|
Ramani
| |
| Wednesday, July 25, 2007 - 2:50 pm: |
| 
|
दाद, हसु अजुनही आवरत नाहीय. मस्तच. मी ऐकलेली विचित्र नावे श्लेष्मा (म्हणजे शेंबुड, चु.भु.द्या.घ्या.) सिंड्रेला चिंधू सबकाळे, आणि ही सिंड्रेला अतिशय अजागळ जाडी मुलगी आहे.
|
Slarti
| |
| Wednesday, July 25, 2007 - 3:37 pm: |
| 
|
दाद, कथा आवडली. पण मला तुझ्या भाषेचा घुमार जास्त आवडतो. 'करवादून, फत्तेलष्कर, आडवारणे...' वगैरे शब्दप्रयोग. शिवाय करते, बोलते, होते याऐवजी 'करत्ये, होत्ये, बोलत्ये' वगैरे... आवडले. btw , टेक्सास गायकवाडांना विसरू नका.
|
दाद, तुझ्या कथेला खरोखरच 'दाद'.. मजा आली.... 
|
Arch
| |
| Wednesday, July 25, 2007 - 4:11 pm: |
| 
|
मला आवडलेली काही छानशी नाव. ३ भावंड मेघा, वर्षा, आणि तुषार. ह्याच क्रामाने झालेली मुलं आणखी तीन भावंड, क्रमानुसार, प्राची रश्मी आणि आदित्य. आई ज्ञानेश्वरी आणि मुलगी ओवी. मुलांची नाव कशी भारदस्त असावीत, रणजीत, समशेर वगैरे. नाहितर राजस, पवन, प्रितम वगैरे. 
|
Disha013
| |
| Wednesday, July 25, 2007 - 6:55 pm: |
| 
|
अजुन एक पंजाबी नाव ऐकुन मी खुप हसलेले.. 'जालंधरसिंग' आणि या नावाचा मालक होता एक ६ महिन्यांचं गोंडस बाळ!
|
Aktta
| |
| Wednesday, July 25, 2007 - 6:59 pm: |
| 
|
मल माहीत असलेल अजुन एके विचित्र नाव प्रक्रुती......... पन ति पोर्गी मस्स्त सुन्दर होति... आत्ता पन असेल कदाचित... अजुन एक विचित्र नाव "दाद" एकटा....
|
Mansmi18
| |
| Wednesday, July 25, 2007 - 7:02 pm: |
| 
|
माझ्या माहितीतल्या एकाच्या मुलीचे नाव ठेवले होते "लाघवी"... हा कार्यक्रम सकाळी झाला आणि.. आणि नाव संध्याकाळी लगेच बदलले....कारण......
|
भाषा बदललि कि अर्थाच अनर्थ होवु शकतो याच उदहरण गेल्या देशवारित बघायला मिळाल, नुकतिच तेंव्हा आमच्या colany त एक पंजाबि मुलगि रहायला आलि होति, तिच नाव होत 'शिवि'! शप्पथ हे खरोखरच तिच नाव आहे. त्यांच्या भाषेत याचा अर्थ 'सुंदर मुलगि' असा होतो म्हणे.
|
Asami
| |
| Wednesday, July 25, 2007 - 7:56 pm: |
| 
|
खरय , माझ्या एका जैन मित्राच्या पोरीचे नाव अतिशी आहे. त्यांच्या भाषेमधे त्याचा अर्थ विदुशी होतो.
|
Prajaktad
| |
| Wednesday, July 25, 2007 - 8:11 pm: |
| 
|
धम्माल लेख!खरतर अगदी साधा विषय खुप रंजकतेने मांडला आहे.ऽगदी पोटभर हसावे असा...प्रतिक्रियाही गमतिदार आहेत. शाळेत असताना वर्गात एका मुलिचे नाव "माधुरी भारती " माधुरी नाव आणी भारती आडनाव..तिच्या भावांची नाव कुमार भारती,विकास भारती....
|
Pancha
| |
| Wednesday, July 25, 2007 - 9:08 pm: |
| 
|
कथे पेक्शा प्रतिक्रिया मजेदार आहेत, एक नविन BB काढुन त्यात ह्या सर्व प्रतिक्रिया हलवायला पाहिजे
|
Farend
| |
| Wednesday, July 25, 2007 - 9:55 pm: |
| 
|
मोठ्या भावाला तीन मुली 'रुपाली, दिपाली आणि वैशाली'. Mrinmayee ते पुण्यातील नसावेत. नाहीतर "दीपा, रूपाली आणि वैशाली" हा क्रम जास्त बरोबर होता. अ-पुणेकरांसाठी: गुडलक चौकातून Fergusson College कडे जाताना या क्रमाने रेस्टॉरंट्स लागतात, यातील तिसरे किमान ऐकले असेल
|
Ajjuka
| |
| Thursday, July 26, 2007 - 2:55 am: |
| 
|
अगं सन्मे मी प्रत्यक्ष बघितली नाहीये ही प्रेता कन्या माझ्या छोट्या चुलतभावाच्या वर्गात आहे ती. काकू सांगत होती. पण तिने १० वेळा कन्फर्म केले असणार. असंच शांभवी नावाबद्दल... नाव ऐकायला छान आहे आणि असतं हल्ली पण दारू या अर्थाचं नाव का बरं? सना, अहाना या नावांबद्दल काय म्हणणं आहे? मला तर ही नावं आखाती देशातून आयात केल्यासारखी वाटतात. आणि एकदम मेणचट वाटतात. दादची मस्त कथा राह्यली बाजूला... नावात काय आहे असा वेगळा बीबीच my experience मधे उघडायला हवा.. अरे हा मंगला गोडबोल्यांचा एक लेख आहे 'झुळूक' किंवा 'पुन्हा झुळूक' मधे याच विषयावरचा. कोणी वाचलाय का?
|
Shyamli
| |
| Thursday, July 26, 2007 - 3:08 am: |
| 
|
शांभवी नावाबद्दल... नाव ऐकायला छान आहे आणि असतं हल्ली >>>आज्जुका अग या नावाचा अर्थ नुसता दारु असा नाहिये शिवाला प्रिय असणारी ती शांभवि(भांग) तसेच पार्वती असे दोन्हि अर्थ होतात
|
Alpana
| |
| Thursday, July 26, 2007 - 4:42 am: |
| 
|
महुआ पण ऍकलय मी नाव... त्याचा पण अर्थ दारुच होतो न?
|
Ksmita
| |
| Thursday, July 26, 2007 - 5:20 am: |
| 
|
ajjuka, हो बरोबर मंगला गोडबोलेंचाच लेख आहे असा . अगदि ह ह पु वा !! मी आठवतच होते नाव बरं झालं संगितलेस ते !!
|
Krishnag
| |
| Thursday, July 26, 2007 - 5:59 am: |
| 
|
दाद! नाम पुराणाला दाद द्यावी तेवढे कमीच!! अगदी ह ह पु वा झाली! माझा एक मित्र त्याचे नाव सुनिलदत्त होते! सुनिलदत्त कुलकर्णी!! आमच्या बरोबर अजून दोघेजण होते एकाचे नांव कांचन तर एकाचे आडनांव कांचन!! कांचन नांवाच्या मित्राला विचारायचो तुझे नांव मुलीचे का ठेवले? तर त्या कांचन आडनांवाच्या मित्राला आम्ही नेहमी म्हणायचो तू तुझ्या मुलाचे वा मुलीचे नांव कांचन ठेव! म्हणजे कसे कांचन कांचन होईल!! दुसरे एक पाहिले चार भावंडे चौघांची नांवे दिपक, ज्योती, प्रकाश आणि किरण!!
|
Ajjuka
| |
| Thursday, July 26, 2007 - 10:10 am: |
| 
|
सुनिलदत्त वरून आठवलं... लहानपणीची आठवण. आपली आवड किंवा तत्सम कार्यक्रम ऐकताना जी पत्र पाठवणार्यांची नावं वाचली जायची त्यातलं एक 'हेमामालिनी निकाळजे'.
|
Monakshi
| |
| Thursday, July 26, 2007 - 10:55 am: |
| 
|
दाद, मस्तच, मजा आ गया. BTW कोणी मला श्रुजा या नावाचा अर्थ सांगेल का?
|
Ajai
| |
| Thursday, July 26, 2007 - 11:10 am: |
| 
|
'दाद'चा हा लेख वाचुन कुणाला असच काही विनोदि लिहायचि 'खाज' आली तर "खुजली' हे उपनाम कसे वाटेल.. ? its bad joke so striking out
|
|
|