|
आला श्रावण, आला श्रावण, घेऊनिया संगे मोदाचे उधाण उठली शेते, झुलली राने, बागडू लागली, थोर लहाने, भिजवूनि ग्रीष्माग्नी या अशा झाल्या हिरव्यागार दशदिशा, हिरवा हिरवा शालू लेवूनि हर्षनिर्भरा सजली अवनी, मखमली तेजाचा, मंडप हा नटला विवाह जणू या धरतीचा चालला, उधळीत जलमोती अक्षदांचे भूमिवर, आशीर्वादी सुष्टीच्या मस्त कलेवर
|
Tukaram
| |
| Sunday, August 12, 2007 - 4:15 pm: |
| 
|
छान आहे श्रावण कविता...
|
Zaad
| |
| Monday, August 13, 2007 - 7:37 am: |
| 
|
दाद, मनापासून आवडली कविता. पुस्तकात..., एका पानात मी, कुठल्यातरी दुसर्याच पानात तू! अंगावर काटा आला गं....
|
Shyamli
| |
| Monday, August 13, 2007 - 7:43 am: |
| 
|
शलाका, शोधु या ना चल सापडेल>> हे घोळत राहिलं मनात, आणि म्हणूनच सुचलं काहीतरी, शेवटच्या ओळी नी जीव घेतला ग
|
Zaad
| |
| Monday, August 13, 2007 - 7:46 am: |
| 
|
शिक्षा तुझा घोर अपराधी ठरल्यानंतर तुझ्याजवळ शिक्षेची भीक मागू लागलो तेव्हापासून तू विसरतेस आणि मलाही विसरायला लावतेस काळ्याकुट्ट सावल्यांनाच अंधार समजून माथ्यावरील अटळ उन्हाची तीव्र तिरीप. सावल्यांच्या खेळात रमून गेलो मी लहान मुलासारखा की तू दाखवतेस पदराआड दडवलेलं ऊन! (तुझ्या पदराच्या सावलीखाली तेही विसरायला लावतेस...) तुझा घोर अपराधी ठरल्यानंतर तुझ्याजवळ शिक्षेची भीक मागू लागलो तेव्हापासून
|
Shyamli
| |
| Monday, August 13, 2007 - 9:06 am: |
| 
|
झाडा खासच रे, वैभवची एक कविता आठवली 'न्याय' वाट्त बहुतेक
|
Daad
| |
| Monday, August 13, 2007 - 10:25 pm: |
| 
|
कल्पना, छान आहेत श्रावण्-कविता. झाडा, आवडली 'शिक्षा'
|
Mankya
| |
| Tuesday, August 14, 2007 - 1:27 am: |
| 
|
मानस .. कन्सेप्ट आवडला रे ! झाडा .. ' शिक्षा ' मस्तच ! श्यामली .. गुरुजींची कविता म्हणतेस का ? तर तीचं नाव ' जजमेंट ' ! लिंक देतोय बघ .. /hitguj/messages/119403/105894.html?1143897685 माणिक !
|
मानस, प्रचंड आवडलेली कविता. छानच. बापू
|
Daad
| |
| Tuesday, August 14, 2007 - 5:57 am: |
| 
|
चुकलं वादळ श्वासान डहुळेलसं आकाश टेकला, चाहुलीनं धसेलसा किनारा पांघरून, काजळ रुजवा केल्या शिवारांचा, काळोख शिवल्या दिवल्यांचा गाव! या वादळानं आता कुणा वेशी कुशी तोंड लपवावं! -- शलाका
|
Kkaliikaa
| |
| Tuesday, August 14, 2007 - 12:10 pm: |
| 
|
मैत्रीणींनो आणि मित्रांनो श्रावणमासाच्या हार्दीक शुभेच्छा! खूप-खुप लिहा.... 
|
Kkaliikaa
| |
| Tuesday, August 14, 2007 - 12:15 pm: |
| 
|
पावसाचे रंग सारे पानांमध्ये दडुन बसले त्या पानांच्या गालावरती थेंबांचे बघ मोती सांडले पावसाचे रंग सारे वनराईने लुटुनी घेतले रेशीमसरींना अम्रुत सरींना घनराईने कवेत घेतले पावसाचे रंग सारे चोहीकडे बघ कसे विखुरले मातीमधुनी त्रुप्त सुखाचा धुंद-गंधीत सुगंध दरवळे पावसाचे रंग सारे तरु-वेलींच्या कुशीत लपले फळा-फुलांना अन कलिकांना कीती, कसे हो रंग वाटले????? पावसाचे रंग सारे भू मायेसी बिलगु लागले नटली-थटली अवनी माई बघा कसे सौंदर्य हे खुलले पावसाचे रंग सारे मन-मनाला रंगुन गेले मनाभोवती रिमझिम रिमझिम सोनसरींचे खेळ रंगले ******************************
|
Kkaliikaa
| |
| Tuesday, August 14, 2007 - 12:24 pm: |
| 
|
श्रावणातल्या रेशीमसरींनो बरस बरस बरसाहो भावकळ्यांना शब्दफुलांना म्रदगंध नाहवा हो श्रावणातल्या रेशीमसरींनो माहेरी जाऊनी या हो त्या तिथल्या अंगणातल्या आठवणी मज सांगा हो श्रावणातल्या रेशीमसरींनो आठवते कां छोटीशी "मी" जरा विसावा त्या वाटेवर भेटतील माझ्या मैत्रीणी हो श्रावणातल्या रेशीमसरींनो बहु भाग्यवान तुम्ही अहा त्या मातीचा गंध कांहीसा मजसाठीही घेऊनी या हो श्रावणातल्या रेशीमसरींनो काय तुम्हांस देऊ मी सखया माझ्या तुम्ही गं सार्या मन माझे घेऊनी जा हो!
|
Shyamli
| |
| Tuesday, August 14, 2007 - 12:26 pm: |
| 
|
मृगजळ खोल खोल आत रुंजी घालत असतं काहीतरी बरचसं समजणारं. बरचसं आवाक्याच्या पलीकडलं काहीतरी हातात नसलेलं काहीतरी हातातून सुटून गेलेलं तरीही... कधीतरी सापडेल असं वाटणारं! श्यामली!
|
Chinnu
| |
| Tuesday, August 14, 2007 - 2:26 pm: |
| 
|
वाह, सर्वांच्या कविता सुंदर! कलिका छान आहेत श्रावणसरी. शलाका, शिवल्या दिवल्यांचा गाव नेहमीच एस्टीतून दिसत राहिलेला.. श्यामलीताई मृगजळ भारीच!
|
बापुजींची ईमेल... पंधरा ऑगस्टला ईमेल्स बघण्याची कुठून कळेना बुध्दी झाली... माझ्या इनबॉक्स मधे आज बापुजींची ईमेल आली! sender चं नाव ओळखीचं नव्हतं वाटलं, कदाचित spam असेल... नंतर वाटलं, बापुजींच्या नावानी कशाला कोण spamming करेल! बापुजींनी लिहिलं होतं... बेटा, साठ वर्षातली तुमची प्रगती पाहून मला फार फार आनंद झालाय... आत्ताच मी पाहिलं, ऑर्कुटवरच्या हजारो प्रोफाईलस वर आज माझा तिरंगा झळकलाय! तुमचं अपार देशप्रेम पाहून ऊर माझा दाटून येतो... पंधरा ऑगस्टला SMS च्या पुरात देश सगळा बुडून जातो! तुझ्याही इनबॉक्स मध्ये आज शेकडो forwards आली असतील स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारी e-greetings सुध्दा भरपूर असतील... तुझे SMS, emails, scrapping झाल्यावर माझं एक छोटंसं काम करशील? एक चरख्याचं चित्र मी attach केलंय तेही तुझ्या मित्रांना forward करशील... ? आणि हो... तुझ्या १० मित्रांना १० मिनिटात हे forward केलं नाहीस तरी फरक काहीच पडणार नाही.... कारण चरख्यावाचून या देशाचं आता कधीच काही अडणार नाही... आणि बापुजींवाचूनही तुमच्या कोणाचं आता कधीच काही अडणार नाही... प्रसाद शिरगांवकर...
|
Kkaliikaa
| |
| Wednesday, August 15, 2007 - 12:40 pm: |
| 
|
प्रसाद.... कविता छान आहे, आवडली कविता. छानच आहे.
|
प्रसाद,ह्म्म.. .. खरय रे अगदी.
|
Daad
| |
| Wednesday, August 15, 2007 - 10:57 pm: |
| 
|
प्रसाद, छानच. 'बापूजींचा देश' हा एक मोठ्ठा गहन विषय आहे आणि बापूजींपासून त्यांच्या देशापर्यंत सगळ्याचं अनेकांनी असं भांडवल केलय की कधी कधी लाजेने कोळपून जायला होतं, आपलं आपल्यालाच. पण कविता छानच!
|
Mankya
| |
| Thursday, August 16, 2007 - 3:38 am: |
| 
|
कलिका .. छान बरसल्यात श्रावणसरी ! श्यामली .. ' मृगजळ ' आवडेश, मस्त ! माणिक !
|
|
|