|
सरस्वती जवळ जवळ धावतच कॉलेजमधे आली होती. तसंही हल्ली पहिलं लेक्चर हमखास चुकायचंच. पण तरी तिची परिस्थिती माहीत असल्यामुळे फ़ारसं कुणी बोलायचं नाही. आज पहिल.ंच लेक्चर मराठीचं होतं. "डोळे बंद करुन पेपर लिहीला तरी मी पास होईन मराठीमधे." तिने एकदा बोलताना रेहानला सांगितलं होतं. पर्समधुन तिने वही काढली. वहीवर छानशा अक्षरात नाव होतं. "सरस्वती." रेहानने लिहिलेलं. ती मनाशीच हसली. अवघ्या दीड वर्षात रेहान तिच्या आयुष्याची सीमा झाला होता. कधी कधी तिचीच तिला भिती वाटायची. या रेहान नावाच्या तुफ़ानात वाहून जाण्याची. वेळीच स्वत्:ला सावरायला हवं होतं. रेहान फ़क्त मित्र होता आहे आणि राहिल. त्यापलीकडे हे नातं जाता कामा नये. "सरस्वती.. आणि तू तर असशीलच ना तिथे.." "हा सर.." ती अचानक भानावर आली. "अहो केळकर. स्पर्धेमधे तुम्ही असालच ना.." तिचं अजिबातच लक्ष नव्हतं. कसली स्पर्धा... ती काय करणार होती? बहुधा तिच्या चेहर्यावरचं प्रश्नचिन्ह त्याना दिसलं असावं. "सरस्वती. अगं कॉलेजच्या स्पर्धा आहेत. निबंध वक्त्रुत्व. वगैरे. तुझ्या पेपरमधून बातमी देशिल ना तु?" "हो सर," याची नोटीस वाचली होती चार पाच दिवसापूर्वी. "सर, आणि मला या स्प्र्धामधे भाग पण घ्यायचा आहे. चालेल ना?" अख्खा वर्ग तिच्याकडे वळून पाहत होता. बहुतेक वर्गात आज ती पहिल्यान्दा बोलली होती. "अरे वा. चालेल ना. पण तुमच्या सर्व व्यापात तुम्हाला जमेल ना?" सरानी तिला विचारलं. सरस्वती गालातल्या गालात. ती अर्ध्या तासात पूर्ण संपादकीय पान लिहत होती. तर हे नोइबंध लिहायला तर अख्खा महिन्याचा अवकाश होता. निबंधाचा विषय होता... "माझ्या स्वप्नातील भारत." पीसीवर टाईप करण्या आधी सरस्वतीनी हातातल्या नोट्स कडे पाहिलं. मटेरियल बर्यापैकी होतं. पण सुरुवात जमत नव्हती. खूप वेळ तिने चार ओळी लिहील्या वाचल्या आणि डीलीट केल्या. स्वप्नातील भारत... ती स्वत्:शी पुटपुटली. काहीतरी वेगळं हवं होतं. विकसित भारत, नोकरी,उद्योग, शांती, एकता, विविधता, परंपरा.. हे तर सर्वानीच लिहीलं असतं. तिला काहीतरी वेगळं करायचं होतं. खूप वेळ विचार करून डोकं बधीर झालं आणि तिने सहज रेहानला फोन केला. त्याच्या नवीन मोबाईलवरती. "रेहान, मला कंटाळा आलाय. आता भेटशील?" "किधर ऑफ़िस मे?" "वेडा आहेस का? कुणीतरी बघेल ना. त्यापेक्षा तू असं कर बाएक घेऊन इकडे ये.. मला हा निबंध लिहायच आअहे पण जमतच नाही.." "मॅडम, Can I say something? " "काय?" "मी मुंबईमधे आहे. मला यायला आठ तास लागतील." सरस्वतीने चिडून फोन बंद केला. परत पीसीच्या पुढ्यात आली तर स्वप्नातला भारत तिची वाट पहात बसला होता. स्वप्नात..... "अरेच्चा... "सरस्वती जवळ जवळ ओरडलीच. नशीब ऑफ़िसमधे अजून कुणी आलं नव्हतं. तिची बोटं धडाधद टाईप करायला लागली. स्वप्न.. तीच तर सुरुवात होती. तिला रात्रीच्या स्वप्नात दिसलेला भारत, आजपासून पन्नास वर्षानी. ख्हुप चांगला पण अजूनही थोडे फ़ार दोष असलेला. पाच पानाच्या त्या निबंढाची प्रिंट आऊट वाचताना ती स्वत्:वरच खुश झाली. परत तिए रेहानला फोन लावला, "थॅंक्स" "किसलिये?" तो गडबडला. "माहीत नाही, एका कामात अडकले होते. तुला फोन केला आणि काम झालं तेपण एकदम मस्त." रेहान हसला. "इसकिये थॅंक्स की जरूरत नही. तुझं काम झालं ना. मग अजून काय?" "रेहान, तुझा आवाज ऐकला तरी माझे प्रॉब्लेम सुटतात." " Dont say like that. मी तुझा आवाज ऐकला नाही तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. सिर्फ़ तुम्हारे बारे मे सोचा तो भी.. Believe me, तुझे हे काम संपलं नाही. आताशी स्टार्ट झालय." यावेळेला सर्स्वती हसली. "रेहान, स्पर्धेचा निबंध आहे. मला बक्षीस मिळेल बाकी काही नाही." "ये रेहानकी भविषवाणी है... ये काम तुम्हारे बहोत काम आयेगा." "हो, मला बक्षीस मिळालं तरी बास, त्यापुढे काय करणार हा निबंध." "देखते जाओ. I feel that this is going to be turning point in your life.. " फोन ठेवल्यावर पण सरस्वती मधेच हसत होती. इतके लेख लिहिले, त्याचं काही नाही. आणि हा कॉलेजचा निबंध Turning Point काहीतरीच काय..
|
Chinnu
| |
| Wednesday, August 01, 2007 - 5:53 pm: |
|
|
नंदु खुप छान वाटलं हा भाग वाचुन.
|
सर, कधी सुरू होईल कार्यक्रम. मला ऑफ़िसला जायचय." सरस्वती जवळ जवळ जवळ तिसर्यादा जाऊन विचारून आली. पण कार्यक्रमाला उशीर झाला होता. एक तर कधी नव्हे ते सरस्वती साडी नेसली होती. आश्रमातल्याच कुणाचीतरी. सगळी सकाळ तेच करण्यात गेली होती. पहिल्यांदा ती साडी नेसली होती. त्यात ते सावरणं कठीण जात होतं. रेहान तिला न्यायला आला तेव्हा आधी कितीतरी वेळ खुदुखुदु हसत होता. "हाय सरस्वती. कशी आहेस?" पल्लवी नेमकी तिला बोलवत आली. "मजेत. तु काय म्हणतेस?" "तुला निबंधात पहिलं बक्षीस मिळालं ना? मला वाटलंच होतं." "तुला कशात बक्षीस मिळालं?" "मला काय येतय? रांगोळी. त्यातच दुसरा नंबर आला. पण तू आज एकदम मस्त दिसतेयस." "थॅंक यु, पण मला हे साडी वगैरे बिल्कुल आवडलं नाही. साधा सलवार कमीझ घातले असते तरी चाललं असतं. रेहान पण हेच म्हणत होता" "ए.. तो आहे अजून रत्नागिरीमधे? मला भेटव ना गं." "तुला कितीवेळा सांगितलं चल माझ्यासोबत तर तुला वेळ नाही. आज काय प्रॅक्टिकल्स उद्या काय टेस्ट्स.. तुझी कारणंच फ़ार असतात." पल्लवी काही बोलणार तितक्यात स्टेजवरच्या माईकची धुसफ़ुस झाली. आणि मग मराठीच्या सरानी कार्यक्रमाला सुरुवात केली. बक्षीस वितरणासाठी मुंबईवरून कुणी पाहुणे बोलावले होते. त्याना यायला उशीर झाल्यामुळे कार्यक्रमाला उशीर झाला होता. सरस्वतीचं एकाही भाषणाकडे लक्ष नव्हतं. कोण बोलतय तेही तिला माहीत नव्हतं. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू झाला आणि तिचं नाव लगेच पुकारलं गेलं. हातातलं बक्षीस पाहिलं आणि परत तिला आठवलं Turning Point . वेडा कुठचा. खरं तर तिला बक्षीस घेऊन लगेच निघायचं होतं. पण नेमकी ती स्टेजच्या पुढ्यात होती. त्यामुळे तिला बाहेरही पडता येईना. कार्यक्रम संपल्यावर मात्र ती लगेच बाहेर पडली. तित्क्यात कुणीतरी तिला हाक मारली. "अहो केळकर... तुम्हाला आत बोलावलय.." प्रमुख पाहुण्याना तिला भेटायचं होतं. ती दबकतच आत गेली. खुर्चीवर साधारण पन्नाशीचे एक गृहस्थ बसले होते. पांढरे केस आणि सोनेरी काड्याचा चष्मा, "सर, तुम्ही बोलावलत मला?" तिने विचरलं. त्यानी वर करून पाहिलं. "सरस्वती ना तु? ये बस." सरस्वती समोरच्या खुर्चीत बसली. "हा अख्खा निबंध तू लिहीलास?" त्याच्या हातात तिचा निबंध होता. "हो,," "घरच्यानी शिक्षकानी कुणी काही मदत वगैरे केली?." "नाही." "ह्म्म.. इंटरेस्टिंग. तू बारावीला आहेस. आणि तरी इतके फ़ॅक्ट्स, आणि लिहिण्याची शैली. नक्की कुणीतरी मदत केली असणार.." "नाही सर. मी एका पेपरमधे काम करते. त्यामुळे असे लेख रोज तरी लिहीतेच, हा जरा मोठा होता. एवढंच." "तू काम करतेस?" त्यानी चष्मा काढुन विचारलं. या प्रतिक्रियेची सरस्वतीला सवय झाली होती. "हो सर, माझे आईवडील नाहीत, खूप लहानपणी गेले. मी इथेच अनाथाश्रमात राहते. काम करायला लागून दीड वर्षं झाली." त्यानी परत एकदा सरस्वतीकडे पाहिलं. जणु ती खरं बोलतेय की नाही हे त्याना तिच्या चेहर्यावर दिसत होतं. त्याच्या त्या नजरेने सरस्वती गोंधळली. "तू काय काय काम करतेस?" त्यानी तिला विचरलं. "सर, मी बातम्या लिहिते, एडीट करते. पान लावते.. म्हणजे बातम्या पानावरती बसवते.." "ठीक आहे. तू खूप छान लिहीतेस. तुझ्यात खूप पोटेन्शिअल आहे, नीट काम केलंस तर खूप पुढे जाशील," सरस्वती मनातल्या मनात वैतागली. हे सांगायला या माणसाने तिला इथे बोलावलं होतं. असंच एक भाषण मघाशी स्टेजवर त्याने दिलं होतं ना... "हे माझं कार्ड, कधी मुंबईला आलीस तर मला नक्की भेट. जी होईल ती मदत मी करेन." त्यानी तिला कार्ड दिलं आणि ते उठले. सरस्वती कार्डवरचं नाव वाचायच्या आत ते बाहेर गेले सुद्धा नाव वाचताना सरस्वतीच्या हृदयाचा ठोका चुकला. सुधीर देशपांडे. सीनीअर एडीटर दैनिक सत्यशक्ती.
|
Aktta
| |
| Monday, August 06, 2007 - 8:55 pm: |
|
|
मला वाटत रेहान....... आहे (भास / खरा / हत्ती / मानुस) (र्माक १०)
|
मला वाटतय ह्याचे उत्तर भास
|
Chetnaa
| |
| Tuesday, August 07, 2007 - 3:25 am: |
|
|
नंदिनी, छान.... आता येऊ दे लवकर पुढचा भाग...
|
नंदु, लवकर लवकर लिही गं.. Is this the story about MPD (Multiple Personality Disorder) just like "Tell me Your Dreams"... ?????
|
मला वाटत रेहान....... आहे (भास / खरा / हत्ती / मानुस) (र्माक १०) >>>> रेहान सरस्वतीला भेटतो तेव्हा खरा माणूस आहे पण स्वप्नाला तो भास वाटतो आणि वीर कपूर " Tranfiguration " वापरून (हॅरीकडची छडी उधार घेऊन) त्याला हत्ती बनवतो. आणि म्हणून सरस्वती चिडून स्वत्:चं नाव सारा ठेवते. आणि वीर भेटल्यावर त्याला aavadakedaavara कर्सने मारायचं ठरवते.
|
Itgirl
| |
| Tuesday, August 07, 2007 - 8:25 am: |
|
|
नंदिनी!!!.... जरा पटपट लिही ग, म्हणजे मग कोणाला कसलेही भास होणार नाहीत
|
Manjud
| |
| Tuesday, August 07, 2007 - 9:53 am: |
|
|
रेहान हत्ती आहे. रेहानने हे वाचलं का?
|
Ana_meera
| |
| Tuesday, August 07, 2007 - 11:15 am: |
|
|
रेहान काल्पनिक आहे मित्रांनो! सारा उर्फ सरस्वतीला(व लेखिका नंदिनीला) झालेला एक भास! ( मी खोटे बोलत ( i mean, लिहित आहे)
|
"रेहान, मी असं कसं काय करू शकते?" रेहानने कपाळाला हात लावला. गेले दोन तास सरस्वती रडत होती. आणि रडता रडता तिचं हेच पालुपद चालू होतं. "सुधीर देशपांडे.... रेहान... माझ्यासमोर होते. आणि मी बावळटासारखं त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. देवा.... हे मी काय केलं?" रेहानने आधी तिला शांत करायचा प्रयत्न केला पण ते त्याच्या आवाक्याबाहेरचं आहे हे समजल्यावर तो स्वत्:च शांत बसून राहिला. ती गप्प व्हायची वाट बघत. तिच्या इतक्यावेळच्या बडबडीमधे त्याला काहीही समजलं नव्हतं. कोण सुधीर? काय झालं? काही नाही. पण सरस्वतीकडे बघताना मात्र त्याला हसू येत होतं. विस्कटलेले केस, रडून रडून सुजलेले डोळे आणि अस्ताव्यस्त झालेली साडी. तिच्या नेहमीच्या know all पेक्षा हे रूप जरा मजेशीरच होतं. जरा तिचा रडण्याचा सूर कमी झाल्यावर त्याने हलकेच विचारलं. "एक बात बताओ, ये सुधीर है कौन?" "काय्य?" ती जवळ जवळ किंचाळलीच. "रेहान, सुधीर देशपांडे. तु कधी नाव पण नाही ऐकलस का?" त्याचा रिकामा चेहरा पाहून ती अजूनच भडकली. "ग्रेट जर्नालिस्ट. ९३ चे दंगे, बॉम्बस्फोट, निवडणुका, he is the best... मी माझ्या निबंधात बहुतेक रेफ़रन्सेस त्याचेच वापरली आहेत. ते समजलं असेल त्याना. पण जर ते समोर असते तर मी त्याना अजून किती काय विचारलं असतं.... किती गाईड केलं असतं त्यानी मला. त्याचा कॉलम मी रोज वाचते.... रेहान हे मी काय केलं?" परत रडण्याचा भर सूरू झाला असता... पण रेहानने लगेच वेळ सावरली. "तू परत भेटली की विचार." "अरे पण मी परत केव्हा भेटणार? त्याच्यासारखा मोठा माणूस असा रोज भेटत नसतो. मी गाढवपणा केलाय. आयुष्यभर लक्षात राहील ही चूक माझ्या." ती पदराने नाक पुसत म्हणाली. "सरस्वती. त्यानी तुला कार्ड दिलय ना? मदत करतील असे पण म्हणाले ना. फिर तू मेरे साथ बॉंम्बेला चल. आणि भेट त्याना. He might offer you a job " सरस्वती रडता रडता मधेच हसली. रेहानला वाटलं, कॅमेरा हवा होता आता.... "रेहान, मी बारावी पण नाहीये अजून. आणि मुंबईमधे जॉब करायचं झालं तर मला मास कम्युनिकेशन करावं लागेल. खूप खर्चिक कोर्स आहे. माझा निबंध आवडला म्हणून कुणी मला जॉब देणार नाही." " Why you always think so negative?" " Its not about being negative. I am facing reality . " reality? क्या है? तुम जिंदगीभर यही पे काम करोगे? कभी इससे आगे नही जाओगे? " "रेहान, मी एकटी मुंबईल कशी जाऊ?" "सिंपल, जैसे रत्नागिरी आये थे." "फ़ालतू जोक मारु नकोस. तुला माहीत आहे मी रत्नागिरीला का आले ते... " "ओह, इसका मतलब ये है अगर मे तुम्हारा रेप करूगा तो ही तुम भागके मुंबई जाओगे... राईट." "रेहान, तुझ्या जीभेला काही हाड? छी.." सरस्वती वैतागून तिथुन निघाली. "सरस्वती मेरी बात तो सुनो. प्लीज यार.." "मला काहीच ऐकायचं नाही. मी परत तुला कधीच भेटणार नाही. बाय फ़ॉरेव्हर." ती मागे वळून न बघताच पुढे गेली. तो तिथेच बसला. मिश्किलपणे हसत. आज ना उद्या सरस्वती मुंबईला आलीच असती. त्याच्याबरोबर. त्याच्या घरी.
|
नंदिनी, लहान तोंडी मोठा घास घेतीयं, पण तु सुधिर देशपांडेचा जोशी केलास............... दिवे घे हं मात्र... :-)
|
Zakki
| |
| Tuesday, August 07, 2007 - 2:47 pm: |
|
|
अहो धूमशान, त्या सरस्वतीला बिचारीला आधीच इतके वाईट वाटत होते, त्यातून 'तिचा' रेहान असला राग येईल असा प्रश्न विचारतो. इतक्या गोंधळलेल्या मन:स्थितीत देशपांडे का जोशी हे कसे लक्षात येईल तिच्या? नेमके हेच दाखवण्यासाठी मुद्दाम चुकीचे नाव वापरले आहे.
|
आयला, गलतीसे मिस्टेक हो गया... झक्कीकाका तुमचे स्पष्टीकरण आवडले.
|
Aktta
| |
| Tuesday, August 07, 2007 - 8:56 pm: |
|
|
लय झाक.... असच फ़ास्ट फ़ास्ट लीवाकी एकटा...
|
Jo_s
| |
| Wednesday, August 08, 2007 - 3:55 am: |
|
|
कोण माझी आठवण काढतय मी खरं कथा पूर्ण झाल्या शिवाय लिहीणार नव्हतो काहीच. पण आता आलोच आहे तर.... नंदीनी छान चालल्ये गोष्ट सुधीर
|
Aktta
| |
| Thursday, August 09, 2007 - 8:27 pm: |
|
|
(एक वाट बघनारा चेहेरा)
|
Manogat
| |
| Friday, August 10, 2007 - 4:21 am: |
|
|
नंदु, आता कथा लवकर संपव... रोज सकाळी नविन posting ची वाट पाहुन थकले..
|
Zakki
| |
| Friday, August 10, 2007 - 12:07 pm: |
|
|
त्या सध्या देव आहे की नाही या चर्चेत गुंतल्या आहेत. , नंदिनी२९११
|
|
|