Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 20, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आषाढ » विनोदी साहित्य » नावात काय्ये? » Archive through July 20, 2007 « Previous Next »

Storvi
Thursday, July 19, 2007 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान! लिंबोणीचे "नावात काय" ची आठवण झाली

रविशा BTW लेक अजुनही धाकटीला कालिया म्हणते असे मला काल लक्षात आले


Mepunekar
Thursday, July 19, 2007 - 10:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह. ह. पु. वा.,
दाद, तुसी ग्रेट हो.
शिल्पा,पण मग त्या कालिया च खर नाव काय आहे? :-)


Daad
Thursday, July 19, 2007 - 10:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला बरीच मेल्स आलीत विचारणारी. आता मात्रं खरं सांगायलाच हवं.
माझ्या नवर्‍याचं नाव खरच नितीन, मुलाचंही खरच केदार.
केदार खरंच (थोडा) अवाढव्यच दिसायचा. त्याची लोकांनी ठेवलेली नावं खरी. नवरा बरेच दिवस त्याला दाजिबा म्हणत होता.
उरलेला नावाचा गोंधळ मात्रं माझ्या डोक्यातून आलेला (ते 'बरीक बरच तिरकंच' चालतं)
अनीलभाई तुम्हाला परीश म्हणायचंय का? ;)


Ajjuka
Friday, July 20, 2007 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त! मजा आली..
हल्ली खरच काहीही नावं असतात... दोन महान नावं मी ऐकलेली...
प्रणय.. pervert आईवडील असंच वाटतं मला.. आता काय करून मूल जन्माला घातलंत हे त्याच्या नावात कशाला असायला हवं!
अजून एक नुकतंच ऐकलेलं नाव. प्रेता... मला हा धक्का अजून पचवता आलेला नाहीये. काय विचार करून हे नाव ठेवलं असेल? इतकं अभद्र नाव आपल्या मुलीला देताना काही वाटलं कसं नाही?


Bee
Friday, July 20, 2007 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, वाचून मजा आली.

'घडवंची' म्हणजे एक लाकडी वस्तू जिच्यावर आपण गाद्या दुलया चादरी उशा वगैरे ठेवतो. म्हणजे अंथरून पांघरुन घड्या घालून ठेवायची लाकडी वस्तू.


Sanghamitra
Friday, July 20, 2007 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद तू तो विनोदी साहित्यकी दादा है रे! मस्त लिहीलेय एकदम.
पण तुला शीर्षक देवनागरीत लिहायचा एवढा कट्टाळा का गं बाई? (नंदिनीची तीट कल्पना फार आवडलीय म्हणून वापरून टाकली.) :-)


Zakasrao
Friday, July 20, 2007 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद मी या आधीच प्रतिक्र्या दिली आहे पण अजुन काही शब्द आठवले ते लिहितोय.
लाफ़्टर चॅलेंज मधे सिद्धु जसे म्हणतो ना तसच
"तु तो छा गयी हे गुलमोहर पे" :-)
अनिल भाइ मोदक तुम्हाला.
दाद तुझ्या ह्या कथेची प्रिंट घेवुन मी बायकोला वाचायला देणार आहे आजच. सध्या आमच्याकडे अशीच कंडिशन आहे. :-)


Manjud
Friday, July 20, 2007 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका, भन्नाट लिहिलं आहेस....... बॉसने तंबी दिली होति office hours इंटरनेट सर्फ़ करायचे नाही. पण ही कथा पूर्ण वाचल्याशिवाय राहवले नाहि.

चंची, अडकित्ता, थेंब, ठिपका, टीपकागद, खोडरब्बर, कर्कटक....
हसून हसून पोट दुखायला लागले. दुर्योधन, हिरोशिमा, नागासाकी जबरी. .

खोडरब्बर..... माझ्या सा.बां. साठी योग्य शब्द सुचवलास.

झकासराव.......... सध्या तुमच्याकडे अशीच परिस्थिती आहे म्हणजे नेमके काय म्हणयचे आहे तुम्हाला? (नवराही कोणत्याही तक्रारीला आता फक्तं 'हू' च म्हणतो. त्याची नव्याची नवलाई पाचव्यातच संपलीये.... नवव्यापर्यंत माझ्याहीपेक्षा टेकीला आलाय. ) असे नाही ना म्हणायचे तुम्हाला. बाकी ही सगळी नावं लक्शात ठेवा.

माझ्या एका मैत्रिणीने मुलीचे नाव "साक्षी" ठेवल्यावर तीचे सासरे म्हणाले होते," आता दुसरा मुलगा झाला तर त्याचे नाव काय "पुरावा" ठेवणार का?"

बाकी मला मुलगी झाली तेव्हा कोणीतरी "वांती" सुचवलं होतं.

शलाका, ही कथा एकदम आवडेश...


Vaibhav_joshi
Friday, July 20, 2007 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त गं ... Full timepass मज़ा आ गया

Milya
Friday, July 20, 2007 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद : ... उच्च गं

मलाही लिंबोणीचा लेख आठवला... आणि त्यावेळी मी लिहिलेला मेसेज पण :-)

'माझ्या ताईच्या कामवाल्या बाईचे नाव 'विश्रांती' आहे' :-)

Lopamudraa
Friday, July 20, 2007 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त ग..छान लिहिलेस..,
माझ्या एका मैत्रिणीच्या भावाचे नाव अमेरिका आहे...



Mi_anu
Friday, July 20, 2007 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरदस्त लिहीले आहे.'स्पर्धा' नंतर हे लिखाण पण खूप आवडले.

Kandapohe
Friday, July 20, 2007 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरी!! धमाल आली अर्धे वाचून सुद्धा. आधी प्रतिक्रिया द्यायला आलो.

प्रत्यंचा! मग मुलाचं नाव काय? 'भाता'? >>>
माझ्या एका मित्राच्या पुतणीचे नाव आहे. तो गमतीने भावाला मुलगा झाल्यावर आता याचे नाव काय 'टणत्कार' का? असे विचारत असे.

Rr38
Friday, July 20, 2007 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतिशय मनोरन्जक कथा! मी एका दमात वाचल्याने जास्त छान वाटलि. बाकी तुमच्या कथा नेहेमीच सुरेख असतात.
अज्जुका, तुम्ही ऐकलेल्या नावाच्या तोडीचे हे दुसरे नाव- रुदाली. मला वाटले की मी चुकून रुपाली ऐवजी रुदाली ऐकले तेव्हा मला स्पष्टीकरण मिळाले की डिम्पलच्या मूव्हिवरुन ठेवले आहे. हेसुद्धा नाव गुजराथीच हे सांगणे न लगे!


Princess
Friday, July 20, 2007 - 10:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, जबरदस्त कथा.
सन्मी, :-) अगदी अगदी हेच म्हणणार होते मी. शीर्षक मराठीत का नाही लिहित ग? जाउ दे म्हणा, तसेही नावात काय्ये :D ?
अनेक विचित्र नावे आठवली मला पण. धुळ्याला एक लेक्चरर आहेत, त्यांचे नाव रशिया बाई :-)
अज्जुका :-) आमच्या वर्गात दोन सख्खे भाउ- एक प्रणय आणि दुसरा प्रीतम. कधीही त्यांचे नाव घेताना(म्हणजे बोलताना-दुसरा अर्थ नाही) प्रचंड लाज वाटायची.


Princess
Friday, July 20, 2007 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबोणीच्या लेखाची लिंक देणार का कोणी?

Marhatmoli
Friday, July 20, 2007 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा मस्तच, मि office मध्ये वाचला हा लेख काल आणि मग (कोणि बघु नये म्हणुन) lab मध्ये जावुन हसत होते. सहिच लिहलायस दाद. खरोखर काय पण एकेक नाव ऐकायला मिळतात हल्लि, मी ऐकलेलि दोन मजेदार नाव इतक्यातलि अपेक्षा आणि मोक्षदा!

Tiu
Friday, July 20, 2007 - 2:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त्तच...मजा आलि खुप वाचताना...पुण्याला असताना आम्हि ज्या हॉटेल मधे चहा प्यायला जायचो तिथल्या वैटर्स चि नावे 'बादल' आणि 'धड्कन' अशी होति...

Tiu
Friday, July 20, 2007 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

aila...hey marathit lihina mhanje layach avghad kaam aahe rao! varcha post lihayla 15 minute lagle mala...:-(

Karadkar
Friday, July 20, 2007 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल office मधे वाचले आणि एकटीच खो खो करत होते cubemates माझ्याकडे खुळ लागलेय की काय असे पहात होते
सही है भाई


एका लहान मुलीचे नाव - हविशा - आईचे नाव विशाखा आणि वडीलांचे हरीश .. काय रे देवा ऐकल्यावर कपाळाला हात मारला होता.

आमच्या होस्टेलमधल्या पोर्या चे नाव - जगनु :D




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators