"कुठे होतीस इतका वेळ?" आश्रमात शिरल्या शिरल्या मालतीने विचारलं. "कुठे काय? बाहेर वाचत बसलेली. परीक्षा जवळ आली आहे. अभ्यास नको करायला." सरस्वती थोडीशी चिडतच म्हणाली. "केवाचे शोधतेय तुला. तुला भेटायला कुणीतरी आलं होतं." "मला? कोण?" बहुतेक पेपरम्धे कसलीतरी बातमी द्यायची असेल. "माहीत नाही. विचारलं तरी नाव सांगितलं नाही. गोरा गोरा पोरगा होता." सरस्वतीने हातातलं पुस्तक खाली ठेवलं. "कशाला आला होता?" तिच्या कपाळावर एक आठी उठली. "माहीत नाय, पण तुला भेटायचा म्हणत होता. पण तु कुठेच नाय्य दिसली. हे बघ, हे देऊन गेला." मालतीने तिच्या हातत एक पाकीट ठेवलं. कुणीतरी बातमी घेऊनच आलं होतं. सरस्वतीने पाकीट फ़ोडलं. आत एक कागद होता आणि फ़क्त एवढंच लिहीलं होतं. "सॉरी." अक्षर कुणाचं ते सांगायची गरजच नव्हती. सरस्वतीचा संताप अनावर झाला. तिने पाकीट आणि कागद दोन्ही फ़ाडून टाकले.
|
नंदिनीजी, पूर्ण जेवण हवं असणा-याला तुकडा तुकडा मिळतोय हो खायला. आणि आशा काही सुटेना पुन्हा पुन्हा रेहानच्याच दारी आपलं परत, नवी तारीख दिसते म्हणून आणि पाहिलं तर नुस्ती comment कोणाचीतरी.
|
Manogat
| |
| Friday, August 10, 2007 - 3:05 pm: |
| 
|
माझ पण असच होत अनघा, रोज याव अणि वाटत कथा असेल तर कोणाच तरी posting असत.. नंदु so now u might be knowing that people are egarly waiting for your story to complet..or to read compleet story. So we are expecting whole story now not a short threads.. please consider this as a kind request from a reader...
|
Sayonara
| |
| Friday, August 10, 2007 - 3:12 pm: |
| 
|
नंदिनी, तुझी कथा वाचून बरेच दिवस प्रतिक्रिया द्यावी की न द्यावी ह्यावर विचार करत होते. शेवटी विचार केला द्यावीच. तुझी लिहिण्याची शैली चांगली आहे आणि तुला प्रसंग चांगले फुलवताही येतात पण तुझी ही गोष्ट प्रचंड बोअर मारायला लागलीये. ना तू गोष्ट पटपट पुढे सरकवतेस ना संपवतेस. तेव्हा काय तो सोक्षमोक्ष लाव बरं.
|
Aktta
| |
| Friday, August 10, 2007 - 5:38 pm: |
| 
|
(, एक ओशाळलेला चेहेरा....)
|
पहाट होत आली होती. खिडकीतून येणारा वारा त्याच्या तोंडावर बस्त होता. "शायद आज बारिश होगी.." तो स्वत्:शीच पुटपुटला. ती अजून झोपलेलीच होती. तिला अजून माहीत नव्हतं की तो तिच्या खोलीत आहे. इतकं सुंदर नातं होतं त्याचं. जणू काही ते Made for each other . पण कुठे काय चुकलं तेच कळत नव्हतं. त्याने त्याच्या परीने, तिने तिच्या परीने खूपदा ओंजळीतून वाहणारं नातं पकडायचा प्रयत्न केला होता. पण शेवटी सगळं व्यर्थ. मात्र येणार्या या पहाटेसोबतच त्याला त्या दोघासाठी एक वगळा मार्ग दिसत होता. एक असा मार्ग जिथे ती दोघं एकत्र चालली असती. आयुष्यभर. त्याने हातातला कॉफ़ीचा कप खली ठेवला. It is time for action त्याने स्वत्:लच बजावलं. बाथरूममधे जाऊन त्याने थंड पाण्याचा शॉवर घेतला. त्याच्या केसाचं सेटींग हातानेच त्याने अस्ताव्यस्त केलं. थोडासा पिंगट रंग केसावर लावला. काळ्या काळ्या बुबुळावर निळी लेन्स चढवली. कानातली ear ring त्याने काढुन ठेवली. तो परत बेडरूममधे आला. साराच्या चेहर्यावरती केस खेळत होते. त्याने मोबाईल काढला आणि पट्कन तिचा एक फोटो घेतला. "झोपलेल्या माणसाचे फोटो काढू नये" असं त्याची आई त्याला कित्येकदा सांगायची. पण साराच्या या छबीपुढे इलाज नव्हता. तो स्वत्:शीच हसला. हॉलमधे आल्यावर त्याने हलकेच गुणगुणायला सुरुवात केली. "हम है राही प्यार के... हम से कुछ न बोलीये.." खूप दिवसानी तो इतका खुश होता. तो दरवाजा उघडून बाहेर जाणार एवढ्यात त्याच्या काहीतरी लक्षात आलं. परत बेडरूममधे येऊन त्याने "ती" डायरी उचलली. सरस्वती आणि रेहानचं पुढे काय झालं हे वाचायची त्याला जबरदस्त उत्सुकता लागून राहिली होती.. जणू काही तो पहिल्यांदाच ही डायरी वाचत होता.
|
Ladaki
| |
| Saturday, August 11, 2007 - 6:36 am: |
| 
|
मायबोलीवरील ५०१वा मॅसेज... नंदिनी कथेने छान वेग पकडलाय... ३ महीने पण संपत आलेत... त्यामुळे कथा अशीच भरभर येउ दे... //सगळ्यांना नम्र विनंती... मधेमधे तारे तोडु नका... त्यामुळे कथेची link तुटते ... ALL THE BEST... 
|
Panna
| |
| Saturday, August 11, 2007 - 2:22 pm: |
| 
|
सायो ला अनुमोदन. नंदिनी, वाचकांचा अंत नको ग पाहूस! लवकर संपव कथा.
|
नंदिनी अजुन किती लांबवणार आहेस कथा चौथा महिना सुरु झाला...
|
Aktta
| |
| Wednesday, August 15, 2007 - 6:34 pm: |
| 
|
सगळे चेहेरे संपले पन कादंबरी काय संपायच नाव घेत नाही.... एकटा...
|
Aktta
| |
| Wednesday, August 15, 2007 - 6:34 pm: |
| 
|
सगळे चेहेरे संपले पन कादंबरी काय संपायच नाव घेत नाही.... एकटा...
|
रेहान प्लीज, मला तुझ्याशी बोलायचं नाही. तू मला सारखा सारखा ऑफ़िसमधे फोन करु नकोस. I am working here ." त्याच्या उत्तराची देखिल वाट न बघता सरस्वतीने रेसीव्हर आदळला. तिने मनातल्या मनात रेहानला एक शिवी दिली. नंतर वाटलं परत फोन उचलावा आणि त्याचा आवाज ऐकावा..... रेहान हे फ़क्त वाटेत आलेलं एक स्टेशन आहे, उतरायचं ठिकाण नव्हे. तिने परत एकदा स्वत्:अला सांगितलं. त्याची माझ्या आयुष्यात काहीच जागा नाही. तो फ़क्त एक मित्र होता. जेव्हा तो मित्रापेक्षा वेगळी जागा घ्यायला लागला तेव्हा त्याला बाहेर काढणं जास्त चांगलं. माह्यासाठी पण आणी त्याच्यासाठीपण. आता तिचं कामात लक्ष लागणं शक्यच नव्हतं. एकतर बोर्ड एक्झाम जवळ आली होती. ऑफ़िसमधीही ती जितका वेळ शक्य होईल तितका वेळ अभ्यास करायची. पण आज काम खूप होतं आणि त्यातच रेहानने तिचा मूड घलवला होता. त्यालापण आताच वेळ मिळाला होता फोन करायला. तिने परत एक शिवी घातली. आणि मेलबॉक्स उघदला. सुधीर देशपांडेचं मेल आलं होतं. तिने काल त्याना मुख्यमंत्र्याच्या भाषणाचा "आतील" संदर्भ काही वेगळा आहे का? असं मेल पाठवलं होतं सुधीर देशपांडेनी अगदी व्यवस्थित मुद्देसुद उत्तर पाठवलं होतं. अर्थात त्याच्या उत्तरानी तिचं समाधान होण्यापेक्षा अजुन काही प्रश्न मनात उठले. तिने त्याना रीप्लाय केला. आठवड्त्यातून एकदातरी सरस्वती त्याना अशाच शंका विचारायची. पहिल्यादा मेल पाठवलं तेव्हा तिला वाटलं की ते कदाचित उत्तर देणार देखील नाहीत, पण तासाभरात त्याचं उत्तर आलं. सरस्वती कुलकर्णी हे नाव त्याच्या लक्षात होतं. ते मेल वाचल्यावर सरस्वती ऑफ़िसातच जोरात ओरडली होती. अख्ख्या ऑफ़िसने तिला इतकं खुश केव्हाच पाहिलं नव्हतं. मेल सेंड करण्या आधीच तिचा मूड परत उजळला. आजचा तिचा विषेश लेख मस्त जमणार होता. तिला लिहायच्या आधीच जाणवत होतं. तिची नजर स्क्रीनवरून फ़िरत होती आणि दूर कुठेतरी तो मात्र तिने आदळलेल्या रीसीव्हरनंतर त्या फोनकडे नुसताच बघत बसला होता. एकटक.
|
Zakki
| |
| Friday, August 17, 2007 - 6:19 pm: |
| 
|
च्च, च्च. बिचारी सरस्वति. इतके सगळे चांगले चालले असताना मधेच रेहान! पूर्वी एका 'वीक मोमेंटला' भेटून तिच्या मनाचे कायमचे खेळणे करून गेला. कितीदा नको म्हंटले तरी मन वढाळ, वढाळ!
|
Aktta
| |
| Friday, August 17, 2007 - 7:18 pm: |
| 
|
तुमचा शतषा रुनी आहे मी..... एकटा...
|
Tiu
| |
| Friday, August 17, 2007 - 7:32 pm: |
| 
|
लिहिण्याची शैली चांगली आहे... interesting ...पण स्टोरी काय पुढे सरकत नाहीये... नंदिनी, तु कथा लिहुन पुर्ण केली आहेस का? की एक भाग टाकल्यावर पुढची storyline ठरवतेस? कुठल्यातरी पुस्तकात वाचलेलं वाक्य आठवलं... Start with the end in mind... आणि already कथा लिहुन तयार असेल तर ३ महीने हा खुपच मोठा कालावधी आहे फ़क्त इथे येउन मराठीत type करायला. However busy you are, it shouldn't take you so long to finish it considering the fact that people like your story and are waiting for it! hope you take this comment in the right spirit...waiting for the next part
|
Runi
| |
| Friday, August 17, 2007 - 8:29 pm: |
| 
|
तुमचा शतषा रुनी आहे मी..... >>> ए तुझे नाव एकटा ना मग रुनी काय लिहितोस. दिवा घे. तुला ऋणी म्हणायचय ना
|
Zakki
| |
| Friday, August 17, 2007 - 10:55 pm: |
| 
|
'तुम एक रुनि तो मै सौ रुनि' असे म्हणायचे असावे. हमभी कुछ कम नही!
|
टिऊ, स्टोरी तयार आहे. एंड काय पण नंतरचे सीन पण तयार आहेत. पण मला खरोखर टाईप करायला वेळ मिळत नाहीये. कारण मी बर्याचदा ऑफ़िसमधे नसून फ़िरतीवर असते. If you have read the recent newspapers, you would understand why I am so busy. Anyways, I have tried to fasten the story line in last two posts. It will go faster now. If I get a break for an rntire day (or night) I can finish it. पण सतत चौदा पंधरा तास काम करून मग टाईप करणं जमत नाही. I think thats actually affecting my story . प्रतिक्रियाबद्दल धन्यवाद. पुढचा भाग लवकरच टाकेन. तुम्ही लोक वाचत आहात म्हणून हाच माझ्यासाठी महत्वाचा मोरल सपोर्ट आहे. झक्कीकाका. बरोबर मन वढाय वढाय. एकटा, अरे ऋणी वगैरे नको रे बाबा. वाचत जा आणि काही खटकल्यास मात्र सांग.
|
Aktta
| |
| Saturday, August 18, 2007 - 8:13 am: |
| 
|
>>ए तुझे नाव एकटा ना मग रुनी काय लिहितोस ते ऋणी लिहायला नाय जमल बघ लय प्रयत्न केला तरी भि नाय जमल... शेवटी भावनांना महत्व हाय बाय... नाय तर लोक ऋणी रुनि, भुनि, धुनी... कुनि भी काय भी लीत बघ... माझ्या सारख... फ़कस्त लायनी वाढवायाले.... सो i mean so रुनि हो या ऋणी कोइ फ़रक नही पेन्दा एकटा....
|
ए नंदिनी, कथा खुप छान चालली आहे ! Keep it up !! तब्बल एक महीन्यानतर वेळ मिळाला पण त्यामुळे एकदम ५-६ भाग वाचायला मिळाले आता तु लवकरच पूढला भाग टाकावास ही अपेक्षा !! (अर्थातच तुझे काम आणि तब्येत साभाळुन ) Best Luck - आशुतष . . . .
|