Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 27, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आषाढ » ललित » विठ्ठल तो आला आला » Archive through July 27, 2007 « Previous Next »

Krishnag
Thursday, July 26, 2007 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, छान लिहलयेस!
अगदी सगुण साक्षात्कारी!!


Rupali_rahul
Thursday, July 26, 2007 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदु, खरच डोळे भरुन बघितलं विठ्ठलाला तुझ्या या लेखातुन... अगदी असेच काहिसे प्रश्न मला "सिद्धिविनायकाच्या" देवळात गेल्यावर पडतात. तिथे जाउन आलं की मन खुप शांत होतं. खुप वर्षांपासुनचा हा अनुभव आहे. पहिल्यांदा मी माझ्या पप्पांबरोबर १०वी पास झाल्यावर गेल्याचे आठवते आहे. त्यानंतर जी गोडी लागली ती अजुनही आहे. खुप समाधान मिळतं. अगदी माझ्या मनातलं लिहिलं आहेस तु. तुझ्या सगळे लेख आणि कथांपेक्षा हे ललित जास्त भावलं, अगदी आतं कुठेतरी खोलवर पोचलं... Thanks

Daad
Thursday, July 26, 2007 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसं लिहिलयस! तुझं त्याला भेटण, त्याचं तुला भेटणं, तुझ्या मनात त्याने 'जेथे जातो तेथे..." हा विश्वास निर्माण करणं....
ही बहुत सुकृताची जोडी आहे.... जप!
नंदिनी, आजची आषाढी तुझ्यामुळे सफळ संपूर्ण झालीये.


Monakshi
Thursday, July 26, 2007 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदू छानच गं, माझ्यासारखे जे कधीही पंढरपूरला गेले नाहीयेत त्यांच्याकरता ते उभं केलंस तुझ्या कथेतून.

Lampan
Thursday, July 26, 2007 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी मस्त लिहिलं आहेस ...
पुर्वी मल कळतच नव्हत कि लोकंना अस trans मध्ये गेल्यासारखं कस होतं हे असं देवळातली मुर्ती वगैरे पाहुन ..
ते तसं खरंतर कुठलीही भव्य गोष्ट पाहिली की होतं हे नंतर समजलं म्हणजे maurice green किंवा marion jones च पळणं , euro cup 2004 मध्ये zidane नी मारलेला goal भर पावसातली वारकर्यांची रांग ... कोकण कडा, पुर्ण ताकदिनं दरीत झेपावणारा जोग falls असलं बरच काही .. आणि हे पाहिलं कि आपोआप डोळ्यात पाणी येतं मुठी वगैरे आवळल्या जातात .. काय माहित कसं काय


Maudee
Thursday, July 26, 2007 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समोरचा रस्ता संपला होता आणि एक हसरी कमान तिथे उभी होती.
"श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आपले सहर्ष स्वागत आहे" :-)
-
अगदी योग्य ठिकाणी break घेतलास.

ख़रच त्या पायांवर डोक ठेवल की सगळं भरून पावत.


Nandini2911
Thursday, July 26, 2007 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वाना मनापासून धन्यवाद.
आज आषाढीच्या निमित्ताने हा लेख मी परत लिहीला आहे. या आधी साधारण पाच वर्षापूर्वी एका दैनिकात छापला होता. पण इथे मी त्यात बरेचसे बदले केलेले आहेत. (मूळ लेख हरवला आहे :-( )
त्यामुळे पहिल्या भागात असलेला हलका मूड दुसर्‍या भागात नाही आहे. कारण दुसरा भाग मला नीट आठवत नाही आहे. त्यामुळे मी तो पुढे न लिहीता विठ्ठलाच्या दर्शानाशीच संपवला आहे. (रुक्मिणी मंदिर वगैरेचा उल्लेख मूळ लेखात आहे.)

सर्वाना परत एकदा धन्यवाद. :-)


Mansmi18
Thursday, July 26, 2007 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो धीर द्यायला कायम असतो. पण मी त्याला कधीच ओळखत नाही. कारण मी माझ्या डोळ्यावरचा माझ्या अहंकाराचा चष्मा कधीच काढत नाही.
------------------------------------------
नंदिनी,

प्रतिक्रिया काय लिहावी हेच कळत नाही. अतिशय अप्रतिम!

सर्व विट्ठलभक्ताना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!!!

||चाले हे शरीर कोणाचिये सत्ते||
||कोण बोलविते हरिवीण्||
||देखवी ऐकवी एक नारायण्||
||तयाचे भजन चुको नका||


Mrinmayee
Thursday, July 26, 2007 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, खूप सुरेख लिहिलंस!
अहंकाराचा चष्मा कधीच काढत नाही. अगदी अगदी खरं!


Dineshvs
Thursday, July 26, 2007 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, तुझ्या आईचा विठोबा म्हणजे एक गारुड आहे. प्रत्येकाला तो असेच भारुन टाकतो. मी गेलो होतो तेव्हा तिथल्या बडव्यांची किर्ती माहित असल्याने, लांबुनच नमस्कार करुन पुढे झालो. तर तिथल्या बडव्याने मला खांद्याला धरुन जवळ घेतले, म्हणाला विठ्ठलाला उराउरी भेटल्याशिवाय कुठे जाता. माझा अजुनही यावर विश्वास बसत नाही, पण आजही त्या सावळ्या विठ्ठलाचे ओळखीचे हसु आठवतेय.
देवळाबाहेर सगळा आनंदच आहे. नामदेवाने ज्या भावनेने पायरी मागुन घेतली, त्या पायरीचा वापर करता येत नाही. तिथे एक माणुन पैसे गोळा करत असतो.


Sayuri
Thursday, July 26, 2007 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nandini,

हा मला वाटतं तुझा आतापर्यंतचा बेस्ट लेख आहे. फारच अप्रतिम!

Bsk
Thursday, July 26, 2007 - 6:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप खूप सुरेख लेख!!! अप्रतीम!!

Disha013
Thursday, July 26, 2007 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप खुप छान लिहिलय नंदिनी.

Ratrani
Thursday, July 26, 2007 - 7:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारच सुरेख लेख लिहिलाय. आम्ही लहान असताना माझे वडिल सोलापुरला नोकरी करायचे तेव्हा मे महिन्याच्या सुट्टीत नेहमीच पन्ढरपूर, तुळजापूर, गान्डगापूर ला जाउन यायचो त्याची आठवण झाली. २५ वर्षे होउन गेली आता. आता आमेरिकेत आल्यापासुन आषाठी कार्तिकी कधी येते आणि कधी जाते समजतही नाही. पण आता internet मुळे( calender असूनहि बघायला वेळ नसतो) आपल्या देशात गेल्यासरख वाटत. आणि रोज सकाळ पेपर वाचत असल्यामूळे ह्या वर्षी उपवासही करायला मिळाला.
नन्दिनि ह्या वर्षी काहितरी वेगळ करावस वाटल म्हणुन सकाळी लवकर उठून विश्णु सहस्त्रनाम म्हटल ख़िचडी केली आणि Office ला आले. नेहमी खुप भुक लागते रोज पण आज अजुन तरी फ़्रेश वाटतय. आणि हा लेख वाचून अजुनच उभारी आलीय.


Ksmita
Thursday, July 26, 2007 - 10:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान झालाय लेख ! आज एकादशीच्या दिवशी पंढरपूरला गेल्यासारखे वाटले .

Aaftaab
Friday, July 27, 2007 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, मंदिरं तर हजारो आहेत, पण तू लिहिलयस तशी अनुभूती येणं ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे.. फ़ार कमी जणांना फ़ारच क्वचित येते..
तुझ्या काही वाक्यांनी अगदी ढवळून निघालो.. "म्हटली तर भाकडकथा, म्हटली तर जगण्याची शिदोरी".. किती खरं आहे..
तुला खोटं वाटेल, पण हे वाचून माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं!
विठ्ठल, विठ्ठल...


Ardeshmukh
Friday, July 27, 2007 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

it's very nice
dont have words to describe
what i felt inside !!

thanks for this nice post !!

Saee
Friday, July 27, 2007 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, उत्तम लेख. संतांपासून ते सामान्यांपर्यंत आणि जुन्या जाणत्यांपासून ते आपल्यासारख्या नव्या पिढीच्या तरुणांपर्यंत सर्वांना तो विठू हवाहवासा वाटतो ही निव्वळ जादू आहे! तर्कापलिकडचे आहे सगळे.
वारीचा अनुभवही घेऊन बघावाच असा. तो शब्दात वर्णन करणं अशक्य आहे. मला गर्दीची भिती वाटते, पण वारीत चालताना अत्यंत सुरक्षित वाटतं. मी तीन वर्षे एक टप्पा केला, पण पाय दुखणे, कंटाळणे किंवा तहानभूक हे ओळखीचे मित्र आजूबाजूला फिरकलेही नाहीत. दुसर्‍या दिवशी office ला जाताना ताजी टवटवीत होते मी. केवळ अविस्मरणीय अनुभव आहे तो! सलग तीन आठवडे वेळ काढता येईल त्या वर्षी पुर्ण वारी करायची असा आत्मविश्वास आला आहे आता. माझे मावसदीर दर वर्षी जातात त्यामुळे शेवटपर्यंत सोबत मिळेलच.
मायबोलीचीही एक दिंडी करू शकतो आपण:-) मला खात्री आहे खुप मोठी होईल.. ज्याला जितकं जमेल त्यानं तितकं यावं! शेवटी सगळं स्वानंदासाठीच तर करायचं..


Avikumar
Friday, July 27, 2007 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे,
ऐसी चंद्रभागा, ऐसे भिमातीर, ऐसा विटेवर देव कोठे,
ऐसे संतजन, ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे,
तुका म्हणे आम्हा अनाथाकारणे, पंढरी निर्माण केली देवे"

ग्यानोबा मावली तुकाराम..... ग्यानोबा मावली तुकाराम..... ग्यानोबा मावली तुकाराम.....


Sharmilaj
Friday, July 27, 2007 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिय नन्दिनि,

मी अत्तपर्यन्त मायबोलि नुस्तेच वाचत आले आहे पन कधि मात लिहिले नव्ह्ते.
तुज़ा हा लेख वाचुन प्रत्यक्श वित्थलाला भेत्थुन आल्यासार्खे वातले.
खुप आब्भारि आहे सुन्दर आनि मनापासुन लिहिलेल्या लिखनाबद्दल.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators