|
Supermom
| |
| Tuesday, July 17, 2007 - 3:23 pm: |
| 
|
टी व्ही वरच्या चित्रपटातला गलका एकदम वाढला तशी मला दचकून जाग आली. हातातला रिमोट केव्हाच गालिचावर गळून पडला होता.एकाच कडेला इतका वेळ झोपल्याने मान अवघडून दुखायला सुरुवात झाली होती. सोफ़्यावरून पाय हळूच खाली घेत मी स्लिपर्समधे सरकवले. आळस कसा अंगात भरून राहिला होता.केसांचा हलकासा सैलसर अंबाडा बांधून घेत मी स्वैपाकघरात आले. मायक्रोवेव्ह च्या घड्याळात एक वाजत आला होता. 'अजून आला नाहीय हा. आज काय ऑफ़िसमधेच झोपणार आहे वाटतं.....' मनातल्या मनात चरफ़डतच मी जेवायच्या टेबलावर येऊन बसले. आता भुकेची जाणीव झोपेवरही मात करू लागली होती. काचेच्या भांड्यांवरची झाकणं उगाचच उघडून पहात मी एक निसटता निश्वास सोडला. 'हं....वाटली डाळ,आम्रखंड,पुर्या, बटाट्याचा रस्सा...सगळं त्याच्या आवडीचं. वाढदिवस आपला अन जेवण मात्र नवर्याच्या आवडीचं बनवलंय. अन त्याला काही आहे का त्याचं? एक वाजला तरी अजून घरी यायचा पत्ता नाहीय....' प्लेटमधे चमचाभर श्रीखंड नि दोन पुर्या वाढून घेत मी खुर्ची सरकवली तोच लॅचचा आवाज आला. 'अग, हे काय...जेवली नाहीस अजून? मी कित्तीदातरी तुला सांगितलय..मला उशीर असला की जेवून घेत जा म्हणून...' 'मग तर महिन्याचे वीस दिवस मला एकटीलाच जेवावं लागेल..' मनात नसतानाही तीर सुटलाच. 'राणी, मी थकून आलोय. आता वाद जाऊ देना. चल, आपण दोघं जेवू या छान. अन मी मस्त सुट्टी घेतलीय उद्या. तुझ्या आवडीप्रमाणे सारा कार्यक्रम ठरव तू...खूप फ़िरूया बाहेर. हवं तर आत्ताच बुक करतो सिनेमाची तिकिटं मी. ऑनलाईन...' 'काही नको. दिवसाला महत्व असतं. दर वर्षी हेच. कध्धी कध्धी म्हणून वेळेवर येत नाहीस तू....' आता माझे डोळे भरून आलेले.कोणत्याही क्षणी धारा बरसणार असतात. 'इथे मी दिवसभर खपून घरची कामं करतेय. नि एक वाढदिवसाला पण घरीच. कंटाळा आलाय अगदी मला. अन तुझ्या माणसांना वाटतं की मी इथे किती आरामात आहे... नुसती लोळतेय महाराणीसारखी...' नवर्याच्या चेहर्यावर हलकंसं हसू पसरलं. 'गॉट इट. फोन केला होतास वाटतं घरी आज. अग तुला कितीदा सांगितलंय. कोणी काहीही म्हटलं तरी आपण लक्ष देऊ नये. अन इतका मनस्ताप तुला होतोय तर करतच नको जाऊस फोन तू.मी बोलतोच नाही तरी दर आठवड्याला....' माझ्याशी बोलता बोलता तो हात धुवून जेवायला येऊनही बसला होता. माझ्या डोळ्यातलं पाणी हलक्या हाताने पुसून त्यानं माझ्या प्लेटमधेही वाढायला सुरुवात केली होती. 'राणी, कोणाच्या बोलण्याचा असा परिणाम नाही करून घ्यायचा मनावर. शांत पाण्यात दगड पडला ना, तर तरंग उठणं अगदी साहजिक, पण पाणी गढूळ नसतं होऊ द्यायचं असं. तितका संयम हवाच मनावर आपल्या...' 'पुरे तुझं साहित्यिक बोलणं. जेव आता...' मला खुदकन हसू फ़ुटलं. अपूर्ण.
|
Sneha1
| |
| Tuesday, July 17, 2007 - 5:12 pm: |
| 
|
लवकर लिहा पुढे. आम्ही वाट पाहतोय.
|
Bhagya
| |
| Tuesday, July 17, 2007 - 10:41 pm: |
| 
|
आम्हीपण वाट बघतोय. बाकी वाढदिवस आपला आणि जेवण मात्र नवर्याच्या आवडीचं....... अगदी खरं.
|
Sms
| |
| Tuesday, July 17, 2007 - 11:54 pm: |
| 
|
कीती सुन्दर लिहितेस दर वेळेस supermom . पुढचा भाग लवकर येउदेत.
|
Manogat
| |
| Wednesday, July 18, 2007 - 9:38 am: |
| 
|
सुमाॅ, पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघते आहे..
|
Badbadi
| |
| Wednesday, July 18, 2007 - 10:34 am: |
| 
|
सुमॉ, सुंदर लिहिलं आहेस... 'राणी, कोणाच्या बोलण्याचा असा परिणाम नाही करून घ्यायचा मनावर. शांत पाण्यात दगड पडला ना, तर तरंग उठणं अगदी साहजिक, पण पाणी गढूळ नसतं होऊ द्यायचं असं. तितका संयम हवाच मनावर आपल्या...' >> असा समजूतदार माणूस सोबत असल्यावर अजून काय हवं?
|
Supermom
| |
| Wednesday, July 18, 2007 - 2:21 pm: |
| 
|
दुसरा दिवस अगदी आनंदात उजाडला.माझ्या मनासारखा थुईथुई नाचतच. सकाळपासूनच दोघं घराबाहेर पडलो. खूप खूप भटकंती झाली. मनासारखी खरेदी झाली.सिनेमा बघून झाला अन छानशा हॉटेलमधे जेवणही झालं.घरी परतण्याआधी जवळच्याच तलावाच्या काठावर दोघं जाऊन बसलो. 'खरं सांग,तू मलाच का पसंत केलंस? इतक्या मोठ्या घरातला तू. काय पाहिलंस माझ्यासारख्या मध्यमवर्गीय, साध्यासुध्या मुलीत?...' गेल्या वर्षभरात अनंत वेळा विचारलेला प्रश्न मी पुन्हा विचारला. 'सांगितलंय की मी तुला. आकाशवाणी झाली होती ना... हीच तुझी बायको म्हणून...' नवर्याच्या चेहेर्यावर मिष्कील हसू. 'अहं... नेहेमीसारखं थट्टेत उडवू नकोस ना. खरं खरं सांग अगदी...' माझा आवाज रुसका. नवरा आता मात्र गंभीर झाला. 'तुला मी कितीदा सांगितलंय. अशी वेळ येते, एखादं माणूस समोर येतं नि वाटतं की हीच.. हीच ती व्यक्ती. हिच्यासाठीच थांबलो होतो मी इतका वेळ. तो क्षण जणूकाही तिथेच थबकून रहातो. पण त्या थांबलेल्या एका क्षणाने आयुष्याचे सारे प्रश्न सोडवलेले असतात. सगळं कसं स्पष्ट होतं डोळ्यांसमोर. फ़क्त एकच जाणीव उरते, ती म्हणजे आयुष्याचा जोडीदार मिळालाय....सगळा शोध संपलाय. मग मनात उरतात फ़क्त सहजीवनाची तरल स्वप्नं......' नकळत माझाही आवाज कातर झाला. 'पण या सार्याबरोबरच घरच्या माणसांच्या नापसंतीला झटकून टाकणारी एखादी जादूची कांडी असती तर...? किती बरं झालं असतं रे...' 'हं. अजून कालचं फ़ोनवरचं संभाषण गेलं नाहीय वाटतं बाईसाहेबांच्या डोक्यातून... चल, इतक्या सुरेख दिवसाला गालबोट नको लावूस राणी आता. विसरून जा बरं ते....' 'खूप प्रयत्न करते मी विसरायचा. पण मन विसरूच देत नाही रे. मान्य आहे. तुझ्या माणसांच्या मनात काही वेगळीच प्रतिमा असेल सुनेची. पण आता आलेय ना मी तुझा हात धरून या घरात...मग त्यांनी नेहेमी असं खोचक बोलायची काय गरज आहे?....' माझ्या पापण्यांवरचे थेंब सर्रकन गालावर उतरले. 'राणी.. राणी..मला अगदी मान्य आहे त्यांचं चुकतंय ते. पण एक कळत नाहीय मला. याआधी तर आपण भारतात एकत्र कुटुंबात रहात होतो.या सार्याशी तर तुझा रोजच सामना होता. मग तेव्हा तू कधी इतकी खिन्न झाली नाहीस. अन गेले सहा महिने बघतोय....फोनवरच्या एखाद्याच बोचर्या शब्दानं इतका मनस्ताप का करून घेतेस तू? इथे तर आपण दोघंच आहोत. तसाही फ़ारसा संबंध येतच नाही घरच्यांचा...' आता मात्र मी खरंच विचारात पडले. हे काय होतंय मला सारखं? खरंतर हा माझा स्वभाव नाहीच. सगळं आयुष्य कसं समरसून जगायला आवडतं मला.गेल्या काही दिवसात हे असं सतत भरून आल्यासारखं, मनावर मोठ्ठं दडपण असल्यासारखं का वाटतंय?....' घुसमटून टाकणारी ती जाणीव पुन्हा तळापासून वर येऊ लागली तशी मी झटकन उठले. 'अरे, किती उशीर झाला...घरी नाही का जायचं? उद्या ऑफ़िस आहे म्हटलं...' अपूर्ण
|
supermom , नेहेमीप्रमाणेच सुंदर. पुढचा भाग केव्हा?
|
Swa_26
| |
| Thursday, July 19, 2007 - 7:01 am: |
| 
|
सुमॉ... नेहमीप्रमाणेच छान!! लिहित रहा
|
Itgirl
| |
| Tuesday, July 24, 2007 - 11:57 am: |
| 
|
supermom, पुढचे भाग वाचायची खूप उत्सुकता आहे.. कधी येणार पुढचे भाग?
|
Rajankul
| |
| Tuesday, July 24, 2007 - 12:55 pm: |
| 
|
सु.मा. खुप चांगल लिहिता तुम्ही.
|
Aashu29
| |
| Tuesday, July 24, 2007 - 9:34 pm: |
| 
|
supermom सम्पलि का विश्रांती? येउ दे कि पुढचा भाग लवकर!!
|
Zakki
| |
| Wednesday, July 25, 2007 - 1:11 pm: |
| 
|
अहो, त्या खरी घडत असलेली कथा लिहीताहेत. अजून पुढचा भाग घडलाच नाही तर कश्या लिहीतील?

|
Supermom
| |
| Wednesday, July 25, 2007 - 1:34 pm: |
| 
|
मित्रमैत्रिणींनो, सगळ्यांचे आभार. माझ्याकडे माझी बाहुलीसारखी गोड भाची पाहुणी म्हणून आलीय. त्यामुळे तिच्याबरोबर वेळ कसा जातो हे कळतच नाहीय. आठवडाभरात गोष्ट पूर्ण करतेच. झक्की,खरी घडलेली गोष्ट नाही हो ही. बाकी तुम्ही माझ्या गोष्टीच्या बी बीवर आलात की भीतीच वाटते मला.
|
Arch
| |
| Wednesday, July 25, 2007 - 5:52 pm: |
| 
|
झक्की,खरी घडलेली गोष्ट नाही हो ही.>> तरीच म्हटल नवरा नावाचा माणूस इतका समजूतदार कसा असू शकतो. 
|
Manuswini
| |
| Wednesday, July 25, 2007 - 6:17 pm: |
| 
|
आर्च, अनुभवाचे बोल का ग? बघ तु घाबरवतेस आम्हाच्या सारख्यांना? btw कशी आहेस? हल्ली कमि दिसतेस(असतेस?)
|
Sneha21
| |
| Thursday, July 26, 2007 - 9:11 am: |
| 
|
झक्की,खरी घडलेली गोष्ट नाही हो ही.>> तरीच म्हटल नवरा नावाचा माणूस इतका समजूतदार कसा असू शकतो. 100 percent true. Arch.....sahich...aani sumom tumhi pan,....
|
अस वाटत नाही पण.. नवरा हा प्राणी साधा भोळा असावा.. आपली चूक असताना जो माफी मागतो, तो प्रामाणिक असतो. आपली चूक आहे की नाही, याची खात्री नसतानाही जो माफी मागतो, तो शहाणा असतो. आपली चूक नसतानाही जो माफी मागतो, तो नवरा असतो!!! आजच वाचल कुठेतरी...
|
Maudee
| |
| Thursday, July 26, 2007 - 10:02 am: |
| 
|
योगिता dear तुझ लग्न झालेल नाही दिसत अजून. बाकी supermom छान चालल आहे.... कथा येऊ दे
|
हो ग...पण तु कस ओळखलस maudee ??म्हणतात ना अज्ञानात सुख असतं तस आहे ते...
|
|
|