Manas6
| |
| Tuesday, July 17, 2007 - 11:32 am: |
| 
|
बोलताना तोल गेला बोलताना तोल गेला; घाव झाला, खोल गेला. कालचा उपदेश माझा, काय मित्रा, फोल गेला? पैंजणांना चेतवाया, ढोलकीचा बोल गेला अश्रू सांगे वाहताना, -"जन्म कवडीमोल गेला". नेत्र-बाणा, सांग ना रे! एव्हढा का खोल गेला? वाढला अंकुर पण का, सोडुनी ती ओल गेला? काय रामाच्या कथेतुन, जानकीचा रोल गेला? -मानस६
|
Chinnu
| |
| Tuesday, July 17, 2007 - 2:15 pm: |
| 
|
मानस, क्या बात है! वाढला अंकुर पण... शिवाय शेवटचा पंच लय भारी!
|
मानस मस्तच रे. सगळेच शेर छान. फक्त दुसर्या शेराचे प्रयोजन कळले नाही. मक्ता सही
|
Mankya
| |
| Wednesday, July 18, 2007 - 6:36 am: |
| 
|
मानस .. मस्तच रे मित्रा ! मतला .. क्या बात ! खोल शब्दही खोल गेला मनात ! अश्रू सांगे .. मस्तच ! शेवटचा शेर .. सही उतरलाय ! माणिक !
|
Jo_s
| |
| Wednesday, July 18, 2007 - 9:36 am: |
| 
|
मानस चांगली जमल्ये सुधीर
|
Shyamli
| |
| Wednesday, July 18, 2007 - 1:36 pm: |
| 
|
वाह..... आवडली गझल .. .. .. ..
|
Pulasti
| |
| Wednesday, July 18, 2007 - 5:56 pm: |
| 
|
मानस, मस्त गझल! अश्रू आणि ढोलकी शेर छानच! रामाचा शेर तर खूप आवडला... पुलस्ति.
|
Pulasti
| |
| Wednesday, July 18, 2007 - 5:58 pm: |
| 
|
साळसूद! पूल बांधले जरी वाढतेच का दरी? भूक ही शिळीच अन ही शिळीच भाकरी! राग फार साचला, काढला तुझ्यावरी देतसे कधी हरी काय खाटल्यावरी? आलबेल या इथे कत्तली तिथे जरी! साळसूद ठेव तू भाव चेहर्यावरी! प्रश्न हेच जर तुझे - व्यर्थ जिंदगी खरी! -- पुलस्ति.
|
Mankya
| |
| Thursday, July 19, 2007 - 1:37 am: |
| 
|
पुलस्ति .. ' साळसूद ' आवडेश ! मतल्यात रूपके तितकिशी चपखल वाटत नाहीत अस मला वाटतं, पर्याय सूचला तर सांगेनच. शिळीच भाकरी .. क्या बात ! देतसे .. मस्त ! आलबेल .. पोहोचला नाही मित्रा ! साळसूद .. मस्तय ! शेवटचा शेर .. खरंय ! आवडला ! माणिक !
|
Daad
| |
| Thursday, July 19, 2007 - 3:05 am: |
| 
|
(सहावा)मानस, 'बोलताना तोल गेला' चांगलीये. मतल्याने विकेट घेतलीये. अंकूरचा शेरही सुंदर आहे. पुलस्ति, छानय 'साळसूद'.
|
Bee
| |
| Friday, July 20, 2007 - 2:50 am: |
| 
|
मानस आणि पुलस्ति, मला दोन्ही गझला खरे तर कविता म्हणूनच जास्त आवडल्यात. खास करून पुलस्तिची..
|
Jo_s
| |
| Friday, July 20, 2007 - 5:27 am: |
| 
|
पुलस्ति, छान आहे,साळसुद आवडला
|
T_pritam
| |
| Saturday, July 21, 2007 - 9:14 am: |
| 
|
दोन्ही सुरेख आहेत...मल आवडल्या... btw, कुणी मला 'गजल' आणि 'कविता' यातला फरक सांगेल का? मला माहीत नाहीये...
|
मानस छान गज़ल. पण मक्ता आवडला नाही.ईनफॅक्ट तो शेरच वाटत नाही. चू भू द्या घ्या. मानस जाणकार मक्त्याचा शेर समजवून सांगाल का? पुलस्ति व्वा! छान छोट्या मीटरमधेही मस्तपैकी लिहितोस रे! मक्ता अजून स्पष्ट हवा होता का? चू भू द्या घ्या. मेघा
|
मेघधारा ... जाणकार म्हणवून घ्यायला बरोब्बर कसा टपकलो किनै ?
असो jokes apart खरंतर तुझा प्रतिसाद वाचल्यानंतर माझी उत्सुकता जास्त वाढली . काय रामाच्या कथेतुन जानकीचा रोल गेला याला नव्या मराठी गज़लचा प्रातिनिधिक शेर म्हणता येईल काय ? या आधीही चपखल बसणारे इंग्लिश शब्द वापरून लिहीलेल्या गज़ल वाचनात आल्या आहेत . उदा .:- प्रसाद ची " आपल्या दोघांमध्ये ही गॅप का ? " किंवा मला वाटतं कार्यशाळेच्या गज़ल मध्ये बैरागीने टेलिफोन शब्दाचा वापर केला होता . तर प्रश्न हा आहे की केवळ इंग्लिश शब्द आहे म्हणून आपण थोडंसं prejudiced होतो का ? given a choice मला तसं वापरायला आवडणार नाही ( हज़ल सोडून ) पण म्हणून जे वापरतात ते छान नसेलच असा पूर्वग्रह का ? ( असं तुझं म्हणणं नाहीये , हे मीच बोलतोय आत्ता विचार करताना ) म्हणून मग पूर्ण शेरकडे पाहताना मला जे वाटलं ते असं आजच्या जमान्यात सीतेसारखी स्त्री राहिलेली नाही किंवा सीतेला किंमत राहिलेली नाही यापैकी काहीतरी म्हणायचे असावे पण मग हा metaphor घेताना आज असे राम तरी कुठे राहिलेत ज्यांच्या कथेत सीता नाही असं म्हणतो आहोत , असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही म्हणजे थोडक्यात आजच्या कथेत रामाला तरी रोल आहे की नाही कोण जाणे
मानसच काय ते सांगू शकतील पुलस्ति .. ओके ओके वाटली . चू. भू. दे. घे . आज आलोय ह्या बीबी वर तर एक गज़ल पोस्ट करतो
|
उनाड झुरून मेले सताड उघडे कवाड माझे कुठे उधळले नशीब होते उनाड माझे नकार वाटू नये असा तो नकार होता कशास तू एवढे पुरवलेस लाड माझे तुम्हीतरी साक्ष द्या खरी माझिया व्यथांनो तुम्हांसही वाटतात अश्रू लबाड माझे ? हळूहळू पाय काढता घेतला फुलांनी हळूहळू माळरान झाले उजाड माझे ( विचाराधीन ) असेच वरवर खणून सारे निघून गेले कुठेतरी खोल आत होते घबाड माझे फिरून ती वेस ओळखीची समोर आली शहारले हाय ! विंचवाचे बिर्हाड माझे
|
मानस, छानच अहे गझल.. पुलस्ति.. मतला अधिक आवडला. वैभव, वा!!! एकसे बढकर एक शेर आहेत.
|
Bairagee
| |
| Tuesday, July 24, 2007 - 10:15 am: |
| 
|
'लाड' आणि 'घबाड' अतिशय सुंदर. एकंदर सुंदर गझल. मतला आणि शेवटचा शेर अजून निःसंदिग्ध व्हायला हवे होते असे वाटते. 'माळरान' हा शब्द तिथे दुसऱ्या वाचनात खटकला. 'माळरान' हे तसे उजाडच असते. कवाड 'झुरून मेले' खटकले.
|
Mankya
| |
| Tuesday, July 24, 2007 - 10:17 am: |
| 
|
वैभवा .. .. .. .. !! माणिक !
|
Jo_s
| |
| Tuesday, July 24, 2007 - 10:29 am: |
| 
|
वैभव छान आहे नकार वाटू नये असा तो नकार होता कशास तू एवढे पुरवलेस लाड माझे ......आवडला
|