|
धन्यवाद मंडळी! हं... मुक्तीसाठी..म्हणजे सहजधर्म तरी प्रयास केला जातो.. व्वा. मेघा
|
Manas6
| |
| Friday, August 03, 2007 - 8:34 am: |
|
|
आणि एवढा खुजा मला मी दिसतो इवला खुणावताना ह्या पायाच्या अंगठ्यापाशी ( हळूच तेव्हा तळहातावर घेतो त्याला कुणासही आकळण्याआधी) .. वा..बैरागी...खोलवर जाऊन केलेले आत्म-परीक्षण.. आणि त्यात जे गावले ते अत्यंत प्रान्जळपणे. जसेच्या तसे..कथन करण्याचा कविचा मन्-मोकळेपणा ह्या कवितेत दिसला.. मानस ६
|
माणिक , बी दोघांच्याही कविता आवडल्या.
|
Shyamli
| |
| Saturday, August 04, 2007 - 6:46 pm: |
|
|
अभिप्रायांबद्दल सगळ्यांनाच धन्यवाद वैभव, पुण्याई आवडली आणि चिन्नुला अनुमोदन, कविता सुचायला एकादशिच निम्मत्तय फक्त 'तो' तर ज्याच्या त्याच्या मनात असतोच नेहमिच त्याच्याशिवाय व्यर्थच सगळ नाहि का?
|
Shyamli
| |
| Saturday, August 04, 2007 - 7:00 pm: |
|
|
मेघा, ,ओढ आवडली, सारंग आधिच वाचली होती तिकडेही अभिप्राय दिला आहे माणिक, <<सरळ ईथेच टाईप>>>> होता है होता है , लिखते रहो
|
Bee
| |
| Monday, August 06, 2007 - 7:26 am: |
|
|
गणित भर वाहत्या रस्त्यावर डेरेदार वृक्षांच्या रांगा, रात्री अपरात्री ऐकू येतो चिमण्या पाखरांचा दंगा माणसांच्या जगाबरोबर त्यांचेही जग बदलले का? चोविस तासांचे गणित अवघड झाले असेल का?
|
Jo_s
| |
| Monday, August 06, 2007 - 9:28 am: |
|
|
बी, खर आहे, हल्ली बरेचदा रात्रीही पक्षी ओरडत असतात.
|
Chinnu
| |
| Monday, August 06, 2007 - 3:11 pm: |
|
|
.. बी कविता आवडली
|
Ldhule
| |
| Tuesday, August 07, 2007 - 2:13 am: |
|
|
जो, अहो बरेचदा काय सिंगापुरात तर रोजच रात्री ओरडतात. बी, खरय... गणित बिघडलय खरच.
|
Chetnaa
| |
| Tuesday, August 07, 2007 - 3:42 am: |
|
|
पाऊस... छमछम करित पाऊस धारा अविरत झडत आहेत.. झाडे, घरांसह बेघरांच्या मनांनाही झोडपत आहेत... उंच कोरड्या सुसज्ज गवाक्षांतून कोणी... न्याहाळीती मुग्ध होत ऐकत गोड गाणी.... फ़ाटक्या छताखाली भिजले अंग चोरुनी... पाही हताश,उदास मनाने थरथरत कुणी... खोट्या पैशात बोलवी गीत कुणा ओठी... कुणी पावसास परतवी रोजगारा आशेपोटी... टाळ्या पिटीत कुणी निरागस सोडी पाण्यात होडी.. त्यातच वहाता संसार वेचण्या कुणी धडपडी... ज्या गरीब लेकरांसाठीही पाऊस कोसळत असतो... त्यांच्याच पोटी भुकेचा आगडोंब उसळत असतो.... कवींच्या प्रतिभा पाऊस सरगणिक उंचावत झडतोय... भुकेल्या जळक्या पोटांवर अश्रूंचाच पाऊस पडतोय... अश्रूंच्या पावसानेही पोटाची आग विझत नाही... बाहेरचा रम्य पाऊस तिथवर पोहचतच नाही....
|
Bee
| |
| Tuesday, August 07, 2007 - 5:48 am: |
|
|
चेतना, पावसावरची ही वेगळी कविता छान आहे.
|
घेऊया अगावरी पावासाच्या सरी घेऊया अगावरी पावासाच्या सरी गात्रा गोड शिरशिरी जगण्याच्या वाटेवरी श्वासाचेही इवले इवले तरग ते उठतील पाण्यापरी मनात डोलू बागाडू लागतील येईल मागल्य दारातून वारा न्हाईल सुगन्धात दरवरुन सुगन्धाने मुक्त मने ज़न्कारील स्पशरातून चैतन्याची गन्धातून श्वासाची देहच बोलू लागेल अव्यक्त बोली सूगन्धाची होइल अशान्त पानाची शान्त ती सळसळ पोर आसमन्तात घालतील आनन्दाने गोड शीळ सुगन्धाची धुन्द लहर समास्त प्राणीमात्रा भिडेल हिरवी हिरवी कोवळी पाने गुजगोष्टी करतील एक नवा ओला ताजा दिवस येईल नभातून देऊनिया धरतीला भरभरून मोद आस होईल ती दाट होईल मोकळा मोकळा श्वास होईल मन ते नितळ-निर्मळ भरभरून जशी मोतीयाची ओन्जळ
|
चेतना छाने कविता पण.. माणिक, मेघधारा.. आणि सारंग कविता एकसे बढकर एक..
|
Tree
| |
| Wednesday, August 08, 2007 - 10:47 am: |
|
|
very fine u wrote that poem very nice sunita
|
Chetnaa
| |
| Thursday, August 09, 2007 - 3:39 am: |
|
|
हाय सुनिता, तुझी पहिलिच पोस्ट दिसतेय ही.... वेलकम मायबोलिवर... खुप आवडेल तुला इथे येत रहा.. तिथे देवनागरी लिहिलय तिथे क्लिक करुन लिहि मराठीत, तुला आवडेल.
|
Daad
| |
| Friday, August 10, 2007 - 6:01 am: |
|
|
एक से बढकर एक खरच! मेघधारा, बी, चेतना, कल्पना, छान आहेत कविता. शोधूया चल ना, अजून सापडेल... उन्हाची बोटं फिरल्या सावलीचा घाट, अन धुकट लाटात, मिळून शोधलेली वाट चांदणवेलीतळची वितळली साखरभेट, एकमेकांना शोधण्यात हरवलो, ती पहाट! पुस्तकात..., एका पानात मी, कुठल्यातरी दुसर्याच पानात तू! शोधूया चल ना, अजून सापडेल... --शलाका
|
Tree
| |
| Friday, August 10, 2007 - 8:52 am: |
|
|
maniiparsa चल... आज 'मनी' पर्सच साफ करु म्हटल पण हाती काही लागेना खूप खळ्बळ्-ख़ुळबळ केली तर एक आरसा चेहर्यावरील विविध रंग... काजळ आणि लिपस्टिकची कांडी मिळाली सारे फासून फसविण्याची आयुधं आतापर्यंत कितींना फसवले याच्या फ़ास्ट ग़णितात असलेलं 'तन' पर्सच्या आत खोल्-खोल दडलेलं अन् या सर्वात भागीदरी नाही म्हणून तळातून निसटलेलं 'मन' sunita zade royalsunita@rediffmail.com
|
Mankya
| |
| Friday, August 10, 2007 - 10:14 am: |
|
|
दाद .. छानेय गं ! कुठल्यातरी दुसर्याच पानात तू! .. अगदी ! धन्यवाद दोस्त्स ! बैरागी .. त्यामागची भुमिका कळली तर पुर्णपणे समाधान वाटेल अर्थात सूचना मान्य आहे दुमत नाही ! माणिक !
|
Chetnaa
| |
| Friday, August 10, 2007 - 2:51 pm: |
|
|
दाद,सुनिता छानच ग.. वर पन खुप सुंदर आहेत सर्वच कविता...
|
Chinnu
| |
| Friday, August 10, 2007 - 11:32 pm: |
|
|
शलाका, सुंदर आहे कविता. काही बदल सांगु इच्छिते. चांदणवेलीतळची पेक्षा चांदणवेलीत वितळली असे केले तर. तसेच पुस्तकात.. पेक्षा प्रितपुस्तकात कसे वाटेल? सहजच सांगितले, नाही आवडले तर कृपया राग मानु नये.
|
|
|