Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
अखंडवाणी

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आषाढ » ललित » अखंडवाणी « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through August 07, 200720 08-07-07  5:45 pm

Prajaktad
Tuesday, August 07, 2007 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ! सही विषय , प्रतिक्रिया तर धमाल आहेत.

Disha013
Tuesday, August 07, 2007 - 7:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ,
मस्त लिहिलय!
पंचेस सही!
स्वाती,

लगेच बायकांची वर्दळ सुरु झाली बघा. :-)
माझ्या अखंड बोलण्याला माझा नवरा आता सरावलाय आणि मी त्याच्या खाणाखुणीच्या उत्तरांना. मला म्हणतो,भारतात परतलो की तुला एखाद्या महिला मंडळात चिकटवुन देईन.तिथे कर बडबड!म्हणजे मी सुटलो!


Manuswini
Tuesday, August 07, 2007 - 7:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, अग हा अबोला बरा नाही बरे...... :-)

मला तर वाटते बोलण्याने मन हलके होते. न बोलणारी माणसे कळायला कठीण.
माझी जुळी बहिण एकदम recorder आहे, मी तरी कमीच. ती कोणी काय dress घालुन आले, तो रंग तीच्या कानातले, मग कोण professor कसा बोलला, त्याचा आवाज कसा आहे(अगदी imitate करून) ते प्रत्येक सेंकदाला काय घडले ह्याचा पुर्ण report आईला द्यायची घरी आल्यावर. आता नोकरीला लागल्यावर सुद्धा तेच आहे पण जरा कमी झालेय.
तीच्या न बघितलेल्या मैत्रिणी, office collegue मी हे 'असेच' ओळखु शकेन प्रथम बघुन सुद्धा इतके डीट्टो वर्णन.
बरे प्रत्येक वेळेला तुला तो john माहीती आहे ना, मग मी म्हणायचे हा तोच ना जो असा वाकडा चालतो,त्याच्यावर ही लगेच जोरात, अय्या तुला कसे माहीती? .......

शी काय तुझ्या लक्षात राहते ग.(हा तीचा शेरा, वर पण का ग तुझ्या इतक्या लक्षात राहेला तो? (आता मी लक्षात नाही ठेवले तर आणखी एक Story होईल ना...)

वर असा प्रश्ण. नी मधेच माझीच तपासणी, तुला कधी मी john विषयी सांगीतले, तुला हे सांगीतले ते माझ्या कसे लक्षात नाही? तुला माहीती आहे ना तो मागे कसा खडुस वागला ते पुन्हा भुतकाळाची एकदा Story सुरु
मग मी, आता काय झाले त्याला, त्याच्यावर काही नाही ग तो दिसला होता walmart मध्ये.... इतकेच? असा म्हणत मी आपली चाट.

न बोलणयांच्या मनातले काहीच सांगता येत नाही.
माझी एक मावशी आहे, ती इतकी बडबडी ना, तीचा Weak point तीला फक्त हे म्हणायचे " कीती बोलती ही " , इतकी वैतागते ना.
जरा कुठे तोंड उघडले तर तुम्ही लोक कच्चे खाता. basically तेव्हाचा मावशीला दोन तास उलटुन झाले असतात बडबड करून.


Manuswini
Tuesday, August 07, 2007 - 7:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी आई मला बाहेर निघताना(जर आम्ही कोणा ओळखीच्या लोकांकडे जात असु तर..), मनु कमी बोल जरा. जेव्हा कमी बोलायचे ठरवते ना तेव्हाच ज्यास्त बोलते(हे कळते सगळे बोलुन झाल्यावर). काहीतरी problem आहे असे वाटते मला :-)
पण तीच माझी जुळी बहिण बाहेर एकदम शांत( observation ) करत. नी घरात शिरली की radio सुरु.

(but in my exp, people who speak less outside are better observer and better judge people than people like me. We release lot of info about us I guess )


Storvi
Tuesday, August 07, 2007 - 9:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कळत नाही कारणं द्यायची गरज काय? :-O

Zakasrao
Wednesday, August 08, 2007 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहिच लिहिलय सुमॉ.
स्वाती
प्रतिक्रिया पण मस्तच आहेत :-)
थोडक्यात काय "बोलणे हा स्त्रियांचा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो त्या मिळवतातच."
मला आता एक गोष्ट लक्षात आली. मला एका बुधवारी ज्यावेळी SG रोड वाले भेटले होते त्यावेळी सगळ्या पुरुष मंडळीनी त्या बायकांच्या बाजुला का बसवले होते.


Milya
Wednesday, August 08, 2007 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ही ही सु.मॉ. सही लिहिले आहेस :-)

स्वाती किती अबोल आहेस गं.. अगदी अपवादाने नियम सिद्ध करणारी

पण फ़क्त बायकाच नाही काही काही managers पण खूप बोलतात आणि दुसऱ्याला बोलूच देत नाहीत :-(

Giriraj
Wednesday, August 08, 2007 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटले कोणत्या अखंड वाण्याबद्दल लिहिले आहे... पण इथे काहीच संबंध नाही त्याचा बिचार्‍याचा...

बाकी जे लिहिलेय ते छानच लिहिले आहे.. :-)


Zakki
Wednesday, August 08, 2007 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे अखंड वाण्याबद्दलच आहे. पण बायका सांगत असल्यामुळे अजून मुख्य विषय सुरु व्हायचाय.

'छ्या:! या पुरुषांना जर्रा पण धीर नाही!' एक ऐकलेले वाक्य.


Abhishruti
Wednesday, August 08, 2007 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manuswini, ही गोष्ट अगदी खरी आहे, मी पण समोरच्या माणसाला बोलता बोलता बरीच माहिती सांगते पण चौकश्या करुन त्या माणसाची माहिती काढून घेत नाही की त्याच निरिक्षण करत नाही.
मला मधे घशाला problem झाला, endoscopy केल्यावर त्यानी जास्त बोलू नका असं सांगितल मी म्हंटल पाहिजे तर औषधं द्या पण बोलू नकोस असं सांगू नका. एकतर ते पथ्य नक्कीच नीट पाळलं जाणार नाही आणि मी बोलले नाही तर तुम्ही treat कोणाला करणार :-)


Simm
Wednesday, August 08, 2007 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Milya--"पण फ़क्त बायकाच नाही काही काही managers पण खूप बोलतात आणि दुसऱ्याला बोलूच देत नाहीत "---

---Can't बायका be managers??



Runi
Wednesday, August 08, 2007 - 8:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ एकदम छान, बायकांच्या हा जिव्हाळ्याचा विषय ना त्यामुळे सगळ्या बायकापण बघ कशा अखंड आणि अगदी थोडक्यात प्रतीक्रीया देताहेत .
सगळ्यांच्या प्रतिक्रीयापण वाचनीय आहेत.


Paragkan
Thursday, August 09, 2007 - 2:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

zakki .. .. ..

Milya
Thursday, August 09, 2007 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

simm : अगं ते 'बायका' हे बायकोचे अनेकवचन म्हणून वापरले आहे... :-) मला असे म्हणायचे होते घरी प्रत्येकाची बायको तर खूप बोलतेच पण दारी काही managers पण बोलून वात आणतात :-)

आणि बायका असतात की managers. उलट माझ्यामते जास्त चांगल्या managers असतात बायका...

BTW simm म्हणजे काय?

झक्की

Badbadi
Thursday, August 09, 2007 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा!!! एकदम सही विषय, लेखन आणि प्रतिकिया :-) पण माझा आयडी च काय हे सांगतो ना!!! अजून काय बोलावं? :-)

Gajanandesai
Thursday, August 09, 2007 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ, स्वाती

काही बायका तर अशा असतात की आपल्या पावरबाज अखंडवाणीत नवर्‍याने पण सहभाग घेतलाच्च्च पाहिजे आणि तोही बरोबरीने (म्हणजे अधून मधून नुसते हूं हूं केलेले चालत नाही). आता पाच हजार शब्दांच्या ठिगळानं या बरोबरीत कुठे म्हणून पुरे पडावं?
त्यामानाने पहिला प्रकार(नवर्‍याला तोंड उघडायची देखील संधी न मिळणे) जरा तरी सुसह्य!.... असावा.


Zakki
Thursday, August 09, 2007 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Pardon me, but I just read this, and couldn't wait to share it.
» The trouble with her is that she lacks the power of conversation but not the power of speech.
- George Bernard Shaw


Manuswini
Thursday, August 09, 2007 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन भाऊ, sorry पण सहज विचारते हा स्वानुभव का हो?
पण काहीही म्हणा हे अगदी खरेय, माझी आजी स्वःताच बर्‍याच विषयावर आघाडीने बोलत बसायची, आणी समोरच्याला म्हणायची तु नुसती मान हलवत रहा. काय म्हणाले ते कळले का?

मिल्या,
हे असे दिन दहाडे statement करतोस म्हणजे १०००० शब्द एकायची तुझी तयारी आहे वाटते?? just kidding..


Savyasachi
Thursday, August 09, 2007 - 6:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी आई तर स्वत्:शीच मोठ्यांदा बोलत असते. मी उगाचच अधून मधून जाऊन खरय, काय करणार, हो ना अस बोलून येतो. की तिला पण वाटत कोणितरी ऐकतय अस.. :-)

Disha013
Friday, August 10, 2007 - 8:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व.पु. काळेंच्या कथाकथनात एक किस्सा ऐकलेला या बाबत.जसा आठवतोय तसा लिहीते.
एक माणुस वैतागुन मित्राकडे गेला. बायको फ़ारच बडबडते अशी त्याची तक्रार. तो मित्राला म्हनाला,' अरे एखादा मुलगा सुतळी बॉम्ब फ़ोडणार असेल तर आपण मनाची तयारी करतो की आता मोठा आवाज होणार आहे. कान बंद करुन घेतो.
एकदा बॉम्ब फ़ुटला की झालं.
पण तेच मुल जर दिवसभर टिकल्या फ़ोडत बसलं तर कशी वाट लागेल?माझं तेच होतय!!'





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators