Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 31, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » भाद्रपद » कथा कादंबरी » रेहान... » Archive through July 31, 2007 « Previous Next »

Itgirl
Thursday, July 19, 2007 - 10:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा नंदिनी!! पुढचा भाग पण पोस्टलास!! पण परत एवढाच? :-( (अस म्हणते म्हणजे परत अजून पुढच पण लिहीशिल आणि इथे पोस्टशील!! :-) )

Ardeshmukh
Friday, July 20, 2007 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I Think it's makeover time for sarswati
she'll become sara after this !!

m i right ??

Nandini2911
Friday, July 20, 2007 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई गं... माझा तर विश्वासच बसत नाही आहे. खरं सांगतेस?" सरस्वती आनंदाने म्हणाली.
"हो, आणि हे सर्व तुझ्यामुळे. तुच माझा अभ्यास नीट घेतलास. पास व्हायची पण माझी अक्कल नव्हती तिथे ६२ टक्के फ़क्त तुझ्यामुळे."


आज सकाळपासून सरस्वती ऑफ़िसमधे काही काम करत नव्हती. आज रीझल्ट लागला होता. शाळेमधून सरस्वती पहिली आली होती. ८८ टक्के. अगदी थोडक्यात बोर्डात यायचा नंबर राहिला. पण सरस्वती खुश होती.

आणि त्याहून जास्त खुश पल्लवी पास झाल्याची होती. तिच्या आईला कायम वाटायचं की सरस्वती पल्लवीची पुस्तकं वापरते, ती पल्लवीला नीट शिकवत नाही. कायम त्याच्या बोलण्यातून तिरकसपणे सरस्वती "फ़ुकटी" असल्याचं जाणवायचं.
आज काही न बोलता सरस्वतीने आपलं मत सिद्ध केलं होतं. जितकं घेतलं तितकंच परत केलं. जगाच्या व्यव्हारात ती पक्की बनत चालल्याची ती खूण होती.
"अगं, इतके चांगले मार्क मिळाले पेढे तरी दे." तिच्या ऑफ़िसमधे कुणीतरी म्हणालं.

सरस्वती कशीबशी हसली. अजून खोटं वागण्याची आणि बोलण्याची कला मात्र तिला जमली नव्हती.
महिना अखेर जवळ आला होता. पेढे काय सुतळी आणायला पैसे नव्हते. सकाळपासूनच सर्वानी तिला पार्टी दे पढे दे सुरू केलं होतं.
"काय लाज बीज आहे की नाही. ती मेहनत करून पास झाली आणि तुम्ही फ़ुकटे पेढे कसले मागता?"
जाधव ओरडले.
सरस्वतीने मागे वळून गेले. जाधवाच्या हातात किलोभर पेढ्याचा बॉक्स होता.
"तू तर आपल्या पेपरचं नाव रोशन केलस. हेडलाईन आज तूच आहेस. अग्रलेख पण तुझ्यावरच लिहिणार आहे. आणि साठे... ते सरस्वतीने लिहिलेले दोन तीन झकास लेख काढा रीप्रिंट करू."

"थॅक्यु सर" सरस्वती हसत म्हणाली.
डोळ्याच्या कडा आपसूक ओल्या झाल्या होत्या.
"अरे, थॅक्यु काय? आपली पोरगी आहे, शाळा झाली, आता बारावीला पण असाच पहिला नंबर पाहिजे. आणि हो, आता तुला हवा तो चॉईस. ज्या पाहिजे त्या टाईमाला ये, अभ्यास महत्वाचा."
जाधव मनापासून हसत म्हणाले.

माणसं बदलतात. सगळेच लांडगे नसतात. विश्वास ठेवायला शीक, रेहान सरस्वतीच्या कानात सांगत होता.


Ana_meera
Saturday, July 21, 2007 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिखते रहो नंदिनी.. या महिन्यात पूर्ण होणार काय कथा? थोडा मोठा भाग लिही ना please ....

Nandini2911
Sunday, July 22, 2007 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


प्रिय सरस्वती,
हल्ली पेपरात तुझी नाव रोज छापून येत आहे. त्यावरूनच तुझा पत्ता कळला. आणि हे पत्र पाठवायचे धाडस करत आहे. तुझ्या काकाला यातली काही माहीत नाही. तरी कृपया गैरसमज करुन घेऊ नये.

तुझ्या दहावीतल्या यशाबद्दल तुझे मनापासून अभिनंदन. अशीच यशस्वी होत जा. तुझे आयुष्य खूप खडतर आहे याची मला कल्पना आहे. पण तरीही तु कर्तुत्वाच्या उत्तुंग शिखरावर गेलेलं पाहण्याची इच्छा आहे. शिक्षण आणि नोकरी दोन्ही करत आहे हे वाचून वाईट वाटले. पण काय करणार? दैवच असं असतं

सरस्वती, एक वाईट बातमी आहे. तुझी आई मागच्या आठवड्यात वारली. महिन्याभरापूर्वी तिचा दुसरा नवरा साप चावून मेला आणि त्यानंतर ती कुणाशीच बोलत नव्हती. दोन तीन दिवस घरातून गायब होती. आणि नंतर ती खाडीत सापडली. आत्महत्या की तिच्या नवर्‍याच्या घरातल्यानी मारले ते देवा परमेश्वरालाच ठाऊक. तिच्या नावाची अंघोळ करून घे. जे काही नातं होतं ते संपलं होतंच. पण कर्तव्ये तर पार करावीच लागतात ना..

तिने तुझ्या नावाने बॅंकेत काही पैसे ठेवले होते. तू एकदा गावाकडे ये, म्हणजे ते तुला काढून घेता येतील. तुझ्या वडीलानी तुला काही ठेवलं नाही. पण आईने जे काही दिलं आहे ते नाकारू नकोस. आणि तुला एकटीला जगायचं असेल तर पैसा हा लागेलच.

सागर समीर नीट आहेत. आता शाळेत गेले आहेत. खूप मस्ती करतात. तू होतीस तेव्हा त्याचा अभ्यास नीट घ्यायचीस. आता मला जमत नाही. गेल्या वर्षीपासून पायाचं दुखणं वाढलं आहे.

तरी एकदा येऊन जाणे.

कळावे,
तुझीच
जया काकू,


"काय गं सरस्वती? काय वाचतेस?" प्राची आत येत म्हणाली.
सरस्वतीने मान वर करून पाहिलं.
"काही नाही गं. हे जाधव सर ना.. उगाच एवढं मोठं काहीतरी लिहितात. वाचकाची पत्रे येतात. अशीच काहीतरी."

सरस्वतीने हातातलं पत्र फ़ाडुन टोपलीत टाकलं.
"एखादा स्वस्त आणि चांगला डोळ्याचा डॉक्टर माहीत असेल तर सांग. मला वाटतं मला चष्मा लागणार आहे. वाचताना डोळे चुरचुरतात आणि डोळ्यातून पाणी येतं." बोटाने गालावरचा अश्रू टिपत ती म्हणाली.
}

Manutai
Monday, July 23, 2007 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढे काय झाले? कळून घेण्याची उत्सुकता आहे.

Nandini2911
Monday, July 23, 2007 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सरस्वतीचं अकरावीचे वर्ष तसं नीट गेलं. हल्ली रेहानच्या रत्नागिरीला फ़ेर्‍या कमी झाल्या होत्या. तसाही त्याचा विचार करायला तिच्याजवळ वेळ नव्हता. सरस्वतीचं कॉलेज सकाळचं होतं. आणि दुपारनंतर ऑफ़िस. रात्री पहिलं पान लागेपर्यन्त ती थांबायला लागली होती. खालच्या बाजारातून उद्यम नगर पर्यन्त इतक्या रात्री तिला जाणं येणं रोज कठीण जात होतं.

रात्री आश्रमात आल्यावर तिच्यामधे जेवण्याइतकी पण शक्ती नसायची. थकली भागलेली तशीच ती झोपायची. बहुतेक सगळा अभ्यास ती वेळ मिळेल तसा करायचीच.

पण एका गोष्टीवर मात्र सरस्वती खुश होती. तिची बातमीवरची नजर पक्की होत चालली होती. काय महत्वाचं आहे आणि काय नाही. हे तिला पटकन कळायचं. एखादी सुबक रांगोळी काढावी तशी ती पान लावायची. continuation नाही. बातम्या एकमेकात अडकवलेल्या नाहीत. आणि तरीही हवा तो बॅलेन्स.
तिचं चित्रपटाविषयीचं ज्ञान पण दिवसेंदिवस उजळून निघत होतं तासनतास नेटवर बसून ती माहिती गोळा करायची. आधी तिला फ़क्त चालु हीरो माहीत होते. पण हळू हळू तिचा चित्रपटाचा इतिहास पण तयार होत गेला. सरस्वती या विषयात मास्टर बनत चालली.
असंच एकदा नेटवर सर्च करता करता तिला एक जुनी मुलाखत मिळाली. रसिका नावाच्या हीरॉईनची.

रसिकाचं आणि रोहित कपूरचं लफ़डं असलेलं तिला माहीतच होतं. पण या मुलाखतीत अजून पण बरंच काही होतं. रसिका रोहितबद्दल बोलत नव्हती. ती बोलत होती, वीरबद्दल. तिच्या मुलाबद्दल. मुलाखतीसोबत एका सतरा अठरा वर्षाच्या मुलाचा हसरा फोटो होता. थेट आईसारखा दिसणारा चेहरा. पण बापासारखी नजर.

फोटोकडे पाहून सरस्वतीला वाईट वाटलं. त्याच्या जन्माच्या आधीच बापाने त्याला नाकारलं होतं. तिच्या जन्मानंतर तिच्या आईने तिला सोडलं होतं.

तिच्या बापाने सगळा दोष तिच्या माथी मारला होता. आणि त्याच्या आईने त्याच्यासाठी रात्रीचे दिवस केले होते.

ती शिXअणासाठी मर मर मरत होती. तो बोर्डींगमधलं शिक्षण संपवून अमेरिकेला निघाला होता. Film Production च्या कोर्ससाठी. किती फ़रक..

स्क्रीनकडे बघत बघत सरस्वती विचार करत होती. तेवढ्यात तिची नजर परत मुलाखतीवरून फ़िरली.
"शॅट. एवढा मोठा पॉइंट मी कसा काय मिस केला? वीर फ़िल्म्स मधे येणार आहे."

सरस्वतीने मेंदुच्या कॉम्प्युटरमधे वीर कपूर नावाची फ़ाईल उघडली. यापुढे रसिका आणि वीरबद्दल येणारा प्रत्येक शब्द साठवला गेला असता.
सगळेच जण गेलेल्या काळाकडे बघतात. सगळ्यानाच आज काय चाललय ते माहीत असतं. पण तिला येणार्‍या उद्याकडे लक्ष ठेवायचं होतं.

आणि उद्याचा काळ वीरचा असणार आहे. हे तिला का कुणास ठाऊक समजून चुकलं होतं.
"एकदातरी मला या मुलाला भेटायचं आहे. मी माझा भूतकाळ स्वत्:हून संपवला आहे. त्याच्याकडे तर तो ही ऑप्शन नाही. एकदातरी वीर कपूर भेटलाच पाहिजे."

रात्री झोपायच्या आधी सरस्वतीने डायरीत लिहिलं


Radha_t
Tuesday, July 24, 2007 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

fantastic ... चालू द्या पुढे

Ardeshmukh
Tuesday, July 24, 2007 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

nice episode !!

keep it up !!

Tiu
Friday, July 27, 2007 - 8:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतकी काही आवडली नव्हती मला कथा...पण जाधवांचं character बदलल्यावर आवडली...

just kidding ...खुपच छान लिहीलंय...पुढचा भाग लवकर येऊ द्या...

आणि चांगलेच असतात हो जाधव लोक!!! :-)


Ana_meera
Saturday, July 28, 2007 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, कट्टी. लिहायला वेळ काढत नाहीस म्हणून.

Itgirl
Sunday, July 29, 2007 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही, नाही अजून संपला नाही पेशन्स माझा... रोज इथे येऊन बघणार आहे मी पुढचा भाग आला आहे का ते.....

नंदिनी कधी ग लिहिशील तू....


Nandini2911
Sunday, July 29, 2007 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"कसला विचार करतोयस?"
"कौन मै? नहि तो ऐसेही बस.."
"रेहान, तु गप्प बसलास ना की मला कायम भिती वाटते."
"भिती? कसली?"
"माहीत नाही. पण तु असा विचार करत असलास की मला वाटतं तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस... का कुणास ठाऊक असं वाटत राहतं."
"पागल. मै क्या छुपाऊ तुमसे, अपनी तो जिंदगी खुली किताब है.. Open Book
"आणि तु पुस्तकं वाचतोस." ती हसत म्हणाली.
"नाह.. You know something I cant read books, I hate to read. I mean.. I cant be a bookworm like you "
"अच्छा. म्हणजे तु पास होत नाही कारण तू अभ्यास करत नाही... तुला अक्कल नाही अशातला भाग नाही."
"अब पता चला तुम्हे. चाहू तो एक बार सारे असब्जेक्ट्स छुडालू. पर मन ही नही करता..."
"काय हा वेडेपणा? बारावी नंतर शिकायचं नाही का तुला?"
"शिकून काय करणार? हेच ना.. मच्छी.. आंबे. ते तर आता पण करतो. चांगला पैसा मिळतो."
"अरे पण शिक्षणाचा उपयोग फ़क्त पैसा कमावण्यासाठी थोडाच होतो? शिक्षण नाही तर जगायला काय अर्थ?"
"ऐसा तुम सोचती हो, मै नही. वैसे भी इस बार मै पास होनेवाला हु.. dont worry "
"रेहान.. तू वेडा आहेस. मूर्ख आहेस. आणि नालायक आहेस, " ती वैतागून म्हणाली.
" thank you चाहो तो और दो चार गालिया दे दो. मै बदलनेवाला नही हु.."
"तुच म्हणालेला ना की माणसं बदलतात... मग..
"माणसं... मी नाही.. सरस्वती.. न मी बदलणार. ना तुला बदलू देणार. आपण असेच राहणार. This is not going to change.




Ana_meera
Monday, July 30, 2007 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बस एव्ह्ढचं? पुढे काय झालं?

Shamli
Monday, July 30, 2007 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

nandini
ag ewadhya GAP ni lihishil tar magach sagal wisrayalaa hot?

Jaraa MOHT MOTH lihi

Ardeshmukh
Monday, July 30, 2007 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hellooooooooooooooooooo


plz plz plz plz plz plzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz


post some bigger parts

Nandini2911
Monday, July 30, 2007 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सरस्वतीचं बारावीचं वर्ष सुरू झालं. अकरावीला ती वर्गात पहिली आली. अर्थात जाधवाच्या मते जर ती पहिली आली नसती तर ती हेडलाईन झाली असती.
"मग, बारावी नंतर काय करणार?" असंच तिला एकदा प्राचीने विचारलं. "माहीत नाही... अजून ठरवलं नाही.. पण कॉलेज करणार नाही हे निश्चित," सरस्वती आलेला फ़ॅक्स वाचत म्हणाली.. "हम्म... खेडला तीन अपघात. हायवेवरतीच तेही. आणि मस्तपैकी पाच जण गेले. हेडचा प्रश्न सुटला. चार वर्षाची पोरगी वाचली. Human Interest .. आज दिवसभर निवांत.. प्राची.."
"सरस्वती.. तु आता काय बोललीस?"
"मग.. आता जास्त काम नाही. फ़्रंटला हीच बातमी स्प्रेड करु."
"ते नव्हे. तु पुढे शिकणार नाहीस? मुर्ख आहेस का?"
सरस्वतीने हातातला फ़ॅक्स खाली ठेवला.
"मी असं कुठे म्हटलं की मी शिकणार नाही. पण मला आता कॉलेज आणि नोकरी एकदम जमणार नाही. त्यापेक्षा मी नोकरीच करेन.. इथेच खूप शिकायला मिळेल. नाही का?"
"सरस्वती.. पण तुला हे कसं जमेल?"
"सर्व जमेल.. आता फ़क्त बारावी पास करायची आहे. मग नंतर पुढचं बघू.."
बोलता बोलता सरस्वतीला अचानक आठवलं आणि ती खुद्कन हसली.
"काय झालं?" प्राचीने विचारलं.
"अगं माझा तो मित्र आहे ना.. रेहान.. तो माहितेय तीन वर्षे बारावीला नापास होतोय. यावर्षीपण तो पास नाही ना झाला... तर बिच्चारा.."
"तु अभ्यास घेते की काय त्याचा?"
"चल गं. तो कॉमर्सला आहे. आणि तावर्षी पास होईलच याची खात्री आहे म्हणे त्याला..."
"बाप रे. तुझ्यासारखा तुझा मित्र पण वेडाच दिसतोय.."
:"हम्म.. चल लास्ट पेजला रोहित कपूरचा हा फ़ोटो लाव.. आणि मी त्याची मुलाखत बनवुन देते ती लाव.. आं.. हा.. रोहित कपूर यापुढे फ़क्त वर्षाला एकच फ़िल्म करणार.."
"काय?" प्राचीच्या हातून कीबोर्ड पडायचा शिल्लक होता.
सरस्वतीने तिच्याकडे कपाळावर आठी आणून पाहिलं.
"ओरडू नकोस. रोहित कपूर वाचत नाही आपला पेपर."
"पण म्हणून तू असं खोटं लिहिणार.."
"खोटं काय त्यात? रोहित कपूरला बाकीच्या भानगडीमधून वेळ कुठे असतो पिक्चर करायला. एवीतेवी ही एकच पिक्चर करतो. चल आज हे लावू आणि मग उद्या सलमान खान घेऊ.. "
प्राची अजून गोंधळली होती.
सरस्वती किंचित हसली.
"आधी मला पण वाटायचं की असं लिहिणं चूक आहे. पण मला पेपरचा सेल वाढवायचाय. या लोकाची इज्जत नाही. चल कामाला लाग."

खुर्चीत बसल्या बसल्या सरस्वतीने केसातून हात फ़िरवला... डोळे घट्ट मिटले. चूक आणि बरोबर.. खरं आणि खोटं.. नैतिक आणि अनैतिक.. काय असतं हे सगळं? पोकळ शब्दाचे बुडबुडे? कोण आलं होतं तिच्या मदतीला? कुणीच नाही. आयुष्यात पुढे जायचं तर तडजोड ही करावीच लागते. कधी दुसर्‍याबरोबर तर कधी स्वत्:बरोबर..

सरस्वतीने ध्येय ठरवुन घेतलं होतं. पैसा. पॉवर.. सत्ता.. या गोष्टी नसतील तर तुम्ही असून नसून सारखेच. हातात पैसा असेल तरच जगण्याला किंमत. नाहीतर गटारातले किडे आणि आपण सारखेच. पण पैसा इतक्या सहजासहजी मिळतही नसतो. त्यासाठीच तर ती रात्रीचा दिवस करत होती. एक न एक दिवसाचं प्लानिंग करत होती. आज ती जिथे होती तिथून तिला उंचीवर पोचायला पाच वर्षं हवी होती. फ़क्त पाच वर्षं... आणि तेही जर सगळं तिच्या प्लाननुसार झालं असतं तर..

}

Radha_t
Tuesday, July 31, 2007 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा सरस्वतिच्या व्यक्तिमत्वाचा हा वेगळा पैलू interesting .. realistic कथा

Mansmi18
Tuesday, July 31, 2007 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपली का कथा(कादंबरी)? का अजुन आहे?

Rani_2007
Tuesday, July 31, 2007 - 6:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, आता खरोखर मागचे विसरायला होतंय. असं वाटतंय कि तु 'सरस्वति आणि रेहान' वर खूपच रेंगाळली आहेस. दररोज एक एपिसोड लिहिण्यापेक्षा दोन-तिन दिवसांनी एकदम तिन-चार एपिसोड पोस्ट कर म्हणजे कथेत interest टिकून राहिल.

माझं प्रामणिक मत सांगितले, राग नसावा. तू वेळात वेळ काढून एवढे लिहितीय ते खरंच स्तुतिप्राप्त आहे.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators