Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 19, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » भाद्रपद » कथा कादंबरी » रेहान... » Archive through July 19, 2007 « Previous Next »

Nandini2911
Thursday, July 12, 2007 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खालच्या बाजारातून निघून सरस्वती बस स्टॅंडकडे निघाली होती. एक तर तिला आज उशीर झाला होता. त्यात जाधवसाहेबाना तिचं काम विषेश पसंद नव्हतं. म्हणजे ती नीट काम करत नव्हती असं नव्हे, पण एकूणच त्याना ती आवडत नव्हती असं तिला वाटायचं.

तेची ती तंद्रीत चालत असतानाच समोरुन रेहान बाईकवरून येताना दिसला. तिला पाहिल्याबरोबर त्याने गाडी तिच्या दिशेने घातली.
"अजीब लडकी हो.. कितना ढुंढा मैने तुम्हे. गायब का होतेस?" तो म्हणाला.
"वो मामुके पास मी तुझ्या जॉबसाठी फ़िल्डंग लावली होती पण तू आलीअच नाहीस"

आसपासचे सर्वजण त्याच्याकडे बघायला लागले. एक तर रत्नागिरी तसं मोठं गाव नाही आणि त्यात अशा गोष्टी तर फ़ार लवकरच पसरतात.
"रेहान.. प्लीज.. आपण इथे नको बोलू य...मी उद्या भेटते तुला.."
"लास्ट टाईम पण हेच बोलून तू मला रस्त्यावर सोडुन गेली. Why you are running away from me? "
"रेहान, इथे सगळे बघतायत आपल्याकडे मी उद्या तुला आमराईत भेटते, नाहीतर आज रात्री जेवण झाल्यावर येते. पण आता नाही बोलत," ती म्हणाली.
"चल, बस," तो म्हणाला.
"रेहान, एकदा सांगितलं ना मी इथे बोलणार नाही." ती दबक्या आवाजात म्हणाली.
"तू बाईकवर बसते कि मी सर्वाना ओरडून सांगू तू माझी आयटेम आहे म्हणून.. " तो शांतपणे म्हणाला.
"रेहान प्लीज " एव्हाना बहुतेक जण त्याच्याकडे बघायला लागले होतेच.
"बस," त्याने बाईक स्टार्ट केली.
"माझं ऐकून घे प्लीज.." ती म्हणाली. त्याच्या निळ्या डोळ्यातली जरब तिला जाणवली.
ती बाईकवर बसली.
आणि जवळ जवळ अर्द्ध्या रत्नागिरीकरानी त्या दोघाना बाईकवरून जाताना पाहिलं.

रेहानने बाईक आश्रमाकडे न नेता सरळ कॉलेजच्या इथून घातली आणि भाट्याच्या सुनसान रस्त्याला घातली.
"आपण कुठे चालओय?" सरस्वतीने विचारलं. वार्यावर तिचा आवाज विरून गेला. भाट्याचा रस्ता संपून सुरूबन पाठी गेलं तरी रेहान थांबायचं नाव घेत नव्हता. सुरुबनानंतरचं समुद्र सुरू झाला. वैतागून सरस्वतीने रेहानच्या पाठीत एक धपाटा घातला.

बेफ़ाम चाललेल्या बाईकवरून पाठी वळून तो हसला.
"और बस दो कदम..."
दो कदम? कि किलोमीटर सरस्वतीला प्रश्न पडला. शेवटी एका चढावर त्याने बाईक थांबवली. दूरवर कुणी चिटपाखरू सुद्धा नव्हतं.
"देखो.." तो म्हणाला. समुद्राकदे बोट दाखवत.
सरस्वती क्षणभर काहीच बोलली नाही.

सुर्यास्त होत आला होता. त्याचं एक विलक्षण प्रतिबिंब समुद्रावर पडलें होतं. त्याच्याही अलीकडे रत्नागिरी हिरवीगार दिसत होती.
"कुठल्याच शब्दात वर्णन करता येणार नाही... सुंदर.." ती म्हणाली. समुद्रावरून येणारा वारा सहज तोंडावर बसत होता.
"कभी सोचा था रत्नागिरी भी इतना खुबसूरत है?" रेहान म्हणाला.
"कधीच नाही"
"म्हणून तर मी तुला इथे आणलय.. "
"थॅंक्स.," ती म्हणाली. "खूप छान आहे."
"सरस्वती, मुझसे दूर क्युं भाग रही हो?" त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारलं.
"काय?" ती गदबडली.
"मी खूप दिवसापासून पाहतोय. You are trying to avoid me. Why? "
"रेहान, असं काहीही नाही. मला हल्ली दिवसभर वेळ नसतो. तू इथे आहे हे मला माहितसुद्धा नव्हतं."

"तुला खोटं बोलता येत नाही. बोलू नकोस." तो समुद्राकडे बघत म्हणाला.
"रेहान, मला तुझ्याशी कसलीही मैत्री ठेवायची नाही." ती म्हणाली.
"का?"
"काहीही कारण असेल त्याच्याशी तुला काय देणं घेणं.."
"सरस्वती, Stop doing it. You will ruin yourself.. " तो म्हणाला.
"म्हणजे?"
"रिश्तोंसे भाग रही हो. मुझसे नही. अपने आप से भाग रही हो."
"रेहान, असं नाही. मी तुला आताच कुठे भेतली आहे. आणि तू इतक्यात नात्याच्या गोष्टी पण बोलायला लागलास, माझ्याजवळ या असल्या फ़ालतूपणासाठी वेळ नाही." सरस्वती उसळून म्हणाली.
"म्हन्जे आपलं काहीच नातं नाही असं तुला म्हणायचे आहे?"

"हो. कारण आपली फ़क्त ओळख आहे. बाकी काहीही नाही."

"आणि तू ओळखीच्या प्रत्येक माणसाला सांगतेस की तू घर का सोडलस? तुझ्या आईने काय केलं.. है ना?" त्याच्या स्वरात आतापर्यंत कधीच न जाणवलेला कडवेपणा होता.
"रेहान, मी तुला माझा भूतकाळ सांगितला पण याचा अर्थ असा नव्हे की आपण..."
"एक मिनिट.. मी इथे वाद घालायला आलो नाही. Neither I am intersted in your past मला फ़क्त तुला जेच सांगायचं आहे की तू आणि मी.. we are related ,"
"रेहान, तू काय बोलतो तुला समजतं का रे?" ती म्हणाली. हताशपणे.
"सरस्वती, तुझं आणि माझा रिश्ता असा नाव देऊन सांगता येणार नाही. आपण फ़्रेंड्स आहोत हे खरं. but we are not romantically linked मला पण माहीत आहे ते. आणि तुझी सगळ्यात मोठी भिती तीच आहे ना? "

"रेहान, मी स्वत्:ला त्या ठिकाणी नाही बघू शकत जिथे माझी आई आहे. I cant do that " सरस्वती शांतपणे म्हणाली.

त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला.
" I am not asking you do that , पर रिश्तोंसे डरो मत. तु आतल्या आत स्वत्:मधे हरवत चालली आहेस. बाहेर बघायला तुला वेळ नाही. आपल्या दुनियामधे हरवू नको. Look at the world, Its so beautiful. Look at people.. "
"रेहान, तुला माहीत आहे मी कुणावर विश्वास ठेवू शकत नाही.."
"का नाही? सरस्वती.. "
"रेहान, माझी आई मला सोडून गेली, जगातला सगळ्यात मजबूत मायेचा धागा तोडून गेली. माझा कसा कुणावर विश्वास बसेल. "
"सरस्वती, तुझी आई कुठेतरी जिवंत आहे, केव्हातरी ती तुला न्यायला पण आली होती. पण माझी तर आईच नाही. मी काय करू?"
"रेहान, तुला वडील आहेत. मामा मामी काका काकी सगळे आहेत. माझं या अख्ख्या जगात कुणीही नाही."
"मी सुद्धा?"
"रेहान, तू मित्र आहेस. पण तरीही.."

"तेच तर मी तुला सांगतोय. forget your past मीच एकटा मित्र का? बाकी कुणी का नाही. Stop sulking yourself "
"बोलणं सोपं आहे. करणं कठीण आहे. "
"काही कठीण नाही. If you believe in yourself .
"माझा माझ्यावर विश्वास आहे म्हणूनच मी आज इथे आहे." सरस्वती म्हणाली.
"अब देखो... " त्याने मधेच आकाशाकडे बोट दाखवलं.
सुर्य केव्हाच मावळला होता. राखाडी अंधार पसरत चालला होता. सगळीकडे काजळी पसरल्यासारखा,
"थोड्या वेळापूर्वी इथे किती रंग होते, आता फ़क्त काळा.. " रेहान म्हणाला.
"म्हणजे?" त्याच्या बदललेला विषय तिच्या ध्यानात आला नाही.

"दुनिया बदलती है. वक्त बदलता है. रिश्ते बदलते है, पर्त ये नजारा वैसा ही है, अगर कुछ बदला है तो अपना नजरिया attitude . सगळं आहे तसंच आहे फ़क्त वेगळ्या नजरेने बघायला शीक."
"या सगळ्याचा तुझ्या आणि माझ्या नात्याशी काय संब.ध?"
"काहीही नाही. आपलं नातं आहे तेच आहे. आणि राहील. सरस्वती. एक जिग सॉ पझल आहे. आपण त्याचे तुकडे आहोत. एकमेकापासुन वेगळे केले तर फ़क्त तुकडे आणि एकत्र जोडले तर मीनिंग असेल."
"आपण कधीच एकत्र असणार नाही.."
तो हसला. "हे ठरवणारी तु कोण? तकदीर से जुडे है हम दोनो. चाहकर भी अलग हो ना पाओगी."


रात्र चढत होती. सरस्वतीच्या मनात विचाराचे कल्लोळ उठले होते.
रेहान मात्र नेहमीच्या सवयीप्रमाणे तारे बघत होता.







Ardeshmukh
Thursday, July 12, 2007 - 6:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

a
nandini
ajunahi grip ghetali nahi story ne
one more post is required
post it as early as possible !!

Zpratibha
Friday, July 13, 2007 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनि उत्सुकता तर आहेच ग. पण स्वत्:ची काळजी घे आधी आणि जमेल तसच लिहि.

Manjud
Friday, July 13, 2007 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदू, घाईघाईत लिहू नकोस. आत्ता कंटाळवाणं वाटलं तरी कथानक आता वेग पकडतंय. आणि ज S..S रा शुद्धलेखनाकडे लक्ष दे. वाचताना रसभंग होतो.

Itgirl
Friday, July 13, 2007 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, मस्त आहे हे नवीन लिखाण!! आवडल!

Bee
Friday, July 13, 2007 - 8:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदीनी संपली का कथा.. तसेच वाटते आहे. खूप सुंदर लिहितेस..

Arati7
Friday, July 13, 2007 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटत कि अजुन साराचा परत उल्लेख याय्चा आहे अजुन...सो कथा अजुन क्रमश्: आहे....... pan story line is really gud....i m really waiting for next part....

Ana_meera
Friday, July 13, 2007 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

yes, अजुन बराच लांब पल्ला गाठायचा आहे असे वाटते सरस्वतीला सारा बनण्यासाठी. eagerly waiting nandini, please do write whenever time permits and get well soon

Savyasachi
Friday, July 13, 2007 - 2:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऑं ! कथा संपली ???? :-) कमालच झाली

Kayrao
Friday, July 13, 2007 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान चालू आहे कथा , पण सुरवाति चा वेग मंदावला सारखा वाटतो , बहुदा तेच तेच रिपिट होताय.



Ladaki
Saturday, July 14, 2007 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदीनी संपली का कथा.. तसेच वाटते आहे.>>>

बी कुणाची कथा??? तुझ्या कथेला पुर्णविराम दिलास का???
अरे मग तुझी कथा संपल्याचे तुझ्या कथेखाली लिही ना... मॉड्सनी तो बीबी अजुनही बंद नाही केलाय रे....


Nandini write little faster and dont forget to write क्रमशः

Neelu_n
Saturday, July 14, 2007 - 6:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाडकी:-) बाकीच्याचा अजुन तसा गैरसमज नाही झालाय पण. तरीही तु म्हणते तसे क्रमश्: लिहले तर बरं होइल.
नंदीनी वाचतेय कथा.. पटापट लिह बघु. मी सगळे पहिले भाग विसरण्यापुर्वी.. :-)


Chyayla
Sunday, July 15, 2007 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक जिग सॉ पझल आहे. आपण त्याचे तुकडे आहोत. एकमेकापासुन वेगळे केले तर फ़क्त तुकडे आणि एकत्र जोडले तर मीनिंग असेल

क्या बात है..

Manogat
Wednesday, July 18, 2007 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदु,
we are desperately waiting for next posting... Get well soon :-)


Itgirl
Wednesday, July 18, 2007 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, आशा आहे की तुला आता बर वाटत असेल आणि खूप कामात पण busy नसशील :-)
रेहान च्या पुढच्या भागांची खूप वाट बघत आहे मी, आणि मीच काय सगळेच बघत आहेत... I am sure
कधी चालू करणार लिहायला? :-)



Ana_meera
Thursday, July 19, 2007 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेहान आणि साराला विसरता येत नाहीये लवकर. नंदिनी hope you are back to work now, eagerly waiting for next episode dear

Nandini2911
Thursday, July 19, 2007 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"काय बात आहे? आज एकदम खुश दिसताय.." जाधव ऑफ़िसमधे येतायेताच म्हणाले.
सरस्वती हसली. सकाळपासून "आज छान दिसतेय" हे वाक्य कितीतरीवेळा तिने ऐकलं होतं. हॉस्पिटलमधे लेले आजी सुद्धा म्हणाल्या.
"नजर लागेल हो पोरी तुला"
पांढरा सलवार कमीज, मोकळे सोडलेले लांब केस आणि डोळ्यात घातलेलं काजळ. जणू कालच्या रात्रीची आठवण.

"काय वैताग आहे! काल जशी दिसतेय तशीच आज पण दिसतेय" ती नाजुला बसणार्‍या प्राचीला म्हणाली.
प्रूफ़ रीडींग करता करता प्राचीने तिच्याकडे पाहिलं.
"खास काही कारण आहे का?"
"डोंबल कारण. सकाळी केस ओले होते म्हणून मोकळे सोडले. बाकी काही नाही. पण आज जाधव जरा नीट दिसतोय, त्याला आज विचारेन."

"परत? तो नाही म्हणेल माहित आहे ना?"

"नाही, आज तो हो म्हणेल. प्राची मी ही कारकूनगिरी करून वैतागली आहे. सकाळी काहीच बातम्या नसतात. खरी सुरुवात तर चारनंतर होते आणि मग काम चालू होतं. आणि मी साडेपाचला घरी जाते. काय फ़ायदा? त्याला माझं टाईमिंग बदलावंच लागेल."

सरस्वतीने पर्समधून चार पाच कागद काढले.
"हे काय आहे?"
"लाच देतेय जाधवला" आणि ती हसली.

खरंतर जाधवच्या केबिनमधे जाताना ती जरा घाबरायची. तिला आता कुठल्याही पुरुषाची नजर कळत होती. पण तिला फ़िकीर नव्हती. जे वाईट घडायचं होतं ते घडून गेलं होतं. आता त्याहून जास्त काय होणार होतं. या लांडग्याचा सामना करण्याची हिंमत तिच्यात होती.

"सर?"
जाधवानी मान वर करुन पाहिलं.
"बोला, काय सेवा करू आपली?" जाधव म्हणाला. तिला वरपासून खालपर्यन्त न्याहाळत.
"सर, हा एक लेख आहे. मी लिहीलाय. ते काही फ़िल्मस्टार्स वाघा बॉर्डरला गेले होते ना..."
जाधवानी कागद वाचायला घेतले. पहिला परिच्छेद वाचून झाल्यावर त्यानी मान वर करून पाहिलं.
"हे तू लिहीलंस?" आवाजात अविश्वास होता.
"हो... आज सकाळी"
"ठीक आहे. साठेला सांग एडिट मारायला. पान चारवर घेऊ."
"थॅंक यु सर" ती म्हणाली. अजिबात न हसता.
"अजून काही?"
"सर ते माझं टाईमिंग...."
जाधवानी डोळ्यावरचा चष्मा काढला.
"सरस्वती, कितीवेळा सांगितलं, मी मुलीना रात्री उशिरापर्यन्त थांबवत नाही. त्यात तू तर अजून लहान आहेस."
"पण सर, मला या गावातल्या भानगडीमधे रस नाही, शिव्वाय नॅशनल आणि इंटर नॅशनल बातम्या उशीर सुरू होतात. कुणी भाषानंतर करायला नाही म्हणून आपल्या बातम्या मिस होतात. प्लीज सर."
"थीक आहे. मी साठेशी बोलतो. त्याला मदत होत असेल तरच... पण रात्री आठ पर्यन्तच"
सरस्वती हसली.
"धन्यवाद" ती म्हणाली.

खरंच आज तिला खूप वेगळं वाटत होतं. आज संध्याकाळी रेहान तिला न्यायला येणार होता.


Radha_t
Thursday, July 19, 2007 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा झक्कास चाललय फ़क्त वीर सारा हे सगळ विसरायला होतय आता पर्यंत दोनदा सुरवातिपासून वाचाव लागल, ए नंदिनी सगळ type करुन ठेव आणि एकदाच post कर ना ग वाचायला मजा येईल.
त्याच काय आहे कितिही नाही म्हटल तरी इथे येऊन नवीन post बघण्याचा मोह आवरत नाही


Itgirl
Thursday, July 19, 2007 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, नवीन लिहिलस!! :-) पण एवढच? :-(

Nandini2911
Thursday, July 19, 2007 - 9:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"काय झालं? फ़ार उदास दिसतेस?" रेहान तिच्या चेहर्‍याकडे एकटक पाहत म्हणाला.
"रेहान, आज सर्व मला म्हणाले कि मी खुश दिसतेय. तुलाच कशी काय उदास दिसते रे?"
रेहान काहीच बोलला नाही.
"मी सांगू?" ती म्हणाली. "तुला बघितलं ना की माझा चेहरा कोमेजतो. तू नसलास ना की मी खूप खुश असते" तो गालातल्या गालात हसत होता.
"धीरे से बोलो. कोई सच मान लेगा."
"कोण काय ऐकतय आणि काय करतय याची मला काळजी नाही."
"मला आहे. कारण जिथे आपण सध्या आहोत तिथून माझे घर पाच मिनिटावर आहे. आणि या आंब्याच्या बागेत माझ्या घरचे केव्हापण येतील"
"मला घाबरवतोस?"
"तू घाबरली का?"
"माझा चेहरा बघून सांग ना... म्हणे मी उदास दिसते.. हट" ती लटक्या रागाने म्हणाली.
आता मात्र तो हसला.
"हसण्यासारखं काय आहे?"
"ए सरस्वती.. तुला घाबरवू?"
ती काहीच बोलली नाही.
"परवा तुझा रीझल्ट आहे ना?" तो अगदी हळू आवाजात म्हणाला.
"अय्या हो... " सरस्वती जवळ जवळ ओरडली. "बरी आठवण केलीस रे. उद्याच अठरा हाताच्या गणपतीला जाऊन येते, आणि जमलंच तर विठ्ठलाला सुद्धा... जाम भिती वाटतेय रे. डीस्टिंक्शन मिळेल ना रे?"
"मला काय माहीत? मी तर थर्ड क्लासच्या वर कधी गेलो नाही. दोन वर्षं झाली HSC तर सोडवतोय. But dont worry तुम्हे जो चाहियेगा मिल जायेगा"
"खरंच?"
"अगदी खरं.... आणि आता जाधवला तुझं टाईमिंग परत बदलायला लागेल. उसे कह दो, Morning college afternoon duty "
"तुला कसं माहित माझे टाईमिंग बदललेलं?"
रेहान दिलखुलास हसला.
"तू दिवसभरात काय करतेस आणि कुठे असतेस. याची सगळी माहिती असते माझ्याकडे. उतनी रत्नागिरी तो मुझे पहचानती है... मुझे सब पता चलता है. चाहे तुम बताओ या ना बताओ"





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators