|
Manas6
| |
| Saturday, August 11, 2007 - 3:37 am: |
|
|
चंद्र-तारे खूप झाले...! चंद्र-तारे खूप झाले; आता 'कोसळलेल्या उल्कांवर' लिही! पाने-फुले नेहमीचीच; आता 'उन्मळलेल्या मुळांवर' लिही! प्रेमभंग नित्याचा; आता 'रोजच्या' विनयभंगावर लिही! तुलसी-महात्म्य पुरे ; आता 'बाटवलेल्या गंगांवर' लिही! हिरवा मळा छानच; आता काटेरी कुंपणावर लिही! भाटगिरी सोडून आणि, राजाच्या माजोरेपणावर लिही! माझे, मी , खूप आता, आतल्या 'कमी'पणावर लिही! आणि सिरीयल्सचा 'आत्मा' असलेल्या, छद्मीपणावर लिही! 'जीवघेणे' कटाक्ष बस; रोजच्या 'जीव देण्यावर' लिही! अन हुंडा घेउनही 'सावित्रीचा', 'जीव घेण्यावर' लिही! 'कर्माचे ओझे' जाणतो; अता पुस्तकांच्या ओझ्यावर लिही! आणि सौभाग्य लेणे विस्कटणाऱ्या, कर्जाच्या बोज्यावर लिही! हिरवाईचे वर्णन 'वाचले' मी; 'न वाचणाऱ्या' वनराईवर लिही! नि आपण स्वत:लाच लोटतोय,ना वेड्या ; त्या भयाण खाईवर लिही! -ानस६
|
|
|