|
Mansmi18
| |
| Thursday, July 26, 2007 - 5:00 pm: |
| 
|
अस वाटत नाही पण.. नवरा हा प्राणी साधा भोळा असावा.. ------------------------------- १००% खर आहे
|
Zakki
| |
| Thursday, July 26, 2007 - 5:40 pm: |
| 
|
नवरा साधा भोळा आहे असे नुसते वाटते. खरे तर अत्यंत समजूतदार, बायकोचे सदैव ऐकणारा, नि तिला जास्तीत जास्त सुखात ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत असलेला असा असतो. वरील गोष्टीतून लेखिकेला तेच तर सांगायचे आहे!
|
Ravisha
| |
| Thursday, July 26, 2007 - 6:56 pm: |
| 
|
"आपली चूक आहे की नाही, याची खात्री नसतानाही जो माफी मागतो, तो शहाणा (नवरा) असतो." बापरे,इथे प्रत्येक जण आपापली अनुभूती सुरु करण्यापूर्वी supermom ,तुम्ही पुढील लिखाणाला सुरुवात करावी.(बाहुली तिच्या घरी गेली असेल तर)
|
Supermom
| |
| Wednesday, August 01, 2007 - 6:26 pm: |
| 
|
दुसर्या दिवशी नवरा ऑफ़िस मधे निघून गेला. सारी कामं उरकून मी बाल्कनीत येऊन बसले. मनात विचारांचं काहूर सुरूच होतं.या वेळी भारतात मी संस्थेत असायचे. मतिमंद मुलांच्या संस्थेत मी नोकरी करीत होते तेव्हा. नंतर एक तास मी तिथेच थोडी मदत करीत असे. विनापगारी..समाजसेवा म्हणून. हेमंतचं स्थळ आलं तेव्हा खरंतर लग्नाचा विचारही डोक्यात नव्हता माझ्या. संस्थेतल्या मुलांसाठी आपल्या पुतण्याचे जुने कपडे नि खेळणी द्यायला तो आला होता. त्याच्या बहिणीबरोबर.त्यानं माझ्यात काय बघितलं ते तोच जाणे, पण पुढच्याच आठवड्यात त्याच्या घरच्यांचा फ़ोन आला. आईबाबा एकदम खुशीतच आले. आपोआप असं सुरेख स्थळ पोरीनं पटकावलं म्हणून. पण मी जरा संभ्रमातच होते. हेमंतच्या घरचे लोक फ़ार बडे होते. बंगला, गाडी, समाजात प्रतिष्ठा...सारंच होतं. हेमंतचा मोठा भाऊ सुमंत विवाहित होता. हेमंत मधला नि धाकटी कांचन. हेमंतच्या मोठ्या भावाला नि वडिलांना माझं स्थळ पसंत नव्हतं ते आमच्या मध्यमवर्गीय परिस्थिती मुळे. आईंचा माझ्या साध्यासुध्या राहाणीवर आक्षेप होता. माझी मोठी जाऊ,अनिता, तोलामोलाच्या घरातून आलेली, फ़ॅशनेबल होती. सासरच्या इतमामाप्रमाणे रहाणं तिला जमत होतं, नव्हे त्यातच ती लहानाची मोठी झालेली होती. 'खरंच, किती सुरेख रहातात अनितावहिनी...' माझ्या मनात आलं. 'नीट सेट केलेले केस, वेगळ्यावेगळ्या पद्धतीचे ड्रेसेस,दागिने...' त्यांच्याकडे बघून मला सिरियल मधल्या बायकांचीच आठवण होत असे.मेक अप सुद्धा इतक्या सफ़ाईनं करीत की त्यांच्या मूळच्या देखणेपणात त्यामुळे भरच पडत असे. याउलट मी अगदी साधी. त्यांच्या नि आईंच्या मते बावळटच.केसांचा एक लांबसडक शेपटा नि कॉटनचे सौम्य रंगातले सलवार कमीज इतपतच माझी फ़ॅशन मर्यादित होती. नाही म्हणायला गजरे नि फ़ुलं यांची फ़ार आवड होती मला. कामावर जायचं म्हणून मंगळसूत्र देखील छोटसंच घालायचे मी. अनामिकेत चमकणारी तेजस्वी हिर्याची अंगठी इतकीच काय ती बाबासाहेब सरपोतदारांची सून असल्याची खूण. मी सिल्कचे, जरीकामाचे ड्रेसेस घालून बाहेर जावं असं कितीदातरी आईंनी मला सुचवून बघितलं होतं. पण मी ज्या वातावरणात, ज्या ठिकाणी नोकरी करत होते तिथे ते कमालीचे विशोभित दिसले असते. अन नोकरी मी सोडणार नाही हे मी हेमंतकडून कबूल करून घेतलं होतं आधीच. 'जाऊ दे ग आई. तिला आवडतं तसं राहू दे तिला... अन एरवी तुझ्या किटी पार्टीत येते ना ती तुझ्याबरोबर तुला हवे तसे कपडे घालून?..' हेमंतनंच एकदा माझी बाजू घेतली होती. 'तेच सांगते मी आईंना. अहो भाऊजी, सवय असावी लागते अशा कपड्यांची आधीपासून...' दुसर्याला लागट बोलण्यात अनितावहिनींचा हात कोणी धरत नसे. 'जाऊ दे बाई..' आई म्हणाल्या... 'तुझ्या नवर्यालाच चालतंय, तर मी कोण बोलणारी?' 'अगदी अर्ध्या वचनात आहेत हो ते तुझ्या. भाऊजी, बायकोनं अगदी भुरळ पाडलीय बघा तुम्हाला...' अनितावहिनींचं छद्मी हास्य. 'म्हणजे काय वहिनी? अहो नवर्याला भुरळ घालता येत नाही ती बायकोच कसली?' गडगडाटी हसून हेमंतनं कोपरखळी मारली होती. वहिनींच्या चेहर्यावरच्या रागानं मलाच वरमल्यासारखं झालं होतं. वरवर हसून उडवलं, तरी मला मनातून खूप वाईट वाटलं होतं तेव्हा. पण नंतर आम्ही दोघेच असताना हेमंतनं माझी खूप समजूत काढली होती. 'जाऊ दे ग. वहिनीची सवयच आहे असं बोलायची...' अन त्याच्या प्रेमळ समजावणीनं मी ही पटकन सारं विसरले होते तेव्हा. मग आता सातासमुद्रापलिकडे हे बोचरे शब्द, या जुन्या आठवणी का वारंवार घायाळ करताहेत मला? का दिवस दिवस अशी उदास बसून राहतेय मी? -अपूर्ण.
|
Runi
| |
| Wednesday, August 01, 2007 - 8:54 pm: |
| 
|
अरे वा नविन भाग टाकला. छान, सुमॉ आता पटपट पुर्ण करा बघु कथा.
|
Supermom
| |
| Tuesday, August 07, 2007 - 7:24 pm: |
| 
|
दाराचा आवाज आला तशी मी उठले. बाल्कनीतून घरात येताना माझे पाय किंचित कापत होते. दार उघडायला जाताना घड्याळाकडे बघितलं. चक्क दुपारचे चार वाजले होते. म्हणजे? चार तास मी बाहेर बाल्कनीत बसून होते? आश्चर्याच्या अन विचारांच्या भोवर्यात हेलपाटतच मी दार उघडलं.दारात हेमंत उभा होता. 'तू इतक्या लवकर कसा काय आलास आज?' 'अग,जरा काम उरकलं लवकर. चल, फ़िरवून आणतो तुला....पण तुझे डोळे इतके लालसर का दिसताहेत? रडलीबिडली होतीस वाटतं?' 'छे, रडायला काय झालंय... अन कालच फ़िरलो की बाहेर एवढे. आज घरीच बसू या. हवंतर एखादा पिक्चर घेऊन येऊ...' उसन्या उत्साहाने मी बोलून गेले खरं,पण माझ्या डोक्यात विचारांनी थैमान घातलं होतं. 'हे काय झालंय आपल्याला...इतक्या कडक उन्हात बाहेर बसलो होतो आपण. ए.सी. चालूच होता अन बाल्कनीचं दारही उघडंच. वेड्यासारखेच वागतोय आपण. सगळं ठीक चाललंय, अन हे गोंधळलेपण, ही सतत मनाला जाळणारी खंत कसली? इतके मोठे प्रश्न कोणते आहेत आपल्यासमोर? आई म्हणते तेच खरं असेल का? सुख दुखतंय तसंच काहीसं?...' विचार करतच मी तयार झाले.जीन्स वर हाताला आला तो कुर्ता चढवला, अन केसांचा एक साधासा अंबाडा बांधून निघाले. 'हे काय, मला वाटलं होतं तू कालचा नवा ड्रेस घालशील. अन केस असे काय कंटाळल्यासारखे बांधलेत? आजकाल नेहेमीसारखी मस्त हेयरस्टाईल वगैरे करतच नाहीस तू?' हेमंत मृदू स्वरात म्हणाला. एक क्षणभरच मी त्याच्याकडे बघितलं अन एकदम सारं रक्त डोक्यातच उसळल्यासारखं झालं मला. हातातली पर्स मी दाणकन टीपॉयवर आदळली. 'सरळ सांग ना, तुला माझ्याबरोबर यायला लाज वाटतेय म्हणून....' अन ताड ताड पावलं टाकत मी बेडरूममधे गेले. उशीत डोकं खुपसून माझ्या संतापाला मी वाट करून दिली. हतबुद्ध झालेला हेमंत माझ्या माघारी खोलीत आला असावा.त्याची चाहूल मला लागली, पण नंतर तो काहीही न बोलताच बाहेर गेला. थोड्या वेळाने मी उठून बाहेर आले तर तो सोफ़्यावर मान मागे टेकवून नुसताच बसला होता. डोळे मिटून. पायातले बूटही न काढता. मला एकदम भरून आलं. बिचारा किती मन राखायचा प्रयत्न करतो आपलं. काय झालंय या सहा महिन्यात आपल्याला?' त्याच्या जवळ जाऊन मी त्याच्या कपाळावर हात ठेवला. 'सॉरी. खरंच सॉरी. चुकले मी. रागावू नकोस ना. उगाचच राग आला मला... चल जाऊ या बाहेर...' नेहेमी सॉरी म्हटलं की उडवून लावणारा हेमंत आज हसला नाही. डोळे उघडून, सावरून बसत त्याने माझा हात हातात घेतला. 'तुला बरं नाहीय का?काही त्रास होतोय का? नाहीतर असं करतेस का? भारतात माहेरी जाऊन येतेस का काही दिवस?....' 'असं रे काय विचारतोस? सॉरी म्हटलं ना एकदा?...' माझे डोळे आता काठोकाठ भरून आले. 'नाही ग, तसं नाही...' हेमंतचा आवाज एकदम कातर झाला. 'मी घरी का आलो लवकर सांगू तुला? ...' घुटमळतच तो म्हणाला. 'शेजारच्या नूतननं फ़ोन केला मला ऑफ़िसमधे. तू केव्हाची उन्हात, बाल्कनीत बसली होतीस. रडक्या चेहर्यानं. तुला तिनं बाल्कनीतून हाकाही मारल्या. पण तू अगदी स्तब्ध होतीस. म्हणून तिनं फ़ोन करून बोलावून घेतलं मला.....' अवाक होऊन, मी त्याच्याकडे बघतच राहिले. डोळ्यांतून गालावर उतरणारं पाणी पुसायचेही कष्ट न घेता.... अपूर्ण.
|
Itgirl
| |
| Wednesday, August 08, 2007 - 2:03 am: |
| 
|
सुपरमॉम... कथा पुढे चालू केलीत ते छान
|
Prajaktad
| |
| Wednesday, August 08, 2007 - 6:34 pm: |
| 
|
हा भाग खुपच भावनिक आणी सुंदर जमलाय. कथेची रंगत वाढतिय
|
Supermom
| |
| Wednesday, August 08, 2007 - 8:38 pm: |
| 
|
माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. नूतननं हाका मारल्या? कधी? अन मला का ऐकू नाही आल्या? कडक उन्हात बसून बसून डोकं दुखतंय आता. पण तेव्हा अशी पुतळ्यासारखी का बसून होते मी? काय, काय चाललंय हे सारं?' भीतीनं थरथरत, विलक्षण घाबरलेल्या मनानं मी हेमंतकडे बघितलं अन पुढच्या क्षणी रडत रडत त्याला घट्ट मिठी मारली. 'हे काय होतंय हो मला? मी आजारी आहे का? वेड तर लागलं नाही मला? पण मग हे बाकीचं सारं कसं समजतंय? काय करू मी, देवा.... ' हुंदके देत मी रडत होते. अन हेमंत माझी समजूत घालत होता. 'घाबरू नकोस. आपण उद्याच डॉक्टरकडे जाऊन येऊ. काही व्हायरल तापाची वगैरे सुरुवात असेल. अग, या देशात तर कित्ती प्रगत अन पुढारलेलं आहे सगळं. उद्याच डायग्नोसिस होईल बघ. अन अगदी टुणटुणीत होशील तू.मी घेऊन जाईन तुला दवाखान्यात. आता हास बघू छानशी....' बराच वेळ तो माझं सांत्वन करत होता. मी जराशी शांत झाले. मग तो मला बाहेरही घेऊन गेला. येताना माझं मन बरंच थार्यावर आलं होतं. पण शरीर मात्र अगदी प्रचंड थकल्यासारखं झालं होतं. घरी आलो अन मी पडूनच राहिले. हेमंतनंच खिचडी लावली. त्या बिचार्याला तेवढंच यायचं स्वैपाकातलं. चार घास खाऊन मी झोपूनही गेले. दिवसभराच्या मन स्तापानं मला लगेचच गाढ झोप लागली. दुसर्या दिवशी हेमंतनं सकाळीच फोन करून महत्प्रयासानं डॉक्टरची अपॉइंटमेंट ठरवली. वेळेवर मी तयार झाले अन ऑफ़िसमधून तो मला न्यायला आला. क्लिनिकमधे बाहेर वाट पहाताना मी जरा चिन्ताक्रांतच होते. हेमंतच मधून मधून मला हसवायचा निष्फ़ळ प्रयत्न करत होता. सोनेरी केसांच्या, हसर्या डॉक्टर एलिसनं स्मितहास्यानं आमचं स्वागत केलं. माझ्या सगळ्या तक्रारी, बाल्कनीत बसण्याचा प्रसंग, सारंकाही तिनं नीट लक्ष देऊन ऐकलं. मला नीट तपासलं. तिच्या प्रसन्न चेहर्यावर नेमके कोणते भाव होते ते मला कळण्याआधीच तिनं किंचित गंभीर होऊन मान हलवली. 'यंग मॅन, आय एम रेफ़रिंग युवर वाइफ़ टु समबडी एल्स....फ़िजिकली शी लुक्स ओके टु मी....' तिनं हातात दिलेल्या कार्डाकडे आम्ही दोघंही डोळे फ़ाडून बघतच राहिलो..... 'डॉ. मायकेल ब्राऊन, सायकियाट्रिस्ट...' गाडीत जाऊन बसलो, अन मला पुन्हा एकदा अनिवार रडू कोसळलं. 'कुठल्या दिशेने चाललाय प्रवास माझा? वेडी ठरवली जाणार होते मी? चार पाच महिन्यांनी भारतात जायचं आहे. तिथे सगळ्यांची काय प्रतिक्रिया होईल हे सारं ऐकून? आधीच आपण नावडती सून आहोत...त्यात आता हे...' 'ए बाई, आता रडू नकोस ना. कालपासून किती रडतेस? तू रडलीस ना, की माझं घर रडवं होतं ग. अजून त्या डॉक्टरने सांगितलय का काही? मग कशाला इतका महापूर?' हेमंत बिचारा समजावून थकला तसं आम्ही दोघं घरी आलो. सगळा दिवस असा उदासवाणा गेला.
|
Manuswini
| |
| Wednesday, August 08, 2007 - 11:03 pm: |
| 
|
सुमॉ, Sorry to interupt you ग़ोष्ट interesting आहे. पण डॉक्टर बद्दल वाचले नी एकदम तडक गेली म्हणुन लिहिते, इथील डॉक्टरांचा अनुभव माझा भयंकर वाईट आहे, diagnose तर अगदी मठ्ठ रीतीने करतात. recent अनुभव म्हणजे माझा accident झाला तेव्हा माझी पुर्ण बाजु numb होत होती तेव्हा काय काय भयंकर गोष्ट सांगीतली(ती इथे लिहीत नाही) पण मला भीतीने खल्ले होते. माणुस त्याने आधी मरायचा. really sorry to write big post,pls continue
|
Amol_amol
| |
| Wednesday, August 08, 2007 - 11:30 pm: |
| 
|
I agree 100% with Manuswini. they wait untill u feel like you are going to die before they arrive at some conclusion. By that time you have already concluded to change the doctor.
|
Manogat
| |
| Friday, August 10, 2007 - 4:28 am: |
| 
|
Supermom, मस्त छान वेग घेतला आहे कथेने..पण मला वटत पहिल्यांदा तुमच्या कथेला इतका वेळ लागतो आहे, का ते नाही माहित. But egarly waiting for you next post
|
Nilima_v
| |
| Friday, August 10, 2007 - 4:31 am: |
| 
|
सुमॉ, ग़ोष्ट खुप छान आहे. अरे २ कुटुंब जेव्हा एक होतात तेव्हा त्यांच्यात कधी कधी खुप तड्जोड करावी लागते. मनावर ताबा मिळवणे महत्वाचे असते. मनात एकदा राग करण्याची सवय लागली की कठीण असते. बोलायला सोपे पण करायला अवगढ आहे.
|
Karadkar
| |
| Friday, August 10, 2007 - 8:02 pm: |
| 
|
सु. मॉ. अग अत्तापासुन नको लाडु करायला घेउस बरे -- लिहि आधि गोष्ट. GTG मध्ल्या लोकाना नाही लाडु मिळाले तरी चालतील.
~D ~D
|
Zakki
| |
| Friday, August 10, 2007 - 10:01 pm: |
| 
|
अहो कराडकर, स्वत:पुरते बोला, आमचे GTG होणार म्हणून तुम्ही जळत असाल, पण आम्हाला लाडू हवे आहेत! गोष्ट राहिली तरी आमच्या GTG ला त्या ऐकवतील, तुम्हाला टुक, टुक!

|
Supermom
| |
| Tuesday, August 14, 2007 - 11:49 pm: |
| 
|
पुढच्याच आठवड्यात माझ्या मानसोपचार तज्ञाच्या अपॉइंटमेंट्स सुरू झाल्या. डॉक्टर ब्राऊन अगदी म्हातारा, समजूतदार माणूस होता. त्याचा दवाखाना मनोरुग्णांचा दवाखाना वाटतच नव्हता मुळी. सगळीकडे प्रसन्न वातावरण, मोठमोठ्या खिडक्या अन तर्हेतर्हेच्या फ़ुलांनी सजलेले फ़्लॉवरपॉट्स. आम्ही आत गेल्यावर त्यानं मनमोकळं हसत आमचं स्वागत केलं. मलातर तो अगदी सांता क्लॉज सारखाच वाटला. 'या प्रेमळ शुभ्र मिशांबरोबर याला पांढरी लांब दाढी असती तर फ़क्त एका लाल टोपीचीच कमी होती' असा मजेशीर विचार माझ्या मनात चमकून गेला. डॉक्टर ब्राऊननं मला अगदी काळजीपूर्वक तपासलं. बर्याच टेस्ट्स करून घ्यायला सांगितल्या. प्रश्नांची तर भलीमोठी यादीच त्याच्याकडे तयार होती. त्या प्रश्नांना उत्तरं देता देता मी थकूनच गेले. 'वेल, माय डिअर, टेस्ट्स चे रिपोर्ट्स येऊ दे आधी. मला खात्री आहे तू यातून अगदी नीट बरी होशील. चीअर अप....' 'पण मला झालंय काय?...' धडधडत्या ह्रदयानंच मी प्रश्न केला. 'बोलू आपण त्याविषयी. काळजी करण्यासारखं काहीच नाहीय हे नक्की. हं, अन अजून दोन अपॉइंटमेंट्स अन सारे रिपोर्ट्स हे होऊन जाऊ दे आधी. मग बघू या. टेक केअर....' माझ्या खांद्यावर हलकेच थोपटत त्याने जणूकाही वेळ संपल्याची सूचनाच दिली आम्हाला. घरी आलो अन मनातले अप्रिय विचार झटकून टाकायचा अयशस्वी प्रयत्न करत मी स्वैपाकाला लागले. दोन आठवडे होऊन गेले तरी या गडबडीत भारतात फ़ोन करायला झालाच नव्हता. 'मी लावतोय ग घरी फ़ोन. तुझा स्वैपाक झाला की तुझ्याही घरी लावू या...' हेमंतनं बैठकीतूनच ओरडून सांगितलं. फ़ोन त्यानं स्पीकरवरच ठेवला होता. आईंनीच घेतला. 'अरे, किती वाट बघायची? दोन आठवडे झाले की. सगळं ठीक आहे ना रे?'... ' अग, हिला बरं नाहीय जरा...' 'अरे देवा, मग तुझ्या जेवणाखाण्याचं काय रे?....' मी हतबुद्धच झाले. बाहेरच्या खोलीत येऊन काहीतरी बोलण्यासाठी मी तोंड उघडणारच होते तोच पाठमोर्या हेमंतचा किंचित धारदार आवाज माझ्या कानी आला... 'अग आई, माझ्या जेवणाची काळजी करण्यापेक्षा ती कशी आहे हे तरी विचारायचंस.....' 'तसं नाही रे... तुम्ही दोघं एकटेच राहता ना तिथे, म्हणून म्हटलं बरं का. कशी आहे तिची तब्येत आता...? 'ताप आलाय थोडा... बाकी काही नाही. तुम्ही सगळे कसे आहात?' हेमंतनं चतुराईनं प्रश्नाला बगल दिली. 'भाऊजी, गोड बातमी असेल तर सांगा हं मोकळेपणी. बॅग भरून तयारच आहोत आम्ही. तेवढीच अमेरिकाही बघता येईल. मी करीन हो बाळंतपण....' हा आवाज अनितावहिनींचा. 'एक दिवस स्वैपाकाची बाई आली नाही तर लगेच फ़ोन फ़िरवून हॉटेलमधे ऑर्डर करणार्या ह्या. बाळंतपण कसलं करणार डोंबल्याचं?....' एव्हाना हेमंतचं माझ्याकडे लक्ष गेलं होतं. डोळ्यानंच मला गप्प बसायची त्याने खूण केली. थोडावेळ बोलून, मी झोपलेय असं सांगून त्यानं फ़ोन आवरता घेतला. ' मी झोपलेय असं का सांगितलंस ...?' ' मुद्दामच...' मला जवळ घेत त्यानं सोफ़्यावर बसवून घेतलं. 'माझ्या घरच्यांचे स्वभाव माझ्याइतके नसले तरी थोड्याफ़ार प्रमाणात तुलाही माहीत आहेत राणी. तू आहेस साधी. उगाच मानसोपचारतज्ञ वगैरे बोलून जाशील असं वाटलं मला. माकडाच्या हाती कोलीत नको...' त्याच्या म्हणीचं मला हसूही आलं अन त्याचं सांगणंही पटलं. दोन आठवड्यानी आम्ही डॉक्टर ब्राऊनकडे परत गेलो. जास्त न बोलता त्यानं विषयालाच हात घातला. 'यू आर सफ़रिंग फ़्रॉम डिप्रेशन...' पुढचं ऐकायच्या आधीच खोली आपल्याभोवती फ़िरतेय असं वाटल्याने मी बसल्या बसल्याच टेबलाचा काठ घट्ट धरला.
|
Jaijuee
| |
| Thursday, August 16, 2007 - 7:38 am: |
| 
|
छान कथा आहे हं! चालु द्यात! "सुख खुपतय" हे मात्र खरं! किंवा कदाचित असही असेल की नायिकेला स्वत:च विश्व न उरल्याने तिला घरची लागट बोलणी आठवून डिप्रेशन येत असेल किंवा...! किती तरी शक्यता आहेत ना? त्यामुळेच कथा कूल होतेय!
|
Radha_t
| |
| Friday, August 17, 2007 - 10:47 am: |
| 
|
मस्त चाललय सुपरमॉम, येउ द्या अजून
|
Manogat
| |
| Tuesday, August 21, 2007 - 5:26 am: |
| 
|
अरे आजकाल लेखक मंडळींना काय झालय, कोनिच कथा पुर्ण करत नाहि लवकर. Supermom लवकर टाक ग पुढचा भाग, आता डीप्रेशन वचणार्यांना येणार बहुतेक...
|
Supermom
| |
| Tuesday, August 21, 2007 - 1:11 pm: |
| 
|
दवाखान्यातून घरी आले अन माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं. डिप्रेशन मला का अन कसं आलं हे कळेनाच.काय कमी होतं माझ्या आयुष्यात? देखणा, प्रेमळ पती, पैसा, मानमरातब कशालाच कुठे कमतरता नसताना हे काय भलतंच आक्रीत देवानं माझ्यापुढे वाढून ठेवलं होतं? केवळ घरच्यांच्या बोलण्याने हे इतकं व्हावं हे माझ्या मनाला सयुक्तिक वाटत नव्हतं. कितीतरी घरी अशा घटना घडतात. सून अन सासरचे यांच्यात अगदी पराकोटीचे वादही असतात, पण म्हणून काय सगळे मानसिक नैराश्याने ग्रासतात थोडेच?माझ्यातच काहीतरी दोष असला पाहिजे. त्याशिवाय हे झालंच कसं? विचार करकरून डोकं फ़ुटायची पाळी आली होती.तशी मी लहानपणापासून मनस्वीच. सकाळ झाली की आधी पायरीवर नुसतीच बसून राहणार. बागेत उमललेली इवलीइवली फ़ुलं, पानांआडून डोकावणार्या कळ्या,हिरव्यागार गवतावर डुलणारे दवबिंदू... हे सारं अगदी मनात साठवून घेत कितीतरी वेळ मी बसून असायची. आईचा ओरडा सुरुच असायचा दूध घे,काही खा म्हणून. पण मी आपल्याच विश्वात हरवलेली असायची.दोघं मोठे भाऊ तर मला कायम वेडाबाई.. म्हणूनच हाक मारायचे. पण ते गमतीनं. पण ही गंमत अशा क्रूर स्वरुपात नियतीनं सत्यात उतरवायची ठरवली होती तर... डॉक्टर ब्राऊननं मला गोळ्या लिहून दिल्या होत्या. रोज एक गोळी पुरेशी आहे. त्यानं सगळे त्रास कमी व्हायला लागतील असं तो बोलला होता. हेमंतनं जाऊन लगेच त्या गोळ्या आणल्या. 'मला काहीही झालेलं नाहीय.. मी हे औषध मुळीच घेणार नाहीय...' मी अगदी ठामपणे त्याला सांगितलं. 'वेडी की काय तू?...' शब्द तोंडातून निघून गेले अन हेमंतनं जीभ चावली.माझी नजर त्यानं चुकवल्याचं लगेच माझ्या लक्षात आलं. 'म्हण ना बोल बोल.थांबलास कशासाठी? मला नकोत या गोळ्या. माझ्या वेडेपणावर शिक्कामोर्तबच होईल मग. नियमितपणे औषध घ्यायला लागले तर...' मी काय बरळत होते माझं मलाच कळत नव्हतं. 'एक शब्द न बोलता ही गोळी घे तू आधी.पुरे झाला हट्टीपणा...' माझा हात घट्ट धरून त्यानं ती गोळी मला घ्यायलाच लावली. लग्नानंतरच्या इतक्या दिवसात प्रथमच मी त्याचा राग बघत होते. त्याला घाबरूनच की काय मी मुकाट्यानं ती गोळी गिळून टाकली अन आत येऊन निजून राहिले. पडल्या पडल्याच माझा डोळा लागला असावा. मधूनच स्वैपाकघरातून भांड्यांचे, फ़्रीज उघडल्याचे आवाज येत होते. पण मी अर्धवट झोपेतच होते. उठावसं मनात होतं पण शरीरानं पार असहकार पुकारला होता. माला, माझी मैत्रीण मानसोपचार तज्ञ होती. तिच्याबरोबर एकदा मी दवाखान्यात गेले होते. तिथल्या भान हरपलेल्या, शून्यात नजर लावून बसलेल्या बायका माझ्या स्वप्नांमधे थैमान घालत होत्या. मधूनच हेमंतचा प्रेमळ हात डोक्यावरून फ़िरतोय असा भास होत होता. आईच्या लाडानं मारलेल्या हाका आठवत होत्या. सारं कसं सरमिसळ झालं होतं मनाच्या पडद्यावर... काचेचा ग्लास खळकन पडून फ़ुटल्याच्या आवाजाने मी खडबडून, पूर्णपणे जागी झाले. 'काय फ़ुटलं रे....' असं विचारतच मी स्वैपाकघरात गेले अन माझी उरलीसुरली झोपही पळाली. डोकं घट्ट धरून हेमंत जेवायच्या टेबलाजवळ खाली जमिनीवरच बसला होता. अंगात त्राण नसल्यासारखा... 'काय होतंय तुला? चक्कर येतेय का..?' विचारतच मी त्याच्या कपाळावर हात ठेवला अन चटकाच बसला मला. 'अरे, तुला किती ताप आहे... फ़णफ़णलायस अगदी..' 'सकाळपासूनच जरा कोमट वाटत होतं ग अंग. आता मात्र...' पुढचे शब्दही त्याला बोलवेनात. गळून गेल्यासारखा तो जागेवरच बसून राहिला. अपूर्ण
|
|
|