|
शलाका, प्रतिसादा बद्दल धन्यवाद, प्रसाद, बांपू वरील कविता छान....
|
Badbadi
| |
| Thursday, August 16, 2007 - 11:21 am: |
|
|
प्रसाद, तुला नक्कि काय म्हणायचं आहे ते झेपलं नाही शेवटच्या कडव्यामुळे confusion झालंय..
|
Shyamli
| |
| Friday, August 17, 2007 - 6:26 am: |
|
|
चीन्नु,माणिक धन्यवाद माणिक हो रे हिच कविता. लिंकबद्दल अजून एकदा धन्यवाद
|
कलिका, मयुरेश, दाद, कल्पना धन्यवाद... बडबडी... मला थोडक्यात असं म्हणायचं होतं की १५ ऑगस्ट (आणि २६ जानेवारीलाही) आपल्यातल्या अनेकजणांना e- देशप्रेमाचा एक मोठा hysteria होतो, attack येतो इ इ! या सगळ्या e- संदेशांच्या देवाणघेवाणीत आपण खरंचच देशाला उपयोगी असं काही करत असतो का? इथे कोणाच्याही देशप्रेमाबद्दल काही शंका घेत नाहीये, फक्त ते ज्या मधुन व्यक्त होतंय त्या गोष्टीचा खरंचच देशप्रेमाशी काही संबंध आहे का... मोबाईल कंपन्या आणि ISP सोडले तर कोणाला काही त्याचा काही उपयोग होतो आहे का असा साधा विचार जरा उपरोधिक पध्दतीनी मांडायचा प्रयत्न होता... बापुजी आणि चरखा ही केवळ दोन प्रतिकं... अगदी साध्या पध्दतीनी व्यक्त केलेलं देशप्रेमही कमालीचं प्रभावी ठरू शकतं हे सांगणारी... (म्हणजे आता आपण सगळ्यांनी चरखे घेऊन बसायचं का?... तर नाही... आपल्या काळाला अनुरुप अशी माध्यमं आणि साधनं आपण शोधली पाहिजेत...) SMS, email, scrapping मधे आपण जो वेळ आणि पैसा घालवतो तोच जरा या दिशेने वळवला तर कदाचित आपल्यालाही सापडू शकेल आपल्या युगाचा चरखा!
|
Psg
| |
| Friday, August 17, 2007 - 11:42 am: |
|
|
प्रसाद, सही कविता आणि explanation ही!
|
Chinnu
| |
| Friday, August 17, 2007 - 2:45 pm: |
|
|
प्रसाद बडीला पडलेला प्रश्न मलाही पडलेला. मला तुमचे स्पष्टीकरण फार आवडले. keep it up!
|
prasad kavita vachun mala suddha kalali navhati, pan spashtikaranaa nantar chimata basala. kavita avadali, patali, pudhe...? survat kelich ahes tar thambayach nahi...
|
Daad
| |
| Monday, August 20, 2007 - 2:44 am: |
|
|
कहाणी प्रत्येक कहाणी स्वप्नासारखी, कुठेतरी सुरू व्हायची अन कुठेतरी संपायचीच! डोळ्यात सुरू होऊन कवितेत किंवा कवितेत सुरू होऊन डोळ्यात! पण स्वत्प्नं काचेचीच शेवटी, राजा डोळ्यांना काय, कवितेला काय .......फुटली की खुपतातच! -- शलाका
|
Mankya
| |
| Monday, August 20, 2007 - 4:28 am: |
|
|
दाद .. ' कहाणी ' आवडली, मस्त ! ' डोळ्यात सुरू होऊन कवितेत किंवा कवितेत सुरू होऊन डोळ्यात! '... क्या बात ! ....... फुटली की खुपतातच !.. खरंय ! माणिक !
|
तिथी कुण्या मळभ दाटल्या दुपारी एकाकी मी चाळत असता विधातालिखित काही कविता .. भिरभिरणारी नजर पडे एका पानावर .. स्थिरावते अन मंद हासर्या त्या कवितेवर जशीच्या तशी भिंतीवर जी आहे अजुनी पुनपुन्हा वाचुनी तरी ती .. कळेल म्हणुनी वाचत असतो तिथी गाठुनी वर्षाकाठी जन्म घेतला आहे मी ज्या .. कवितेपोटी ......
|
Mankya
| |
| Monday, August 20, 2007 - 8:14 am: |
|
|
वैभवा .. .. .. .. ! माणिक !
|
Daad
| |
| Monday, August 20, 2007 - 8:52 am: |
|
|
माणिक, धन्स. वैभव, तिथी मस्तच.
|
Jo_s
| |
| Monday, August 20, 2007 - 11:26 am: |
|
|
प्रसाद, छान आहे कल्पना, नाह्तरी या मोबाईल आणि मेल मुळे नाही त्या गोष्टींच प्रस्थ अवाढत चाललय त्यामुळे हे One Day मातरम वाटतं. शलाका छान. वैभव, तिथी, काहीतरी कळतय वाटेपर्यंत वाटतय की काहीतरी नाही कळते तसच या डेज् चा पण हल्ली अतिरेक झालाय म्हणून डेज् पहाट झाली, गजर वाजला सूर्य अजून नव्हता उगवला थोडा वेळ कंटाळा केला सूर्य आजूनही नव्हता आला परत वेळ गेला थोडा सूर्याचा का अडला गाडा? शेवटी त्याला SMS "कारे? जास्त शहाणा झाला?" लगेच मोबाईल माझा वाजला त्याचा होता रिप्लाय आला "शहाण्या, जरा कॅलेन्डर बघ कुठे तू? कुठे चाललय जग? मदर्स, फादर्स, ब्रदर्स, सिस्टर्स स्टुडंट्स, टिचर्स, ..अर्स, ..अर्स फ्रेंडस्, डॉगज्, वुमन्स्, जेन्टस् ट्रॅडिशन, ऍडीशन, एन्व्हॉयर्नमेन्ट् पेट्रोलियम आणि टेक्नॉलॉजी व्हॅलेन्टाईन इत्यादी आजी माजी आहेकारे आज "डे" असा? डेच नाही तर उगवणार कसा?" "डे" शिवायही पूर्वी कसा साऱ्यांना मान होता सूर्यही, सूर्य मालेत स्थानाने महान होता आता म्हणे लागतील त्याला त्यांचे नियम पाळायला डेज प्रमाणेच वागायला पूर्वे कडूनच उगवायला पूर्वेकडूनच यायला लावण्यात एक कुटील डाव आहे उगवताच दिशा दिसावी पश्चिम जिचं नाव आहे सुधीर
|
Milya
| |
| Tuesday, August 21, 2007 - 5:20 am: |
|
|
वैभवा : तिथी छान पण नक्की कळलीय का नाही तेच कळत नाहीये ...
|
नक्की कळलीय की नाही तेच कळत नाहीये :- मिल्या , सुधीर कदाचित ह्याच विचारातून ही कविता सुचली . जश्या काही कविता वरवर कळल्यागत वाटतात आणि जसंजसं वाचत जाऊ तसे अनेक कंगोरे लक्षात येतात तसंच आपल्या आजूबाजूच्या माणसांचं अन गोष्टींचं असतं नाही का ? दिसायला लागली तर प्रत्येक गोष्टीत अन माणसांत कविता दिसते . त्यातलेच आपणही एक असू असा विचार आला . मग आपण एक कविता म्हणून कुणाला सुचलो ? आपली जन्मदात्री कविता ही नक्की कश्या प्रकारची कविता असेल ? म्हणून मग कुठल्या तरी मळभ दाटल्या दुपारी जुना अल्बम ( विधातालिखित कविता ) चाळत असताना त्या फोटोवर नजर पडते . ती व्यक्ती गेल्यापासून खरंतर तोच फोटो enlarge करून लावलेला असतो . तरी दिवसातून किती वेळा तिकडे पाहिलं जातं ? तिथीला फक्त हार घालताना आठवणींचे कढ दाटून आल्यागत होतं पण ते ही तितकंच . मग आपण जर ती व्यक्ती असताना किंवा गेल्यानंतरही तिला समजून घेण्याचा प्रयत्नच केलेला नाहीये तर आपल्याला तिच्याबाबत judgemental होण्याचा कुठे अधिकार उरतो ? even ही माझी अत्यंत आवडती व्यक्ती / कविता असं म्हणणंही surface level लाच तर नसेल ? ह्या विषादातून शेवटचं कडवं sarcastic आलंय . प्रतिक्रियेबद्दल सर्वांचेच धन्यवाद .
|
Milya
| |
| Tuesday, August 21, 2007 - 8:31 am: |
|
|
वैभव : मस्तच आणि धन्स विस्तॄत सांगितल्याबद्दल... आणि हुश्श मला असाच अर्थ लागला होता...
|
Meenu
| |
| Tuesday, August 21, 2007 - 8:54 am: |
|
|
वाह ! वैभव सुंदर रे ...!
|
Jo_s
| |
| Tuesday, August 21, 2007 - 9:09 am: |
|
|
वा, वैभव आता जरा लक्षात आली, छानच आहे
|
Chinnu
| |
| Tuesday, August 21, 2007 - 2:45 pm: |
|
|
वैभव सुंदर! माणसचं कविता रूपी दिसलेत तुम्हाला, ग्रेट! सुधीर कल्पनाविलास छान!
|
Shyamli
| |
| Thursday, August 23, 2007 - 4:26 am: |
|
|
क्या बात है! पण कविता जरा लवकर लवकर येउ देत ज रे
|
|
|