|
Disha013
| |
| Thursday, August 16, 2007 - 8:04 pm: |
| 
|
दाद, काय लिहिलय! जाम हसवलयं! मुकुट घालतानाचे वर्णन अफ़लातुन!!!! एकेक व्यक्तिरेखा म्हणजे नमुना आहेत. विक्रन और वेताळ....!! हीहीही
|
Daad
| |
| Thursday, August 16, 2007 - 10:24 pm: |
| 
|
सगळ्यांचे आभार. नंदिनी, असं नको करूस बाई. मी स्वत्: रेहानसाठी रोज येते इथे. सन्मे, thanks गं. ह्यानंतर वाट 'चोखाळेन'! झक्कीदा, thanks हो, गुच्च्या बद्दल, I mean गुच्छा बद्दल! बघितलत ना, डोकं तिरकं जास्तं चालतं... अगदी साध्या साध्या बाबतीत. मला असं वाटतं की माझी 'पुस्तकी लिहायची' स्टाईल नसून जास्तं 'निवेदनाची' आहे. त्यामुळे दुसर्यांदा वाचणारे त्यातली व्यक्तीरेखा कळल्यावर, टोनसह वाचत असावे.... त्यामुळे दोनदा वाचावं लागतय! माझ्या लक्षात येतात ह्या त्रुटी, मी वाचते तेव्हा. पण मग त्यातला केलेला बदल 'सपक' वाटायला लागतो. प्रयत्नं करेन पुढच्या वेळी मुळात एका झटक्यात झापेल असं लिहायचा. परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार.
|
Chinnu
| |
| Thursday, August 16, 2007 - 10:44 pm: |
| 
|
दाद, एका झटक्यात झापेल असं की झेपेल असं गं? पण जे काय लिहिशील ते लिहित रहा हो, गुणाची माज्यी बाय ती!
|
Slarti
| |
| Thursday, August 16, 2007 - 11:50 pm: |
| 
|
>>> मी आजच्या सट्संगाच्या प्रसंगाचा मास्तंग.... त्याबद्दल आपण त्यांचे वादन करूया.....
डॅनीचे आख्खे 'स्पीच'च बुंगाट आहे... भाषेच्या खुब्या आणि खाचखळगे सही उचलले आहेत...
|
Chetnaa
| |
| Friday, August 17, 2007 - 4:16 am: |
| 
|
दाद, सही ग..... मस्तच! सगळेच साहित्यीक प्रांत किती सुंदर हाताळतेस तू? ग्रेट!
|
Manjud
| |
| Friday, August 17, 2007 - 6:10 am: |
| 
|
दाद, तुझी विनोदी कथा ऑफिसमध्ये वाचणं एकदम डेंजर झालंय. फोन कानाला लावून मी हसत सुटले ही गोष्ट वाचून. तु लिहिलंस तसंच तुझ्याच टोनमध्ये मी ही गोष्ट वाचली. अगदीच ह. ह. पु. वा. पण काही काही वेळेला पंचेसचा अतिरेक होतो हं. तुझी शैली ज्याना नीट समजली नाहीये त्याना डोक्यावरून जातात तुझ्या गोष्टी. तुझी परवानगी घ्यायची होती की तुझी " नावात काय्ये " आमच्या ट्रीपला वाचून दाखवली तर चालेल का?
|
Daad
| |
| Friday, August 17, 2007 - 6:47 am: |
| 
|
मंजिरी, हो sssss . (मला सांगही मग झालेली नावांवर चर्चा. माझ्या त्या लेखापेक्षा चर्चा जास्तं मजेशीर होती नाही का?) आणि पंचेस समजण्याबद्दल म्हणशील तर... होईल सवय हळू हळू
|
Manjud
| |
| Friday, August 17, 2007 - 9:07 am: |
| 
|
नक्की सांगेन..... बहुतेक मीच वाचून दाखवताना पडणार आहे!!!!
|
Tiu
| |
| Friday, August 17, 2007 - 5:05 pm: |
| 
|
सहि आहे... office मधे बसुन हसतोय मी एकटा वेड्यासारखा... आणि 'आजुचे' आणि 'बाजुचे' लोक बघतायेत माझ्याकडे...
|
दाद, शब्दच नाहीत. खुप हसवलस. तुला आमच्याकडून हजार " पडव्या " बक्षीस!!!
|
सहीच फार दिवसांनंतर एवढे मनमोकळे हसु आले. क्या बात है. एवढ चांगल कोणी लिहीत का? ऑर्स्ट्रेलियात असतो तर भेटुन अभिनंदन केले असते. दाद व्वा.
|
Farend
| |
| Friday, August 17, 2007 - 11:08 pm: |
| 
|
मलाही आवडले, काही कोट्या//पंचेस खास वाटले नाहीत किंवा नीट कळाले नसतील. पुन्हा वाचून पाहीन. पण मुळात इतके आहेत की प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे सुद्धा बरेच सापडतील. सर्वात आवडलेले म्हणजे 'रवी शशी कळा' Daad तू हे डुप्लिकेट आयडी घेऊन लिहायला हवे होते, कारण ते तू लिहिले आहेस हे आधीच माहीत असल्याने असेल कदाचित पुरुषांच्या दृष्टिकोनातून लिहिलेले वाटत नाही , मधे मधे जेव्हा तसे उल्लेख येतात तेव्हा पुन्हा लक्षात येते की कोणीतरी नवरा लिहितो आहे. आणखी एक म्हणजे जेव्हा यातील पहिला लेख आणि टायटल वाचले तेव्हापासून ते पूर्वी पहाटे कायम ऐकायचो ते गाणे काही डोक्यातून जात नाही!
|
Daad
| |
| Friday, August 17, 2007 - 11:57 pm: |
| 
|
tiu , एक मुलगी, केदार, thanks heaps . केदार, त्या निमित्ताने या हो, सिडनीला. फारएंड, तुम्ही म्हणता तशी शक्यता आहे. त्याबद्दल वेगळं मेल केलय तुम्हाला. डुप्लिकेट आयडी ह्या कल्पनेचीही भिती वाटते... त्यापेक्षा माझं काय सुधारायला हवं ते सांगा, मदत करा ( please ). आपुन तैयार है, सुदरनेको (जम्या तो)
|
Gs1
| |
| Saturday, August 18, 2007 - 5:13 pm: |
| 
|
सुरेख लेखन. मनापासून आवडले.
|
Vaatsaru
| |
| Sunday, August 19, 2007 - 2:58 pm: |
| 
|
सगळ्यात पहिले म्हणजे फ़ारच सुंदर लिखाण, इतके उत्तम विनोदी लिखाण अलीकडच्या दिवाळी अंकातही वाचायला मिळत नाही. (तसेही ते फार पूर्वीच बंद झाले आहे म्हणा.) एकच तक्रार वजा (किंवा ह्यातली तक्रार वजा करुन) सूचना आहे की तुमच्यात उत्तम (विनोदी) लिखाणाची प्रचंड क्षमता आहे, त्यामुळे नेहेमीचेच यशस्वी विनोदाचे नमुने (लठ्ठ बायका, इंग्रजाळलेले मराठी) असे टाळता आले तर...
|
Daad
| |
| Sunday, August 19, 2007 - 11:15 pm: |
| 
|
एक गोष्ट या गोष्टीच्या बाबतीत नमूद कराविशी वाटते की, हा सत्संगाचा प्रसंग एक भारताबहेर, western देशात घडलेली घटना आहे. त्यातून होणारे गोंधळ आहेत ह्यात. त्यामुळे घरातल्या मुलाचं इंग्रजाळलेलं मराठी, किंवा लिहून दिलेलं मराठी बोलण्याचा प्रयत्न हा एक बर्यापैकी मोठ्ठा भाग झाला (ह्यातले काही किस्से 'ऑंखो देखा हाल' आहेत ) वाटसरू, पण thanks heaps and पॉइंट टेकन. लिहायला आत्ताच कुठे सुरूवात केलीये. पण 'लठ्ठ बाईचा' तुमचा मुद्दा नक्की पटला. परत मी वाचताना तर नक्कीच. पुढच्या वेळी प्रयत्न करेन, (पुढच्या वेळी मोह आवरेन )
|
zakkas.. sundar.. hasun hasun loLan ghetali.. too good.
|
Chyayla
| |
| Monday, August 20, 2007 - 6:11 am: |
| 
|
दाद.. मी तुमच लिखाण नेहमी वाचतो व तुमच्या कविता, लेखनशैली यांचा चाहता आहे. ईथेही सगळ्यानी अगदी मनापासुन कौतुकच केले.. पण एक वाक्य मला फ़ार खटकले ते मी प्रामाणिकपणे ईथे नमुद करतोय, बघा तुम्हाला पटले तर ठीक आहे नाहीतर सोडुन द्यावे, मला राग नाही येणार. मला खास करुन खालील वाक्य अतिशय खालच्या दर्जाचा विनोद वाटला.. खरच विनोद म्हणावा का याला असा प्रश्न पडला. निदान तुमच्या लेखन शैलीमधे मी ही अशी अपेक्षा कधीच नव्हती केली त्यामुळे मला थोडे दुख्: झाले.. अर्थात माज़ी खंत विचारात घेण्याची तुम्हाला काहीच गरज नाही पण एक मीत्र आणी हितचिंतक म्हणुन मी ईथे निदर्शनास आणुन देत आहे. अर्थात यावर वाद होउ नये ही पण ईछा:. दुपारचं तुडुंब जेवण झाल्यावर पडल्यासारखा दिसणारा तो विष्णू (देव म्हणून म्हणू नये पण मला तरी तो मटण्-बिटण चापून, वर विडा खाल्ल्यासारखा तृप्त दिसतो) चु. भु. दे. घे.
|
सुरेखच लिहिलय.. फक्त एक बंडूरंगचा विनोद नको होता.. विनोद वाईट आहे असं नाही पण संपूर्ण लिखाण तुझं स्वत:च आहे, हाच विनोद फक्त इथे विनोदाच्या बीबीवर, टीव्हीवर, सिनेमात बराच वेळा ऐकलेला आहे, त्यामुळेच तो खटकला
|
शलाका ... सुरेख ( नेहेमीप्रमाणेच )
सगळ्यांच्या प्रतिक्रियाही वाचल्या .. मला का कुणास ठाउक शेवट एकदम abrupt वाटला . पण ज्या अर्थी कुणी उल्लेख केलेला नाहीये त्या अर्थी मला ते लिखाण संपावसंच वाटत नव्हतं असं दिसतंय . आणि हो .. बंडूरंग च्या बाबतीत देवदत्तशी सहमत . you dont need such crutches
|
|
|