|
Daad
| |
| Thursday, August 30, 2007 - 4:02 am: |
| 
|
सुमॉ, अजून एक सुंदर कथा. नेहमी सारखा पॉझिटीव्ह शेवट्- मला आवडणारा. मध्ये जरा जास्तं गॅप पडली त्यामुळे आणि तुझं लिखाण आवडतं त्यामुळेही, मलाही ही कथा जरा झटपट संपल्यासारखी वाटली. कुठे तिला अजून फुलायला वाव होता, ते आत्ता सांगता येत नाहीये. पण विचार करून सुचलच, तर नक्की मेल करेन. लेखकाला आलेले अनेकानेक अनुभवातले वेचक कोणते अनुभव वापरायचे, तेही कशा प्रकारे.... ह्यातूनच मुळी त्या त्या लेखकाची हातोटी ठरते. सुमॉला अधिक जोडपी समंजस दिसली असतील असं नाही. कदाचित नेमका उलटाच अनुभव असेल. पण तो अनुभव वापरून त्यातून लिहिलेली गोष्टं.... ही अशी "जोडप्याने कसं वागायल हवं" हे सांगणारी होऊ शकते. हे माझं मत हं! सुमॉबाई, तू काय म्हणतेस?
|
Psg
| |
| Thursday, August 30, 2007 - 4:54 am: |
| 
|
सुमॉ, आवडली गोष्ट. मला पण आवडतात समंजस प्रेमळ जोडपी डिप्रेशन हा फ़ार गंभीर आजार आहे. त्यावर स्वत्:च मन खंबीर करून, योग्य ते उपचार घेऊन आणि मायेच्या माणसांबरोबर राहून नक्कीच मात करता येते. positive शेवट आवडला.
|
Arc
| |
| Thursday, August 30, 2007 - 4:54 am: |
| 
|
मला कथा अशी वाटलिच नाही. some how कथा सुरु होउन समपलि तरि पुर्ण जालिये असे वाटलेच नाही.
|
Princess
| |
| Thursday, August 30, 2007 - 5:02 am: |
| 
|
कथा छान आहे. पण तुमच्या इतर कथांच्या मानाने डावी वाटते. कथाबीज उत्तम पण कथा फुलली नाहीये असे मला वाटते. खुप गॅप पडल्यामुळेही असे वाटत असेल कदाचित.
|
Chetnaa
| |
| Thursday, August 30, 2007 - 5:40 am: |
| 
|
सुपर मॉम, छान कथा...
|
Kashi
| |
| Thursday, August 30, 2007 - 7:23 am: |
| 
|
सुमाॅ, मस्त आहे कथा.... आवडली.
|
Supermom
| |
| Thursday, August 30, 2007 - 1:29 pm: |
| 
|
सगळ्या मित्रमैत्रिणींचे आभार. शलाका, माझ्या गोष्टींमधली अधिकाधिक जोडपी समंजस आहेत असं सगळ्यांनाच वाटतंय. मला मात्र ती नॉर्मल जोडपी वाटतात. भांडणारी पण वेळी मतभेद मिटवून टाकणारी. सगळ्यांनाच असं वाटायचं कारण कदाचित असंही असेल ग, की माझं मत आपल्या जनरेशनच्या नवर्यांबद्दल खूप चांगलं आहे. आधीच्या जनरेशनपेक्षा ही पिढी बायकांना जास्त समंजसपणे वागवते असं मला नेहमीच वाटत आलंय. माझे स्वतः चे वडील, काका, तसंच त्या पिढीतली काही माणसं यांच्या निरीक्षणातून हे मत बनलंय. उदा. आज स्वैपाकाचा कंटाळा आलाय म्हटल्यावर चल, पिझ्झा बोलावू या. हे अगदी सहजपणे म्हणणं, किंवा मुलांना वाढवण्याची जबाबदारी अर्धी स्वतः हून उचलणं,घरी कोणी पाहुणे येणार म्हटल्यावर बायकोला मदत करणं या गोष्टी ही पिढी अगदी सहजपणे करून जाते. आधीच्या पिढीत हे दुर्मिळ होतं. निदान मी तरी हे बघितलंय. याचा अर्थ ती पिढी वाईट होती असा मुळीच नाही.(यावर एक वाद सुरू व्हायचा नाहीतर) त्या पिढीच्या वेळी एकत्र कुटुंब जास्त होती. तेव्हा त्यांचे प्रॉब्लेम्सही वेगळे होते. तर हे माझं आत्ताच्या नवर्यांबद्दलचं चांगलं मत गोष्टींमधे उतरत असेल कदाचित. अन हो, आपल्या जनरेशनमधे मी खूप चांगल्या स्वभावाचे, समंजस नवरे बघतेय (.. जसे माझे भाऊ, जिजाजी, आणि अर्थातच पतिदेव) हे अगदी खरंच.
|
Runi
| |
| Thursday, August 30, 2007 - 7:17 pm: |
| 
|
सुमॉ मला वाटते की तुझे आभार प्रदर्शनाचे भाषण झालेय त्यानंतर देतेय मी माझी प्रतिक्रिया. मी नेहमी तुझ्या कथा वाचते आणि मला त्या आवडतात. ही कथा पण आवडायला लागली होती पण तेवढ्यात ती अनपेक्षीतपणे संपलीच. तु कथा लवकर संपवलीस असे मला वाटले. खर तर मला वाटत होते की ही कथा मुलीच्या डिप्रेशन बद्दल आहे. त्यामुळे मला तिचा संपुर्ण प्रवास (म्हणजे ती पुर्ण बरी होईपर्यंतचा प्रवास, तिची आणि तिच्या नवर्याची मानसिक स्थिती, त्यातले बदल असे सगळे) आणि त्यात तिला नवर्याची मिळालेली साथ असे अपेक्षीत होते. अशी अपेक्षा ठेवल्यामुळे कदाचीत कथा लवकर संपली मला असे वाटले.
|
Sashal
| |
| Thursday, August 30, 2007 - 9:01 pm: |
| 
|
मी पण गोष्ट उशीराच वाचली .. इथे +ve attitude दाखवलाय तो सगळ्यांत मोठा plus point वाटतोय गोष्टीचा .. पण तिला depression यायचं कारण नीट कळलं नाही .. मला काही मानसोपचारातलं ज्ञान नाही, पण काहितरी ठोस कारण असायला हवं ना depression येण्यामागे .. ते नीट explain झालं नाही आणि तीची recovery पण गुंडाळली गेली हे नक्की ..
|
Panna
| |
| Thursday, August 30, 2007 - 9:10 pm: |
| 
|
सुमॉ, मस्त आहे कथा!!
|
Supermom
| |
| Thursday, August 30, 2007 - 9:43 pm: |
| 
|
रुनी, मला तिच्या डिप्रेशनचा पूर्ण प्रवास दाखवायचाच नव्हता ग. मुळात हे असे आजार परदेशात जितक्या सहजपणे घेतले जातात तितके अजून आपल्याकडे घेतले जात नाहीत. साध्या मानसिक दुखण्याची सुद्धा 'वेड' म्हणूनच संभावना केली जाते. नवीन नवीन संसार असताना झालेल्या या आजाराचा दोघांच्या नात्यावर परिणाम, अन समंजस नवर्यानं तिची अवस्था सहानूभूतीनं जाणून घेणं इतकंच सांगायचा प्रयत्न केला मी. माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीच्या सांगण्याप्रमाणे काही लोकांना सगळं सुखाचं असूनही डिप्रेशन येतं. त्याचा परिणाम होतो मनावर, पण दुखणं हे मेंदूतल्या काही केमिकल्स चा imbalance झाल्याने येतं. माझ्या माहितीप्रमाणे या द्रव्याचं नाव serotonin हे आहे. अर्थात मी डॉक्टर नसल्याने यावर जास्त explain करण्याची माझी पात्रता नाही. अन सशल, तिची recovery दाखवलीच नाहीय ग मी. नुसती सुरुवात दाखवलीय recovery ची. त्यामुले गुंडाळायचा प्रश्नच नाही. हं, शेवट गुंडाळलाय असं बर्याच जणांना वाटतंय, तेव्हा ती काळजी घेईन मी यापुढे. तू म्हणतेस तसा तिचा positive attitude अन इतक्या त्रासात नवर्याचं तिच्यावरचं प्रेम अन त्याची तिच्या मनाला नव्याने होणारी जाणीव हे चित्रित करायचा प्रयत्न होता माझा. तो बहुतांशी फ़सलेला दिसतोय.
|
Sashal
| |
| Thursday, August 30, 2007 - 9:46 pm: |
| 
|
Supermom , फ़सला नाहिये अजिबात .. गोष्ट छानच झालीये लिहून ..
|
Daad
| |
| Friday, August 31, 2007 - 1:00 am: |
| 
|
सुमॉ, नाही नाही. प्रयत्नं फसलेला नाही. मुळीच तसं वाटून घेऊ नकोस. सशल म्हणतेय तसं रिकव्हरीच्या पॉइंटपासूनच थोडी पळाली गोष्टं. तुझा उद्देश हेता की- 'तिच्या नवर्याच्या प्रेमाची नव्याने झालेली जाणीव, स्वत्:चा पॉझिटीव्ह attitude जागृत होणं, ह्यातून तिने सावरायला केलेली सुरूवात' दाखवायची आहे... नेमकं त्या तिथे तुला कदाचित अजून फुलवता आली असती का? आमचं ठीकय गं. वाचून इथे हे हवं आणि तिथे ते- सांगणं सोप्पय. लिहिणं कठीण आहे. आणि आवडलेल्या लेखकाचं अजून वाचावं असं वाटत रहाणं चांगलं लक्षण आहे. तुझ्या गोष्टी वाचल्या की खरच एक उभारी येते, हे नक्की.
|
Runi
| |
| Friday, August 31, 2007 - 2:53 am: |
| 
|
सुमॉ कथा फसली नाही काही, लवकर संपली असे वाटतेय, सगळ्यांच्या प्रतिक्रीया अशाच आहेत. बाकी दाद म्हणते ते खरय.
|
मला अस वाटत कि, डिप्रेशन हे तिच्या रिकामपणातुन निर्माण झाल आले, तो पन १ मार्ग आहे कि तिनि परत काहि तरि काम करुन डिप्रेशन कमि केले असते सोबत औषध आणि नवर्याचे प्रेम तर सोबत होतेच. असो कथा एकदम मस्त झलि आहे.
|
Amruta
| |
| Friday, August 31, 2007 - 10:12 pm: |
| 
|
सुमाॅ गोष्ट आवड्ली. आणि तुझ्या आपल्या पिढीच्या नवर्यांबद्दलच्या मताला पुर्ण अनुमोदन
|
Chetnaa
| |
| Saturday, September 01, 2007 - 3:02 am: |
| 
|
सुमॉ, छान जमलिय ग कथा... फ़सलिय असा विचार नको करुस... तुला जे मांडायचय ते छान मांडलं आहेस... इथे सर्वांच्या सल्ल्याने लिहिणार्यांची आणखी प्रगती होइल असे मला वाटते... आणि दाद ला अनुमोदन....
|
तुझी लिहीण्याची शैली छानच आहे सुमॉ. फक्त ही recovery ची process इतकी सहज सुरू होताना दिसत नाही खर्या आयुष्यात, हे दुर्दैव. Denial मधेच बराच काळ दवडला जातो. औषधं घेतली जात नाहीत. आणि सगळंच कठीण होवून बसतं. मला तरी या कथेतली नायिका एकूण वर्णनावरून ज्याला clinically depressed म्हणतात तशी झाल्यासारखी वाटलीच नाही. हे normal माणसाला कधीमधी जाणवणारं मळभ आहे. चुभूद्याघ्या.
|
Mrinmayee
| |
| Saturday, September 08, 2007 - 2:44 pm: |
| 
|
सु. मॉ. तुझ्या कथा इतक्या सहज आणि ओघवत्या भाषेत असतात की वाचायला मजा येते. ह्या कथेच्या स्टोरीलाईन बद्दल पु. लं च्या भाषेत.."माझा मत स्वातीशी एकदम जुळते". क्लिनिकल डिप्रेशन पेक्षा ज्याला 'फावला वेळ सिंड्रोम' म्हणता येईल, तसं काहीसं नायिकेला झाल्याचं वाटलं. रागवु नकोस!
|
|
|