|
Lalu
| |
| Thursday, August 09, 2007 - 3:19 pm: |
|
|
लिंबू, बेश्ट झाले आहे! मी पण ऐकले होते खडूच्या कोरीव कामाबद्दल. खडू थोडा ओला केला होता का? कशाने कार्व्ह केलेस?
|
Arch
| |
| Thursday, August 09, 2007 - 3:22 pm: |
|
|
लिंबू, खरच कला आहे तुझ्या हातात. (कला हा शब्द कारागिरी म्हणून वापरला आहे.)
|
Zakki
| |
| Thursday, August 09, 2007 - 4:55 pm: |
|
|
आता कळले का, शाळेत मास्तरांचे खडू कोण पळवत होते ते?
|
LT Best! .. .. ..
|
फ़, वैशाली झकास एकदम आत शिरावस वाटल लिंब्या, मस्तच रे... (पण मग हे अस काहीतरी करायच सोडून तू मोठमोठी पोस्ट का लिहीत बसतोस?)
|
Runi
| |
| Friday, August 10, 2007 - 1:42 am: |
|
|
लिंबुभाऊ, एकदम मस्त आलीये ती बाहुली. मला एकदम लहान माझी बाहुली तिची मोठी सावली हे लहान्पणीचे गाणं आठवले. कशी कोरली ह्याबद्दल सांगा ना जरा आणि सोबत ती कोरतांनाचे step by step फोटो असतील तर टाका ना कुठे तरी
|
काशी, लाडकी, सायुरी, लालु, आर्च, झक्की, हवा_हवाई, सव्यसाची, रुनी, धन्यवाद! लालु, खडु ओला केला नव्हता, ओला केल्यास कार्व्हिन्गला अजुनच कठीण होते, मात्र तेलात भिजवण्याचा प्रयोग केलेला नाही, करुन बघायला हवा! ऑइल किन्वा वॅक्स खडु पण ट्राय करायला हवेत! साबणावर फार पुर्वी केल हे! साबणावर सहज सोप जात पण साबण टिकत नाही, तरी माझ्याकडे दहा वर्षान्पुर्वी केलेले काम शिल्लक आहे! सुरवातीची आऊटलाइन काढुन म्हणण्यापेक्षा, खडुवर बघुन, तेवढा नको असलेला भाग सुरीने कातरुन घेतला, मग पाया कडुन सुरुवात करत वर डोक्या पर्यन्त कार्व्ह करत गेलो, त्यासाठी देखिल मोस्टली सुरीच वापरली, क्वचित ठिकाणि अर्धे ब्लेड व कर्कटक आणि सुई वापरली. या मूर्तीत एक दोन ठिकाणि चुकलो हे! उजवा पाय नीटसा आला नाही, तसेच ओठ काढताना शेवटी क्षीण होत चाललेल्या दृष्टीचे बन्धन आले! आर्च, कला हातात नाही, डोक्यात असावी लागते, अन बहुधा ती जन्मजात असते! हातात असते ते केवळ कौशल्य, स्कील आयुध वापरायच! आयुध कशाकरता वापरायची आणी त्यातुन काही निर्माण करायच की विध्वन्स हे मेन्दु ठरवतो, हात नाहीत! एनिवे, सान्गायचा मुदा असा की चित्रकार किन्वा मूर्तिकार बनायला एक विशिष्ठ नजर लागते, जर ती नजर असेल तर बघितलेले दृष्य नजरेसमोर तरळु शकते, ज्या माध्यमात काम करायचे त्यावर ते दृष्य आधी उमटलेले दिसते, चित्रकार किन्वा मूर्तिकार फक्त ते त्याला दिसत असलेले दृष्य स्किल्स आणि माध्यमे वापरुन बाकीच्यान्ना दिसेल इतपत आणुन ठेवतो! तुम्ही कौतुक करताय, बर वाटत वाचायला, पण कुणी जर केळकर म्युझियम मधे गेलात अन तिथे हस्तिदन्तात केलेला बुद्धिबळाचा पट आणि सोन्गट्या बघितल्यात तर आश्चर्याने थक्क व्हाल! माझ्या नजरेसमोर तो पट हे अन त्यापुढे माझी वरची मूर्ती म्हणजे खर तर पोर खेळ हे, खरच पोरीसाठी करुन दाखवलेला एक खेळ! रुनी, स्टेप बाय स्टेप फोटो काढु शकलो नाही, कॅमेरा नाही! हा एकच फोटो दहा जणान्च्या मिनतवार्या करुन डिजिटल मधुन काढुन घेता आला! पण मी हे स्टेप बाय स्टेप च लक्षात ठेविन! पुढच्या वेळेस! सव्यसाची, आता कळ्ळ?? पोस्ट्स मोठ मोठ्या का असतात ते????
|
Ajjuka
| |
| Friday, August 10, 2007 - 4:52 am: |
|
|
लिंब्या सहीच रे!! भाग्यवान आहात अशी कला ज्यांच्या हातात/ डोक्यात/ हृदयात आहेत ते!!
|
Ajjuka
| |
| Friday, August 10, 2007 - 4:54 am: |
|
|
एक प्रश्न आहे फोटोशॉप मधेच चित्र काढलेलं असलं तर ते माझी चित्रकला मधे येईल का? अगदी कोरा कागद घेऊन काढलंय. कुठलाही ready media वापरला नाहीये.
|
अज्जुका, तुला थॅन्क्यू! चित्राकरिता माध्यम कोणतही असेल तरी ते "माझी चित्रकला" या सदरात येवु शकेल! म्हन्जे तू समज घराच्या फरशीवर चित्र काढलस अन त्याचा फोटु काढुन इथे टाकलास तरी तो तुझी चित्रकला म्हणुनच बघितला जाईल काय काढल हेस ते टाक इथे!
|
Ajjuka
| |
| Friday, August 10, 2007 - 5:33 am: |
|
|
पुण्यात भुगावला मानस नावाचं रिसॉर्ट आहे. तिथे रात्री तळ्याच्या मध्यात बोट नांगरून ठेवली असताना दिसलेल्या landscape चे माझे impression आहे. save for web केल्यावर details किती राह्यलीयेत माहित नाही
|
Ajjuka
| |
| Friday, August 10, 2007 - 5:38 am: |
|
|
हे लॅपटॉप च्या टचपॅड वर केलंय. अजून टॅब्लेट घेतली नाहीये. लवकरच एक बेसिक टॅब्लेट घेईन मग रेषा अजून चांगल्या करता येतील. (टॅब्लेट पक्षी पेन माउस.. हे मलाही खूप दिवस माहित नव्हतं म्हणून इथे दिलंय.)
|
Ajai
| |
| Friday, August 10, 2007 - 6:21 am: |
|
|
youtube वर काहि painting चे video आहेत ज्यात photoshop मधे painting करताना घेतलेल्या सगळ्या steps animated आहेत. e.g. जर photoshop मधे portrait केले असेल तर video मधे पहिल्यान्दा outline draw होतान दिसते. नन्तर बाकिचे details, shading अक्खा sequence दिसतो. कुणाला असा video कसा create करायचा हे माहित आहे का. असेल तर कृपया detail द्या इथे. once basic video is created I will be able to edit it using pinacle studio or Adobe premier
|
Kandapohe
| |
| Friday, August 10, 2007 - 11:36 am: |
|
|
लिंब्या!! काल गडावर म्हणले तसे छानच जमले आहे. आणखी येवू दे. मधे मी असेच खडूवर गांधीजी, गुलाब बघितले होते.
|
Shyamli
| |
| Friday, August 10, 2007 - 3:16 pm: |
|
|
लिंबुभाउ ,सही आलीये ती बाहुली
|
Shonoo
| |
| Friday, August 10, 2007 - 6:04 pm: |
|
|
लिम्बू: गडावर आणि इकडे तिकडे कीबोर्ड बदडता त्या ऐवजी कलेबद्दल जो एक परिच्छेद लिहिला आहे तो जरा व्यवस्थित दोन चार पाने भरतील येवढा लिहा पाहू. शिल्प तर फार सुरेख आहे. रॉदँची मैत्रीण Camille वर एक सिनेमा होता camille नावाचाच. त्याची आठवण आली तुमचं शिल्प पाहून आणि वरचं लेखन वाचून. अशी कलेची नजर असणं हे देवाघरचं देणं आहे! भाग्यवान आहात तुम्ही. त्या नजरेने तुम्हाला काय दिसतं हे शब्दात चित्रबद्ध करण्याची कला पण आहे तुमच्या कडे. त्याचा लाभ समस्त मायबोलिकरांना व्हायला नको का?
|
Upas
| |
| Friday, August 10, 2007 - 6:37 pm: |
|
|
लिंबू मस्तच रे.. आवडलं अगदी
|
LT सही एकदम. प्रत्यक्षात जास्त छान असणार
|
Ajjuka
| |
| Saturday, August 11, 2007 - 2:06 am: |
|
|
मॉडस, माझी वरची दोन्ही पोस्टस उडवून टाका. छोट्या size मुळे काहीच details कळत नाहीयेत.
|
लिंबु खडू अन तो कलेचा परिच्छेद दोन्ही मस्तच.
|
|
|