Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 24, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » श्रावण » कथा कादंबरी » मैफील » Archive through August 24, 2007 « Previous Next »

Zelam
Thursday, August 23, 2007 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१.
’जहागिरदार साहेब काय अप्रतीम झाला हो कार्यक्रम! कान अगदी धन्य धन्य झाले ऐकून.’

mall च्या दारात उभं राहून त्याची अवाढव्यता निरखण्यात मग्न असलेल्या जहागिरदारांना क्षणभर चमकल्यासारखंच झालं. इथं अमेरिकेत असं कुठेही मराठी ऐकण्याची अपेक्षा त्यांनी केली नव्हती. तरी पटकन सावरून ते म्हणाले ’तुम्ही होतात का तिथे?’
’म्हणजे काय? तुमच्या गाण्याचे निस्सीम भक्त आहोत आम्ही. शक्यतो कुठलाच कर्यक्रम चुकवत नाही. आणि नंतरच्या स्नेहभोजनाच्या वेळी आपण सांगितलेले एक एक किस्से! मजा आला.’
’thanks हं. अहो पण तो जेवणाचा कर्यक्रम निवडक लोकांसाठीच होता ना! तुमचा चेहरा आठवत नाहीये तरी.’
’अहो निवडक असली तरी होतीच की पंचवीस माणसं. तुम्ही तरी किती जणांचे चेहरे लक्षात ठेवणार? बाकी जेवण आवडलं का?’
’वा! म्हणजे काय? इथं अमेरिकेत राहूनसुद्धा तुम्ही लोक ज्या रितीनं आपली संस्कृती जपता त्याला तोड नाही. काय सुंदर होतं हो पंचपक्वान्नांचं जेवण! काय बडदास्त ठेवलीय तुम्ही लोकांनी! आणि कुठून कुठून लोक येतात! खरंच फार समाधान मिळतं अशा रसिकांसमोर आपली कला पेश करताना.’
’खरंच जहागिरदार साहेब, आम्हालाही खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. आपली अशीच कृपा राहूदे. चला येतो मी. भेटू लवकरच.’
’अहो थांबा ना. कुलकर्णी येतीलच इतक्यात गाडी घेऊन.’
’बोलेन मी नंतर त्यांच्याशी. आत्ता जरा घाईत आहे. येतो हं. नमस्कार.’

कुलकर्णींना सांगायला हवं असा विचार करताना जहागिरदाराना जाणवलं की आपण त्यांचं नावच विचारलं नाही.

२.

’हे होतय काय आपल्याला? आजकाल माणसांचे चेहरेच फारसे लक्षात रहात नाहीत. आता परवा जायचंच आहे रम्याकडे तेव्हा त्याला लगेहात हेही विचारु. अमेरिकेतून आल्यापासून दहादा फोन आलेत रम्याचे की परत एकदा full checkup due आहे म्हणून. इथे आल्यापासून इतकी गडबड चालू आहे ना! महिना झाला तरी वेळ नाही मिळालाय. शेवटी आता परवा ठरवलंच आहे त्याच्याकडे जायचं. रम्या म्हणजे ना doctor कमी आणि जेलर जास्त आहे. आपल्याला एकदा mild attack येऊन गेल्यापासून तर जास्तच जपतो. आता गळ्यासाठी थोडं पथ्य पाळणं आवश्यकच आहे पण कायमच आपलं हे खाऊ नको, ते करू नको असं माझ्यासारख्या शौकीन माणसाला कसं चालेल? तिथे अमेरिकेत तर इतका पाहुणचार झोडलाय सगळीकडे, वजन वाढलंच असेल थोडं. आता ऐका रम्याची बोलणी. बाकी जगात सगळ्याना आपल्या गायकीने धुंद करणाया या विलास जहागिरदाराला सुनावण्याचा हक्क आहे फक्त रम्यालाच. गायकीने धुंद! ह मगाशी कोण भेटलं होतं ते त्या recording studioत? हो, कुणी बापट म्हणून. तेही हेच म्हणत होते नाही का की मागच्या रविवारची मैफील फार सुंदर झाली म्हणून. आता मी काही छोट्या मैफिली करत नाही पण सगळंच काही पैशांसाठी करायचं नसतं. विराज बापट माझा पटटशिष्य. त्याच्या घरचेही सगळेच रसिक. त्याने कधी नव्हे ती विनंती केली आणि बापट मंडळी आपल्यालाही आवडतात म्हणून गुहागरला त्यांच्या मूळ घरी जाऊन आपण मैफील जमवली. आता तिथे सगळे घरचेच होते. विराजचे नातेवाईक वगैरे मिळून असतील जेमतेम पन्नास साठ जण. सगळ्यांशीच गप्पागोष्टी झाल्या. पण त्या मघाशी भेटलेल्या बापटांचा चेहरा पाहिल्यासारखं वाटत नाहीये. दोन दिवस होतो की आपण तिथे! हं पण ते बापट फक्त मुख्य कार्यक्रमासाठीच आले असतील कदाचित. त्या अमेरिकेत पण ते कोण भेटले होते त्यांचं नावही आपण विचारलं नाही. आता परवा रम्याला लक्षात ठेवून विचारलं पाहिजे असं का होतंय ते. हसायलाच लागेल तो आणि काही नाहीये रे असंच म्हणेल पण जातोच आहोत तर विचारायला काय हरकत आहे?


३.

’मी कुठे आहे?’ दोळे चोळत जागं होत जहागिरदारांनी विचारताच उशाशी बसलेल्या दोघा व्यक्तींकडे त्यांचं लक्ष गेलं.
’तुम्ही बापट ना? विराजचे नातेवाईक? Studioत भेटलेले? आणि तुम्ही? अहो तुम्ही मला अमेरिकेत भेटलेलात. तुमचं नावही विचारायचं राहिलं. इथे कधी आलात? आणि तुम्ही आणि हे बापट ओळखता की काय एकमेकाना? आणि मी कुठे आहे? इथे कसा आलो?’
’सावकाश बुवा. एवढा त्रास करून घेऊ नका. मी पाटील. हा बापट आणि मी तुमच्या गायकीचे निस्सीम भक्त आहोत आणि त्यामुळेच इथे आमची गाढ मैत्री झाली. तुम्ही इथे लवकरच येणार हे आम्हाला कळलं तेव्हा म्हटलं तुमची प्रत्यक्ष ओळख करून घेऊ म्हणजे तुम्हालाही एकटं नाही वाटणार. आता तर काय रोजच मैफीलीचा आस्वाद घ्यायला मिळणार आम्हाला.’
’काय? अहो पाटील तुम्ही काय बोलताय काही कळत नाहीये मला. बापट तुम्ही ताबडतोब विराजला फोन लावा बघू आणि इथे बोलवा त्याला.’
’take it easy जहागिरदार. विराज इथे कसा येणार?’
’कसा म्हणजे काय? असं कोड्यात का बोलताय तुम्ही? Kidnap वगैरे नाही ना केलं मला?’
’फार विनोदी आहात तुम्ही. बरं गुहागरला जी घरगुती मैफील झालेली त्याचं कारण माहितेय तुम्हाला?’
’हो. विराजच्या घरचे म्हणजेच तुम्ही बापट लोक कुणाच्या तरी स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी काहीतरी मैफील करता आणि यावर्षी पाच वर्षं झाली या उपक्रमाला. पण त्याचा इथे काय संबंध?’
’बरोबर. पण पाच वर्षांपूर्वी या उपक्रमाची सुरुवात का झालेली माहितेय? आमचं बापट कुटुंबात सगळेच गाण्यातले दर्दी. पण विराजचा चुलत काका शरद बापट खरा जाणकार. तानसेन नसला तरी खरा कानसेन. मैफीलींचं त्याला अतोनात वेड. तुमचा तर तो पंखाच. त्या शरदचं सहा वषांपूर्वी अपघाती निधन झालं. त्याला श्रद्धांजली म्हणून गेली पाच वर्ष बापट कुटुंब ही मैफील जमवतं. पहिली चार वर्ष नवोदीत कलाकारांना संधी दिली. यावर्षी विराजने तुम्हाला घाबरतच विचारलं. तुम्ही मोठ्या मनाने होकार दिलात आणि सगळे भरून पावले.’
’असं का? विराज मला मुलासारखाच आहे. त्याची विनंती कशी अव्हेरीन मी? अहो पण बापट तुम्ही please विराजला फोन करा ना आता.’
’तुम्हाला अजूनही कळलेलं दिसत नाही जहागिरदार साहेब. गुहागरला भिंतींवर टांगलेल्या तसबिरींकडेही आपलं लक्ष गेलेलं दिसत नाही. आत्ता तुमच्या समोर बसून तुमच्याशी बोलतोय तोच शरद बापट. दोन दिवसांपूर्वी studio मधून घरी परतत असताना आलेल्या heart attack च्या तीव्र झटक्याने आपलं निधन झालं. म्हणूनच हे पाटील म्हणतायत आता रोजची तुमची मैफील जमायची ती इथेच’.

समाप्त



Chaffa
Thursday, August 23, 2007 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही भिडू मस्तच एकदम.

Panna
Thursday, August 23, 2007 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान जमलीये रहस्यमय कथा!!

Kmayuresh2002
Friday, August 24, 2007 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान!!! .. .. ..:-)

Chetnaa
Friday, August 24, 2007 - 3:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेलम.... छानच आहे कथा!!!... :-)

Ana_meera
Friday, August 24, 2007 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगली जमली आहे रहस्यकथा!!

Sanghamitra
Friday, August 24, 2007 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेलम मस्त. छोटी आणि परीणामकारक. मायबोलीवर यायची भिती वाटायला लागलीय आता :-)

Psg
Friday, August 24, 2007 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह! :-)
जमली आहे कथा


Manjud
Friday, August 24, 2007 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेलम, छान आहे कथा. मनापासून आवडली.
पण थोडि अजून फुलवता आलि असती. कहितरी missing वाटतं.

मायबोलीवर गूढकथा पण यायला लागल्या. बरं वाटलं.


Swa_26
Friday, August 24, 2007 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छन जमलीय कथा keep it up!!

Daad
Friday, August 24, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानय कथा, झेलम, लिहीत रहा.

Farend
Friday, August 24, 2007 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुलमोहर वर हॅलोवीन दोन महिने आधीच? :-)
झेलम, इंटरेस्टिंग वाटली कथा.


Mankya
Friday, August 24, 2007 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेलम .. वेगळा विषय, वेगळी कथा ! मस्त !

माणिक !


Monakshi
Friday, August 24, 2007 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेलम, मस्त, अजुन येऊद्यात.

Prajaktad
Friday, August 24, 2007 - 9:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेलम ! चांगली वाटली कथा..

Sush
Friday, August 24, 2007 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेलम छान कथा,
पण एक सुचना,
कथा लिहिताना plz भयकथा असल्यास कंसात भयकथा असे लिहावे.
अशा कथा office मधे वाचताना फार काळजि घ्यावी लागते. म्हणजे त्या द्रुष्टिने काळजि घेता येइल. कारण एकदा लिन्क उघडलि की वाचायचा मोह आवरता येत नाहि.


Kashi
Friday, August 24, 2007 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेलम, मस्त... चांगली वाटली कथा..

Rajya
Friday, August 24, 2007 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठेतरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतय.

म्हणजे, कथा अशी सुरु झालीय म्हणे पर्यंत संपली?

झेलम sorry पण काय कळालं नाही
कृपया राग नसावा आणि वाद ही नसावा.


Zelam
Friday, August 24, 2007 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या अशी कशी हो कळली नाही कथा (भोकाड पसरून पाय आपटत रडणारा चेहरा) - दिवे घ्या हं please .
अहो त्यात रागावण्यासारखं आणि वाद घालण्यासारखं काय आहे? उलट तुम्ही प्रामाणिक comment दिली हे महत्त्वाचं. पुढे सुधारणा करता येईल.

सुश अहो मी भयकथा असं मुद्दामच लिहिलं नाही कारण मग वाचक ती त्याच दृष्टीने वाचतो आणि surprise element आणि त्यातून बसणारा पंच कमी होतो. please सांगाल का की तुम्हाला काय काळजी घ्यावी लागते, हा मुद्दा खरच लक्षात आला नाही माझ्या.

मंजू लक्षात ठेवीन पुढच्या वेळेस. ही लघुकथा लिहिताना मी अनावश्यक details मुद्दामच टाळायचा प्रयत्न केला आहे.

बाकी अभिप्राय आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल सगळ्यांचेच खूप आभार.


Antara
Friday, August 24, 2007 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा लिहिताना plz भयकथा असल्यास कंसात भयकथा असे लिहावे.
अशा कथा office मधे वाचताना फार काळजि घ्यावी लागते. म्हणजे त्या द्रुष्टिने काळजि घेता येइल. >>>
भयकथा वाचताना कसली काळजी!!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators