माझ्यालेखी जीव लावताना केला मी विचार नाही माफ करा ! मी तुमच्याइतका हुशार नाही तिने म्हणे सोडले जागणे माझ्यासाठी तरीच नजरेत राहिला तो खुमार नाही कधीच नाही रंग बदलला कुणामुळे मी कधीच गेलो कुणातुनी आरपार नाही तिला विचारून या अगोदर किंमत माझी नंतर लावा बोली , माझा नकार नाही निष्प्रभ ठरले हसवायाचे प्रयत्न सारे प्रारब्धाच्या रुसण्यालाही सुमार नाही तुझ्या दुकानी नाहीतर मग दुज्या दुकानी नवस फेडतो ... ठेवत काही उधार नाही माझ्यालेखी निराकार हा , निराकार तो असाच विष्णू , तसाच परवरदिगार नाही
|
Psg
| |
| Wednesday, August 22, 2007 - 6:43 am: |
| 
|
वाह वैभव! सुरेख.. तिने म्हणे सोडले जागणे माझ्यासाठी तरीच नजरेत राहिला तो खुमार नाही .. हा शेर फ़ार आवडला!
|
Mankya
| |
| Wednesday, August 22, 2007 - 8:07 am: |
| 
|
वैभवा .. सकाळ सजवली या गजलेने माझी ! जियो ! मतल्यावर आपण एकदम फिदा .. सहजता क्लाSSस ! खुमार .. छानच, आवडला ! किंमत .. तूफान आवडला ! कायम लक्षात राहील हा ! नवस फेडतो .. लयीत थोडासा कमी पडतोय ( माझं मत ). अर्थ भावला ! निराकार .. हा सहीच ! माणिक !
|
Princess
| |
| Wednesday, August 22, 2007 - 9:25 am: |
| 
|
वैभव... जबरदस्त. सकाळी (भल्या सकाळी वाचली तेव्हा) नवसाचा शेर नव्हता ना....तसेच जास्त छान वाटत होते. गझल खुप छान आहे. मला खुप जास्त आवडलेले शेर म्हणजे खुमार आणि किंमत. आजकाल तुम्ही खुप कमी लिहिताय गुरुजी. लिहित राहा. छान वाटते तुमच्य कविता वाचायला.
|
Chetnaa
| |
| Wednesday, August 22, 2007 - 9:35 am: |
| 
|
वैभव... छानच... खुमार, किंमत आणि प्रारब्ध... सही
|
Chinnu
| |
| Wednesday, August 22, 2007 - 3:27 pm: |
| 
|
वैभवा, चव आली ही गजल वाचून! तुझ्या दुकानी, नायतर दुज्या दुकानी!!! 
|
Daad
| |
| Wednesday, August 22, 2007 - 11:33 pm: |
| 
|
गज़ल प्रच्चंड आवडली. बोली, प्रारब्ध मस्तच. पण 'निराकाराने' जीव गेला! आता कुणीतरी मला मदत करा. मात्रांचं गणित मला वेगळंच वाटतय? जीव लावताना केला मी विचार नाही गाल गालगा गागागागा लगा लगागा माफ करा! मी तुमच्याइतका हुशार नाही गाल लगागा गागागागा लगा लगागा गुर्जी, मार्गदर्शी व्हा!
|
Shyamli
| |
| Thursday, August 23, 2007 - 4:22 am: |
| 
|
शलाका, अग मात्रावृत्त दिसतय हे,(बहुतेक) २४ मात्रांची एक ओळ ब-याच दिवसानी काहितरी छान वाचायला मिळाल.
|
सर्वांना खूप धन्यवाद . शलाका ... ही मात्रावृत्तातली गज़ल आहे . म्हणजे प्रत्येक मिसर्यातील मात्रांची संख्या सारखी , क्रम नव्हे . गा गा गा गा X ३ म्हणजे २४ मात्रांची गज़ल . रोजचे येणारे अनुभव , त्यातून सुचणारे मिसरे , शेर , कविता बर्याच वेळा खूप hard hitting होतात . बरं लिहून झाल्यावर पुन्हा तो मूड राहतोच . ( आणि तो जायच्या आत नवे अनुभव हजर असतातच ) असं हे दुष्टचक्र चालू असताना एखादे दिवशी आपण सगळीच चिंता क्षणभर बाजूला ठेवून total whacky मूड मध्ये शिरतो . अश्याच एका संध्याकाळी हा मतला सुचला . मग हा Tongue in cheek मूड गज़लभर राहिला . It was a good change for me and an overdue one
सांगायचा मुद्दा हा की म्हणून मात्रावृत्त तर मात्रावृत्त , गज़ल आहे ना .. बा SSSSSS स . अशी तयार झाली
|
Milya
| |
| Thursday, August 23, 2007 - 11:49 am: |
| 
|
वैभव मस्त पण का कुणास ठाऊक तुझ्या बाकी गझलेंच्या तुलनेत थोडी डावी वाटली मतला , खुमार आवडले.. शेवटचा शेर (मक्ता?) नीटसा कळला नाही... धुसर वाटतोय का मला झेपत नाहीये? तुला असे म्हणायचेय का? की माझ्यालेखी विष्णू काय किंवा परवरदिगार काय दोघेही निराकारच पण तसे नाहीये...
|
Devdattag
| |
| Thursday, August 23, 2007 - 1:41 pm: |
| 
|
वैभव आवडली रे.. मिल्या मी लावलेला अर्थ.. माझ्यालेखी विषणू आणि परवर दिगार या दोघांचेही अस्तित्व नाहिये, भौतिक दृष्ट्या नाहीच(निराकार) आणि पारमार्थिक दृष्ट्याही विष्णू आणि परवर दिगार दोघेही निराकार, विष्णूचेही अस्तित्व मला मान्य नाही अन परवर दिगाराचेही
|
सही रे वैभव.... आवडली गझल.. मिल्या,मलाही देवाने सांगितलाय तसाच अर्थ वाटतोय शेवटच्या ओळींचा.
|
Jo_s
| |
| Friday, August 24, 2007 - 5:05 am: |
| 
|
व्वा, वैभव मस्तच, मी ही शेवटच्या शेरा बद्दल साशंक होतो, पण देवाच स्प्ष्टीकरण वाचल्यावर तसाच अर्थ वाटू लागलाय. "सोडले जागणे" आणि "नजरेत राहिला तो खुमार नाही" ही कल्पना मस्तच आणि मजेशिरही वाटली. तिला विचारून या अगोदर किंमत माझी नंतर लावा बोली , माझा नकार नाही हेही आवडलं.
|
मिल्या .. पुढच्या वेळी काळजी घेईन रे . ( म्हणजे काय कुणास ठाऊक ! ) कारण मला लिहीताना आवडल्याशिवाय सेव्ह केलीच नसती . तरीही विचार करेन . धन्यवाद सर्वांनो . आता खुद्द देवानेच त्याच्या डबलरोल वर स्पष्टीकरण दिल्यानंतर मी पामर काय बोलणार ?
|
Yog
| |
| Friday, August 24, 2007 - 5:53 am: |
| 
|
vaibhav, छान! पण मतल्यात गोन्धळ वाटतो.
|
Daad
| |
| Friday, August 24, 2007 - 6:05 am: |
| 
|
धन्स, श्यामली, वैभवा! (व्याकरण म्हटलं की आधी 'टाईम प्लीज' - बोली- 'टॅम प्लीज' म्हणून पालथ्या मुठीला थुंकी लावून मी उलट्या दिशेने चालायला सुरूवात करते. उगीच नाही त्यात.....) ए, त्यातल्या त्यात परत एकदा वाचल्यावर बोलीचा शेर किती किती सहज वाटतो? वैभवच्याच भाषेत- 'अगदी समोर बसून बोलल्यासारखा'
|
Bairagee
| |
| Friday, August 24, 2007 - 9:48 am: |
| 
|
वा, गझल सुरेख आहे. त्यातही तिला विचारून या अगोदर किंमत माझी नंतर लावा बोली , माझा नकार नाही फार उत्तम शेर आहे. फारच आवडला. उधारदेखील. 'जीव लावताना केला मी विचार नाही ' ही ओळ म्हणताना लय जाऊ शकते. 'जीव लाव ताना केला मी विचार नाही' असे वाचले तर जात नाही. 'असाच विष्णू, तसाच परवदिगार नाही' ही ओळ जास्त ओढल्याताणल्यासारखी वाटते.
|
Manas6
| |
| Saturday, August 25, 2007 - 5:45 am: |
| 
|
कधीच नाही रंग बदलला कुणामुळे मी कधीच गेलो कुणातुनी आरपार नाही वा अतिशय अभिनव कल्पना.... मला भौतिक-शास्त्राचे तास आठवले.. तिने म्हणे सोडले जागणे माझ्यासाठी तरीच नजरेत राहिला तो खुमार नाही ..मस्तच निष्प्रभ ठरले हसवायाचे प्रयत्न सारे प्रारब्धाच्या रुसण्यालाही सुमार नाही ..वा! मक्त्याच्या शेवटी प्रश्न-चिन्ह असावे का? -मानस६
|
Desh_ks
| |
| Tuesday, August 28, 2007 - 3:47 am: |
| 
|
कुमार जावडेकरांचा "सोपे नसते" हा रदीफ घेऊन काही शेर लिहिले आहेत. त्यांचा आक्षेप नसावा ही आशा आहे. "सोपे नसते" चांदण्यातला दाह सोसणे सोपे नसते जळताना दरवळून जाणे सोपे नसते सोपे नसते साध्याशा प्रश्नांचे उत्तर मनातले नेमके सांगणे सोपे नसते नकळत केव्हांतरी निसटतो एक उसासा, मुकेपणाने वाट पाहणे सोपे नसते|| लखलखणार्या रत्नखचितशा आकाशातुन ध्रुवतारा शोधून काढणे सोपे नसते|| सभोवतीच्या झिंग आणणार्या गलग्यातुन गुंजन ह्रदयातले ऐकणे सोपे नसते|| आठवणींचे उरात ओझे होते अवघड आभासातुन संगत जपणे सोपे नसते|| कधी हरवतो विणीतला नक्षीचा धागा गुंत्यामधुनी मग उलगडणे सोपे नसते 'हे अवघड, ते अवघड' नुसते म्हणायचे, पण, अवघड तेही टाकुन देणे सोपे नसते -सतीश
|
Bairagee
| |
| Tuesday, August 28, 2007 - 5:38 am: |
| 
|
साध्याशा प्रश्नांचे उत्तर सोपे नसते मनातले नेमके सांगणे सोपे नसते नकळत केव्हांतरी निसटतो एक उसासा, मुकेपणाने वाट पाहणे सोपे नसते सहजसुंदर, सुधीर. बहोत ख़ूब. सही जा रहे हो. मतला येऊ द्या.
|