लिंबोणीची lionk देणार का कोणी?
|
Runi
| |
| Friday, July 20, 2007 - 4:21 pm: |
| 
|
आमच्या वर्गातल्या मुलाच्या भावाचे नाव होते 'चंपक'. आणि आमच्या कॉलनीतल्या एका बाईनी मुलगा हवा असतांना ३री पण मुलगीच झाली म्हणुन तिचे नाव 'निराशा' ठेवले होते.
|
Nalini
| |
| Friday, July 20, 2007 - 4:31 pm: |
| 
|
एकदम जबरदस्त. ह. ह. पु वा. तुझ्या लेखांना प्रतिक्रीया देताना शब्दांची फारच कमतरता जाणवते. >> 'घडवंची म्हणजे स्वयंपाकघरातलं फडताळ' दाद, आम्ही माठाखाली ठेवण्यासाठी तीन पायांची लोखंडी वस्तु असते तिला घडवंची म्हणतो तसेच बी म्हणतो त्याप्रमाणे आंथरूण पांघरुन रचून ठेवण्यासाठी लाकडी घडवंची वापरतात.
|
Storvi
| |
| Friday, July 20, 2007 - 5:58 pm: |
| 
|
माझ्या एका colleague ने मुलीचे नाव निया ठेवले निमिशा आणि आशिश चे combination म्हणून. गुजराथीच हे काय सांगायला हवं? आणि त्याने एन्ग्लिश मध्ये कसलासा फ़ोर्म भरून दुसर्या colleague कडे दिला. त्यात NAME: NIA असे लिहिले होते. तर हा दुसरा बंड्या त्याला म्हणतो.. ये क्या नाम की जगह Not Applicable किसलिये लिखा हैं? 
|
Ravisha
| |
| Friday, July 20, 2007 - 6:30 pm: |
| 
|
अरे ह्या विनोदी साहित्यावरील प्रतिक्रिया देखील धम्माल विनोदी आहेत हसून हसून गडाबडा लोळायची वेळ आली आहे... माझी इथली तिसरी प्रतिक्रिया -(मोह आवरत नाही ना) storvi - "२ दहलिया सायकल चालवत आहेत" आणि "अजूनही कालिया" आणि आता "निया" अज्जुका- प्रणय आणि प्रेता झकासराव-"अशीच कंडीशन" असेल तर नक्कीच द्या वाचायला कथेची प्रिंट,अश्या कंडीशन मध्ये हसणे चांगलेच,नाही का? manjud- साक्षी,पुरावा मिलिंदा-'माझ्या ताईच्या कामवाल्या बाईचे नाव 'विश्रांती' आहे' कांदापोहे-"टणत्कार" princess -"रशिया बाई" Tiu- "बादल आणि धडकन" कराडकर-"हवीशा" (रवीशाशी काऽऽही संबंध नाही ) Runi -"निराशा" बापरे,अजून एक नामावली झाली की इथे
|
Madhura
| |
| Friday, July 20, 2007 - 9:25 pm: |
| 
|
दाद, नेहमीप्रमाणेच छान. ROTFL. परिचितांकडुन ऐकलेला हा एक किस्सा नावांचा : वडिल धरणावर engineer म्हणुन काम करत. मुलांची नावे प्रकल्प आणि योजना. :-))
|
Daad
| |
| Saturday, July 21, 2007 - 12:02 am: |
| 
|
मला वाटतं प्रतिक्रिया जास्तं विनोदी आहेत. काही काही नावं ऐकून मीही सपाट! हं. कबूल. घडवंची म्हणजे फडताळ नाही! (लक्षात ठेवेन). ए, आणि मला माहीत नाहीये, देवनागरीत कथेचं 'नाव' कसं लिहायचं ते, खरच, आईशप्पथ कारण 'ओळख' टाईपल्यावर लक्षात आलं की कॅपिटल ' O ' वापरलाय. म्हणजे ते "ऑळख" झालं! thanks गं, आणि रे.... सगळ्यांचेच!
|
Ksmita
| |
| Saturday, July 21, 2007 - 1:04 am: |
| 
|
मस्तचं !!! खरं आहे कथा आणि प्रतिक्रिया दोन्ही वाचून अगदी हसता हसता पुरेवाट झाली !!!
|
Ajai
| |
| Saturday, July 21, 2007 - 5:43 am: |
| 
|
माझ्या जुन्या organization च्या thailand datacenter च्या head चे नाव IBM होते.
|
Ajjuka
| |
| Saturday, July 21, 2007 - 6:17 am: |
| 
|
रविशा, अगं खरंच ऐकलीयेत ही नावं गं!! आमच्या वर्गात एक रीता होती. बाईंसकट सगळ्यांना संभ्रम होता की रिकामी असं नाव का ठेवलंय तिचं? शाळा हुजुरपागा, तिचं आडनाव एकारांत, रहाणार बाजीराव रोडला आणि खूप वर्षापूर्वीची गोष्ट(८९ साली १० वी) त्यामुळे अजूनच विचित्र वाटायचे.
|
T_pritam
| |
| Saturday, July 21, 2007 - 7:11 am: |
| 
|
Daad: आमच्याकडे पण स्वयंपाक घरातील फडताळालच घडवंची म्हणतात... बाकी तुमचं लेखन एक्दुम उत्क्रुष्ट आहे... office मध्ये वाचताना मुर्खासरखा एकटाच हसत होतो मि... Ajjuka: ते नाव कदाचीत रीटा असेल...जसं 'रिटा भादुरी' आहे...
|
Ajjuka
| |
| Saturday, July 21, 2007 - 8:04 am: |
| 
|
नाही नाही ते रीता च होतं. अहो ४-१० वी एकाच वर्गात असल्यावर नाव नीट माहित नसेल असं होईल का?
|
T_pritam
| |
| Saturday, July 21, 2007 - 8:11 am: |
| 
|
Ajjuka, मी फक्त एक शक्यता बोलुन दाखवली होती... बाकी please मला 'अहो' म्हणू नका...एवढा मोठा नाहीये मी...आणी सवय पण नाहीये असं ऐकायची, विचित्र वाटतं... 
|
Sahi
| |
| Saturday, July 21, 2007 - 1:05 pm: |
| 
|
माझ्या माहितीतील गुज्जु नावे मुले आरव कोम्बडा आरवल्यासारख ज्वलित जळलेला? मुली रिआना उपगन्या म्हणजे काय? तितिक्शा
|
Dineshvs
| |
| Saturday, July 21, 2007 - 1:19 pm: |
| 
|
दाद, छान जमलाय लेख. काहि नाव ठेवत राहिलो तर रुळतील की पंकज, नितीन, अनिता रुळली तशी.
|
Farend
| |
| Saturday, July 21, 2007 - 4:39 pm: |
| 
|
ऋता चं (हिंदी लोक बोलतात तसे) कदाचित रिता झालं असेल, ऋचा चं रिचा होतं तसं. अर्थात ऋता ला ही काही अर्थ आहे का माहीत नाही.
|
माझ्या माहितीप्रमाणे ' ऋत' म्हणजे रास्त, उचित. अथर्वशीर्षात ' ऋतं वच्मि सत्यं वच्मि' असा उल्लेख येतो. तेव्हा सदैव उचित अश्या प्रक्रारचं वर्तन असणारी स्त्री म्हणजे ' ऋता'. ' तितीक्षा' हा तपाचरणाचा एक प्रकार आहे. यात आत्मक्लेश करून घेतात. ' आरव' म्हणजे उद्यान. पसायदानात ' चला कल्पतरूंचे आरव | चेतना चिंतामणींचे गाव || ' असा उल्लेख आहे. चुभूद्याघ्या.
|
Tiu
| |
| Sunday, July 22, 2007 - 6:02 pm: |
| 
|
माझ्या माहीतीतल्या एकाचं नाव...प्रिन्स शिंदे...
|
Ksmita
| |
| Sunday, July 22, 2007 - 6:28 pm: |
| 
|
माझ्या एका ओळखितल्या मुलीचे नाव " सिन्नी " . मला चटकन सिन्नी पंखा च आठवला तर म्हणे हो तेव्हा हा पंखा नविनच आला होता बाजारात म्हणुन ठेवले नाव .
|
Mansmi18
| |
| Monday, July 23, 2007 - 12:05 am: |
| 
|
दाद, तुम्ही वाइट वाटुन घेउ नका पण इथे आलेल्या काही प्रतिक्रियांव्यतिरिक्त मला काही विनोदी वाटले नाही. तुमच्या या आधीची पण एक विनोदी कथा (नाव आठवत नाही पण ती नाटक बसवण्याबाबतीत होती) ती वाचुनही मला एकदा सुद्धा हसु आले नाही. मी कथा परत परत वाचली की कदाचित मी नीट वाचली नसेल किंवा मला कळली नसेल म्हणुन पण तरिही नाही आले हसु. it was just okay माझ्यासाठी. तुमचे इतर साहित्य मला आवडले आहे पण विनोदी मला तितकेसे आवडले नाही.
|