Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मराठी गझल

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आषाढ » काव्यधारा » मराठी गझल « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 24, 200720 07-24-07  10:29 am
Archive through July 26, 200720 07-26-07  10:25 am

Daad
Thursday, July 26, 2007 - 11:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव गज़ल नखशिखान्त आवडली.
झुरून मेले कवाड्- वाट बघून बघून आतल्या आत झुरून...! नशिबाची वाट बघण्यात उघडेच राहिलेले... हे असलं तूच लिहू जाणे!
हळूहळू पाय काढता- हाये! माळरानावर येणारी फुलं अशी हळू हळू धुमारतात. लावलेल्या बागेसारखी एकाचवेळी नाही.
रोज बघतो... पण कधीतरी एकदम लक्षात येतं की अरे संपूर्ण माळ पिवळ्या फुलांनी डवरलाय नुसता.... असं म्हणता म्हणता... फुलं काढता पाय घेतात... एक एक करून... अन एक दिवस लक्षात येतं की अरे.... उजाड झालाकी माळ..! (प्रेमात पडणं अन त्यातून बाहेर पडणं असच असावं का?)
घबाड्- आमच्यासाठी एक घबाडाचाच शेर, बाबा. बोलायचं काम नाही!
मक्ता सहीच!


Aaftaab
Friday, July 27, 2007 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुरून गेले कवाड वर पुन्हा एकदा दाद द्यावी वाटतेय.
एवढे बोलीभाषेतले साधेसुधे शब्द वापरून एवढा powerful मतला तयार झाला आहे, की बस्स..
यावरून एक जगजीतची ग़ज़ल आठवली... राहावत नाही म्हणून उल्लेख करतोय..

कौन आयेगा यहां, कोई ना आया होगा
मेरा दरवाजा हवाओने, हिलाया होगा..

दिल-ए-नादान ना धडक, ऐ दिल-ए-नादान ना धडक
कोई ख़त लेके पडोसी के घर आया होगा




Swaatee_ambole
Friday, July 27, 2007 - 7:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, मला विचारांती तो शेर चूक वाटत नाहीये आता. विशेषतः दादचं वर्णन वाचल्यावर. :-)

तेव्हा माझ्याकडून तो ' विचाराधीन' मधून ' मस्त' category मधे गेलाय. :-)


Manas6
Sunday, July 29, 2007 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गझल वाचल्या बद्दल/ दिलेल्या प्रतिसादाबद्दल मायबोलीकर स्नेह्यांचे मन:पूर्वक आभार!
मेघधारा, वैभवने आपल्या शंकेचे निरसन- म्हणजे गझलेचा प्रत्येक मिसरा हा कर्ता, कर्म आणि क्रियापद असलेले एक संपूर्ण वाक्य असावे असा नियम नाहीये- अगदी व्यवस्थित केलेय... अलिकडे वाचण्यात आलेली शेरांची काही उदाहरणे..ज्यातील पहिला मिसरा हे एक अपूर्ण वाटणारे वाक्य आहे..विशेषत: छोट्या बहरेच्या गझलेत असा अपूर्ण वाटणारा मिसरा आपल्यास मुख्यत्वे करुन बघावयास मिळेल

१) सरफिरे दिल के बादशाहों की,
राजधानी हुई, हुई, न हुई.-- बलबीरसिंह 'रंग'
२) गझल की आग में पलकों के साये,
मुहब्बत की हिफ़ाज़त कर रहे है-- बशीर बद्र
३) चॉंद तारों से मशविरा करके,
शब की दहलीज़ पर सहर रखना-- अमीर कज़लबाश
४) उसके आगे मेरा ऑंसू,
ऑंख बचा कर निकला होगा-- जगजीवनलाल अस्थाना
५)शोरो-गुल, गर्दो-गुबार,
राजधानी! और क्या?-- प्रदीप चौबे
६) एक ज़रा सी मुलाकात के,
कितने मतलब निकाले गये-- लक्ष्मीशंकर वाजपेयी
७)
अ) जाने क्या साहिल से कहकर,
उल्टे पॉंव समन्दर लौटा
ब) पैगम्बर, अवतार, देवता,
इंसॉं क्या-क्या होकर लौटा-- अनिल 'अभिषेक'

मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
-मानस६




Meghdhara
Sunday, July 29, 2007 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने..

म्हणतात शिष्याने गुरुकडून जास्तीत जास्त घेत रहावं. आज गुरुपौर्णीमेच्या निमित्ताने मायबोलीमुळे सुरू झालेल्या एका प्रावासाबद्दल मायबोलीला मनापासुन कबुली नी धन्यवाद देण्याचा हा प्रयत्न..

मायबोलीवर यायला लागल्यावर जिथे आपली लिहायची ऐपत नाही असा बीबी म्हणजे गज़ल बीबी हे मनात पक्कं होतं.

गज़ल बीबी म्हणजे यावं, वाचावं, आवडल्यावर, आपसूक ओठातुन व्वा बाहेर पडल्यावर प्रतिक्रिया द्यावी. कधीकधी काही खटकल्यास, न कळल्यास विचारावं हे एवढच माहिती आणि ग्रुहीत धरलं होतं.'काय लिहितात हे लोक!' किंवा 'सलाम'म्हणत (अर्थात मनातल्या मनात), गुरूबद्दल आदराने शिष्याचा हात कानाकडे जावा तेवढ्याच सहजतेने आणि त्याच भावनेने गुपचूप दुसर्‍या बीबी कडे वळावं हे नेहमीचं रुटीन होतं.


गज़ल कार्यशाळा सुरू झाली आणि नियमबद्ध लिहायचा प्रयत्न आपणही करू शकतो याचा विश्वास वाटू लागला.

आपण ट लाट ट नी प ला प करतोय असं वाटायला लागल्यापासुन ते गज़लेच्या जमिनीचा एक परिघ असतो नी या जमिनीच्या गर्भाला धरुन परिघावर पोहचता पोहचता, मिसर्‍यांच्या, जीवनसत्यांच्या, सशक्त खेदांच्या, अनेक लाटा आपल्यालाही भिजवू शकतात असे वाटेपर्यंत मजल मारली गेली.

प्रक्रुतीच्या, भोवतालच्या, सौंदर्याच्या अनेक अस्तित्वांमधलं मीटर जाणवायला लागलं. आत पोचायला लागलं. मीटरमधे बांधून आलेल्या सौंदर्याची अदब, त्याचा दिमाख मोहात पाडू लागला. तल्लख आनंद, खोल मनातलं दुःख, जीवाभावाची सल किंवा मनाच्या अगदी कुठल्याही प्रामाणीक संवेदनेने रसरसून हे सौंदर्य ओतीव धारेसारखे वाहू शकतं, स्फुरू शकतं हे पटू लागलं.


मग सुरू झाला हट्टीपणा. कधी शब्दांना बोलवायचा, कधी व्यक्त व्हायचा, कधी वहायचा.. दरम्यान गज़लवर नी इतर कवितांवर हक्काने (क्वचित आगाउपणे), कधी थोड्या असमंजसपणे भाष्य करणे सुरू राहिले.(नी आहे!) कधी रसिक, अर्धवट ज्ञानामुळे कधी किंचीत क्रिटीक वाटायला लागलं.


काही म्हणजे मोजून चार गज़ल लिहिल्या. रात्री जागवून, बराच खटाटोप करुन लिहिलेले आणखीन दोन तीन काव्यप्रकार, गज़ल नियमात, श्रेणीत बसतच नाहियेत कळल्यावर हिरमोडही झाला. पण कच्च्या विद्यार्थ्याने अभ्यास जास्त करावा या स्वानुभावाने शिकत प्रयत्न होत राहिला.

शुद्धलेखनाचा रियाज, 'डोळस' वाचन, छंदांचा व्रुत्तांचा अभ्यास, नियमित ग्रुहपाठ आणि मुख्य म्हणजे नियमीत लेखन याचा अनियमीत तरी पाठपुरावा किती महत्वाचा आहे नी आवश्यक आहे कळायला लागलं. स्वताहून बरेच दिवे घेतले गेले. वाट पहाणे सुरू झाले. सौंदर्याचं स्रुजन आपल्या हाती नसतं हे माहिती असुनही वाट पहाणं सुरू झाले. आणि प्रत्येक वाट बघणं आपल्या थ्रू काहीतरी नी आपल्याला काहीतरी शिकवून जातच.

आज गुरूपौर्णिमेच्या निमीत्तने या प्रवासाची सुरवात करून दिल्याबद्दल गज़ल कार्यशाळेचे आणि मायबोलीचे मनापासुन आभार!!!

आणि वाट पहाण्याचा हा प्रवास संपू नये ही मनोमन ईच्छा.





एकदा वाट पहायची ठरवल्यावर रात्री मोजायच्या नसतातच..


सवयीचे ही अता जाहले वाट पाहणे
वाट पाहुनी कधी न थकले वाट पाहणे

शब्दांच्याही गर्दीला मी चुकवीत आले
प्रारब्धी शब्दांचे ठरले वाट पाहणे

असा महात्मा म्हणे जन्मतो युगायुगांनी
क्रांतीच्या ठीणगीला उरले वाट पाहणे

वाट पाहण्या मजला लावून जिंकलास तू
जिद्दीने मीही ना हरले वाट पाहणे

(स्वप्नांनीही घ्यावा थारा याच ठीकाणी
जेव्हा नव्हते जुनेच सरले वाट पाहणे)

अटी मागण्या मायेपोटी पुरवत पुरवत
बिनशर्ती प्रेमास्तव जपले वाट पाहणे

सुखावले हे का इतरांच्या दुर्दैवाने?
परदुःखावर सहज भाळले वाट पाहणे

श्रद्धेने व्यवहार साधला गाभार्‍याशी
श्रद्धेने रांगेत दंगले वाट पाहणे

सोडून गेला रणांगणा तो अर्ध्यावरती
सोबत करण्या आता कुठले वाट पाहणे!


मेघा




Manas6
Monday, July 30, 2007 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघधारा, आपले मनोगत आवडले. गझलेतील भावही
पुढील प्रवासासाठी शुभकामना!
-मानस ६


Bairagee
Monday, July 30, 2007 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघधारा, 'वाट पहाणे' ह्या अन्त्ययमकाला अनेक ठिकाणी सहजपणे निभावलेले नाहीत. अन्त्ययमक उंटाला जिराफाचे शेपूट लावल्यासारखे किंवा रेशमी कुर्त्याला टेरिलिनचे ठिगळ लावल्यासारखे वाटायला नको.असो. पण तुम्हाला गझलेची तबीयत लाभलेली आहे हे एकंदर वाटते. (काही सुट्या ओळी, मतला आणि 'श्रद्धा' छान.) आणि मेहनत करण्याचीही तयारी आहे, हेदेखील चांगले आहे. मोठ्या गझलकारांचे गझलसंग्रह पुन्हा पुन्हा वाचा. गझलेच्या भाषेला वळण येईल. ओळींत सफाईदारपणा येईल.

Meghdhara
Tuesday, July 31, 2007 - 2:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानस धन्यवाद.
बैरागी मार्गदर्शनाबद्दल अत्यंत आभारी आहे. लिहून लिहून सहजपणाही यावा ही इच्छा आहेच,
पुन्हा धन्यवाद!

मेघा


Shyamli
Saturday, August 04, 2007 - 7:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा स्वतंत्र प्रयत्नाबद्दल अभिनंदन :-)
गुरुपौर्णिमा आवडली तुझी

Aaftaab
Monday, August 06, 2007 - 9:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'हो'ला 'हो' म्हण, घाम गाळ रे
थुंकी झेलुन, घोट लाळ रे

म्यानेजर चुकतो कधीच ना
रात्रीलाही म्हण सकाळ रे

तिकडे जा, जिकडे म्हणेल तो
मेंढी तू, तो मेंढपाळ रे

ओव्या घे मानून, त्या शिव्या
गळ्यात त्यांची घाल माळ रे

भत्ता, सुट्टी, वा पदोन्नती
वर्ज्य तुला ते मोहजाळ रे

कामासाठी त्याग हा करी
फेकुन दे वेड्या, घड्याळ रे

धर्म आपला कर्मयोग हा
कुडी तुझी चंदन, उगाळ रे

=============


Chinnu
Monday, August 06, 2007 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा मी इकडे पाहिलच नाही ग. छान लिहिले आहेस.
आफ़ताब कुडी तुझी चंदन.. अगदी अगदी! :-)


Manas6
Monday, August 06, 2007 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा आफताब नोकरदाराची व्यथा अतिशय प्रभावीपणे व्यक्त झालीये
मानस ६.


Aaftaab
Tuesday, August 07, 2007 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद चिन्नु आणि मानस.
मॉड, जर ही काहीच्या काही या सदरात जास्त बसत असेल, तर तिकडे हलवली तर चालेल..


Vaibhav_joshi
Tuesday, August 07, 2007 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघधारा ... मनोगत अत्यंत प्रामाणिक आहे .

आपण ट लाट ट नी प ला प करतोय असं वाटायला लागल्यापासुन ते गज़लेच्या जमिनीचा एक परिघ असतो नी या जमिनीच्या गर्भाला धरुन परिघावर पोहचता पोहचता, मिसर्‍यांच्या, जीवनसत्यांच्या, सशक्त खेदांच्या, अनेक लाटा आपल्यालाही भिजवू शकतात असे वाटेपर्यंत मजल मारली गेली.

वाह .

गज़लबद्दल जरी आधी बोलणं झालं होतं तरीही बैरागींची मत योग्य आहेत असं वाटलं . पुढच्या वेळी आणखी काम कर गज़लवर . गज़लियत मुरू लागलीय यात वाद नाही . शुभेच्छा .

आफ़ताब ..
काहीच्या काही का ? ( खरंतर हा वेगळा विभाग का आहे ? विनोदी / sarcastic कविता म्हणजे काहीच्या काही ? न सुटलेलं कोडं आहे ! आणि मुख्य म्हणजे तो एक उगाचच inferior बीबी असल्यासारखी treatment दिली जाते . नेमस्तक काही करता येईल का ह्या बाबतीत ? )
विषय चांगला निभावला आहेस .


Bairagee
Wednesday, August 08, 2007 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आफ़ताब, आवडली गझल/हझल. सहज, चांगली, मजेदार. शेवटचा शेर जरा वेगळाच वाटतो. अनेकदा एखादे व्यंजन/अक्षर सलग आले खटकते. 'मेंढी तू, तो मेंढपाळ रे ' ह्या ओळींत 'तू' नंतर लगेच आलेला 'तो' कानांना खटकतो. 'तू मेंढी, तो मेंढपाळ रे' असे करता येईल.

Sanghamitra
Wednesday, August 08, 2007 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव,
खरं सांगायचं तर या अशा घिशापिट्या प्रतिक्रिया द्यायचा कंटाळा आलाय. आणि सेम प्रतिक्रिया सेम कवीला तर अगदी नकोच.
पण हे असं वाचल्यावर आणि तुझ्यासारखा शब्दसंभार नसल्यावर बाकी म्हणावं तरी काय?
नेहमीप्रमाणेच सुरेख. आणखी काय? :-)
बाय द वे, विचाराधीन शेर आवडला नाही. मतला भयंकर आवडला.
(हे "साधे सोपे एका दमात अर्थ कळणारे"
असले काही असायलाच हवे प्रत्येक कवितेत असे मला तरी वाटत नाही. कवितेला केलिडोस्कोप होण्याची मुभा असते नाही का? फक्त प्रत्येकाला किमान एकतरी खास त्याच्यासाठी तयार झालेला अर्थ दिसायला हवा इतकेच.)
बाकीचे शेर चढत्या क्रमाने आवडले. विंचवाचे बिर्‍हाड सगळ्यात.
पुलस्ती, साळसूद आवडली. मतला आणि भाकरी विशेष.
मानस, उदाहरणे सही आहेत. खूप वाचलेल्यांनी अशी उदाहरणे देत रहावे इथे.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators