|
Aaftaab
| |
| Tuesday, July 24, 2007 - 12:38 pm: |
| 
|
पहिलाच प्रयत्न आहे. कृपया सांभाळून घावे. --- अनोळखी तो: hi.. ती: hi " asl ?" "हे काय असतं? मी chat मध्ये जरा नवीनच आहे" "एज, सेक्स, लोकेशन..." "आधी तू.." "२८, m , मुम्बई, तू?" "२५, f , मुम्बई" "अरे वा.. काय करतेस?" "काही नाही, घरीच असते.. तू काय करतोस?" "मी एका कंपनीत आहे." "मग ऑफ़ीसच्या वेळेत chat ?" "असंच, टाईम पास.. तुझ्या घरी इंटरनेट आहे?" "आहे ना. तेवढाच टाईम पास.." "मग तुझं नाव काय?" "लक्ष्मी, सरस्वती, भानामती, असंच काहीतरी. " "म्हणजे नक्की काय?" "तुला काय वाटलं, लगेच नाव सांगेन अनोळखी माणसाला? high hopes " " chill yaar.. मी काय अनोळखी आहे का आता? आपण गेले दीड मिनिट chat करतोय ना" "ह.. मग तुझं नाव सांग आधी.." "माझं- शेखर" "खरं नाव?" "अगदी खरं.." "माझं नाव.. काय बरं? स्वाती.." "खरं नाव वाटत नाही, खरं सांग. तू मुलगीच आहेस ना?" "नाही, मी एक स्त्री आहे.. हा हा हा" "खूप हुशार आहेस." "ती तर मी आहेच." "मग मुलं वगैरे?" "अजून तरी नाही.. तुझ्याबद्दल पण सांगशील?" "मी? माझं अजून लग्न नाही झालं.." "अरे वा, म्हणजे मज्जाच मज्जा.." "कसली मज्जा?" "तुला माहीत आहे कसली!"
|
Aaftaab
| |
| Tuesday, July 24, 2007 - 12:43 pm: |
| 
|
"नाही, खरंच. सांग ना कसली?" "जसं काही तुला माहीतच नाही.." "पण लग्न झाल्यावर जास्त ना असली मजा?" "चल, चावट कुठला!" "हे बरं आहे, you started it आणि आता मला.." "ह्म्म्म, लग्न कधी करणार आहेस?" "का?" "करू नकोस!!....." "....... what!! का बरं?" "काही नाही, जाऊ दे.." "असं कसं जाऊ दे? स्वाती, बोल ना, काय problem आहे?" ".............." " swaatee dear? are you there? " "ह्म्म्म, कभी किसी को मुकम्मल जहान नही मिलता..." "अरे तू तर एकदम सेन्टी झालीस की.. हे बघ जे काही आहे ते मला सांगून टाक.. तुला पण मोकळं वाटेल.. " "पण..." "आणि नसेल सांगायचं तर नको.. माझी काही तुला जबरदस्ती नाही.. if you feel comfortable, only then you can share.." " thanks . तुला सांगून तरी काय फ़ायदा?" "मैत्रीमध्ये फ़ायदा तोटा नसतो स्वाती.." "ठीक आहे.. अरे माझं लग्न होऊन २ वर्षे झाली. पण आमच्यामध्ये अजूनही problems आहेत.." "म्हणजे?" "आता कसं सांगू? म्हटलं तर problems आहेतही आणि नाहीतही.." "मी ऐकतोय (वाचतोय).." "अरे अगदी ते पहायला आले होते तेव्हापासून त्यांना माझ्याबद्दल कधीच काही आवडलं असं वाटलं नाही.. मी काही अगदी ऐश्वर्या राय इतकी सुंदर नाही, पण चार चौघींमध्ये उठून जरूर दिसते.. तसे तेही फ़ार काही वाईट नाहीत. दिसायला ठीक ठाक आहेत." "तू आहेस ना? का तुला बोअर होतय?"
|
Aaftaab
| |
| Tuesday, July 24, 2007 - 12:51 pm: |
| 
|
"मी आहे. तू लिहीत रहा." "तसं सगळं बरं चालू आहे, पण ह्यांना मी आवडलिये असं कधीच वाटलंच नाही. हे कुणाला सांगितलं तर खरं सुद्धा वाटणार नाही कदाचित. कधी कधी कुणी ओळखीचे भेटले तर माझी तोंड दुखेपर्यंत तारीफ़ करतात.. पण नवरा मात्र नेहमी या बाबतीत उदासीन असतो." "पण असं का? he should appreciate you right?" "हो ना. कुठल्याही पत्नीला हेच वाटेल.." " but I think you should talk to him about this. " I have tried Shekhar.. ते नेहमीच खूप तुटक वागतात माझ्याशी.. it is almost like he takes me for granted. म्हणजे बायको आहेच.. सकाळी नाश्ता, डबा देईलच, संध्याकाळी जेवण guarenteed आहेच.. आणि इतर गोष्टी सुद्धा निसर्ग नियमाने होतातच.. I am sorry Shekhar, I should not bore you.. " "स्वाती, continue.. please.. may be I can help. does he have any interest outside? " " I don't think so. ते तशातले वाटत नाहीत.." "स्वीटी, ( I am going to call you that..) I think all problems will be solved if you have communication between you.. I think you should first be his friend and understand him.. May be he is not very good at expressing himself.." "you are right.." "कसं असतं, पुरुषाला बायको हा प्रकार handle करण थोडं अवघडच जातो. girlfriends वगैरे ठीक आहे. जे हवं ते घेऊन दिलं, टाईम पास केला, घरी सोडली की झालं.. बायको म्हणजे एक वेगळच tension असतं.. " "म्हणजे?" "म्हणजे बघ, बायकोशी emotionally connect व्हावं लागतं.. तेच मोठं अवघड आहे. सारखी तिला attention द्यावं लागतं. आणि एवढी शिकलेली बायको असते तेव्हा तर जरा घाबरूनच असावं लागतं." "हे काही तरी विचित्रच वाटतय.." " you know men like to be brief. whereas you women want to go into details of everything.. you want to be appreciated all the time. सगळ्यांनाच ते करणं जमेल असं नाही.." "पण माझ्या बर्याच मैत्रीणी आहेत, त्यांचे नवरे त्यांची इतकी तारीफ़ करतात ना.. " " that's what I am saying.. not everyone is the same.. Give him some time. Find out what he is looking for.." "what will he be looking for?" "Well, he may be looking for a vulnerable girl who needs him. he may be looking for someone who understands him and knows his feelings without saying anything. may be you intimidate him with your smartness and wit and perfection in everything you do.. he may be looking for someone who is not that perfect, you know.. असंही असू शकतं की त्याला आधी एक girlfriend हवी आहे.. जरी लग्न केलय तरी बायको नावाच्या प्रकारासाठी he may not be ready yet " "मग लग्नच कशाला करायचं पण?... shee, I hate him... but how do you know all these things? तू तर..."
|
Aaftaab
| |
| Tuesday, July 24, 2007 - 12:55 pm: |
| 
|
"मी? माझा या गोष्टींचा अभ्यास आहे.. तू जर भेटलीस तर तुला अजून details मध्ये मी सांगू शकतो.." "हो, जशी काही मी तुला लगेच भेटायला येणार आहे.." "का नाही? जर माझे intentions चांगले असतील तर का नाही?" " you really have high hopes " " yes I do.. I want to help you.. " "आणि मी जर स्त्रीच नसले तर?" "हा हा हा, good joke .." "पण तू राहतो कुठे?" "मी? अंधेरीला.. आणि तू?" "मी... इकडे नवी मुंबई कडे.." "आपण कुठे तरी बाहेर भेटू या.. दोघांना convenient अशा जागी. how about near Vaashi station? " "अं.... विचार करते.." "लवकर कर.. माझा cell चालत नाहीये.. तुला ऑफ़ीसचाच एक number देतो.. तुझा विचार होईल तेव्हा phone कर.." "चालेल.. पण करेनच याची खात्री नाही बरं का.. " "घे.. २३३४४५५६ आणि purchase section सांग. फोन माझ्याकडेच येईल.. कुणाला सांगू नकोस तुझं खरं नाव. कोणी विचारलं तर दुसरं काहीतरी नाव सांग.. any other name.. like say सुमती.." " what???!!!!.. is it you, शंकर????" " who is this?!! सुमती???!!" ".................." ".................." .......... समाप्त.................
|
मस्त. आफ़ताब, पहिलाच प्रयत्न झकास आहे. Keep it up.
|
Asami
| |
| Tuesday, July 24, 2007 - 2:56 pm: |
| 
|
अशाच theme वरची वपूंची एक गोष्ट आहे बहुतेक (CBDG), पण तू net lingo मधे नीट बसवली आहेस.
|
Ravisha
| |
| Tuesday, July 24, 2007 - 3:04 pm: |
| 
|
शेवट अपेक्षित होता;पण मजा आली वाचायला.पुढील लेखनासाठी शुभेच्छा,आफ़्ताब.
|
आपल्याला तर एकदम आवडली बुवा!!!!!!!!!!!!!
|
Chetnaa
| |
| Tuesday, July 24, 2007 - 4:05 pm: |
| 
|
वा आफ़ताब खुप छान... पहिलाच प्रयत्न? वाटत नाही.. लिहित रहा...
|
Amruta
| |
| Tuesday, July 24, 2007 - 4:58 pm: |
| 
|
मजा वाटलि वाचताना. वाचताना १ movie आठवला. नाव नाही आठवत पण US मधे राहाणार्या family बद्दल होता. त्यात तर शेवटी भेटतात तेव्हा कळत की आपण एकमेकांशी chat करत होतो म्हणुन.
|
Mansmi18
| |
| Tuesday, July 24, 2007 - 5:10 pm: |
| 
|
आफ़ताब, खुप छान. keep it up अम्रुता, I think that movie was mitra my friend..revati and some ex-model guy
|
Amruta
| |
| Tuesday, July 24, 2007 - 9:43 pm: |
| 
|
नाही रेवति नव्हती त्यात. मला actors ची नाव माहित नाहीत. पण त्यातल्या तीला तो म्हणजे तीच्या शेजारी रहाणारा american मुलगा वाटत असतो. ( i hope माझ 'ती ती 'कळ्ळ असेल)
|
Daad
| |
| Tuesday, July 24, 2007 - 10:59 pm: |
| 
|
आफताब, छानच. गोष्ट नावासकट आवडली. नुसते संवाद! पहिला प्रयत्नं म्हणतोस... वाअत नाहीये. मस्तं ओघ आहे लिहिण्याला. लिहीते रहा..... ('लिहीत रहा' असंच टायपायचं होतं पण हे 'लिहिते' चा टायपो जास्तं आवडला... 'वाहाते' सारखा)
|
Karadkar
| |
| Tuesday, July 24, 2007 - 11:21 pm: |
| 
|
अमृता http://movies.indiainfo.com/preview/mitr.html हा movie आहे तो ..
|
Amruta
| |
| Wednesday, July 25, 2007 - 12:18 am: |
| 
|
yes कराडकर हिच movie, मनस्मी अग रेवती म्ह्टलस म्हणुन कळ्ळ नाही.
|
Chinnu
| |
| Wednesday, July 25, 2007 - 12:50 am: |
| 
|
आफ़ताब छान लिहिलं आहेस.
|
T_pritam
| |
| Wednesday, July 25, 2007 - 4:38 am: |
| 
|
मस्त लिहिलीय....शेवट expected होता, तरी पन छान वातली... By the way, the movie on this theme was 'Mitr - My Friend' and the lead actress was Shobhana ....हा चित्रपट पन जबरदस्त होता...
|
Aaftaab
| |
| Wednesday, July 25, 2007 - 4:56 am: |
| 
|
सगळ्यांनाच प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.. thanks
|
Ana_meera
| |
| Wednesday, July 25, 2007 - 7:17 am: |
| 
|
एक चांगली वहाती गोष्ट..
|
Manjud
| |
| Wednesday, July 25, 2007 - 7:32 am: |
| 
|
आफताब, संवादातून कथा छान फुलवली आहेस. अश्याच विषयावरची एक कथा गुलमोहरवर आली होती. आठवली की लिंक देईन इथे. टिथे हा conept ही discuss केला होता. अर्थात एकाच विषयावर अनेकजण आपआपल्या कल्पना फुलवतात (फुलवू शकतात). मला आवडली ही कथा.
|
|
|