Daad
| |
| Monday, August 20, 2007 - 9:09 am: |
|
|
सगळ्यांचे आभार. च्यायला, तुम्हाला वेगळं मेल केलय. पण तुमची इथेही माफी मागते. विष्णूचा, कुणाही देवाचा अपमान आणि त्यायोगे कुणा वाचकाचं मन दुखावणं हा उद्देश नाहीच नाही. ही अनुद्देशाने, अनवधानाने केलेल्या कृतीचा परिणाम आहे. पण तुम्ही दुखावलात त्यासाठी माफ करा. देवदत्ता, वैभवा, कबूल! बंडुरंग फेल गेला. वैभवा, तुझं बरोबरय. महाराजांच्या हातात सत्संग गेल्यापासून जरा घाईत संपलय सगळं. पुन्हा लिहिणार आहे तो भाग जरा फुरसत मिळाली की... बाकी हे लिहिणं म्हणजे माझ्यासाठी तरी एक शिकणच चालू आहे आणि तुम्हा लोकांचं माहीत नाही पण मी जबरदस्त एन्जॉय करतेय!
|
Farend
| |
| Tuesday, August 21, 2007 - 12:50 am: |
|
|
Daad माझी कॉमेंट परत घेतो मी पुन्हा वाचून पाहिले पण असे शब्द किंवा वाक्ये नाहीत की जी उदाहरण म्हणून देता येतील. त्यामुळे मी म्हंटले तसे केवळ तू लिहिले आहेस हे आधीच माहिती असल्याने असे झाले असेल (कोणी 'नवर्याने' लिहिले आहे असे वाटत नाही असे मी लिहिले होते त्याबद्दल).
|
Mankya
| |
| Tuesday, August 21, 2007 - 2:29 am: |
|
|
दाद .. अगदी चौफेर फटकेबाजी .. सगळीकडे ( सगळ्या बीबींवर ) सहीच ! मस्तच रेखाटलयस प्रत्येक व्यक्तिमत्व अन विशेष म्हणजे तुझ्या लिखाणाला अस्सल मराठी विनोदांची किनार आहे आणि हो .. मार्मिकताही छान डोकावते काही जागी ... Keep it up !! माणिक !
|
Yog
| |
| Tuesday, August 21, 2007 - 5:43 am: |
|
|
Daad, मस्त जमलिये भट्टी.. नेहेमीप्रमाणेच प्रासन्गिक विनोद छान रचले आहेत. फ़क्त punch lines ना आगा-पिछा (वर्णन)नको.. मग अजून मजा येईल
|
Maudee
| |
| Tuesday, August 21, 2007 - 6:31 am: |
|
|
दाद छान लिहिले आहेस तू सर्व sugestions positively घेत आहेस हे बघून (वाचून) आणख़ी छान वाटले च्यायलाला अनुमोदन
|
Jagmohan
| |
| Wednesday, August 22, 2007 - 2:27 am: |
|
|
आईशप्पथ! काय फर्मास लिहिलंय हो तुम्ही! असंच अखंड लिहित जा!
|
दाद .. अजून पूर्ण वाचले नाही, निवांतपणे वाचेन. (नेहमीचेच 'सध्या रिकामपणापुढे अजिबात फुरसत नाही' हे आहेच ) पण त्या आधी दाद देण्यावाचून राहवले नाही की पहिला परिच्छेद खूपच आवडला.. छानच ! (त्यामुळे तो थोडा वेगळ्या प्रकारच्या लेखातही चालला असता का असे वाटून गेले. चू. भू. द्या. घ्या. )
|
Zakasrao
| |
| Thursday, August 23, 2007 - 1:52 am: |
|
|
तुमची विनोदी कथा हापिसात वाचण भयंकर रिस्कि आहे. वाचत असताना हसु फ़िस्सकन बाहेर येत होत आणि मी ते दाबण्याचा प्रयत्न केला तर तोंडातु विचित्र आवाज येत होता. खुप छान जमली आहे. फ़क्त याआधीची संगीतावरची कथेपेक्षा पन्चेस कमी आहेत असे वाटले. आम्हाला कस तेंडल्या ने प्रत्येक मॅच मधे बॉलरची धुलाइ करत शतक माराव वाटत. त्याच्या अर्धशतकावर समधान होत नाही हे तसच आहे.
|
Swa_26
| |
| Thursday, August 23, 2007 - 6:04 am: |
|
|
दाद, खुपच छान लिहितेस तू!! नेहमीप्रमाणेच. माझीपण अवस्था झकाससारखीच झालेली!! अजुन एक तुला सांगायचे राहुन गेलेले, ते म्हणजे मागे ETV ला राहुल देशपांडेचा कार्यक्रम झालेला, त्यात ते "पंचतुंड नरमुंड" ऐकुन तुझीच आठवण झाली...
|
Rajya
| |
| Friday, August 24, 2007 - 11:10 am: |
|
|
दाद, दाद आणि दाद अजुन एक, काल दादला मायबोली जाॅईन करुन १ वर्ष झाले
|
Daad
| |
| Monday, August 27, 2007 - 10:30 pm: |
|
|
मनापासून आभार, सगळ्यांचेच. राजा (की रज्या), खरय! माझ्या लक्षातच आलं नाही. दिवस कसे गेलेत कळलेलच नाहीये..... आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद, रे!
|
Chinnu
| |
| Tuesday, August 28, 2007 - 1:39 am: |
|
|
... दिवस गेले? ...
|
Maudee
| |
| Wednesday, August 29, 2007 - 8:44 am: |
|
|
दिवस कसे गेलेत कळलेलच नाहीये ---- ... दिवस गेले? ... ---- चला म्हणजे आणख़ी एक नावात काय्ये वाचायला मिळणार
|
Arch
| |
| Wednesday, August 29, 2007 - 5:34 pm: |
|
|
दोनदा.. मी तर चारदा वाचतो. प्रत्येक वेळी नविन विनोद कळतो. >> मग कशाल ते सरदारजींना हसायच.
|
Daad
| |
| Wednesday, August 29, 2007 - 10:14 pm: |
|
|
"दिवस गेलेत?" -काय फंटर आहात रे, एकेक! नाही.... मुळीच नाही, तसलं काही नाही. आता इथे गेलेल्या दिवसांबद्दल, वर्षाबद्दल मी काहीही म्हटलं तरी माझ्यावरच उलटणारय
|
Chinnu
| |
| Thursday, August 30, 2007 - 2:09 pm: |
|
|
शलाका 'आमी नाय' म्हणतांना गालातल्या गालात हसलेली दिसत्येयंस बरं ए थोडी गंमत केली, राग नको मानुस. अजून खुप खुप लिही. तुझे लिखाण वाचायला मज्जा येते.
|
Vaishakh
| |
| Sunday, September 02, 2007 - 2:18 pm: |
|
|
खूप छान आहे... पुलांच्या आसामी- आसामी मधल्या "अध्यात्म" ची अवर्जून आठवण आली. त्याचा हा एकविसव्या शताकतला अमेरिकन अवतार वाटला... खूप दिवसांनी इतके छान विनोदी वाचायला मिळाले... धन्यवाद !!!
|