Bairagee
| |
| Thursday, July 19, 2007 - 6:10 am: |
| 
|
सारंग, स्वातीशी सहमत.शारीर अशा निसर्गचित्रांचे दालन.सुखद प्रतिमासृष्टी. धूसरतेच्या धुक्याने अधिकच मोहक.
|
Kkaliikaa
| |
| Thursday, July 19, 2007 - 12:19 pm: |
| 
|
पाऊस कुणाचा??? तुझा कि माझा?? उंच-उंच नभातुन वाजत-गाजत धावत येतो मेघांच्या पालखीत बसुन थेट माझ्या दारी येतो मग सांग बरं......पाऊस कुणाचा??? तुझा कि माझा?? कधि छपरावर चढुन बसतो कधि दारावर थाप देतो दार उघडायचीही नसते फुरसत सरळ घरात आत शीरतो मग सांग बरं......पाऊस कुणाचा??? तुझा कि माझा?? दरवर्षी नेमाने बघ वेडा होऊन पळत येतो माझ्याकडे धाव त्याची दिलं वचन विसरत नसतो मग सांग बरं......पाऊस कुणाचा??? तुझा कि माझा?? कधि करतो अंगणात रिमझिम कधि टपटप पानावरती परसबाग सुंदर माझी नव्याने हो फुलवायला येतो मग सांग बरं......पाऊस कुणाचा??? तुझा कि माझा?? मला कधिच विसरत नाही विश्वासाला तडा जाऊ देत नाही तसा तुलाही तो विसरत नाही म्हणा पण शब्द-फुले माझ्याच ओंजळित टाकुन जातो मग सांग बरं......पाऊस कुणाचा??? तुझा कि माझा?? *******************************************
|
Sarang23
| |
| Thursday, July 19, 2007 - 1:54 pm: |
| 
|
मित्रांनो धन्यवाद... मिल्या खरच तुझा हा आ लै भारी आहे... स्वाती... अतिशय लांबून पाण्यासाठी पायमोड केलेल्या गाई थकलेल्या का नसतील? मग वेळ कुठलीही असो...मुळात पहाटेच्या गाई थकलेल्या कशा? हा प्रश्नच मला खटकला... पण तुला आणखीही काही सुचवायचे असेल असे मी गृहीत धरले आहे आणि विचार करतोय... पण तसं काही असल्यास नक्की सांग... खरं तर हा प्रश्न पडलेल्या सगळ्यांनीच जर यावर प्रकाश टाकला तर मलाही तसा विचार करायला खूप मदत होईल... आणि 'फेस - केस' का खटकलं कोणी मला please सांगेल का? अकारांत शेवट झाला आहे म्हणून की एकूण कल्पनाच ठीक वाटत नाही?
|
Chinnu
| |
| Thursday, July 19, 2007 - 2:19 pm: |
| 
|
सारंग फ़ेस-केस कल्पना बरोबर नाही वाटली. बाकी छानच. लय एकदम सही. मोठ्याने वाचतांना ताजी कैरीची फोड खावी मे महीन्याच्या दुपारी, एवढी मज्जा आली!
|
सारंग, पाण्यासाठी ओढ्याकाठी थकलेल्या गाई सोन्याहून पिवळते गर्द वनराई या ओळी पहाटेची वेळ दर्शवत नाहीत असं माझं मत. पहाटे वनराई सोन्याहून पिवळत नाही, आणि अपवादात्मक परिस्थितीत पहाटे पहाटे गायी थकू शकतीलही, पण कवितेत प्रतिमा वापरताना ती अपवादात्मक असून कशी चालेल? तशी वापरायची तर तो अपवाद का झाला आहे हे ही स्पष्ट व्हायला हवं हे माझं मत. मला त्या ओळी वाचताना टळटळीत मध्यान्ह आली डोळ्यांसमोर. केस फेसाप्रमाणे किंवा फेस केसांप्रमाणे कसे दिसतील हे ही मला प्रयत्न करकरूनही डोळ्यांपुढे आणता आलं नाही. झर्याला अंगावर उडवण्याइतका फेस कसा हे ही कळलं नाही.. पाणी अडथळ्यांपाशी फेसाळलेलं दिसेल, तुषार उडतील, पण फेस उडेल? कदाचित या सगळ्या प्रश्नांचं उत्तर poetic liberty या दोन शब्दांत देता येईल. पण मला हे कळलं / पटलं नाही हे नमूद करावंसं वाटलं.
|
Bee
| |
| Friday, July 20, 2007 - 2:13 am: |
| 
|
चरा झाडांवर फुले आणि पानांवर पाणी हिर्व्या हिर्व्या रानामध्ये पाखरांची गाणी पाण्यासाठी ओढ्याकाठी थकलेल्या गाई सोन्याहून पिवळते गर्द वनराई ओल्या ओल्या उताराला लाल लाल कडा वाटेवर पावलांच्या प्राजक्ताचा सडा अशा वेळी पहाटेचा खळाळता झरा चालताना भांबावून तोल जातो जरा सारंग, मला फ़क्त इथपर्यंतच तुझी कविता आवडली. पुढील कडवी कवितेशी सुसंगत होत नाहीत की काय असे वाटले. त्या ओळी पुर्ण कळल्याही नाही खर तर.. कविता छान आहे.. लय शब्द वर्णन वगैरे वगैरे उत्तम आहे..
|
Jo_s
| |
| Friday, July 20, 2007 - 5:11 am: |
| 
|
सारंग कविता मस्तच आहे.याची लयही मला खुप आवडली. पण स्वातीच्या शंकाही रास्त आहेत. सुधीर
|
सारंग , सोन्याहून पिवळते आणि केस व फेस या दोन तीन ओळी दिशाभूल करत आहेत . काल आपण बोलल्याप्रमाणे generalised assumptions कवितेच्या बाबतीत असू नयेत हे काही अंशी खरं असलं तरीही मग अपवादात्मक म्हणणे कवितेतून सिद्ध करण्याची जबाबदारीही येते . जे तू करण्याचा प्रयत्न केला आहेस हे दिसतंच आहे . पण मला असं वाटतंय ( अनेको वाचनानंतर ) की संपूर्ण कवितेतील वातावरणनिर्मितीच्या वर्णनात्मक ओळी आणि त्यानंतर आलेला वियोगाचा निष्कर्ष ह्यात कुठेतरी डिसकन्नेक्ट जाणवतो आहे . माझ्यामते तू संपूर्ण कवितेचं रसग्रहण स्वतःच का टाकत नाहीस ? ह्यामुळे वेगवेगळ्या लोकांच्या शंका एका पोस्ट मध्ये कव्हर होतील . तुला पहिल्यापासून शेवटपर्यंत काय म्हणायचं आहे आणि कुठल्या अनुषंगाने कुठले शब्द त्या त्या ठिकाणी आले आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे असे मला वाटते
|
नमस्कार! नमस्कार हो माझ्या मित्रांन्नो आणि मैत्रीणींनो. मी मायबोलीवर नविन आहे. तुमच्याशी मैत्रिची अभिलाषा बाळगते. मला आवडेल तुमच्याशी बोलायला. अर्थात तुम्हाला आवडत असेल तरच हं! माझ्या कविता आवडतात कां हो तुम्हाला??? कळवाल कां मला??? नाही आवडल्या तरिही सांगायचं. बरं का????
|
पाऊस मना-मनांचा! पाऊस ढगांचा पाऊस मेघांचा पाऊस सौदामीनीचा पाऊस वसुंधरेचा पाऊस गारांचा पाऊस थेंबांचा पाऊस सरींचा पाऊस ओल्या मातीचा पाऊस तरुवल्लरींचा पाऊस घनराईंचा पाऊस वनराईंचा पाऊस मनमोराचा पाऊस पक्ष्यांचा पाऊस प्राण्यांचा पाऊस नद्या-नाल्यांचा पाउस मना-मनांचा पाऊस माझा पाऊस तुझा पाऊस इतरांचा पाऊस सर्वांचा!
|
छान आहे कविता तुझ्या कालिका.. मला आवडल्या... चारोळ्या लिह्ते का तु? तिकडे झुळुकेवर ये
|
Princess
| |
| Friday, July 20, 2007 - 10:12 am: |
| 
|
कलीका, छान आहेत पाऊस कविता, आवडल्यात. खुप दिवसानी आले. माणिक, दोलकाची कविता जबरदस्त. गुरुजी, मिल्याला दिलेली भेट खुप आवडली. अशी भेट फ़क्त मिल्यालाच का :D ?पुढच्या वाढदिवसाला मला पण हवी. (मिलिंदराव, तुम्ही इतकी सुंदर भेट मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले होते? )
|
Sarang23
| |
| Friday, July 20, 2007 - 10:13 am: |
| 
|
स्वाती आणि वैभव, अतिशय छान विचार करायला लावणारं लिहीलं आहे तुम्ही... आता थोड मला काय वाटतय याविषयी... पाण्यासाठी ओढ्याकाठी थकलेल्या गाई सोन्याहून पिवळते गर्द वनराई सगळ्यात पहिली गोष्ट जर कवी म्हणतोय की गाई थकलेल्या आहेत तर त्यावरून असा निष्कर्ष मी काढला असता की गाई लांबून आल्या आहेत... हा अपवाद कसा होऊ शकतो??? जर कवी गाईंची अवस्था स्वतःच सांगतोय तर मग प्रश्न उरलाच कुठे? आता यावरून कवी असं म्हणूच कसं शकतो? अशी चर्चा कितपत योग्य आहे? अस लांबून पायमोड करत पाणी प्यायला येणार्या गाई थकतात हा अपवाद कसा काय? त्या तसं कायमच करत असतात.. त्या पाण्यासाठी थकलेल्या गाई आहेत... दुसरी गोष्ट... टळटळीत मध्यांन्ह... इथे मी असं कुठेही म्हटलं नाही की उन्हं धरेवर पसरल्यामुळे सगळी वनराई पिवळली आहे... तस असतं तर मग कडक उन्हाचा तरी उल्लेख हवा होता... निदान सुर्याच्या अस्तित्वाचा...? पण तो तिथे नाहीये... म्हणजे वनराई अजूनही गर्दच आहे... गर्द हे विशेषण शक्यतो हिरव्या रंगालाच असतं... म्हणजे गर्द हिरवी वनराई पिवळत गेली ती गाईंच्या अस्तित्वामुळे... वैभव, मला बैरागींचे म्हणणे काही अंशी पटले की धूसरपणा आहे... पण तो फारच थोडा आहे... आणि सौंदर्यवर्धक आहे... पण disconnected असं काही खरच वाटत नाहीये...
|
Mankya
| |
| Friday, July 20, 2007 - 12:34 pm: |
| 
|
Princess.. मनःपुर्वक आभार ! आकृतीबंध प्रवासरेषा एका निरपेक्ष बिंदूतून अस्तित्व साकारत दुर्लक्षीत अटळ पूर्णविरामाकडे सातत्याने झेपावणारी प्रथमतः कोणत्याही आकाराला न जुमानता नकळत पण प्रामाणिक स्वैर रेखाटणांचा टप्पा अनियमित आकारही निरागस लोभसवाणा .. कालमात्र एका विरळ्याच ठिपक्यातून पुन्हा दिशा बदलते रेखा सुरूवात स्पर्शाची .. छेद विच्छेदांच्या जाणीवेची आकृतीला अता निरनिराळी सूत्रेही सांभाळणे आवश्यक ( ? ) काही स्वनिर्मित तर काही ईतरांनी मांडलेली .. लादलेली आपल्याशी दुसर्यांचं गणित जमलं .. सुत्र जमलं कि आवेशाने पुढे सरकायचं त्यांना समांतर अन अगदिच काटकोनात जेंव्हा साधेल मिती तेंव्हा स्वकेंद्रित फिरायचं .. ओघ परीघाकडून केंद्रबिंदूकडे प्रत्येक नवख्या स्पंदनाच्या अक्षांश रेखांशाचे भान सांभाळत कुठेतरी एखादं लंबांतर असावं वाटतं अगदी शून्य पण केवळ कर्तव्य, निती (?) म्हणून ते अंतर जाणूनबूजून वाढवायचं तेंव्हाच महत्वकांक्षेचा कोनही साधण्यास निष्प्रभ ठरावं अखेर कृती आकृतीबंधाचे निष्फळ प्रयत्न संपले की आकार सोपवायचा श्रद्धेने अथवा नाईलाजाने ... निराकारावर ! माणिक !
|
माणिक, हा ' दोलायमान - भाग २' आहे का? आकृतीबंधाचं रूपक लंबकाइतकं प्रभावी वाटलं नाही. कारण त्यातली गतिमान होण्यातली, थांबण्यातली आणि एकाच कक्षेत फिरण्यातली अपरिहार्यता या रूपकात येत नाही. लंबक साध्या अहेतुक धक्क्यानेही गतिमान होवू शकतो, आकृतीला essentially ' कर्ता' असतो, आणि ओघाने कार्यकारणही. त्यामुळे शेवट ( आकार सोपवायचा निराकारावर) कितीही आकर्षक कसला, तरी त्याचा प्रभाव कमी होतो असं मला वाटलं. सारंग, म्हणजे गर्द हिरवी वनराई पिवळत गेली ती गाईंच्या अस्तित्वामुळे... पिवळ्या गायी?? थकून पिवळ्या झाल्या का? Jokes apart, खरंच तलवार ठेवून लेखणी घे आणि वैभव म्हणतो तसं तूच तुझ्या कवितेचं रसग्रहण लिही अशी मीही विनंती करते.
|
सारंग सुंदर रे...! आणि.... स्वातीला माझ्याकडूनही मोदकांचे दुकान... मला जाणवलेल्या काव्यार्थानुसार, पहिली चार कडवी अतिशय सुंदर... मात्र त्यानंतरच्या चारही कडव्यांचा प्रारंभापासून निर्माण झालेल्या काव्याशयाशी काहीच संबंध लागत नाही असे वाटतेय... झाडांवर फुले आणि पानांवर पाणी हिर्व्या हिर्व्या रानामध्ये पाखरांची गाणी वा! निसर्गवर्णन लाजवाब! झाडांवर फुले असल्याने, पानांवरच्या पाण्यातून दिसणारे आभाळाचे प्रतिबिंब... पाखरांची गाणी... हे केवळ सृष्टीसौंदर्य नाही... तर,जगण्याची, आयुष्याची निरागस समृद्धता ह्यातून प्रकट होतेय... पाण्यासाठी ओढ्याकाठी थकलेल्या गाई सोन्याहून पिवळते गर्द वनराई 'इथे गाई का थकल्या...?' असा प्रश्न पडणे साहजिक आहे... असे असेल का की दिवसभराची वणवण सहन करून गाई आता परत गोठ्याकडे परतण्यास आतुर आहेत... ?? पाण्याचा शोध घेऊन थकलेल्या आहेत असेच जर असेल तर पहिल्या कडव्यातील सृष्टीचे समृद्ध सौंदर्य फोल आहे काय?? की प्रत्येक कडवे एक स्वतंत्र कविता?? 'सोन्याहून पिवळते गर्द वनराई' ... सोन्यासारख्या किंवा सोन्याहून सतेज अशा प्रकाशछटा मुलूखभर पसरल्याने वनराईला पिवळसर झाक आली आहे का?... 'उन्हं धरेवर पसरल्यामुळे सगळी वनराई पिवळली आहे' ह्याबाबत कवी सहमत नाही तर मग वनराई का पिवळली आहे हे उमजत नाही...गाईंच्या अस्तित्वाने असे होणे थोडेसे विचित्र वाटतेय... शिवाय अश्या पिवळट छटा केव्हा पसरतात 'शक्यतो'? संध्याकाळच्या सुमारास असे सौंदर्य प्रकट होते... शिवाय गाई संध्याकाळच्या सुमारास थकण्याची शक्यता जास्त आहे पहाटेपेक्षा... म्हणजे कवितेच्या घटनाक्रमाची सुरूवात संध्याकाळी होतेय...(?) ओल्या ओल्या उताराला लाल लाल कडा वाटेवर पावलांच्या प्राजक्ताचा सडा टेकडीच्या उतार आता ओलावलेला आहे... धुक्यामुळे, दवामुळे तो ओलावलेला आहे काय? दव पडण्याची शक्यता पहाटे जास्त... पण संध्याकाळीही काही हरकत नसावी...शिवाय 'लाल लाल कडा...' असा लालसर पदर सृष्टीतल्या वस्तुमात्रांना कधी लाभतो? संध्याकाळच्या आणि रात्रीच्या सीमेवर रेंगाळणारी अशी एक वेळ असते... संध्योत्तर कालावधी असेल तर सूर्याच्या अंतिम लालरंगी छटा निसर्गात दर्वळत असतात, रेंगाळत असतात... 'वाटेवर पावलांच्या प्राजक्ताचा सडा...' छान!! प्राजक्ताने केवळ सौंदर्यात भरच घातली नाही...तर 'झाडांवर फुले' असतानाचे हे समर्पण म्हणजे मानवी आयुष्याचे चित्रिकरण एका सकारात्मक दृष्टीकोनातून प्रकट होतेय... मानवी जीवनाचे निसर्गाशी असलेले चिरंतन आणि उदात्त नाते कवीला सांगायचे आहे. मातीशी नाळ जोडणार्या शब्दातून कविचा Positive Attitude Towards Life प्रगल्भ आहे! अशा वेळी पहाटेचा खळाळता झरा चालताना भांबावून तोल जातो जरा वरचे चित्रिकरण संध्याकाळचे आहे असे समजले तर 'पहाटेचा झरा' कुठून आला? शिवाय मनाची कातर भांबावलेली अवस्था संध्यासमयीच अधिक गडद होते... पहाटेच्या वेळेस भांबावण्याचे कारण उमजत नाही... ह्यानंतरची चार कडवी ही एक वेगळी कविता आहे असे वाटतेय... कदाचित प्रेमकविता म्हणता येईल... पुन्हा एकदा कविता आवडली सारंग तुमच्या रसग्रहणाची आम्ही वाट पाहतोय (अति-समिक्षेबद्दल क्षमस्व) धन्यवाद.
|
कलिका.. कविता सुंदरच!! ही अजून काही माझी पावसातली गाणी... प्रेमगाणी पावसातली... वर्षावात चांदण्यांच्या मी बेधुंद होऊनी न्हालो सहवासात तुझीया सखे मी दुनिया सारी विसरलो ||धृ|| ह्या वेली हे अंगण अन आभाळ पसरले वरती वरूणाच्या स्वागता कशी नटून बसली धरती निसर्गाचे लोभस रूपडे पाहूनी मी शहारलो सहवासात तुझीया सखे मी दुनिया सारी विसरलो ||१|| रेशमाची लडी की हा हात आहे तुझा माझ्या हाती आभाळ दाटले की घनगर्द केस पसरले खांद्यावरती डोळ्यात तुझ्या पाहता जणू जीवनामृत मी प्यायलो सहवासात तुझीया सखे मी दुनिया सारी विसरलो ||२|| विसावलो तुझ्या अंकावरी हात तुझा फिरे गालावरती अन गोड तुज़े हासने जेंव्हा असे सदैव डोळ्यापुढती मोक्ष मोक्ष ज्यासी म्हणती अर्थ मी त्याचा उमगलो सहवासात तुझीया सखे मी दुनिया सारी विसरलो ||३|| ------ अथांग अंधूक दूरवर ह्या डोंगरांच्या रांगा अन धुंवाधार पावसाने ही दरी भरून गेली उन्हात ग्रीष्माच्या होरपळलो आजवरी होई शांत शांत मन आज, आज प्रीती तुझी मिळाली बेफाम थंड वारा धूंद होऊनी सरींना बिलगे झाडे रान वेलींतून अवखळ खेळ बघ त्यांचा चाले मन उदास होते सुन्न अन रुक्ष आजवर परी वाटे खट्याळ व्हावे आज, आज काय मला हे झाले जोर वाढला, वाढला जोश तूफान पावसाचा बेहोश होवूनी ओली धरणी त्रुप्त आनंद घेतसे त्याचा विरहाचा मौसम सरला, सरला काळ जुदाईचा जावे एकमेकात मिसळूनी आज, आज दिवस मिलनाचा
|
Bairagee
| |
| Saturday, July 21, 2007 - 1:19 pm: |
| 
|
"आकृतिबंध" ही कविता एकंदर चांगली आहे. बुद्धीची चांगलीच कसरत होते. थोडी लांबल्यासारखी वाटते. काही ठिकाणी थोडी अनावश्यक गुंतागुंत आहे असे मला वाटते.
|
Sarang23
| |
| Saturday, July 21, 2007 - 1:30 pm: |
| 
|
स्वाती... आता मलाच कळत नाहीये की हसावं की रडावं... माझ्या पोस्टमधला एक उतारा मी edit करून काढून टाकला होता... उगीच माझं समर्थन उद्धट वाटायला नको म्हणून... तो साधारणपणे असा... "आता गाईंचा रंग पिवळा कसा काय? असा प्रश्न कृपया पडू देऊ नये..." बाकी तुला एक से एक प्रश्न पडतात बरं का... पहाटेच्या गाई थकलेल्या कशा? किंवा पिवळ्या गाई???... असे... सहज म्हणून सांगतो... आत्ता मी ज्या रस्त्यावरून... (बाजीराव रोड) गेलो त्या रस्त्यावर एकूण चार गाई दिसल्या त्यापैकी ३ गाईंचा रंग पिवळा होता... आणि एकीचा तांबूस पिवळा... जो गर्द (गर्द हे विशेषण हिरवेपणातल्या काळेपणासाठी असते. जो सुर्यप्रकाशात कमी कमी होत जातो...) वनराईवर अगदी सोन्यासारखा शोभेल... असे वाटते... आता काय लिहू? मुळात कविता लिहून रसग्रहणही टाकण्यापेक्षा कविताच न टाकणे उत्तम... कवितेचा अर्थ अतिशय म्हणजे अतिशयच सरळ आहे... शाळेतल्या मुलालाही शेवटची दोन कडवी वगळता सबंध कविता कळेल... jokes apart ... पण रसग्रहण हे वाचकाने करायचं असतं... आणि कवीने कवितेशी प्रामाणिक राहून रंग भरायचे असतात... रस भरायचा असतो... आणि त्यात मी पुर्णपणे यशस्वी आहे असं मला वाटतं... अधीक काही लिहीत नाही... बाकी एक... स्वाती तुझं ते "तलवार ठेव" खूप लागलं... तलवार???
|
Mankya
| |
| Monday, July 23, 2007 - 1:09 am: |
| 
|
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद .. स्वाती, बैरागी ! बैरागी .. गुंतागुंत झालीये खरी बर्याच जागी ! मान्य ! स्वाती .. हो, रूपक समर्पक नाहीये ! You said it.. दोलायमान भाग २, त्याच विचारात असताना उतरलिये ही ! माणिक !
|