|
Supermom
| |
| Monday, August 06, 2007 - 4:29 pm: |
| 
|
काही दिवसांपूर्वी नवर्याचा एक मित्र घरी आला होता. अगदी नोकरी लागायच्या सुरुवातीच्या दिवसांपासून त्या दोघांची मैत्री. त्यामुळे इतक्या वर्षांनी भेट झाल्याचा दोघांनाही खूप आनंद झाला होता. साहजिकच सगळ्या जुन्या सवयी, गमतीजमती यांची उजळणी सुरू होती. 'अरे मिलिंद,अजूनही सकाळी उठल्यावर अभंगवाणी ऐकायची तुझी सवय कायम आहे का रे?' मित्राचा प्रश्न. 'अरे बाबा, आता नशिबी अभंगवाणी कुठली असणार? आता फ़क्त असते 'अखंडवाणी.' माझ्याकडे तिरपा कटाक्ष टाकत नवर्याचे उत्तर. मित्राला मुळीच हसू आले नाही. हो, विनोदावर हसतात, सत्य गोष्टींचे हसू थोडेच येते? 'आमचे हे किनई, फ़ारच अबोल.....' अशी तक्रार कित्येक पतीपरायण पत्नींची असते. पण मुळातच 'आपल्या सतत बोलण्यामुळे या अभाग्याला आपण बोलायची जराही संधी देत नाही.' हे त्यांच्या गावीही नसते. आमच्या नात्यातल्या एक काकू तर स्वैपाक करताना, काम करताना इतक्या बोलत असत की त्या काकांची मला फ़ार दया येत असे. एकदा मी आईने केलेला काही तरी पदार्थ द्यायला त्यांच्या घरी गेले असताना काका समोर सोफ़्यावर बसले आहेत. अगदी हताश चेहर्याने. अन काकू श्वास घ्यायचीही उसंत न घेता बोलताहेत असे दृश्य माझ्या नजरेस पडले. 'किती मेलं मरायचं या घरात? सतत पसारा.दिवसभर मेली आवराआवरी. कधी वाटतं, निघून जावं हिमालयात....' 'एवढं कुठलं आलंय माझं भाग्य?' काका हळूच पुटपुटले. त्यांच्या दुर्दैवाने ते काकूंना ऐकू गेलेच. अन मग तोंडपट्ट्याला दांडपट्टा हाच शब्द किती समर्पक आहे याचे प्रात्यक्षिकच मला बघायला मिळाले. त्यानंतर चारच दिवसांनी काका घरी आलेले असताना 'मुकी बायको वा बहिरा नवरा यापैकी काहीही एक असले तर संसार सुखाचा असलाच पाहिजे'. हे बाबांना पटवून देत असतानाही ऐकले. पुरुषांचा कमी बोलण्याचा नि बायकांचा जास्त बोलण्याचा हा 'दैवी गुण' अगदी लहानपणापासून दिसायला लागत असावा. माझा मुलगा शाळेतून घरी आला की एक शब्दही ना बोलता रिमोट घेऊन सोफ़्यावर स्थानापन्न होणार, तर मुलगी अगदी बस स्टॉप पासूनच 'आज शाळेत काय झाले,टीचर काय म्हणाली, मैत्रिणी काय म्हणाल्या या सार्यांचे रेकॉर्डेड समालोचन ऐकवीत येते. बरे ते झाल्यावरही गप्प बसेल म्हणता? नाव नको. कधीकधी तर तिच्या अखंड बोलण्याने...बोलणे हा सभ्य शब्द झाला, 'बडबड' म्हणणे जास्त समर्पक होईल... वैतागून मी थोडेही रागावले की नवरा.. 'जाऊ दे ग. शेवटी मुलीची जात आहे ती...' असे एका दगडात दोन पक्षी मारतो. माझ्या एका आतेबहिणीच्या सासूबाई अशाच. बोलणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क असल्याप्रमाणे सतत बोलत असतात. मी सगळ्या नातेवाईकांना फ़ोन करते, अगदी आवर्जून. पण त्यांना फोन करायला कचरते. आता एका स्त्री शी बोलायला दुसरी स्त्रीच घाबरते, यात पहिली स्त्री बोलण्यात किती 'पावरबाज 'असली पाहिजे हे सूज्ञांनी ध्यानी घ्यावे. तर एकदा त्यांचाच फ़ोन आला. माझ्या सुदैवाने नि नवर्याच्या दुर्दैवाने मी तेव्हा स्वैपाकात व्यस्त असल्याने फोन त्यानेच घेतला. नंतर तासभर उलटला, माझा स्वैपाक उरकला, मुलांना खाऊ घालून गाई गाई झाली तरी नवरा जेवायला यायचे चिन्ह दिसेना म्हणून मी त्याला बोलवायला गेले तर नुकताच फोन संपवून तो सोफ़्यावर बसून घाम पुसत होता. 'अहो, किती वेळचे बोलताय? जेवायचं नाही का?...' 'बोलतोय कुठला ग? ऐकतोय...एस. टी. डी. वर एवढं बोलणं म्हणजे....' 'असू द्या हो.फोन त्यांनीच केला होता ना?' (दुसरा कितीही उद्वेगाच्या मनस्थितीत असताना हे सुचणे हे माझ्या पुणे शहराशी वर्षभर आलेल्या संबंधाचे लक्षण.) मध्यंतरी एका कुठल्याशा पुस्तकात वाचले होते की 'पुरुषांची दिवसभराची शब्दमर्यादा पाच हजार शब्द असते तर स्त्री ची पन्नास हजार शब्द. त्यातही हे पाच हजार शब्द तो ऑफ़िसमधेच खर्च करून टाकतो म्हणे. म्हणजे विचारायलाच नको. आता जन्माला घालतानाच असा कोटा ठरवून देवाने पाठवले असले, तर आम्हा बायकांना उगाच वाचाळ, बडबड्या इ.इ. विशेषणे लावणे हा अन्याय नाही का? तुम्हीच सांगा बरे. समाप्त.
|
मजा आली, पण नाही गं आमच्या घरात उलटं आहे, आई अगदी थंडगार शांत आहे बोलण्याच्या बाबतीत, अगदी शांत राहुन ती कुठलेही काम करेल. पप्पा तर अतीशय बोलके. बहुधा बाहेर patients शी बोलुन वगैरे असे कोणाला वाटेल पण मुळात ती अगदी थंड आहे बोलण्याच्या बाबतीत ही माझ्या पप्पांची तक्रार आणी लगेच टोमणा सुद्धा त्यांचाच की, फक्त योग्य वेळी शांत पणे बोलेल(टोचेल, हे त्यांचे म्हणणे) नी पुढे होईल. हां माझ्या आजीपुढे आबा(माझे आजोबा) अगदीच थंड. कोणाची हिम्मत नाही होणार, पण ती उगाच सुद्धा नाही बोलायची.
|
Daad
| |
| Monday, August 06, 2007 - 10:44 pm: |
| 
|
सुमॉ, मजा आया! चपखलच अगदी. आमच्या घरात सगळ्या बायका बोलक्या आहेत. सासूबाई आणि आम्ही तिन्ही जावा! सासूबाई येणार असतील तर नवरा धसकून असतो, मी नाही. त्याचं म्हणणं, एक रेडिओ स्टेशन ऐकून घेईन पण एकाचवेळी दोन स्टेशनं ती सुद्धा बंद न करता येणारी एकदा माझ्या आठवड्याच्या राशीभविष्यात 'शांत, अबोल, विचार करून बोलणारे आहात' वगैरे वगैरे आलं होतं. मी, सासूबाई अगदी पोटभर हसलो. तेच भविष्य जेव्हा पुढच्या आठवड्यात सासूबाईंच्या राशीला आलं तेव्हा मात्रं घर-दार हसलं किती लिहिलय मी.... बोललेच आहे.... ;)
|
Supermom
| |
| Monday, August 06, 2007 - 11:03 pm: |
| 
|
दाद, रेडिओ स्टेशन वरून आठवलं. आमचं नवीन लग्न झालं नि आम्ही नवा संसार सजवला तेव्हाची गोष्ट. रोज हौसेनं काहीनाकाही खरेदी सुरू होती. माझ्या लहान बहिणीने विचारले की काय काय वस्तू घेतल्यात. त्यावर माझ्याकडे मिष्किलपणे बघून नवरा म्हणाला, 'सगळं झालं घेऊन. रेडिओची फ़क्त गरज नाहीय म्हणून तो नाही घेतला.' माझ्या बडबडीवरून त्याची ही मिष्किली आजतागायत सुरू असते. तसंच माझ्या बहिणीच्या वेळेस एक मुलगा बघायला मी, माझा नवरा नि बहीण गेलो होतो. मुलाकडचे फ़ारच मितभाषी असावेत. मुलगा नि माझी बहीण काहीच बोलत नव्हते हे बघून मीच संभाषण वाढवायचा प्रयत्न केला. अगदी बराच. पण तरीही कोणी काही बोलेना म्हणून शेवटी त्या दोघांना बाल्कनीत पाठवले. घरी निघालो तेव्हा बहिणीने सांगितले की तो फ़क्त एकच वाक्य बोलला की, 'बरीच बोलकी आहे हो तुमची मोठी बहीण...' यावर पतिराज म्हणाले, 'बोलकी शब्द वापरला त्याने? सभ्य दिसतोय मुलगा..'
|
Mepunekar
| |
| Monday, August 06, 2007 - 11:37 pm: |
| 
|
सुमो, मस्त लिहिलयेस. आमच्या घरी पण मी आणी माझी बहिण अणी आई खुप बडबड्या, सतत टकळी चालु या विरुद्ध माझा भाऊ आणी बाबा एकदम शांत. आता सुधा जेव्हा मी घरी फ़ोन करते तेव्हा सगळ्या गप्पा मारुन झाल्या तरी अजुन बोलायचे असते, मग बाबा आणी भाउ आता फ़ोन ठेव १.३० तास होउन गेला अशी (आणी एवढिच वाक्य) आठवण करुन देत असतात अधुन मधुन. तरी माझी आणी आईची अखंडवाणी चालुच असते. अगदी आज स्वैपाक काय केलाय किवा कामवाली आज चक्क वेळेत आली / आली नाही, शेजार्च्या आजी मुंबै ला गेल्यात असे महत्वाचे संभाषण उत्साहाने आईचे माझ्याबरोबर आणी नंतर अजुन एकदा माझ्या बहिणीबरोबर होत असते माझ्या भावाचा पेशंस संपल्यावर तो विचारतो कि स्वैपाक जेवायला किवा कामवली नाही आली तर मदतीला येणारेस का मग तिकडुन कशाला चोव्कशा तुला. या पुर्ण १.३०,२ तासाच्या संभाषणात बाबा आणी भाऊ फ़क्त काय कशी आहेस? मी/ अम्ही ठिक आहोत एवढेच बोलतात
|
Mankya
| |
| Tuesday, August 07, 2007 - 1:07 am: |
| 
|
व्वाह सुमॉ .. आवडलं लेखन अन विषयही ! आम्ही ज्या आजींकडे Paying Guest म्हणून राहतो तिथेही हिच परीस्थिती आहे, जरा उसंत न घेता आजी अगदी Non stop बोलतात तेही निरनिराळ्या विषयांवर उदा. आज तक वरची न्यूज, राशीभविष्य, शेजारील घरातील घडामोडी, सासू - सून नाते ( आता हा काय फक्त बोलायचा विषय आहे का पण असो ) , आणि त्यांच्या स्वतःच्या घराबद्दल सूरू झालं कि माझे सगळे सवंगडी (so called Room partners) ह्या ना त्या कारणाने बाहेर निघून जातात पण मी एक सरावलेला श्रोता आहे त्यामुळे मी तर उलट आस्वाद घेतो ! माणिक !
|
Sunidhee
| |
| Tuesday, August 07, 2007 - 4:43 am: |
| 
|
supermom , एका दगडात दोन पक्षी... माझ्या मामेभावाने एकदा आम्हा ६-७ मैत्रिणींना माझ्या घरात गप्पा मारताना पाहिले आणि नंतर विचारले, 'तुम्ही गप्पा मारता तेव्हा ऐकते कोण?' म्हटलं "का रे?" तर म्हणाला, "कारण सगळ्याच बोलत असतात."
|
Karadkar
| |
| Tuesday, August 07, 2007 - 5:01 am: |
| 
|
मी एक प्रचंड बोलते. पप्पा तर कायम म्हणतात ते तोंड कातड्याचे आहे म्हणुन टिकलेय लाकडाचे असते तर कधीच मोडले असते!!! माझी विभावरी नावाची एक खुप जवळची मैत्रीण अतिशय अबोल आहे. २ वर्षे होस्टेलला रहात होतो. त्यानंतर ती एकदा बहीणीच्या मंगळागौरीचे निमंत्रण द्यायला आत्यबहीणीला घेउन आलेली. आमची बडबड ऐकुन ती बहीण इतकी आचंबीत झाली की घरी जाउन सगळ्यांना एकच सांगत होती विभावरी कित्ती बोलते तिच्याबरोबर! सु.माॅ तुझ्या मुलीसारखी मी पण. घरात आल्या आल्या चप्पल काढुन टकळी चालु मम्मीपुढे! दिवसभराचा आखो देखा हाल! मस्त लिहीलेस ग!
|
Psg
| |
| Tuesday, August 07, 2007 - 5:45 am: |
| 
|
मस्त लिहिलेय सुमॉ! तुझ्या 'ह्यांनी' मारलेले पंचेस सही आहेत! एक सांगू का, बडबडी माणसं सगळ्यांनाच आवडतात, अबोल माणसांबद्दल कायम मनात शंका येते, तशी बोलघेवड्या माणसांबद्दल नाही येत कधी!
|
सु मा छान लिहैअय... अगदी पूनम, पण मला वाटते बडबडी माणस कामाच सोडून सगळ बोलतात आणि अबोल कामा व्यतीरिक्त काही बोलत नाही. मी आत्ता बडबड करु लागलेय. (मायबोलिवरच शिकले.. ), माझे head master माझ्या मुलाची बडबड ऐकुन त्याला म्हणाले तुझ्या आईचा आवाज ती १०वीत गेली तेव्हा ऐकला मी...तु एव्हढ बोलायला कुटउन शिकलास?
|
Chetnaa
| |
| Tuesday, August 07, 2007 - 8:21 am: |
| 
|
सुपर मॉम, छानच लिहिलय... एका दगडात दोन पक्षी...
|
Ana_meera
| |
| Tuesday, August 07, 2007 - 11:28 am: |
| 
|
सुपर मॉम छानच लिहिलेत. माझ्या पहाण्यात बायका १ नंबर आहेतच बोलण्याच्या बाबत. पण अनेक पुरूष सुध्धा बडबडे असतात.
|
Maudee
| |
| Tuesday, August 07, 2007 - 12:37 pm: |
| 
|
एक सांगू का, बडबडी माणसं सगळ्यांनाच आवडतात, अबोल माणसांबद्दल कायम मनात शंका येते, तशी बोलघेवड्या माणसांबद्दल नाही येत कधी! - संपुर्ण अनुमोदन पुनम....
|
सुमॉ, मस्त! ( बघ, मी कसा एका शब्दात दिला अभिप्राय. नाहीतर या बाकी मुली! आपण बोल बोल बोलायचं आणि सगळ्या बायकांना बोलणी खायला लावायची!! तरी माझ्या आत्याच्या सासूबाईंच्या नणंदेची पुतणी म्हणतच असते. तीच गं, जिचा नवरा आमच्या मावशीच्या जावेच्या भाचीच्या मुलीच्या ऑफिसात कामाला आहे. तसा काळाच आहे, पण स्वभावानी चांगला आहे बिचारा. बाकी रंग रूप काय कोणाच्या हातात असतं का? मी तर बाई कध्धी कोणाच्या रूपाबिपाचा उल्लेख नाही करीत. करायचंय काय आपल्याला? आपण बरं की आपलं काम बरं. पण बाकी आमची ही आत्या पुरणपोळ्या काय करते म्हणून सांगू! पुरणात ओलं खोबरं घालतात त्यांच्यात. मग लवकर संपवाव्या लागतात. बरं तर बरं, करूनच्या करून कुणी खातच नाही धड त्यांच्या घरी. हल्लीची डाएटची फॅडं नि काय!! माझं तर स्पष्ट मत आहे, वाट्टेल तितकं खावं आणि आनंदात रहावं. हो की नाही? आता माझी शेजारीणच बघ. वजन की मस्करी!! जिना हादरतो चढायला लागली की! मी काय म्हणते, जरा तोंडावर कन्ट्रोल नको का? पण नाही!! बायका म्हणजे तोंडावर कन्ट्रोल कसा तो नाहीच!! ना खाण्यावर, ना बोलण्यावर!! पण म्हणून सगळ्याच बायका तश्या असतात असं म्हणणं चूक आहे, हो की नाही? तरी आमचे हे नेहेमी म्हणतात......)
|
सुमॉ सही लिहीलेय. आणि बायका लगेच ते प्रुव्ह करायला "आमच्याकडेही अगदी अस्संच " म्हणून पुढे सरसावल्याच. पण खरं सांगू का? बायका आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी भरभरून जगतात गं. म्हणून बोलतात इतकं. प्रत्येक गोष्टीचं अप्रुप, सगळं शेअर करायची आवड, प्रत्येक भावनेची high intensity . म्हणून बोलतात खूप, रडतात आणि हसतातही खूप. स्वाती
|
Zakki
| |
| Tuesday, August 07, 2007 - 2:51 pm: |
| 
|
स्वाति, तुम्ही फारच अबोल हो. एखादी असती तर सांगत बसली असती. त्यावरून सगळ्याच बायका तश्या असतात असं म्हणणं चूक आहे, हे तुम्ही सिद्धच केले.
|
Mrinmayee
| |
| Tuesday, August 07, 2007 - 2:59 pm: |
| 
|
सु. मॉ. आवडलं!!! कित्ती खरं!!!!! स्वाती, तुझ्या आजच्या दिवसाच्या कोट्यातले वरचे ५०० शब्द वजा! झक्की, मुळातच तुमचा शब्दकोटा आम्हा बायकांपेक्षा कमी आहे. तेव्हा शब्द जपून वापरा!
|
Zelam
| |
| Tuesday, August 07, 2007 - 3:37 pm: |
| 
|
सुमॉ सहीच. बघ आहे की नाही मी अपवाद :-) स्वाती HHPV
|
Madhura
| |
| Tuesday, August 07, 2007 - 4:48 pm: |
| 
|
सुमॉ मस्त लिहिलेय. स्वाती :-) तुझी post वाचून मला मिली चित्रपटातील शुभा खोटे आठवली.
|
तशी मी खूप शांत आणि कमी बोलणारी आहे बरं का!. दिवसा अखंड बडबड कराणारे खूप असतील मी तर रात्री झोपेत पण बडबडते. सुमॉ, पण विषय सही घेतला आहे. मजा आली.
|
|
|