|
Sarang23
| |
| Monday, July 30, 2007 - 6:04 am: |
|
|
अंगण कशास असला शाप दिला रे अंगण ठेवुन गेला रोज पहाटे प्राजक्ताचा सडा इथे पडलेला साफसफाई करावयाची शपथ घातली आणि मोबदल्याला देऊन गेला प्राजक्ताची नाणी रोज पहाटे मन हे आता काट्यांमध्ये शिरते दो हातांचा झाडू होतो अंगण भवती फिरते सारंग
|
Meenu
| |
| Monday, July 30, 2007 - 7:27 am: |
|
|
वा झाड, बैरागी, मयुर, सारंग, वैभव, पुनम, श्यामले सगळेच सही लिहीताय. आज एकरकमी प्रतिक्रीया देते .. मजा आली वाचुन ..
|
>>> आणि आपण विसरून गेलेलो असतो हरवून जायची वाट..... वा! वैभव, ' पुण्याई' मस्तच! श्यामली, आवडली.
|
Chinnu
| |
| Monday, July 30, 2007 - 3:47 pm: |
|
|
श्यामलीताई सुरेख! आतापर्यंत वाचलेल्या तुझ्या कवितेतली ही कविता मला अतिशय आवडली. बैरागी, मार्गदर्शनाबद्दल खुप धन्यवाद. पुढचा वेळी खात्रीने प्रयत्न करेन. वैभवा खंत नकोस बाळगु, कारण आषाढी एकादशी हे फ़क्त निमित्त आहे, मनातले व्यक्त करायला. काही वेळा देवळातच जावे लागत नाही, डोळे बंद केल्यावरही काही भाग्यवंतांना दर्शन घडतेच ना. कविता आवडली, त्याबद्दल प्रश्नच नाही! सारंग सुरुवात छान झाली. आठवणींची नाजुक प्राजक्ता बाजुला सारून मनाचे अंगण नेटके करायची कल्पना आवडली. गुरुजी, Encouraging प्रतिक्रियेबद्दल फार्फार धन्यवाद. तुमच्या उत्तेजनाने निदान दोन बोबडे बोल तरी लिहिता येत आहे! मुठभर मांस नक्कीच चढलय आज माणिक अनेक धन्यवाद. मेघधारा फ़्लोमध्ये नक्की कुठे गडबड वाटली सांगणार का? सुधारण्याचा प्रयत्न करते.
|
Pulasti
| |
| Monday, July 30, 2007 - 4:08 pm: |
|
|
श्यामली, उत्तर मस्तच! वैभव, पुण्याई आवडली! सारंग, अंगणाची कल्पना छानच आहे. सडा आणि नाणी दोन्ही प्राजक्ताचीच.. अस थोडं confusion झालंय, पण पुन्हा वाचून पाहीन.. -- पुलस्ति.
|
मजा आ गया.... .. ..
|
Daad
| |
| Monday, July 30, 2007 - 10:03 pm: |
|
|
क्या बात है! एक से एक कवितांचा मोहोर आहे... खूप दिवसांनी इथे आलेय आणि खिळून राहिले. काय लिहिताय सगळे, लगे रहो, बाबा, लगे रहो! घाऊक कौतुक करायला मुळीच आवडत नाही. हे म्हणजे आपल्या माणसासाठी दुसर्या कुणालातरी प्रेझेंट आणायला सांगण्यासारखं वाटतं.... पण तेही करायला लागतं..... बरेचदा लिहीते रहा रे, सगळेच छान लिहिताय... मस्तं मैफिल जमून राहिलीये!
|
सारंग रोज पहाटे.. व्वा! सुंदर. चिन्नू सांगते.. पुर्ण कविता एका ठेक्यात वाटत नाही. १,३,५,७ आणि नववी ओळ नवीन ठेक्यात सुरू होते पण तीच्या पुढच्या ओळीत ती कन्टीन्युइटी रहात नाही. म्हणून वाचताना विस्कळीत वाटते. एका तालात, ठेक्यात, समान मात्रेत नाहिये म्हणावं तर मुक्त छंदाचा फ्लो ही येत नाही. मेघा
|
Jo_s
| |
| Tuesday, July 31, 2007 - 4:21 am: |
|
|
वा, सारंग कल्पना छान आहे पण पहील्या कशास असला शाप दिला रे अंगण ठेवुन गेला ........या दोन ओळीत काहीतरी गडबड वाटत्ये. अर्थ नीट कळला नाही. पुढची सगळी कविता मस्तच.
|
ओढ सळसळत आरपार तुझं अस्तित्व जाणवताना माझं मीपण विलीन होताना शिल्लक रहिलेली ओढ उत्तरदायीत्व नाकारते. तीच्या असण्याचं प्रयोजन मी सोयीस्करपणे डोळेझाक करते कदाचीत माझी आत्मप्रौढी कदाचीत प्रेमाची धुंदी पण खरं सांगू? मोकळेपणी चांदण्यात किंवा अगदी रखरखीत उन्हात जेव्हा तुझ्या साथीने तटतटून माझी पंचेंद्रिये आरक्त होतात जगायची सारी आस्क्ती एकवटून, तुझे हुंकार श्वासागणीक आत येतात तेव्हा मी 'मी' रहातेच कुठे? आणि तू..? तू आणि मी.. आपण काय एकमेकांना ओढणार? आपला संवाद हे फक्त नैमित्त बाकी आत होतेय ती गळाभेट ओजस्वी स्त्रोतांची आणि बाहेरुन उधळलेल्या झंझावातात आपण ओढले जातोय आपोआप... मेघा
|
Mankya
| |
| Tuesday, July 31, 2007 - 6:33 am: |
|
|
सारंगा .. क्या बात ! आपल्याला आवडली रे .. अगदि आहे तश्शी ! मेघा .. उत्कट म्हणजे किती उत्कट .. touching every extremity.. every end !... भावनांचं झंझावत अगदी ! माणिक !
|
Chinnu
| |
| Tuesday, July 31, 2007 - 3:09 pm: |
|
|
मेघधारा धन्यवाद. बदल करुन पाहते.
|
सारंग, मेघा, वैभव, कविता आवडल्या
|
Mankya
| |
| Thursday, August 02, 2007 - 4:40 am: |
|
|
उत्कट धुंद उसासे माळून .. भाळून गेली रात्र अन ऊबदार पहाटस्पर्शाने पुलकित गात्र गात्र धुंदल्या गंधाळलेल्या होत्या त्या अनामिक वाटा लयीत बेफाम उसळत होत्या ह्रदयी अमृतलाटा ईतूका वेळ बेफिकीर स्पर्शांशी स्पर्श बोलले होते ते शब्द अता नयनांनी .. निःश्वासांनी तोलले होते तृप्त रोमारोमात उमललेली ती समर्पणाची आस विश्वासाने उरी विसावलेले अलवार उष्ण श्वास अवघ्या कायेतून समाधान ओसंडून वहात होते जे डोळ्यातून मूक वाहिले, तेच जूने घाव होते ! माणिक !
|
Bee
| |
| Thursday, August 02, 2007 - 7:08 am: |
|
|
बंधन ह्या अवघ्या समष्टीतील निर्जीव अणुरेणुपासून सजीव जिवापर्यंत सारेच प्रयास करतात स्वतंत्र प्राप्तीसाठी, तरीही बंधनात अडकण्याचा केवढा मोठा अट्टाहास!
|
Sarang23
| |
| Thursday, August 02, 2007 - 2:14 pm: |
|
|
मेघा, आधी वाचल्यासारखी वाटतेय... छान आहे! माणिक, कविता छान... अधीक व्यवस्थित वृत्त पाळता आले असते... बी, स्वतंत्र की स्वातंत्र्य?
|
माणिक सारंग म्हणतोय ते खरय.. थोडी घाई केलीस ना? सारंग हो मागे मायबोलीवर कदाचीत टाकली होती. बी बंध कदाचीत माणसाचा बेसीक इन्स्टींक्ट म्हणून अट्टाहास. मेघा
|
Mankya
| |
| Friday, August 03, 2007 - 3:55 am: |
|
|
खूप खूप आभार .. सारंग, मेघा ! वृत्तात वगैरे लिहायचा प्रयत्नच नव्हता हा मुळात .. अगदी प्रामाणिकपणे ! पण पुढच्या वेळेस नक्की प्रयत्न करेन सारंगा ! अन घाई म्हणशील मेघा तर ही कागदावर उतरलीच नाही, सरळ ईथेच टाईप केली .. झालं ! माणिक !
|
Jo_s
| |
| Friday, August 03, 2007 - 4:08 am: |
|
|
मेघा छान, माणिक तुझ्या कल्पना छान आहेत आणि असतात, फक्त जरा लयीत गडबड होते. सारंग आणि मेघाला अनुमोदन
|
Bairagee
| |
| Friday, August 03, 2007 - 5:57 am: |
|
|
सारंग, 'प्राजक्ताची नाणी'आवडली.मेघधारा, कविता, कवितेतली उत्कटता आवडली. माणिक,उत्कट धुंद उसासे, ऊबदार पहाटस्पर्श, धुंदल्या गंधाळलेल्या ... अनामिक वाटा आदी क्लिशे जमल्यास टाळायला हवेत. बी, स्वतंत्र प्राप्तीसाठी ऐवजी मुक्तीसाठी बरे वाटते.'स्वतंत्र प्राप्तीसाठी' म्हणजे 'इंडपेंडंट इनकमसाठी' असा अर्थ घेतला तर वेगळाच अर्थ निघतो.
|
|
|