Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 20, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आषाढ » कथा कादंबरी » न्याय » Archive through July 20, 2007 « Previous Next »

Chinnu
Wednesday, July 18, 2007 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती कथा खूपच आवडली! श्रिनी धन्यवाद.

Swaatee_ambole
Wednesday, July 18, 2007 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीनी, you said it! मनापासून धन्यवाद. :-)

इथे आलेला प्रेमाचा त्रिकोण हे एक उदाहरण झालं, पण सहसा कलाकाराची अपूर्णतेची भावनाच कलाकृतीला जन्म देते, असं मला वाटतं. ती एखादी अपुरी इच्छा असेल, अधूरं स्वप्न, वा असहाय्यतेची (lack of control) भावना. मग ती रुखरुख तरी त्यातून व्यक्त होते किंवा ती भरून काढायचा आभासी प्रयत्न तरी केला जातो. ' सुखासुखी' किती कलाकृती जन्म घेत असतील?

कथा लिहीण्यामागे, त्यातल्या पात्रांचं ' नियंतेपण' वागवण्यामागे (playing God) हे ही असू शकेल का?

अर्थात, हा एक दृष्टीकोन झाला. पण मला पहिली कथा लिहीताना हे प्रश्न पडले. आणि त्या वेळी माझा माझ्याशी जो संवाद झाला, त्याचं हे प्रतिबिंब आहे असं म्हणता येईल.

अभिप्रायासाठी सर्वांची मनापासून आभारी आहे.
माझ्या गेल्या कथेवर अभिप्राय दिलेल्यांचेही आभार महिना बदलल्यामुळे मानायचे राहून गेले होते. ते ही या निमित्ताने मानते. :-)


Lopamudraa
Wednesday, July 18, 2007 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती छान कल्पना आणि कथा जमलीये.!!
(तु आभाराच लवकर आवरल अस नाही वाटत तुला? ....


Gajanandesai
Wednesday, July 18, 2007 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, एकदम साधली आहे कथा!

(वर श्रीनीने लिहिल्याप्रमाणेच मी तिचा अर्थ काढला होता. पण नंदू त्याला "Welcome" म्हणते यात थोडा गोंधळ झाला होता. ती त्याला Welcome म्हणतेय, याचा अर्थ तो नुकताच (कुणा एकाच्या हातातली) कळसूत्री बाहुली झाला आहे का? तो तर आधीपासूनच आहे / असणार. त्या गोष्टीचं ज्ञान फक्त त्याला आता होतंय. त्यामुळे ती welcome म्हणतेय याचा अर्थ तुला यातून कदाचित अजून काही वेगळं सांगायच असेल असं वाटलं.)


Ksha
Wednesday, July 18, 2007 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे, एव्हढां गूढ अर्थ आहे एका " welcome " मध्ये हे माहितीच नव्हतं.

तुम्ही पण गूढ, दुर्बोध वगैरे असं काही लिहीता का हो?
एक भा. प्र.


Bee
Thursday, July 19, 2007 - 1:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, तुम्ही मागे अशीच एक comment लिहिली होती आणि मग मेल करून माफ़ी वगैरे मागितली होती. आता परत तुम्ही एक चुकीची comment लिहित आहात. तुम्ही वयानी मोठे अहात म्हणून खूप बोलता येत नाही तुम्हाला पण प्लीज मला अशा comment अजिबात आवडत नाही. मला माझी ही ID पुरेशी आहे काहीही करायला. इतर चार लोक जर माझ्या सारखी इथे वागत बोलत असतील तर त्याला मी काहीच करू शकत नाही.

Zakasrao
Thursday, July 19, 2007 - 3:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओहो मस्त कथा. :-)
श्रिनी ने सांगितल्यामुळे त्या वेल कम चा अर्थ नीट कळाला.


Kmayuresh2002
Thursday, July 19, 2007 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती मस्तच गं.. वेगळी आहे कथेची मांडणी.. आवडली त्यामुळे.. :-)

Ana_meera
Thursday, July 19, 2007 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा, कल्पना चांगली आहे. मला पण शेवट कळला नव्हता, पण झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणून चुप बसले. thanks अनेकांनी समजावायचा प्रयत्न केल्याबद्ल



Psg
Thursday, July 19, 2007 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेगळी कथा स्वाती. मला दोनदा वाचावे लागले शेवटचे संवाद, पण माझीच समज कमी.

पुढची कधी? :-)


Farend
Thursday, July 19, 2007 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरीचशी कळली होती असे वाटले, पण Srini ने दिलेला Matrix चा ऍंगल नंतर लक्षात आला. मस्त आहे!

Arun
Thursday, July 19, 2007 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती : छान आहे कथा. मनापासून आवडली आणि थोडी थोडी कळली सुद्धा ............ :-)

श्रिनी : कथेचा अर्थ सोप्या आणि सरळ शब्दात सांगितल्यामुळे कथा कळायला उपयोग झाला. धन्यवाद ......... :-)


Swaatee_ambole
Thursday, July 19, 2007 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्म्म्म....
त्या 'Welcome to the club' ने घोळ झालेला दिसतोय. हा एक वाक्प्रचार आहे, ज्याचं loose translation 'आता कळलं, आम्हाला कसं वाटतं ते?' असं होवू शकेल. मला वाटलं होतं तितका तो रूढ नाही तर.

अभिप्रायांसाठी आभारी आहे. :-)


Savyasachi
Thursday, July 19, 2007 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, झकास कथा ! तू निरर्थक हा शब्द फ़क्त कथेच्या शेवटी वापरलास. तो जर आधी पण एकदा योग्य ठिकाणी वापरला असतास तर तुला welcome to club हे लिहायची पण गरज नव्हती.
योग्य ठिकाण कोणते ते तूच सांगू शकशील.
कदाचित, "कळसूत्री बाहुल्यांनी का हा प्रश्ण विचारायचा नसतो. ते 'निरर्थक' आहे". (पहीले पोस्ट, शेवटचे वाक्य.)


Ladaki
Friday, July 20, 2007 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती कथा आवडली... पहिल्यांदा वाचल्यावरच कळली होती... पण अभिप्राय वाचुन थोडीशी गोंधळली... म्हणुन मग परत वाचली कथा आणि सोबत श्रीनीचा अभीप्राय...

पावसाळा सुरु झाल्यापासुन माश्या भारी फिरायला लागल्यायत सगळीकडे... मॉडरेटर्स... फिनाईल शिंपडा की हो जरा... मायबोलीवर!!!


Princess
Friday, July 20, 2007 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, मस्त आहे कथा. स्व-अज्ञानामुळे पहिल्यांदा वाचताना कळली नाही. श्रिनीचा अभिप्राय मदतीस आला.
कथा वेगळी आणि सुरेख आहे. आवडली.


Milya
Friday, July 20, 2007 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती : वेगळी कथा...

माझ्यामते तुझ्या 'welcome..' च्या वाक्याने घोळ झाला कुठला 'club' हे स्पष्ट करायला पाहिजे होतेस म्हणजे कथा पटकन कळायला मदत झाली असती... कारण 'Welcome to the Club' jar tyaa 'club name' बरोबर आलं असतं तर पटकन कळले असते सगळ्यांना असे वाटते .. For e.g Welcome To the club of bloggers/jokers etc..

Ksha
Friday, July 20, 2007 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या,
माझ्या मते मग त्यांतला तो " Punch " गेला असता. हे आहे तसेच चांगले आहे. थोडसं डोकं चालवायला काय हरकत आहे? सगळंच चमच्याने भरवलं पाहीजे असं नाही ना :-)


Zakki
Friday, July 20, 2007 - 5:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर वाटले होते, भारतीयांनाच अमेरिकन वाक्प्रचार जास्त माहित असतात. मग असा गैरसमज का व्हावा बरे?

मी असे लिहीले असते, ' हे मृत्यू, तु पण माझ्यासारखाच एक कळसूत्री बाहुला आहेस. कळसूत्री बाहुला म्हणजे जो स्वत:च्या इच्छेने काही करू शकत नाही. इतर त्याला जसे सांगतील तसे तो करतो. तर आता तूहि आमच्याच सारखा झाला आहेस. तुझा 'का?' हा प्रश्न निरर्थक आहे, म्हणजे त्याला अर्थ नाही, कारण याचे उत्तर आपल्यासारख्या कळसूत्री बाहुल्यांना माहित नसते. ते फक्त जे आपल्याला काही करायला सांगतात त्यांनाच माहित असते, नि ते आपल्याला सांगत नाहीत म्हणून. तर अश्या या कळसूत्री बाहुल्यांच्या गटात तुझे स्वागत असो.'

कदाचित् म्हणूनच मी गोष्टी, कविता काही करत नाही!



Nanya
Friday, July 20, 2007 - 7:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, वेगळी आणि सही कथा,
सहज जाता जाता,
झक्कीकाका, तुम्ही रजनिकांतच्या movie ची script का लिहित नाही? आमचे बरेच प्रश्न सुटतिल





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators