|
Adm
| |
| Friday, July 27, 2007 - 6:22 pm: |
| 
|
Great..!! keep it up..
|
Chana
| |
| Friday, July 27, 2007 - 7:30 pm: |
| 
|
ख़ुपच छान नन्दिनि.. मी जेव्हा पुण्यात होते तेव्हा पालखि बद्दल उत्सुकता वाटायची, पण दर्शनाचा योग आला नव्हता.. पालखी मुळे पुण्यातले काही बन्द रस्ते आणि गर्दि हे टाळणेच जास्त व्ह्ययचे.. पण तुझा हा लेख वाचला आणि मला खुप अपराध्या सारखे झाले.. मस्त लिहिले आहेस एकदम.. इकडे अमेरिकेमधे आल्यावर या गोष्टि जास्त miss होतात ना!!
|
R_joshi
| |
| Saturday, July 28, 2007 - 5:00 am: |
| 
|
नंदिनी अप्रतिम लेखन तुझ्यासोबत मलाही विठ्लाच दर्शन झाल आणि सगले प्रश्न काहीक्षणांसाठी तरी संपले अस वाटल.
|
Pendhya
| |
| Saturday, July 28, 2007 - 5:51 am: |
| 
|
अतिशय छान लेख लिहिलायस नंदिनी. देवाच्या मुर्तीसमोर हात जोडून ऊभे राहिले की सगळं विसरायला होतं. जेव्हा माझी गरज सरते तेव्हा मी देवाला विसरते.. >> जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यातलं, हे सत्य पण तितकच खरं आहे. ही बहुत सुकृताची जोडी आहे.... जप! >> दाद ला अनुमोदन. लेख फ़ार आवडला.
|
Chyayla
| |
| Saturday, July 28, 2007 - 6:01 am: |
| 
|
पांडुरंग पांडुरंग... सायुरीच्या म मताशी एकदम सहमत हे तुझे सगळ्यात श्रेष्ठ लिखाण आहे... खुपच छान
|
Sangu
| |
| Saturday, July 28, 2007 - 9:59 am: |
| 
|
अतिशय सुंदर एकदम मस्त
|
Chetnaa
| |
| Saturday, July 28, 2007 - 11:26 am: |
| 
|
नंदिनी, अप्रतिम लेख.. फ़रच छान लिहिले आहेस..
|
Savani
| |
| Saturday, July 28, 2007 - 1:29 pm: |
| 
|
नंदिनी, खूप छान लेख.
|
नंदिनी सुरेख लिहीलयस गं फारच. असे दर्शन व्हायला नशिब लागतं एवढं समज. माझे गाव पंढरपूरच्या अगदी जवळ. वर्षानुवर्षं पंढरपुरातून जाऊनही कधी दर्शनाला थांबले नव्हते. खराब रस्ते, घाण, डुकरं, चंद्रभागेची गटार सदृश अवस्था इत्यादी प्रकारांमुळे त्या गावातून कधी बाहेर पडतोय असंच व्हायचं आम्हाला. एकदा मनात आलं आणि पपांना म्हटलं की देऊळ पहायचंय. तेंव्हा असाच सुखदाश्चर्याचा धक्का बसला मंदिर पाहून. कुणाला कुठे विठ्ठल सापडेल सांगता येत नाही. तुला त्याच्या देवळातच भेटला हे भाग्य.
|
नंदीनी सुरेख लिहीले आहेस. भावस्पर्शी एकदम आणि ते शब्दात सुद्धा छान मांडले आहेस. मी कॉलेजात असतानाचा असाच एक किस्सा आठवला. आम्ही मित्र मित्र कोल्हापुरमार्गे गोव्याला चाललो होतो. वाटेत देवीला जायला नको असे ठरले. कोल्हापुर मधे गाडी शिरली आणि टायर चक्क फुटला. सकाळी पोचलो असल्याने कुठलेही दुकान उघडे नव्हते, जवळ नविन टायर घेण्याइतके पैसेदेखील नव्हते. सेकंडहॅंड टायर मिळाला तर बघू असे ठरवले पण दुकाने बंद. मग करायचे काय म्हणून अंबाबाइचे दर्शन घेतले. देऊळ व अंबाबाईची मुर्ती बघून भारावून गेलो होतो. निवांतपणे दर्शन घेवून आम्ही देवळाबाहेर पडलो आणि लगेच २०० रुपयात एक टकला टायर मिळाला. त्याच टायरवर आम्ही कोल्हापुर्-गोवा-पुणे असा प्रवास केला.
|
Chandya
| |
| Monday, July 30, 2007 - 4:37 pm: |
| 
|
नन्दिनी, अप्रतिम लिहिलयस. अजि सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु हरी पाहिला रे, हरी पाहिला रे
|
ई आठवी मध्ये असताना पहिल्यांदा वारीला गेलो. आमच्या इथुन (मिरजेहून) पंढरपूर १२८ कि.मी. वारी ४ दिवसात पंढरपूर गाठते.. रोज बरोब्बर ३२ कि.मी. ही कार्तीकीची वारी असते. दर वर्षी काका वारीला जायचे. गावातले ३-४शे लोक जातात. पांडवपंचमीला अर्धा गाव वारीला पोचवायला वेशीवर येतो. मी पण त्यावर्षी नेहमीप्रमाणे गेलो होतो. सहज म्हणुन चालायला सुरुवात केली आणि चालतच राहिलो. पहिल्या मुक्कामाला बाबांनी कपडे आणुन दिले. चौथ्या दिवशी संध्याकाळी पायाचे तुकडे पडत होते पण मी नेटाने लांब रांगेत उभा होतो. जवळपास २-३ तासाने दर्शन झाले. मला आजही तो क्षण जसाच्या तसा आठवतो. त्या वयाच्या मानाने ४ दिवसात १२८ कि.मी. चालणे, ते कष्ट, पायाला येणारे फोड, पालखीमध्ये चालणारी भजने, प्रचंड दमल्यावर जय जय राम कृष्ण हरी असे थोड्या फास्ट लयीमध्ये म्हणत कापलेले अंतर.. सगळेच वेगळे होते.. त्यावेळची माझी मानसिक स्थिती पण त्या क्षणाला गूढमय करण्याला कारणीभूत होती.. त्यानंतर बरेच वेळ वारीला गेलो.. २ दिवसात पंढरपूर चालत गाठले.. २००-२५० किमी सायकल एक दिवसात हाणली पण त्यादिवशीचा जो अनुभव होता तो वेगळाच.. अजुनही वारी एक अशी गोष्ट आहे की जिच्याकडे बघितले की वाटते की लोकांनी देवावर विश्वास ठेवावा..
|
Bee
| |
| Thursday, August 02, 2007 - 2:46 am: |
| 
|
नंदीनी, खूपच छान लिहिलसं..
|
Neelu_n
| |
| Thursday, August 02, 2007 - 6:14 am: |
| 
|
नंदिनी सुंदर.. अतिशय सुंदर.. वाचताना तो अनुभव मीही घेतेय असे वाटले.
|
खुपच सुरेख लिहिला आहेस हा लेख...... अप्रतिम!!
|
Sunidhee
| |
| Thursday, August 02, 2007 - 8:42 pm: |
| 
|
नंदिनी ...!! सुंदर !! मनापासुन लिहिल्याचे जाणवते वाचताना. सर्वांचे अनुभव पण आवडले वाचायला. सई तुझी कल्पना छानच आहे...
|
|
|