|
Shyamli
| |
| Tuesday, August 28, 2007 - 5:48 am: |
|
|
असा रदिफ सुचणेसुद्धा सोपे नसते आठवणींचे उरात ओझे होते अवघड आभासातुन संगत जपणे सोपे नसते||>>> आणि उसासा वाह... वृत्त कोणतं आहे? कळल नाही मला
|
Mankya
| |
| Tuesday, August 28, 2007 - 6:42 am: |
|
|
व्वाह ... " सोपे नसते " आवडली सतीश . गझलही सहज लिहणे सोपे नसते ! ' उसासा ' साठी बैरागी तर ' संगत ' तसेच वृत्ताबाबत श्यामली ला मोदक ! माणिक !
|
आईशप्पत! वैभव गज़ल वाचत असताना चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या शेरांनी मिळून चढता परीणाम झालाय. त्यामुळे सहावा शेर वाचल्यावर आपोआप आलेली ही प्रतिक्रिया. बाकीचे शेर ठीकठाक. आणि एक, तू मात्रावृत्तात लिहीलेले मी वाचले नव्हते कधी. ती गणवृत्तांतल्या लयीतली हृदयाच्या ठोक्यांना झोक्यावर बसवल्यासारखी जी एक गम्मत तुझ्या नेहमीच्या कवितांत असते ती मिसिंग आहे. अर्थात कल्पना आणि शब्द याबद्दल बोलायचे काम नाही.
|
सतीश, छान आहे गज़ल. मतल्यात काहीतरी गडबड आहे. बाकी मस्तच.
|
Desh_ks
| |
| Tuesday, August 28, 2007 - 7:32 am: |
|
|
बैरागी, श्यामली, माणिक, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! श्यामली, माणिक, माझ्या मते हे मात्रावृत्त आहे. प्रत्येक ओळीत २४ मात्रा. बैरागी, तुमचं "मतला येऊ द्या" वाचलं आणि मग ध्यानात आलं की पहिल्या दोन ओळी मतल्याच्या म्हणता येणार नाहीत. तुमच्या सूचनेनुसार मतला लिहिला आहे, मत अवश्य द्यावं. "चांदण्यातला दाह सोसणे सोपे नसते जळताना दरवळून जाणे सोपे नसते" या मतल्याचं श्रेय, बैरागी, तुमचं आहे. -सतीश
|
Mankya
| |
| Tuesday, August 28, 2007 - 8:00 am: |
|
|
जियो ... सतीश ! फक्त मतल्याला ही दाद आहे बरं ! सानी मिसरा अगदी निकट स्पर्श करून तरी हेलावून .. मागे खळबळ ठेवून गेला ! माणिक !
|
Psg
| |
| Tuesday, August 28, 2007 - 9:09 am: |
|
|
सतीश, छान आहे गजल.. मतला तर जमला आहे!
|
हम्! अब कुछ बात बनी सतीशजी.
|
Shyamli
| |
| Tuesday, August 28, 2007 - 12:35 pm: |
|
|
जळताना दरवळून जाणे.......>>>> वा वा !
|
Chinnu
| |
| Tuesday, August 28, 2007 - 2:06 pm: |
|
|
सतीश बहोत अच्छे! एकदम आवडेश.
|
Pulasti
| |
| Tuesday, August 28, 2007 - 3:10 pm: |
|
|
वैभव - खुमार, आरपार आणि बोली मस्तच! सतीशजी - उत्तर, उसासा, ध्रुवतारा, गुंता - क्या बात है!
|
Pulasti
| |
| Tuesday, August 28, 2007 - 3:12 pm: |
|
|
"तोरा" का परक्या दु:खात रहावे? आपण आनंदात रहावे! वय झाले, का वणवण करता? देवा - देव्हार्यात रहावे किरणांनी हळवे व्हावे अन - दव थोडे पानात रहावे भांडण झाले घोर तरीही येत रहावे, जात रहावे घोटावी ही लाळ किती रे का कोणाचे खात रहावे? कानावरती हात धरोनी गाणार्याने गात रहावे! नशिबाने हे पदरी पडले का आम्ही तोर्यात रहावे? श्वासांचा नसतोच भरवसा जगताना लक्षात रहावे -- पुलस्ति.
|
पुलस्ती जियो! तुमच्या लिखाणात जगण्याची एक मुळातून आलेली समज आणि त्याचा सहज स्वीकार जाणवतो, तो फार भावतो मला. बाकी गज़लेच्या व्याकरण दृष्टीने सांगू शकत नाही पण काव्य म्हणून प्रत्येक शेर केवळ सुरेख.
|
Desh_ks
| |
| Wednesday, August 29, 2007 - 4:58 am: |
|
|
वा! पुलस्ति, वा! 'दव', 'तोरा' हे शेर खूपच छान! आणि शेवटचा तर फारच आवडला. "श्वासांचा नसतोच भरवसा जगताना लक्षात रहावे" अगदी "मरणाचे स्मरण असावे" आठवलं. -सतीश
|
Bairagee
| |
| Wednesday, August 29, 2007 - 5:32 am: |
|
|
चांदण्यातला दाह सोसणे सोपे नसते जळताना दरवळून जाणे सोपे नसते सतीश, बहोत अच्छे.तांत्रिक गोष्टींत जास्त न गुंतवता एवढेच म्हणेन की पुढच्या वेळेस जरा अधिक कठीण यमके घेऊन बघा. आव्हान म्हणून. दाहणे, ऐकणे असे (अणे ही अलामत) शेवटपर्यंत निभवून बघा. पुलस्ति कुठलाही अभिनिवेश नसलेली(म्हणजे आपण काहीतरी मोठे सांगतो आहोत असा), प्रांजलप्रामाणिक, सहज भिडणारी गझल आहे. फार आवडली.
|
Shyamli
| |
| Wednesday, August 29, 2007 - 5:54 am: |
|
|
मस्त गझल पुलस्ति, आवडली
|
Psg
| |
| Wednesday, August 29, 2007 - 7:09 am: |
|
|
भांडण झाले घोर तरीही येत रहावे, जात रहावे मस्त! पूर्ण गजलच सुरेख पुलस्ति!
|
प्रतिक्रियेबद्दल सर्वांचेच आभार . सतीश चांदण्यातला दाह सोसणे सोपे नसते जळताना दरवळून जाणे सोपे नसते ह्यात मतल्यात दीर्घ अक्षरावर अलामत भंग होतेय . ( सोसणे आणि जाणे ) तांत्रिक बाब म्हणून नाही पण गज़लच्या आकृतीबंधात अलामत भंग केलीच तर ती लघू अक्षरावर करावी असा संकेत आहे . नाहीतर कवितेत व गज़लमध्ये फारसा फरक उरत नाही असं माझं मत . उसासा चा शेर मस्त उतरलाय . पुलस्ति .. तुम्ही गैरसमज करून घेणार नाही अशी खात्री आहे म्हणून लिहीतो . मतल्यात परदुःखाकडे दुर्लक्ष करावे असं म्हणणं आहे का ? देवाचा शेर मला कळला नाही . किरणांनी हळवे व्हावे अन - दव थोडे पानात रहावे छान ! घोटावी ही लाळ किती रे का कोणाचे खात रहावे? ह्यामध्ये " ही " आणि " रे " हे भरीचे वाटतात . कानावरती हात धरोनी गाणार्याने गात रहावे! छान वापर केलाय . मला इथे तो further कानावरती हात ठेवुनी असा लिहावासा वाटला . म्हणजे मराठीतल्या वाक्प्रचाराचा अर्थपूर्ण वापर होईल असे वाटते नशिबाने हे पदरी पडले का आम्ही तोर्यात रहावे आपण generally पदरी पडले हे नाईलाज झाला अस म्हणताना वापरतो . त्यामुळे कुणी " तोरा " मिरवू शकेल असं वाटत नाही . म्हणजे नशिबाने सर्वस्व लाभले तर त्याचा तोरा करू नये असं जास्त सुसंगत वाटतं त्यामुळे सानी मिसरा परिणामकारक होण्यासाठी उला मिसरा positive मूड चा यायला हवा असं वाटतं चू . भू . दे . घे .
|
Desh_ks
| |
| Wednesday, August 29, 2007 - 8:30 am: |
|
|
सर्वांचे प्रतिक्रियांबद्दल आभार. बैरागी आणि वैभव, अलामत भंग होतो हे खरंच. शिवाय वैभवच्या सांगण्यातून अलामत भंगाच्या संदर्भातला संकेत (मला) नव्याने कळाला. धन्यवाद. अलामत भंग होत असलेले शेर पुन्हा लिहून पाहिले आहेत. मार्गदर्शनाबद्दल अपेक्षा आहेच. चांदण्यातला दाह सोसणे सोपे नसते, जळताना दरवळत राहणे सोपे नसते (मला वाटतं की 'जळताना' बरोबर 'दरवळून जाणे' पेक्षा 'दरवळत राहणे' अधिक योग्य आहे अर्थाच्या दृष्टीनंही) 'आभासातुन संगत जपणे' हे योग्य आहे का? 'आभासातुन साथ राखणे' हा पर्याय सुचला पण मला 'संगत जपणे' हे अधिक अर्थपूर्ण वाटतं. 'अवघड तेही टाकुन देणे' च्या ऐवजी 'अवघड टाकुन सुखे राहणे' असं केल्यास अलामत राखली जाते असं वाटतं. -सतीश
|
Giriraj
| |
| Wednesday, August 29, 2007 - 10:11 am: |
|
|
वैभव,मला वाटते की 'परक्या दुःखात' म्हणजे परक्याने दिलेल्या त्रासाला,दुःखाला का म्हणून कवटाळून रहावे.. आनंद हा आतून यावा... कुणी तुम्हाला दुःखी करून जावं इतके हलक्या हृदयाचेही नसावे.. पदरी पडले बद्दल अनुमोदन रे!
|
|
|