Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 10, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आषाढ » काव्यधारा » झुळूक » Archive through August 10, 2007 « Previous Next »

Princess
Monday, July 23, 2007 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निसटुन गेला हातुन
माझ्या, तो अनोखा क्षण
शोधते पुन्हा पुन्हा
काळाचा कण न कण...


Manogat
Monday, July 23, 2007 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरवल तुला पण,
जणु अजुनही तु जवळ आहे,
ह्रिदयाच्या पानावर,
कोरलेल तुझ नाव तसच आहे...


Mankya
Monday, July 23, 2007 - 8:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओघात हरवला कि गवसला तो क्षण न ठावे
पण भास त्याचा अजूनी मन कुरवाळत आहे
मज निष्प्राण श्वासांनी बिलगून मोहरून जावे
तो गंध तुझ्या श्वासात अजूनी दरवळत आहे !

माणिक !


Manogat
Monday, July 23, 2007 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक,
सुरेख, अप्रतिम..... खुप छान लिहिल आहेस


Manogat
Monday, July 23, 2007 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका शब्दाच अंतर,
लागत का नात्याला फ़ुलवायला,
दोळ्यातला होकर,
का नाही कळत या मनाला.

शब्द सांगणार नाही,
इतक हे डोळे सांगुन जातील,
ते दोघे ही तेव्हा,
बेसावध या दुनीये पासुन राहतील.

मना मनातल अंतर,
खुप जवळ वाटेल,
तीच्या दोळ्यातले भाव
जेव्हा त्याला कळेल.


Mrudgandha6
Monday, July 23, 2007 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


एका चुकार क्षणाची झुळूक
उडवते स्मृतीवरचा पाचोळा
अन मनभर झुलत रहातो
तुझ्या आठवांचा हिन्दोळा


Kkaliikaa
Monday, July 23, 2007 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या आठवणींचा झुला
अजुनही झूलतो माझ्या अंगणात
दुरुनच पाहते मी त्याला
कारण तो द्रुष्टीआड होतो क्षणात

Kkaliikaa
Monday, July 23, 2007 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्यासाठी आयुष्य माझं
तुझ्यासाठीच मी
क्षण-क्षण तुझ्यासाठी
हरवुन जाते माझं अस्तित्व मी

Princess
Thursday, July 26, 2007 - 2:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ठेवा प्रपंच बाजुला
मिटा डोळे क्षणभरी
एकमुखाने मग म्हणा सारे
विठ्ठल विठ्ठल जय हरी


Meghdhara
Thursday, July 26, 2007 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंधार निपचीत पडलेला
पापण्यांच्या कुशीत
आत अख्खं जग जागं
स्वप्न प्रकाशीत.

मेघा


Rajya
Thursday, July 26, 2007 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा, क्या बात है :-)

Jo_s
Friday, July 27, 2007 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा प्रकाशीत मस्त .....


Shyamli
Friday, July 27, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह!..... आत अख्ख जग जाग...........>>>>
मेघा आवडली

Princess
Friday, July 27, 2007 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा, वाह... जग जाग, स्वप्न प्रकाशित खुप्प आवडले



R_joshi
Saturday, July 28, 2007 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा सुंदर:-)

प्रकाश स्वप्नांचा
जीवनी असाच राहु दे
तुझ्या अन माझ्यातला
हा दुवा शिल्लक असु दे

प्रिति:-)


Meghdhara
Thursday, August 02, 2007 - 4:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे व्वा! पापण्यांआतला प्रकाश इतक्यांच्या आत पोहोचला! आवडलं. आणि खरं तर हुरूप आला.

मेघा


Meghdhara
Thursday, August 02, 2007 - 4:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरजे..
हाकेला प्रतिहाक आल्यावर
प्रकाशाला पालवी फुटते
दुव्याचं म्हणाशील तर..
त्याला फक्त माणूस असावे लागते.

आपण सगळ्यांनी माणूस जपलाय ना!

मेघा



R_joshi
Thursday, August 02, 2007 - 9:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा...मी प्रिति:-)

साद मी दिल्यावर
प्रतिसाद तु होशील का
दिल्या घेतल्या वचनांचे
प्रतिबिंब तु होशील का
घाव दु:खाचे सोसुन ही
प्रेम असेच करशील का
जीवनविष प्राशुन हे
निलकंठ तु होशिल का...?

प्रिति:-)


Satyajit_m
Friday, August 03, 2007 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही पावसाळे वाहून गेले
काही उन्हाळे सुकून गेले
डोळ्यांत तरळल्या अश्रूंना
ते पाणी म्हणुन विकुन गेले

ओंझळीत जपल्या कळ्यांचे
जे स्वप्न होते ते नासून गेले
ती राख होती ती खाक होती
ते विभुती म्हणुन फासून गेले

कोंब फुटल्या पालवीला
ते रोप म्हणोनी फसवून गेले
क्षण क्षण विणल्या वस्त्राचे
ते क्षणात धागे उसवून गेले

त्यांनीच विकल्या पाणथळ्याचे
ते सारे झरे सुकवून गेले
दाटल्या कंठाचा आज
अश्रु ही डोळा चुकवून गेले

सत्यजित.


Meenu
Friday, August 10, 2007 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाहूल झाली वादळाची रोजची
हूल झाली मोडण्याची रोजची
रात्र अंधारी कधी संपायची ?
रात्र अंधारी कधी संपायची .....





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators