Disha013
| |
| Tuesday, July 24, 2007 - 7:09 pm: |
| 
|
वा वा वा दाद,खुप हसवलस..... अगदी उच्च दर्जाचे लिखाण! मज्जा आली. कथेच्या प्रतिकियापण विनोदी! माझ्या एका मैत्रीणीच्या मुलीचे नाव होते 'शांतसिता'. कारण एका आजीचे नाव शांताबाई आणि दुसर्या आजीचे नाव आहे सिताबाई!
|
Vishee
| |
| Tuesday, July 24, 2007 - 7:22 pm: |
| 
|
खरच खुप छान कथा आहे. सहीच!! बर्याच दिवसानी मराठी वाचलं आणि ते ही इतकं भन्नाट. keep it up . मला वाटतं ज्यांना हसायला आलं नाही त्यांना high level मराठी कळत नसावं. आणि विनोद कळायला पण sense of humor असावा लागतो ना.
|
Aktta
| |
| Tuesday, July 24, 2007 - 8:33 pm: |
| 
|
लय झाक..... स्तोरी नि comments भी.... माझ्या एका मीत्राच नाव उशीर..... का ते कळल असेलच.... एकटा...
|
Pancha
| |
| Wednesday, July 25, 2007 - 4:08 am: |
| 
|
daad च्या कथेत शाब्दिक मार जास्त असतो, त्यामुळे एक दोन वाक्ये वाचली कि पुढे वाचावेसे वाटत नाही. सरळ सोप्या भाषेत प्रभावशिल कथा लिहिण्यातच खरी कला आहे.
|
Rajya
| |
| Wednesday, July 25, 2007 - 4:38 am: |
| 
|
सरळ सोप्या भाषेत प्रभावशिल कथा लिहिण्यातच खरी कला आहे. पंचा, मग तुला वि. स. खांडेकर आवडत नसतील!! शलाका, मस्तच आहे विनोदी कथा
|
Rajankul
| |
| Wednesday, July 25, 2007 - 6:05 am: |
| 
|
नक्श फ़रियादी है किसिकी शौखी-ए-तहरीर का कागजी है ....." "पैरहन हर पैकर्-ए-तसवीर का.... सुभानल्ला, क्या बात है, क्या बात है>> DILASE RE. आशु २९ ही भाषा कोणती आहे? पंचा you are correct .
|
T_pritam
| |
| Wednesday, July 25, 2007 - 6:13 am: |
| 
|
Pancha, I totally disagree with your views regarding Daad's writing. To verify it, I read this story again and I really didn't find anything difficult to understand... खारट भाजी, शाब्दिक मार ...वगैरे जरा जास्तीच होतय.... कदाचीत तुम्हाला मराठी नीट समजत नसेल म्हणून तसं वाटलं असेल....
|
खरच खुप छान कथा आहे. सही एका घरातील ३ मुलीन्चि नावे क्रमाने पहिली प्रिति मधली मिलन, धाकटी त्रुप्ती
|
दाद, चांगलं लिहिलंय. मधुरा, तो किस्सा मीही ऐकला होता (राहुरीमध्ये). त्यात विकास हे नावपण होतं: प्रकल्प, योजना, विकास. मिल्या LOL. मुलाची कोणी आत्या त्याच्या कानात कुर्र करत "देसाई" असं पुटपुटतेय असं दृश्य डोळ्यासमोर येऊन हसायला आलं. मी ऐकलेलं एका गुजराती मुलाचं नाव: नाजूक. जुळ्या मुलांची नावं बहुतेकदा यमक साधणारी असतात. अनिल-सुनील, अमित-सुमीत.. काळू-बाळू!
|
T_pritam
| |
| Wednesday, July 25, 2007 - 9:33 am: |
| 
|
दूरदर्शन वर एक मालिका यायची.... नाव नाही आठवत, पण त्यात एका स्त्री पात्राचं नाव 'नाजुका' होतं...
|
Ajjuka
| |
| Wednesday, July 25, 2007 - 10:13 am: |
| 
|
आमच्या ओळखीतल्या एकाचं नाव भविष्य आहे आणि त्याच्या भावांची नावं प्रेक्षक व फोरम अशी आहेत. ते गुज्जु आहेत हे सांगायला नकोच!
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 25, 2007 - 10:23 am: |
| 
|
पुर्वी खुपवेळा बालमृत्यु होत असत, त्यावेळी मुलांची नावे मुद्दाम दगडु, धोंड्या, भिकाजी वैगरे ठेवत असत. पुढे त्या मुलाना नावाची लाज वाटत असे. माझ्या ओळखीतल्या एका सातव्या मुलीचे नाव आहे, नकोशी. तिला सगळेच नके म्हणुन हाक मारत असत. पुढे तिने ते बदलुन पुष्पा, असे नाव घेतले. सई परांजपेच्या, अडोसपडोस मालिकेतल्या अरुण जोगळेकर आणि उषा नाडकर्णीच्या सातव्या मुलीचे नाव गलति, असे होते. पहिल्या सहा मुलांची नावे, अ, ब, क वरुन सुरु होणारी होती. त्या सगळ्याना मिळुन मामी कि पल्टन असे नाव होते.
|
Alpana
| |
| Wednesday, July 25, 2007 - 11:23 am: |
| 
|
फोरम माझ्या पण एका मैत्रिणीचे नाव आहे... त्याचा गुजरातीत अर्थ सुगंध असा होतो.. फोरम म्हणजे सुगंधा, एकिचे तर नाव धारा आहे... मला आपलं नेहेमी ती धारा धारा शुद्ध धारा अशी जाहिरात आठवते...आणी अजुन एकिचे नाव अनल होते...
|
Deshi
| |
| Wednesday, July 25, 2007 - 12:46 pm: |
| 
|
आपल्या आवडत्या लालु (म्हण्जे लालुप्रसाद हो) च्या मुलीचे नाव मिसा भारती आहे. मिसा का तर ते एका कायद्याचे अब्रीब्व्हेशन आहे.
|
मी ऐकलेली वेगळी नावे परिक्षा. ज्ञाति (म्हणजे जात ना) राशी (राशीला आलीय असे काहीसे वाटते किनई.) दोन बहिणींपैकी एकीच नाव सृष्टी आणि दुसरीचे सौंदर्या (सरळ सुंदरा किंवा सुंदरी ठेवता येईल की.) अज्जुका प्रेता हे ऐकलेले नाव असेल तर ते कदाचित प्रियता असेल. (हाका मारताना त्याचे प्रेता होते.) लिहिलेले पाहिले असशील तर मात्र कठीण आहे. अमिशा हे पण काय नाव आहे का? अर्थ काय म्हणे? मिशा नसलेली किंवा आमिष(!). तत्वविमर्शिनी आवडले मला. माझ्या एका भाचीचे नाव प्रसन्नवदनी आहे. आदीवासी लोकात खूप भारी नावे असतात. गवर्नर, हिदुस्थान अशी. नकुशी पण कॉमन आहे.
|
Zakki
| |
| Wednesday, July 25, 2007 - 1:16 pm: |
| 
|
'अमिल' असे मुलाचे नाव ऐकले. अमिल म्हणजे काय? लोक ओळखीचे आहेत, पण कदाचित् त्यांनाहि त्याचा अर्थ माहित नसावा. जरी ABCD नसले तरी लहानपणापासून इथेच राहिलेले आहेत.
|
Aashu29
| |
| Wednesday, July 25, 2007 - 1:29 pm: |
| 
|
काय हे पंचा? खारट भाजि कुठे नि कथा कुठे?
|
Mrinmayee
| |
| Wednesday, July 25, 2007 - 2:00 pm: |
| 
|
दादच्या ह्या धमाल कथेवर आधीच पोस्टुन झालंय पण आज ह्या नावांबद्दल आणखी काही आठवलं म्हणून.. मोठ्या भावाला तीन मुली 'रुपाली, दिपाली आणि वैशाली'. दुसर्याला दोन, 'सायली आणि अबोली'. तिसर्याची बायको प्रेग्नंट असताना 'जुळी' होणार हे कळल्यावर आजोबा म्हणाले, " मुली झाल्या तर नावं 'घमेली आणि तपेली' ठेवा'!"
|
Tiu
| |
| Wednesday, July 25, 2007 - 2:02 pm: |
| 
|
मी ऐकलेलं (आणि वाचलेलं) अजुन एक नाव...सुन्द्रा...(सुंदरा नव्हे)...गावाकडचं नाव आहे...तिला सगळे सुन्द्राबाई म्हणायचे!
|
Chinnu
| |
| Wednesday, July 25, 2007 - 2:19 pm: |
| 
|
मृण . सन्मी अमि म्हणजे गुजराथी मध्ये गोड असा अर्थ आहे म्हणे, म्हणूनच अमिषा म्हणजे गोड असणारी वगेरे. आणि रासी नवाची साउथ इंडियन नटी आहे. रासी चा अर्थ ढीगभरुन चांगल्या गोष्टी! (ती दिसायला पण बरीच जाड झालिये आता )
|