Zaad
| |
| Wednesday, July 18, 2007 - 7:44 am: |
| 
|
त्या रात्री आपण दोघे अपुल्यामधले मोजीत असता शेष अंतर कुठून अचानक कोसळला तो पाऊस ओला मिटवून गेला तेही अंतर
|
Jo_s
| |
| Wednesday, July 18, 2007 - 9:33 am: |
| 
|
झाड कल्पना छान आहे. आपुल्यामधले हा शब्द नसता तरी चालले असते असे वाटते. शेवटचा अंतर या शब्दाच्या जागी नंतर कसा वाटतो?
|
Zaad
| |
| Wednesday, July 18, 2007 - 10:52 am: |
| 
|
धन्यवाद सुधीर, तुम्ही सुचवलेले बदल खरंच छान आहेत!
|
Manogat
| |
| Wednesday, July 18, 2007 - 12:53 pm: |
| 
|
प्रेमाच्य ओलाव्याने, नात्यांचे झाड वाढले, आज ओलवा संपला, आणि बहरलेले झाड सुकले.
|
Meenu
| |
| Wednesday, July 18, 2007 - 3:11 pm: |
| 
|
लिहायचा प्रयत्न केला तरी.. हवं ते उमटत नाही होतं असं कधी कधी जगायचा प्रयत्न केला तरी.. आयुष्य पुढे सरकत नाही होतं असं कधी कधी
|
Shyamli
| |
| Wednesday, July 18, 2007 - 3:22 pm: |
| 
|
शोधत काही गेलं तरी सापडत नाही हवं ते हरवाव म्हणलं काही तर हरवतही नाही ...... नकोय ते
|
Meghdhara
| |
| Wednesday, July 18, 2007 - 4:24 pm: |
| 
|
'नको ते' खरच नकोसं होतं का? सापडण्यात हरवण्यात पुन्हा मन फसतं का? ठेचाळूनही हट्टी मन शहाणं काही होत नाही सापडेल या भ्रमात शोधणं काही संपत नाही मेघा
|
R_joshi
| |
| Thursday, July 19, 2007 - 4:35 am: |
| 
|
झाड, मनोगत, मीनु, श्यामली,मेघा फारच छान
|
नुसती एक अस्वस्थ घडी शोधणे हरवणे जशी पावसाची झडी... खर ते एकच... तुझ्या आठवणींची लडी..!!!
|
हरवलं ते शोधायच नाहिये हरवल्याच दुख्:ही नाहिये बस... त्या हरवण्याच्या हरवलेल्या क्षणात हरवुन जायचय..!!!
|
Aaftaab
| |
| Friday, July 20, 2007 - 8:00 am: |
| 
|
तू मिळालीस, मी बहरलो तू हरवलीस नि पुरता हरलो हरवून बसलो स्वत:लाच... फ़क्त हळहळण्यापुरता उरलो
|
तुझे हरवणे अन माझे शोधणे कोण कुणाला कुठे शोधते? कोण कुणात कुठे हरवते?
|
माझा पाऊस सतत बरसतो माझ्या मनाच्या अंगणात त्याला मात्र अजुनही नाही ठावं तो मला काय-काय देऊन जातो.....
|
सापडण्यासारखं बरंच काही आहे शोधायचंच ठरवलं तर..... पण प्रश्न पडतो शोधता शोधता पुन्हा काही हरवलं तर...!
|
R_joshi
| |
| Saturday, July 21, 2007 - 4:14 am: |
| 
|
वाह!!!! तुम्ही सगळे ही छान हरवलाय या 'हरवण्यामध्ये'. हरवलेले शोधण्याचा खेळच असतो वेगळा ऊन-पावसाच्या धारांचा जणु तो भाग सारा प्रिति
|
Jo_s
| |
| Saturday, July 21, 2007 - 5:18 am: |
| 
|
काय हरवले? काय शोधतो? नकळे तरीही शोधत असतो कळण्यास इतका उशीर होतो होते तोही हरवून बसतो हात रिता मग जातो हलवत बसतो तो वर हिशोब मांडत पुसतो मग तो का शोधीले तव पाशी जे होते वसले काय उपयोग समजून आता आयूष्य सरले शोध घेता सुधीर
|
Kkaliikaa
| |
| Saturday, July 21, 2007 - 11:48 am: |
| 
|
हरवलं काहीच नव्हतं तरिही नुसती शोधत होते तू आलास आणि,आणि न हरवलेलं बरंच काही देऊन गेलास
|
Kkaliikaa
| |
| Saturday, July 21, 2007 - 11:53 am: |
| 
|
मी हरवले स्वत:ला थोडं तुझ्यात, थोडं तुझ्या मनात व राहिलेली मी तुझ्याचसाठी अखेरपर्यंत
|
Kkaliikaa
| |
| Saturday, July 21, 2007 - 12:25 pm: |
| 
|
माझ्यासारखा तू नाही तुझ्यासारखी मी नाही तरिही हरवून जाते मी तुझ्यात आणि तू माझ्यात
|
Princess
| |
| Monday, July 23, 2007 - 6:01 am: |
| 
|
रुपेरी बट केसाची सावरु दे नव्याने वय विसरुन एकदा हरवु दे नव्याने
|