प्रिय मित्र मिल्यास ... वाढदिवसानिमित्त सप्रेम भेट ओलीसुकी कधी भुरभुर पाऊस झेललाय देहावर ? इतक्या चोरपावलांनी येतो की आलेला कळतच नाही ... अगदी अंगाशी येईपर्यंत ... पण तोपर्यंत मिटलेल्या डोळ्यांनी ... ओलेत्या ओठांनी पावती देऊन टाकलेली असते सुखावल्याची .... आणि तरीही तो रिमझिमत राहतो ... साळसूदासारखाच जोवर अनावर होत नाही आपल्या भिजायच्या निर्णयामागची ओलीसुकी ................ ................ चिंब ओल्या निर्णयाला उन्हं देताना कळतं कधी कोसळ ..... कधी भुरभुर ! आपण आता सराईत झालो आहोत ओलीसुकी करण्यात ....
|
Milya
| |
| Tuesday, July 17, 2007 - 5:15 am: |
| 
|
वा वा काय सुंदर भेट आहे!!! वैभवा खूप खूप आभार रे!!!!
|
Zaad
| |
| Tuesday, July 17, 2007 - 6:16 am: |
| 
|
चिंब ओल्या निर्णयाला उन्हं देताना कळतं प्रचंड काव्य आहे या ओळीत....खासच!! कविता खूपच सुंदर!!!
|
Sarang23
| |
| Tuesday, July 17, 2007 - 7:00 am: |
| 
|
मित्र मिल्या, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!!! वैभवा... खूप सुंदर भेट... एक कविताच भेट द्यायची म्हणजे...
|
Daad
| |
| Tuesday, July 17, 2007 - 7:30 am: |
| 
|
ओय होय! वैभवा ओलीसुकी झन्नाट आहे! भुरभुर पाऊस्- नुसते शब्दच कसे! मिल्या, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! (कस्सा लक्की आहेस, बाबा! एक अख्खी कविता भेट! मज्जा आहे एकाची, बुवा)
|
Psg
| |
| Tuesday, July 17, 2007 - 7:55 am: |
| 
|
कविता समजल्यावर नि:शब्द झाले! सुरेख वैभव!
|
Jayavi
| |
| Tuesday, July 17, 2007 - 9:10 am: |
| 
|
वैभव..............अप्रतिम!! प्रचंड आवडली ! मिल्या.....किस्मतवाले हो 
|
वैभव, सुंदर!
|
Paragkan
| |
| Tuesday, July 17, 2007 - 5:57 pm: |
| 
|
kya baat hai !!
|
Chinnu
| |
| Tuesday, July 17, 2007 - 9:10 pm: |
| 
|
वैभवा, सुंदर! मलाही ओलीसुकी आवडले.
|
Bairagee
| |
| Wednesday, July 18, 2007 - 9:32 am: |
| 
|
वैभव, 'ओलीसुकी' सुंदर आहे.
|
Jo_s
| |
| Wednesday, July 18, 2007 - 11:23 am: |
| 
|
वैभव, छानच आहे भुरभुर.....
|
Chinnu
| |
| Wednesday, July 18, 2007 - 1:41 pm: |
| 
|
झाडा, पखाल वरील विश्लेषण पाहिले. छान वाटले वाचून. अर्थ स्पष्ट केल्याबद्दल खुप धन्यवाद. या वयात आध्यात्मिक लिहितोस? तेही इतके सुंदर! छान. मिल्या सॉरी हं, गुरुजींची कविता एवढी सुंदर आहे आणि त्या नादात विसरूनच गेले. वाढदिसाच्या उशिराने भरभरून शुभेच्छा!
|
Sarang23
| |
| Wednesday, July 18, 2007 - 1:55 pm: |
| 
|
चरा झाडांवर फुले आणि पानांवर पाणी हिर्व्या हिर्व्या रानामध्ये पाखरांची गाणी पाण्यासाठी ओढ्याकाठी थकलेल्या गाई सोन्याहून पिवळते गर्द वनराई ओल्या ओल्या उताराला लाल लाल कडा वाटेवर पावलांच्या प्राजक्ताचा सडा अशा वेळी पहाटेचा खळाळता झरा चालताना भांबावून तोल जातो जरा भेटीसाठी वेडावून सैरा वैरा धावे एवढे ना कुणासाठी कुणी वेडे व्हावे सखयेच्या अंगोपांगी उडवितो फेस रुबाबात असे जसे कुरळेसे केस परी अशा उधाणाला गालबोट लागे पाडतात ओरखडे वियोगाचे धागे मिलनाला आतुरल्या वेड्या चालीमुळे दगडात पडलेला चरा हळहळे सारंग
|
वा सांरंग काय सुरेख वर्णन केलय.. , खुप आवडली कविता...!!!! एकसे बढकर एक कडवं आहे.(चरा शब्दा ऐवजी दुसरा शब्द हवा होता का?.) मिल्या वाढदिवसाच्या शुभच्छा..!!! पाउस सुरेख आहे वैभव.. मस्त.
|
सारंग, मस्त! लय छान आहे. सगळ्याच उत्कट भेटींना असणार्या वियोगाच्या चिरशापाची जाणीव छान उतरली आहे. ते ' फेस - केस' खटकलं मात्र. तसंच पहाटे गायी थकलेल्या कश्या? वर्णनात घोटाळा वाटतो.
|
Meghdhara
| |
| Wednesday, July 18, 2007 - 4:15 pm: |
| 
|
मिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. वैभव! दाद झन्नाट..! काय शब्द वापरलायस. व्वा सारंग चरा हळहळे! काय कल्पना आहे! त्या झर्याचा नाद आलाय कवितेला. फक्त सखयेच्या आंगोपांगी नीट पोचले नाही. मेघा
|
Mankya
| |
| Thursday, July 19, 2007 - 1:55 am: |
| 
|
सारंगा .. मस्तच रे मित्रा ! मस्त लय आहे ! माणिक !
|
Daad
| |
| Thursday, July 19, 2007 - 3:01 am: |
| 
|
सारंगा, स्वातीला मोदक. लय मात्रं आवडेश
|
Milya
| |
| Thursday, July 19, 2007 - 5:33 am: |
| 
|
सारंग : आवडेश रे.. घाटातली वाट ची आठवण झाली पण माझे पण स्वातीला अनुने बनवलेले मोदक आणि मला शुभेच्छा दिल्याबद्दल सगळ्यांनाच धन्यवाद... खरे तर तुम्ही मला धन्यवाद द्यायला पाहिजेत.. माझ्या वाढ्दिवसामुळे तुम्हाला अशी सुंदर कविता वाचायला मिळाली 
|