|
अतुल, पुनम, लोपा धन्यवाद अतुल तुझी कविता खुप छान आहे!
|
सुरेख चाललय सगळं... मिलिंद, सर्वप्रथम [खूप उशिरा] जन्मदिनाच्या शुभेcछा.. वैभव, ओलीसुकी मस्तय.. सारंग, खूप मस्तय कविता, विरहाच्या भावना खळाळत उतरल्यात.., कलिका, कविता छान आहेत तुझ्या,पण फ़क्त पावसावरच्याच का?अजून इतर विषयावरील येऊदेत माणिक, "आकृतीला अता निरनिराळी सूत्रेही सांभाळणे आवश्यक ( ? ) काही स्वनिर्मित तर काही ईतरांनी मांडलेली .. लादलेली ".. अखेर कृती आकृतीबंधाचे निष्फळ प्रयत्न संपले की आकार सोपवायचा श्रद्धेने अथवा नाईलाजाने ... निराकारावर ! वा!!! अतुल, छान
|
आकृतीबंध मस्तय.. माणिक (दिवसेंदिवस तुझ्या कविता छान होताहेत)
|
Sarang23
| |
| Monday, July 23, 2007 - 11:50 am: |
| 
|
माणिक, कविता आवडली... छान आहे! मित्र मयूर..., मी समिक्षक नाही. ती एक खूप अवघड जबाबदारी असते. खूप जास्त साधना, तल्लख बुद्धी, वाचन आणि व्यवहारज्ञान लागतं... आणि या सगळ्याच्याही वर चिंतनाची एक निष्णात बैठक लागते... बघ ना, coder code लिहितो आणि reviewer तो review करतो. तिथे coder पेक्षाही reviewer ला जास्त माहिती आहे म्हणूनच त्याला तो code review करायला दिला जातो. तसच असतं कवितेबाबतही... त्यामुळे मी कवितेचं माझ्यापुरतं रसग्रहण करून आनंद मिळाला की नाही या दोनच गोष्टी पहातो, आणि प्रतिक्रिया देतो. तसच मी माझ्या कवितेविषयी पण करतो. त्यामुळे मीच माझ्या कवितेचं रसग्रहण देऊ शकत नाही. त्याबद्दल क्षमस्व. बाकी जेवढ्या ठिकाणी समर्थनाची गरज वाटली तिथे बोललो आहेच.
|
Mankya
| |
| Monday, July 23, 2007 - 12:10 pm: |
| 
|
धन्यवाद मित्रांनो .. धन्यवाद ! माणिक !
|
संत अंगभर गुणांनी डवरून सुद्धा ते होतं.. विनयानं झुकणारं.. अन, आकाशाला स्पर्शून सुद्धा, मातीशी आपुलकी जपणारं.. एव्हढं प्रेमळ की स्वत वर दगड फ़ेकनार्यांना सुद्धा.. हसत हसत दान देणारं.. घाव घालणार्यालाही, मायेची सावली देणारं.. इतरांना गती देण्यासाठी, स्वतचा देह जाळणार्या, त्या दानशूर,निःस्वार्थ.. झाडाला.. "संत" म्हणाले.. माझं काही चुकलं का?..
|
Mankya
| |
| Monday, July 23, 2007 - 12:36 pm: |
| 
|
मृ .. क्या बात है ! आवडली ! हसत हसत दान देणारं .. वाह ! ईतरांना गती देण्यासाठी .. मस्तच ! पण ही अगोदर वाचल्यासारखी वाटतेय मलातरी ! माणिक !
|
धन्स,माणिक.. अगोदर वाचण्याची शक्यता नाही,मी अर्ध्या तासापुर्वी लिहिलिय आणि लिहल्या लिहल्या post केली..
|
Bairagee
| |
| Monday, July 23, 2007 - 7:33 pm: |
| 
|
"संत" एखाद्या छान संवादासारखी कविता आहे. असा संवाद जो ऐकला की फार बरं वाटतं, उदात्त वाटतं. आवडली.
|
वा! मृ...'संत' मस्तच!! माणिक छान आहे कविता!
|
माणिक ... माफ़ कर . कविता समजली नाही . मृद्गंधा .. " काय म्हणायचंय " ( विशेषतः झाडाला संत म्हणणे ) ते छान आहे . " कसं म्हणायचंय " मध्ये अजून छान करता आली असती असं वाटलं . पण ज्याला आपण thinking aloud म्हणतो ते आवडलं
|
धन्यवाद.. बैरागी,मयूर.. वैभव, "काय म्हणायचेय" ते अधिक सुंदरतेने "कस म्हणायचे" ..तशी प्रतिभा जर माझ्यात असती.. तुझ्यासारखी.. तर "बात ही कुछ और होती.." .. तरिही विचार करतेय..
|
Sarang23
| |
| Tuesday, July 24, 2007 - 6:59 am: |
| 
|
मृ, संत छान आहे...!
|
नाही नाही मृद्गंधा .. मला प्रतिभेविषयी वगैरे काही म्हणायचे नव्हते . खरं सांगायचं तर ती कविता / तो विचार लयबध्द ( अष्टाक्षरी ? किंवा सारंगच्या कवितेत्ला आठ सहा छंद ? ) छान लागेल कानाला असं वाटलं होतं म्हणून लिहीलं . असो .
|
Mankya
| |
| Tuesday, July 24, 2007 - 8:14 am: |
| 
|
वैभवा .. माफी ??????? तूला समजली नाही म्हणजे अगदी खात्रीपूर्वक .. my limitations! My problem ! मेल केलय उत्तर ! पुढचा प्रयत्न नक्कीच सशक्त असेल ! माणिक !
|
सल.. क्षणमात्र जाहलो मी जेंव्हा माझा जरासा पुरावा त्या क्षणाचा? काहिच सापडेना.. उद्गार वाहवा अन ती टाळी समेवरीची लय तीव्र आलापी ही काहीच भावतेना.. झाले आता जरी ते शब्द भावबद्ध माझे अर्थ मांडणीस काही? काहीच आकळेना अर्ध्यात सोडले काही जे रस्त्यात वेचलेले जे रक्तात वाढलेले काहीच आठवेना... -देवदत्त
|
अर्ध्यात सोडले काही जे रस्त्यात वेचलेले जे रक्तात वाढलेले काहीच आठवेना... वा!देवदत्ता! लाजवाब!!छान आहे कविता!
|
Bairagee
| |
| Tuesday, July 24, 2007 - 11:38 am: |
| 
|
कधी स्तुतीच्या माथ्यावरती समोर येतो अकस्मातसा फुगाच फुटका मौलिकतेचा आणि एवढा खुजा मला मी दिसतो इवला खुणावताना ह्या पायाच्या अंगठ्यापाशी ( हळूच तेव्हा तळहातावर घेतो त्याला कुणासही आकळण्याआधी) ........................................ बैरागी
|
देवदत्त, शेवटचं कडवं(?) खास आहे. ' शब्द भावबद्ध' हे नाही समजलं. ' भाव शब्दबद्ध' नको तिथे? बैरागी, मस्त!! ( फक्त मी ' समोर येतो' च्या जागी ' येऊन पडतो' वाचलं.)
|
Sarang23
| |
| Tuesday, July 24, 2007 - 2:06 pm: |
| 
|
व्वा! बैरागी, खासच!!! कुसुमाग्रज आठवले कविता वाचताना... (ह्या ऐवजी या हवं का?) देवा, मला फारशी कळाली नाही
|
|
|