|
मृद्गंधा , बैरागी , माणिक ... सुधीर , प्रतिसादाबद्दल धन्यवाद . बैरागी ... सताड उघडे कवाड हे प्रतीक्षेचे रूपक म्हणून आले आहे आणि तिथे आपण स्वतः कुणाच्यातरी प्रतीक्षेत जसे झुरून मरणे म्हणतो तसे नशीबाच्या प्रतीक्षेत माझे उघडे कवाड , पर्यायाने मी , झुरून मेले / लो असा विचार करताना मला खटकले नाही . माळरान उजाड मध्ये द्विरुक्ती होतेय की काय अशी शंका लिहीताना आली होती पण त्याहीपेक्षा उजाड हे विशेषण म्हणून मला आवश्यक वाटले . म्हणजे आत्ता जसं हे माळरान आहे ( उजाड / हताश / एकाकी ) ते तसं असण्याची तर खंत आहेच पण हे होण्याची प्रक्रिया टप्प्या टप्प्याने झाली आहे जे जास्त क्लेशदायक आहे असे काहीसे . शेवटचा शेर हा विंचवाचे बिर्हाड हा प्रकार माहीत असल्याविना लागणारच नाही . म्हणजे आपण जसं मराठी गज़ल ला proper मराठी फ़्लेव्हर असणार्या शेरांची गरज आहे अशी चर्चा करतो ना , त्यातला प्रकार आहे . खूप सोप्पा केला तर त्यातली गंमत निघून जाते असं माझं मत . अभ्यासपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद
|
लाड चा शेर मस्त! व्यथांचा शेर नसला तरी चालेल इतर शेरांपुढे मला तो कमी ताकदीचा वाटला.
|
Bairagee
| |
| Tuesday, July 24, 2007 - 11:44 am: |
| 
|
'आत्ता हे जसं' पटले. बिऱ्हाडाच्या शेरात वरच्या ओळीत बदल हवासा वाटला. कवाडाच्या झुरून मरण्याबाबत मतभिन्नता कायम.
|
मस्त गज़ल, वैभव. मतला आणि शेवटचा शेर सर्वात आवडले. पण ' पाय काढता घेतला फुलांनी' हे काय पटलं नाही बाबा. ऋतू ( या संदर्भात वसंत वा हिन्दुस्तानी ' बहार') काढता पाय घेईल, फुलं कशी काढता पाय घेतील?
|
सुवर्णमयी शेर अतिरिक्त वाटू शकतो . मला त्यातील नेहेमीच व्यथांचं रडगाणं जगाकडे गाण्याऐवजी व्यथांनाच त्यांच अस्तित्व सिध्द करा असं विनवलं जातंय ते जरा भावलं होतं . म्हणजे जगास अश्रू लबाड वाटतात इथपर्यंत ठीक पण व्यथांनाही वाटले तर ? व्यथांवर strive होणार्या माणसांचं काय होईल ? असं वाटलं . बैरागी .. मतभिन्नतेबद्दल आभारी आहे . त्याशिवाय प्रगती नाही . स्वाती ... फुलांनी काढता पाय घेतला यात फुलांना पाय कुठं असतात म्हणणं म्हणजे संधी दार कुठल्या हाताने ठोठावते असं म्हणणं नाही का ? बैरागी , सुवर्णमयी , स्वाती .. खरंतर तुमच्या अभ्यासपूर्ण मतांवर मी काय बोलणार . म्हणूनच विरोधी मुद्दे न मांडता लिहीताना कुठल्या प्रयोजनाने लिहीले गेले आहे इतकंच स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय . तरीही आणखी काही सूचना वा बदलांचे स्वागत आहे .
|
Chinnu
| |
| Tuesday, July 24, 2007 - 5:12 pm: |
| 
|
वैभवा, फक्त पहिली ओळ जरा वाचतांना अडखळायला होते. हळुहळु फ़ुलांनी पाय कढला, नकार आणि मतला क्लासिक! लबाड अश्रु आणि आतले घबाड तर सहीच. गजल आवडली.
|
Saurabh
| |
| Tuesday, July 24, 2007 - 6:26 pm: |
| 
|
वैभवा, छान गझल! तुझा आणि स्वातिचा rappo माहित असुन देखील हा आगाउपणा करतो. मला वाटते तिल 'फुलांना पाय कसे असतील' हा प्रश्न पडलेला नाहीय. (कारण वसंतालाही पाय नसतात). पण फुले 'जाण्याची' प्रक्रिया ही वसंताच्या सरण्याचा परिणाम म्हणून होते असे तिला सुचवायचे असावे... ती पॅसीव्ह आहे.
|
सौरभ सर्वप्रथम प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ऋतू येतात जातात तशी फुले जातात म्हणणं योग्य नाही हे स्वातीचं म्हणणं माझ्या लक्षात आलेलं आहे पण मी तिला तेवढ elaborate explanation देत बसलो नाही कारण माझ्या त्या छोट्या स्पष्टीकरणातून काय म्हणायचंय ते समजेल असं वाटलं . आता इतरांनाही हा प्रश्न असू शकतो हे गृहित धरून मी तो शेर काढतोय आणि विचाराधीन ठेवतोय .
|
Devdattag
| |
| Wednesday, July 25, 2007 - 3:32 am: |
| 
|
वैभव.. व्यथांचा शेर लई आवडेश, घबाडही सुरेख, विंचवाच्या बिर्हाडाचाही मस्तच
|
Aaftaab
| |
| Wednesday, July 25, 2007 - 5:09 am: |
| 
|
वैभव, मला संपूर्ण ग़ज़ल आहे तशी आवडली.. आम्हाला असे काफ़िये आणि असे शेर कधी सुचणार?
|
Milya
| |
| Wednesday, July 25, 2007 - 6:02 am: |
| 
|
वैभवा गजल छान आहे. जरा हटके आहे... दोन-तीन शंका मनात आहेत.. फोने करेन त्यासाठी
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 25, 2007 - 11:31 am: |
| 
|
वैभव, स्वाती, फ़ुलानी पाय काढता घेतला, हे अगदी चूक नाही. बीज नुरे, डौलात तरु डोले फुल गळे, फळ गोड जाहले ( घन तमी शुक्र बघ राज्य करी ) मधेही साधारण अशीच कल्पना आहेच कि. बाकि वैभव, रचना आवडली नाही तरच लिहायचे असे ठरवले आहे, आणि ती वेळ कधीही येणार नाही, अशी खात्री आहे.
|
Devdattag
| |
| Wednesday, July 25, 2007 - 12:38 pm: |
| 
|
वैभव, स्वाती, बैरागी आणि इतर जाणकार एक प्रश्न एखाद्या गजलेत जर शेरास दोन अर्थ असतिल.. एक सिम्बॉलिक आणि दुसरा साधा.. पण त्यातला सिम्बॉलिक अर्थ जास्त स्पष्ट असेल, पण पहिला थोडा अस्पष्ट असेल तर तो शेर चांगला आहे असं म्हणू शकतो का?
|
Bairagee
| |
| Wednesday, July 25, 2007 - 1:09 pm: |
| 
|
एखाद्या गजलेत जर शेरास दोन अर्थ असतिल.. एक सिम्बॉलिक आणि दुसरा साधा.. पण त्यातला सिम्बॉलिक अर्थ जास्त स्पष्ट असेल, पण पहिला थोडा अस्पष्ट असेल तर तो शेर चांगला आहे असं म्हणू शकतो का? माझ्या मते, असे काही नाही. एखादी द्विपदी वाचल्याशिवाय सांगता येत नाही. कधी कधी एकच अर्थ असलेला शेर अर्थांचे अनेक पदर असलेल्या द्विपदींपेक्षा अधिक परिणामकारक असू शकतो.
|
Pulasti
| |
| Wednesday, July 25, 2007 - 1:26 pm: |
| 
|
वैभव, मतला सोडून अख्खी गझल आवडली! माळरानही आवडले. बिर्हाड खूपच आवडले! पण मला सर्वात आवडलेला शेर घबाडाचा! अप्रतिम शेर आहे!! माझं 'घबाड' नेमकं कोणतं? माझी मूलभूत मूल्य कोणती? what really diferentiates me.. or even defines me? मी कशाने भ्रष्ट होऊ शकतो? अतिशय सहज आणि सोपा असूनही या शेराची तात्विक खोली प्रचंड आहे... -- पुलस्ति.
|
Chinnu
| |
| Wednesday, July 25, 2007 - 2:12 pm: |
| 
|
सॉरी, मला मक्ता आवडला म्हणायचे होते वैभव!
|
मी जाणकार नाही पन रसिक नक्कीच आहे,आणि मला तरी "फ़ुलांनी काढता पाय घेणे" यात काहीच खटकले नाही,उलटपक्षी जे तिन शेर मला अधिक आवडले त्यातला एक आहे..[दुसरा अर्थात घबादाचा,आणि मक्ता].आणि त्यातही ती ओळ जास्त आवडली
|
देवा, असं सांगणं कठीण आहे. एखादं उदाहरण देशील? आणि तू 'Symbolic' म्हणजे नेमकं काय म्हणतोयस? Metaphor का? ' चांगला / वाईट' हे फार सापेक्ष आहे, त्यामुळे त्याबद्दल generalised विधान करत नाही, पण मला स्वतःला दोन्ही अर्थ पूर्णपणे, ओढाताण न करता लागलेले वाचायला आवडतात. ( तसे लागत नसतील तर ते रूपक समर्पक नाही असा अर्थ झाला, नाही का?)
|
वैभव सुंदर गज़ल. आफताबला प्रचंड अनुमोदन. वैभव.. मक्त्याच्या शेरात 'रोल' या शब्दापेक्षा.. काय रामाच्या कथेतुन हा एक स्वतंत्र अर्थ असलेला मिसरा वाटला नाही म्हणून म्हंटलं. त्या जागी हाय रामाच्या कथेतुन.. ? तरी नियमात बसेल असं वाटत नाही. गज़लेची बाराखडी पुन्हा वाचायला हवी. माझं काहीतरी चुकतय बहुतेक. चू भू द्या घ्या मेघा
|
देवदत्त , स्वाती , एकूण किती अर्थ लागतायत आणि त्यातला कुठला सशक्त लागतोय असं बघण्यापेक्षा किमान एक अर्थ व्यवस्थित वाचकापर्यंत पोचायला हवा इतकाच निकष असावा असे वाटते . बाकीचे अर्थ , त्यांची परिणामकारकता हे सगळं वाचकावर सोडून द्यावं . समजा एखाद्याला दोन अर्थ ओढाताण न करता लागलेच तरी त्यात तिसर्या अर्थाची अंधूक छटा असणारच नाही असं कश्यावरून ? मग हे vicious circle होईल . आपल्याला लिहीताना एक अर्थ लागला , समजला , आवडला व इतरांना समजेल असा वाटला आणि नाहीच समजला अस कुणी म्हटलं तर समजावून सांगता येईल असा आत्मविश्वास असला की झाले असे मला वाटते . हे ही कशासाठी की स्वांतसुखाय लिहीतो म्हणून कलाकृतीची जबाबदारी टाळता येत नाही इतकंच . मेघधारा .. प्रत्येक स्वतंत्र मिसरा ही एक परीपूर्ण ओळ हवी असा नियम नाहीये .
|
|
|