Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मराठी गझल

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » श्रावण » काव्यधारा » मराठी गझल « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through August 28, 200720 08-28-07  5:38 am
Archive through August 29, 200720 08-29-07  10:11 am

Pulasti
Wednesday, August 29, 2007 - 11:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, तुझ्या सूचनांबद्दल गैरसमज कसला अरे! त्यांची तर वाट पहात असतो मी...
मतल्यातली अस्पष्टता अगदी कबूल आहे. मतला अजून नाहीच जमत आणि गझल टाकण्याचा मोह तरी टाळता येत नाही. पुढची गझल मतल्याची पूर्ण खात्री झाल्याशिवाय नाही पोस्टणार.
लाळ मधे "ही" भरीचा आहे खरा. पण "रे" मला नाही तसा भरीचा वाटत. असे केले तर - "रे घोटावी लाळ कशाला?"
कान - ठेवुनी जास्त चपखल बसतं पण मग व्रुत्त भंगत ना :-(
पदरी - मला "पदरी पडणे" हे नाईलाजापेक्षा "न मागता" असं जाणवत राहिलंय. पण तुझा मुद्दा कळला, विचार करतो. एवढ्यात बदलावंस नाही वाटत पण...
खूप खूप धन्यवाद वैभव!
-- पुलस्ति.

Pulasti
Wednesday, August 29, 2007 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा, बैरागी, पूनम, सतीशजी, श्यामली, गिरी - प्रतिसादांबद्दल सार्‍यांचे आभार!
-- पुलस्ति.

Bairagee
Wednesday, August 29, 2007 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, चांगले मुद्दे मांडले आहेत. अलामतीबाबत म्हणायचे झाले तर हा 'देणे' आणि 'पाहणे' असे काफिये वापरण्याबाबत अनेकांचे दुमत आहे. मी स्वतः असे काफिये वापरणार नाही. पण उर्दूत असे काफिये आजकाल सर्रास वापरले जातात. असे काफिये वापरले तर हरकत नाही असे मराठीतल्या काही जाणकारांचे मत आहे. स्वरयमकांपेक्षा, सौती काफियांपेक्षा हे बरे. गझलेच्या तंत्रावर हुकमत सरावाने येईलही पण गझलचे स्पिरीट शेरात हवे. ते सतीश ह्यांना साधते आहे हे महत्त्वाचे. तंत्रात हे स्पिरीट गुरफटून मरता कामा नये.

'ही' आणि 'रे' सारखे भरीचे शब्द टाळावेत, हे खरेच. विशेषतः नियमित गझल लिहिणाऱ्यांना पुन्हापुन्हा ह्या आणि अशाप्रकारच्या गोष्टी सांगाव्या लागू नयेत.

पुलस्तिंचा मतला थोडा सटायरिकल आहेसे मला वाटते. परदुःखाने त्रासणे कवीचे लक्षण आहे. त्यामुळे त्यांना सटायरिकल अर्थच अपेक्षित असावा."माझे एवढे सगळे चांगले चालले असताना परक्या दुःखाने एवढा त्रास का करून घ्यावा?" असे त्यांना म्हणायचे असावे.नसल्यास अजब ह्यांनी एके ठिकाणी सुचविलेली दिशा योग्य होती.

कानावरती हात धरोनी
गाणाऱ्याने गात रहावे!
सूर नीट लागावा म्हणून गवई गाताना कानावर हात धरत असतात, ठेवत नसतात. त्यामुळे वरील शेरात 'हात धरोनी' एकंदर प्रतिमाविश्वाशी मला सुसंगत वाटते आहे. आजबाजूला काय होते आहे हे विसरून, देहभान विसरून आपण आपले तल्लीन होऊन गात रहावे असे कदाचित पुलस्ति ह्यांना म्हणायचे असावे. पण 'कानावरती हात ठेवुनी' घेतल्यास शेर हझलेचा होईल असे मला वाटते. "आपण बेसूर गातो हे लक्षात ठेवून गाणाऱ्याने कानावर हात ठेवावा, सुरांकडे दुर्लक्ष करावे आणि गात रहावे," असा काहीसा अर्थ होईल. चू. भू. द्या. घ्या.

नशिबाने हे पदरी पडले
का आम्ही तोऱ्यात रहावे
ह्या शेरात कवीला बहुतेक 'न मागताही मिळून गेले' असे म्हणावयाचे असावे. केवळ 'पदरी पडणे' ह्या वाक्प्रचाराचा प्राप्त होणे, मिळणे असा सरळ अर्थही आहे. उदा. आज ते पुस्तक अखेर माझ्या पदरी पडले.
'पदरी पडले आणि पवित्र झाले' असे जेंव्हा आपण म्हणतो तेव्हा मात्र अर्थविस्तार होतो आणि वैभव ह्यांना अभिप्रेत असलेला नाइलाज त्यात येतो असे वाटते. जनरली ह्या म्हणीचा पगडा आपल्यावर असावा म्हणून जनरली मनात नाइलाज येत असावा. पण पदरी पडण्याला कुठला संदर्भ आहे त्यावरून हा अर्थ बदलेल. माझ्या मते पुलस्ति ह्यांना पहिला अर्थपदर अपेक्षित असावा.असो. एकंदर चांगली चर्चा होते आहे. मजा आली.


Pulasti
Wednesday, August 29, 2007 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद बैरागी, इतक्या सविस्तर आणि मुद्देसूद प्रतिसादाबद्दल.
मतला - मला उपरोधिकच अपेक्षित आहे. म्हणून अजबनी सुचवलेला "का इतके दु:खात रहावे" हा बदल मी केला नाही. पण तो उपरोधही स्पष्ट व्यक्त होत नाहिये.. :-(
भरीचे शब्द - संबोधन, सलगी, बोलकेपणा अशा काही हेतुंमुळे योजलेला "रे" हा दरवेळी भरीचाच असतो असे मला वाटत नाही. पण अर्थात असे शब्द टाळण्याच्या प्रयत्नात अधिक जागरूक राहीन!
गात आणि तोर्‍यात - इतकं व्यनस्थित मी स्वत:ही मांडू शकलो नसतो!
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!
-- पुलस्ति.

Chinnu
Wednesday, August 29, 2007 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुलस्तीजी, गझल छानच. वरील चर्चेने बरेच उद्बोधन झाले. सर्वांना धन्यवाद.

Sanghamitra
Thursday, August 30, 2007 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पदरी पडले. बैरागींनी लिहिले तेच लिहीणार होते शब्दशः. त्या म्हणीमुळे हा पूर्वग्रह होतोय असे वाटते. पदरात चांगले वाईट काहीही पडू शकते की. नशिबाने पदरी पडले हीच द्विरुक्ती खरे तर. पदरी पडणे म्हणजेच स्वतःच्या कर्तृत्वाशी irrespective असे काहीतरी केवळ नशिबाने हातात येणे किंवा घडणे. असो. तो शेर मात्र या वादापलिकडचे काहीतरी महत्वाचे सांगतोय.

Milya
Thursday, August 30, 2007 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतिशजी : वाह गजलेची तबियत एकदम मस्त संभाळली गेलीय तुमच्या गजलेत... आवडली

पुलस्ती : छान आहे.. अतिशय सोप्या शब्दात मांडलेली गझल...


पदरी बाबत बैरागी आणि सन्मीशी सहमत... IT मधील सर्वांनाच हा शेर चपखल लागू होतो असे वाटतेय

Paragkan
Saturday, September 01, 2007 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wah ... tinhi gajala khaas aahet. tyaa nantar chi vivechane aanakhi khaas aahet!

Swaatee_ambole
Wednesday, September 05, 2007 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, ' माझ्यालेखी' अप्रतिम!
मतल्यात ' जीव लावण्याआधी केला विचार नाही' असं केलं तर? ' मी' ची द्विरुक्ती टळेल आणि अधिक सहज होईल असं वाटतं. चुभूद्याघ्या.
' असाच विष्णू तसाच परवरदिगार नाही' वाचताना तुझ्याच ' मानतो अस्तित्व पण आकार नाही'ची अपरिहार्यपणे आठवण झाली. :-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators