Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 31, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आषाढ » इतर कला » माझी चित्रकला » Archive through July 31, 2007 « Previous Next »

Ajai
Sunday, July 22, 2007 - 3:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



quick sketchpen sketch

Jo_s
Sunday, July 22, 2007 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय छान आलयरे स्केच...
सुधीर


Ajai
Monday, July 23, 2007 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thx @ सुधीर.. मला पण आवडलं हे स्केच पुढे कधितरी oil करेन यावरुन

Shyamli
Monday, July 23, 2007 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या लेकाची चित्रकला :-) मुंगुस आहे म्हणे हे!


Ksha
Monday, July 23, 2007 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, तुझ्या लेकाला शाबासकी दे हो. रेषांची गोलाई खूप छान आहे. अजून प्रयत्न केला तर नक्की चांगली चित्र काढेल बघ तो!

Jo_s
Tuesday, July 24, 2007 - 3:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली खरच छान आलय हे, त्याला प्रोत्साहन द्यायलाच हव. आम्च्या शुभेच्छा कळव त्याला.

Ajai
Thursday, July 26, 2007 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Pha
Friday, July 27, 2007 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, क्विकस्केच नेटकं आलंय, पण त्यावरून एखादं क्लासिक चित्र काढच. :-)
निसर्गचित्रात ऑइलपेंट वापरलेत का? पण थोडंसं अंडरपेंट झाल्यासारखं वाटतंय आणि रंगही काहीसे म्लान वाटताहेत.
श्यामली, पोराने झकास चित्र काढलंय. बसलेल्या मुंगसाचं वरून रेखाटलेलं चित्र दिसतंय. माझ्यातर्फे एक कौतुकाची थाप!(श्लेष नाहीये. :-O )


Pha
Friday, July 27, 2007 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेले वर्ष - दीड वर्षभर एक विषय डोक्यात घोळतोय - पुण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणांची चित्रे रेखाटायचा. चित्रकलेच्या तांत्रिक भाषेत सांगायचं झालं तर या प्रकाराच्या चित्रांना 'नगरचित्रे' असं संबोधतात. मिलिंद मुळिकांची पुणे आणि महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणांची नगरचित्रे पाहून या विचाराचा थेंब मनात पडला असावा. त्यांच्या चित्रांतून जाणवणारा पुण्याचं जुनं 'पुणेपण' आणि कालौघात त्याचं बदलताना दिसणारं रूप हा विषय माझ्याही जिव्हाळ्याचा. त्यातूनच मग सुटीच्या दिवशी दुपारी भटकंती करत स्पॉटस्केचिंगचे प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला अवघड वाटणारं काम आताशा हळूहळू जमायला लागलंय असं वाटतंय. त्यातलाच हा एक प्रयत्न... फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरचं हॉटेल वैशाली :

'वैशाली'
माध्यम : पेन
प्रत्यक्षचित्रण


हॉटेल वैशाली

Shyamli
Friday, July 27, 2007 - 7:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद क्ष,सुधीर वाचायला लावलंय त्याला हे :-)
खुश आहे स्वारी अजुन छान चित्र काढतो म्हणे आता बघुया.
श्रीमंत बर बर , थाप पोचवते :D

Kedarjoshi
Friday, July 27, 2007 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ मस्तच. पण अरे तो समोरच कठडा आजच रुप आहे. त्या क्ठड्याच्या जागी लोखंडाच्या सळया काढल्या काढल्यास तर ते १० वर्षापुर्वीच वैशाली वाटेल. (शिवाय त्या गाड्या पण जास्त हव्यात)

Saurabh
Friday, July 27, 2007 - 8:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा फ! छानच जमलंय!..

Runi
Friday, July 27, 2007 - 9:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ एकदम छान जमलय नगरचित्र. अगदी त्याच्या बाजुचे वस्ते टेलरचे दुकान, नंतर वैशालीच्या बाजुच्या गल्लीत शिरतांनाची कमान. एकदम जमले, आवडेश.
बाकी कुतुहल म्हणुन विचारतेय तु कुठल्या वेळी हे चित्र काढलेस? कारण वैशाली नेहमी एकदम खचाखच भरलेलेच बघितलय मी, आणि तितकीच जनता त्याच्या बाहेर उभी असते. समोरच्या गाड्या तर विचारुच नकोस. चालता पण येत नाही तिथुन.
केदारशी सहमत.


Ksha
Friday, July 27, 2007 - 10:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ .. खलास!
हो! केदारला मोदक.
आणि हो, एक RTO ची गाडी पण काढ बाजूला


Ajai
Saturday, July 28, 2007 - 2:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ- वर्ष दिडवर्ष म्हणुन्च गायब होतास का :-) चित्र छानच. milind mulickancha प्रभाव जाणवतोय.
मी ही जागा पाहिलेली नाहिये पण जर अगदी समोरुन स्केच न करता थोड्या वेगळ्या कोनातुन काढले असते तर वेगळा Perspective मिळाला असता का?

माझ्या चित्राबद्दल्- हो ते oil आहे आणि खरच underpenting करुन तेतेहेच थाम्बलो. का कुणास ठावुक ते तसच चित्र मला पुर्ण वाटले.

oil painting चा विषय निघालाय म्हणुन तुझा सल्ला विचारतोय. खालि मी करत असलेले ये portrait टाकतोय सध्या shadows & higlights block केलेत. आतापर्यन्त वापरलेल्या तंत्रा बद्दल आनी पुढे detaling/glazing कस कराव याबद्दल तुझे आणि इतर expert मायबोलिकरान्चे मार्ग्दर्शन हवेय.


dirty wash

underpainting

current stage -block

steps ahead- you syggest


original ref photo.. chitraat yaa aivaji haataat don phul asateel

Kashi
Tuesday, July 31, 2007 - 2:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ्- खुप सुन्दर स्केच..!!!!!! मी सध्या असेच सिंगापुर रेखाटायचा प्रयत्न करते आहे...एखादे टाकेन इथे. पेन मधल्या स्केचेस साठी तुपेसरांचे 'स्केचिंग करता करता' हे पुस्तक जरुर बघ.

Himscool
Tuesday, July 31, 2007 - 3:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ.. सही रे सही.. पण मलाही बाकीचे म्हणताहेत तो गाड्यांचा मुद्दा पटला.. फक्त अगदी सकाळी सकाळीच ७ वाजता अश्या कमी गाड्या असतात वैशाली समोर...

Psg
Tuesday, July 31, 2007 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ! ये हुई ना बात! मस्त आलंय स्केच. तो वैशालीचा 'V' बेस्ट! :-)

मला नाही गाड्यांचा मुद्दा पटला, कारण तसं म्हणलं तर वैशालीत लोकं नाहीत असंही कधी होत नाही! :-) मग गाड्या काढल्या तर लोकंही काढायाला हवीत आणि मग चित्र 'वैशाली'चं न दिसता 'वैशाली समोरची गर्दी' असं दिसेल!! :-)


Bee
Tuesday, July 31, 2007 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ, नगरचित्र मस्तच आले आहे. कल्पनाही मस्तच आहे.

Kandapohe
Tuesday, July 31, 2007 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ, छान कल्पना व चित्र. चतुर्थी जवळ आल्याने माझाही मोदक.

अजय सही चालले आहे.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators