Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 27, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आषाढ » विनोदी साहित्य » नावात काय्ये? » Archive through July 27, 2007 « Previous Next »

Savani
Thursday, July 26, 2007 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद तुझा लेख आणि त्यावरच्या प्रतिक्रिया वाचून टोटल हहपुवा...
माझ्या ओळखीत ३ भावंडान्ची नावे.. पूजा, आरती, प्रसाद.
अजुन एका गुज्जु मैत्रिणीच्या मुलिचं नाव " अश्मि " का तर वडिलांचं नाव अश्विन आणि आईचं मिता.
अश्म म्हण्जे पाषाण न खरं.
हल्ली नविन आलेल्या अनिका, अनुका ह्या नावांचा अर्थ काय आहे?


Dineshvs
Thursday, July 26, 2007 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महुआ म्हणजे दारु नव्हे. मोहाचे ते उत्तरेकडचे नाव आहे. उत्तरेकडे मुलीचे नाव म्हणुन ते लोकप्रिय आहे. मोहाचे झाड आदिवासीना अतिप्रिय आहे. दारु गाळण्याशिवाय बरेच उपयोग आहेत त्याचे, साखर करण्यापासुन तुप करण्यापर्यंत.

Vinaydesai
Thursday, July 26, 2007 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'शीला' ऐवजी 'शिला' असं नाव ठेऊन माझ्या बघण्यात एक व्यक्ती कारण नसताना दगड झालेली आहे...


Sayuri
Thursday, July 26, 2007 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ऐकलेली काही: विश्रांती, खुशाल
अलिकडेच ऐकलेलं एका गुज्जु मुलाचं नाव्: अमूल :-)


Zakki
Thursday, July 26, 2007 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याचे आडनाव 'बटर' होते का?

Sayuri
Thursday, July 26, 2007 - 6:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अफसोस! बटर नव्हते. नेहेमीप्रमाणे पटेलच निघाला! :-)

Pancha
Thursday, July 26, 2007 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओफ़िस मधल्या दोन गुजराथी मुलांची नावे: आनल Anal आणि दुसरा फ़ेनल Fenal

Madhura
Thursday, July 26, 2007 - 6:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे तर मराठीत , अनल म्हणजे वारा. पवन नाव असते ना तसेच.

दिनेश, पंकज या नावात काय चूक आहे असे ? पंकज म्हणजे कमळ (चिखलातुन उगवलेले ते). CBDG .




Karadkar
Thursday, July 26, 2007 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मधुरा, अग आई म्हणजे चिखल नाही का होत मग !!!

Madhura
Thursday, July 26, 2007 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कराडकर ते ही खरेच की. पण मग मुलीचे कमल नाव ही नको ठेवायला :-))

Prajaktad
Thursday, July 26, 2007 - 8:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या तेलगु मैत्रीणी ने मुलाचे नाव "सरण" ठेवले आहे...मुलाच नाव "पार्थीव" (अर्थात पटेल )कस ठेवतात?
मॉड एखादा बीबी द्या कि उघडुन ... मग, अजुन नावं लिहता(ठेवता?)येतिल.


Vaatsaru
Thursday, July 26, 2007 - 9:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मधुरा
माझ्या माहितीप्रमाणे अनल म्हणजे अग्नि


Arch
Thursday, July 26, 2007 - 9:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, अग, हे तेलगु लोक श चा उच्चार स करतात. ते नाव शरण असणार. कारण इथे एका तेलगु मुलाच नाव ससी आहे ते म्हणजे शशी कारण भावाच नाव रवी आहे. गुजराथी स चा उच्चार श करतात आणि तेलगु श चा उच्चार स करतात. शेवटी काय आपण मराठीच शहाणे.

Arch
Thursday, July 26, 2007 - 9:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि अनल च spelling काय करतात?

Aktta
Thursday, July 26, 2007 - 10:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एके सुर्वना....... मुलाच नाव :-) तो पन साऊथवाल... :-):-)
एकटा...


Madhura
Thursday, July 26, 2007 - 10:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्ताच वाटसरुंचे post वाचले. बरोबर आहे वाटसरु तुमचे.
अनिल म्हणजे वारा आणि अनल म्हणजे अग्नि.
arch
,

Daad
Thursday, July 26, 2007 - 11:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉड्स, माझी काहीच हरकत नाहीये हा बंद करून नाव ठेवण्यासाठी (लिहिण्यासाठी) स्वतंत्र उघडायला.
सगळ्या सगळ्यांचे खूप आभार.


Storvi
Friday, July 27, 2007 - 12:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>कराडकर ते ही खरेच की. पण मग मुलीचे कमल नाव ही नको ठेवायला >>
ऐसा रे कैसा? मुलीचे नाव गुलाब असेल तर आई कुंडी झाली का? अरे पंकज म्हणजे चिखलात जन्मलेल ना? कमळाला पंकज म्हणतात पण, ते अपण assume करतो पण फ़ुलाचे नाव पंकज नसते काही हो ना?:-O

Ravisha
Friday, July 27, 2007 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च,म्हणजे एखाद्या खर्‍या "शरण"ला गुजराती लोकं "सरण" म्हणणार :-) आ तो सारु छे पछी....

Monakshi
Friday, July 27, 2007 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मला सांगा ना कोणीतरी श्रुजा चा अर्थ काय?




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators