|
Dineshvs
| |
| Friday, July 27, 2007 - 7:00 am: |
| 
|
नविन नावे शोधायची तर आपली गीर्वाण भाषा उपयोगी पडेल, अजारीसूतसारथी अज म्हणजे पर्वत आरी म्हणजे शत्रु, पर्वताचा शत्रु म्हणजे इंद्र ( का ते माहित नाही ) त्याचा सूत म्हणजे पुत्र तो अर्जुन, आणि त्याचा सारथी तो कृष्ण. हुश्श. जलजाक्षी, पाण्यात जन्मलेला तो मासा, त्याच्यासारखे अक्ष म्हणजे डोळे असणारी ती जलजाक्षी. अजानुबाहु, आकर्णनयन, आनितंबकेशिनी बरिच आहेत अशी नावं शाळेच्या इतिहासात वाचलेले एक नाव म्हणजे पट्टाभीसीतारामैया. खुप रुळली आहेत तरी चुकीची नावे म्हणजे सचिन, अजय आणि जितेंद्र ती अनुक्रमे शचेंद्र, अजेय आणि जितेंद्रीय अशी हवीत.
|
या बीबीवर फक्त या लेखावर प्रतिक्रिया द्याव्यात. बाकीची पोस्ट्स खालील बीबीवर टाका. इथली लेखाशी संबंधित नसलेली पोस्ट्स त्या बीबीवर हलवली जातील. /hitguj/messages/644/128961.html?1185535705
|
Milindaa
| |
| Friday, July 27, 2007 - 11:32 am: |
| 
|
ऐसा रे कैसा? मुलीचे नाव गुलाब असेल तर आई कुंडी झाली का? << You said it Sto.
|
Deepa_s
| |
| Friday, July 27, 2007 - 11:33 am: |
| 
|
माझ्या ओळखीतल्या एका कुटुम्बातील मुलाचे नाव होते, राहुल आणि मुलीचे नाव होते केतकी. त्यांची आई त्यांना राहू, केतू म्हणायची.
|
Karadkar
| |
| Friday, July 27, 2007 - 2:24 pm: |
| 
|
स्टो ... ... ...
|
कोणी 'निरांजना' नाव एकलेय का? खुपच unique आहे. त्याचा अर्थ माहीती आहे का? दुसरे माझे आवडते नाव 'अरुशी'. त्याचा अर्थ सुर्याची पहीली किरण.
|
Sahi
| |
| Friday, July 27, 2007 - 8:25 pm: |
| 
|
सावनी माझ्या सख्ख्या आत्तेभावन्डान्ची नावे प्रसन्न प्रसाद आरती आरतीताईच्या नवर्याचे पण नाव प्रसाद आणि मुलाचे नाव अभिशेक....
|
Ksha
| |
| Friday, July 27, 2007 - 10:49 pm: |
| 
|
मग म्हणावं आता मुलगी झाली की तिचं नाव मंत्रपुष्पांजली ठेवा! म्हणजे पुढचं सगळं वाचेल!
|
Ladaki
| |
| Saturday, July 28, 2007 - 11:35 am: |
| 
|
दाद तुमच्या लिखाणाला दाद द्यायची माझी ही पहिलीच वेळ... बघा हे असच होतं... अभीप्राय द्यायचा म्हणुन टायपायला बसले की शब्दच विसरायला होतात... लाडकी...
|
Vaatsaru
| |
| Saturday, July 28, 2007 - 12:00 pm: |
| 
|
दिनेश इंद्र पर्वतांचा शत्रू कारण फ़ार पूर्वी (म्हणे) पर्वतांना पंख होते आणि ते सगळीकडे उडत जाउन शहरे नष्ट करायचे म्हणून लोकांच्या प्रार्थनेवरुन इंद्राने त्यांचे पंख कापले अशी काहीतरी गोष्ट वाचल्याचे ओझरते आठवते आहे
|
Dineshvs
| |
| Saturday, July 28, 2007 - 12:16 pm: |
| 
|
आभार वाटसरु. बहुतेक ते पर्वत वाळवंटातले असावेत का ? अनेक पुरातन संस्कृति मातीखाली गाडल्या गेल्या, त्या या उडणार्या पर्वतांमुळेच का ? आणि इंद्राने बहुतेक वृक्षलागवड करुन, त्याना उडण्यापासुन रोखले असेल.
|
Ksha
| |
| Sunday, July 29, 2007 - 3:16 am: |
| 
|
तुम्ही पण असे प्रश्न विचारायला लागला का दिनेश? ढवळ्याशेजारी बांधला पवळा ...
असो. आता "विषयाला धरून लिहा" असा संदेश येण्याआत ...
|
Radha_t
| |
| Tuesday, July 31, 2007 - 10:49 am: |
| 
|
भन्नाट ग दाद... ह ह पु वा
|
खुप रुळली आहेत तरी चुकीची नावे म्हणजे सचिन, अजय आणि जितेंद्र ती अनुक्रमे शचेंद्र, अजेय आणि जितेंद्रीय अशी हवीत. >> "सचिन" हे नाव तर ईन्द्रदेवाचे आहे ना... चूभूद्याघ्या
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 01, 2007 - 3:23 am: |
| 
|
अरेरे, तु दुखावलास का रे ? माझ्या माहितीप्रमाणे ( संदर्भ सुमन बेलवलकर ) शचि आणि इंद्र मिळुन झाले शचेंद्र. त्याचा बंगाल्यानी केलेला अपभ्रंश शोचिन्द्र. त्याचे छोटे रुपांतर शोचिन आणि मग झाले सचिन. मला काहि सचिन ची फ़ोड करता येत नाही. चिनसकट का चिन सह का चांगला चिन ? अजुन विचार कर रे, नाव बदलुन टाकु,
|
Zakki
| |
| Wednesday, August 01, 2007 - 1:53 pm: |
| 
|
सच्चिदानंद चे सचिन झाले असेल का?
|
Slarti
| |
| Wednesday, August 01, 2007 - 4:11 pm: |
| 
|
शचि + इंद्र असा संधीविग्रह असेल तर संधी शचींद्र अशी होईल ना ? मग शोचिंद्र - शोचिन - सचिन इ.
|
|
|