Wednesday, August 29, 2007 - 7:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनू,
पण खर्‍या लाईफ़ मधे सगळी न समजून घेणारी जोडपीच असतात असे तरी का वाटते तुम्हाला?


Disha013
Wednesday, August 29, 2007 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ,कथा छान आहे गं.
तुझ्या कथांमधली नाती म्हणजे आदर्श नाती कशी असावीत याचच उदाहरण देतात.
अन असा समंजस नवरा असल्यावर डिप्रेशन्ची काय बिशाद राहण्याची!:-)


Manuswini
Wednesday, August 29, 2007 - 7:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग पण माझी ही प्रतिक्रिया तुझ्या गोष्टीवर based होती, राग नसावा पण तुझे उत्तर असे अपेक्षीत न्हवते कारण i asked you genuinly based on your story as your stories most of the time depicts relationships between husband n wife and i thought you might shed some light, if writer writes such stories he might have some ideas about the topic, he has his views. this was my thought though.
I was frank not sarcastic here. but giving honest comment is considered wrong here? not sure???
no offense!



Supermom
Wednesday, August 29, 2007 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनू, माझे उत्तरही sarcastic नाही ग. असे का वाटले तुला? माझ्या म्हणण्याचा इतकाच अर्थ होता की दोन्ही प्रकारची जोडपी असतात जगात.तुला प्रामाणिक उत्तरच दिले मी. फ़क्त ते प्रश्नाच्या रूपाने दिल्याने गोंधळ झाला बघ.

Manuswini
Wednesday, August 29, 2007 - 8:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो गोंधळ झाला बघ खरेच. पण हरकत नाही ग. खरे तर आतापर्यंत तुझ्या कथावरून एक तुझी image झालीय माझ्या मनात. जरी प्रत्येक्षात ओळख नसली तरी आवडीने इथे येवून तुझ्या कथा वाचून तुला प्रतिक्रीया द्याव्याश्या वाटतात कारण फक्त तुझी 'image' आहे जी माझ्या मनात नाहीतर मी सहसा Avoid करते ग कोणाला प्रतीक्रिया लिहिणे. हरकत नाही.

पण एक सांगते picture असो वा काही एखादा लेखक किंवा दिग्दर्शक ह्याच्याकडून अपेक्षा असतात आणि त्यांचे काम(गोष्टी किंवा movie ) हे नेहमीच कुठेतरी परीणाम करतात बघ. आहे की नाही हे यश तुमचे!.
म्हणजे साध्या साध्या simple relationship चे कंगोरे ज्याचा आपण विचार करत नाही आणि वाचताना हो, असे वागणे चुकीचेच आहे वगैरे पटते त्या कथेतून जे सहसा कळणार नाहे किंवा वळणार नाही.

बरे राहुदे उगाच वाढली बघ माझी post .
Goodluck तुझ्या पुढील कथेला.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators