|
Chinnu
| |
| Wednesday, July 18, 2007 - 5:22 pm: |
| 
|
हो तो 'आडवरले' शब्द एकदम आवडला ग शलाका.
|
Manuswini
| |
| Wednesday, July 18, 2007 - 5:51 pm: |
| 
|
मस्त आहे. मी तर एकांची नावं अशी एकलेली आहेत, प्रगती, उन्नती वगैरे. आम्ही बहिणी म्हणायचो आता जर ह्यांना तिसरी मुलगी झाली तर नाव 'अधोगती' सुद्धा ठेवतील. नी त्यानंतर मुलगा असेल तर 'काळ' . कारण मैत्रीणी ची आई तिसंर्यादा preganant होती आणि त्यांची expectation मुलगा हवा असे होते. पण शेवटी मुलगी झाली, तिचे नाव 'क्रांती' ठेवले. :-). एका बंगाली मैत्रिणीच्या बहिणीचे नी भावाचे व तीचे असे नाव होते, पुतुल, टूटूल, बबूल. एका भैया मित्राचे नाव 'अभीनंदन', 'मनोरंजन'. एका काळ्याकुट्ट अजागळ मैत्रिणीचे नाव 'लावण्य'.
|
Daad
| |
| Thursday, July 19, 2007 - 1:03 am: |
| 
|
'केम, सलाकाबेन? केम छो? सारू?' असेल बिचार्याचा रोख निव्वळ तब्येत कशी विचारण्याचा. पण नववा महिना उलटलाय, उन्हाळा हू म्हणतोय, नवराही कोणत्याही तक्रारीला आता फक्तं 'हू' च म्हणतो. त्याची नव्याची नवलाई पाचव्यातच संपलीये.... नवव्यापर्यंत माझ्याहीपेक्षा टेकीला आलाय. असं असताना इतक्या साध्या प्रश्नातही वेगवेगळे भाव ऐकू यायला लागतात. हा गुज्जूभाई भावाच्या ऑफिसातला, जिममधला टेटेचा पार्टनर, परेशभाई. दहाव्या महिन्यातला देह सावरून बसल्याचं जमेल तितकं दाखवत मी प्रयत्नं पूर्वक, 'सारू सारू'. म्हटलं. मनात मात्रं 'मारू?' आलं. खोटं कशाला बोला? हिंसक विचार मनात आणायचे नाहीत असं आईने, सासूबाईंने सांगून सांगूनही, हल्ली विसरायला होतच होतं. 'केटला? दो?', मला 'दो' म्हणजे दोन कळणार नाही म्हणून दोन बोटं (दोन्ही बोटात अंगठ्या) माझ्यापुढे नाचवत विचारलं. वेडपटच दिसतोय! मी, 'नही नही, एकच छो, छू... छे' असं गडबडीने सांगितलं. छ्छे! ह्यांच्या क्रियापदांचा घोळ कळत नाही, बाई. 'ऑ? अज्जून आठ महिना बाकी छे? तमे तो, आपणी गुजराती बायडीच्याबी पक्षी मोटा मने फुढे....' त्या 'दोन' आकड्याचं 'महिने' हे यूनिट आत्ता कळल्याने माझ्या कानातून धूर यायचा बाकी होता, मला आपलं वाटलं की ' twins ' आहेत का विचारतोय. माझ्या 'छा छू' ने काय ते ओळखून तो मराठीवर उतरला. 'ते तुमचा भाव सांगितला आमाला नावाचा गड्बड'. सम्याला ना... बघतेच आता. 'अरे, काय वांदा नाय. आत्ता नाव करून देते. एक पेड हाय? न्हानाबी चालेल' पेड? झाड? काय असेल, देवाचं बिवाचं म्हणून मी आपलं 'पिछेकी बाजूमे, है, एक छोटासा तुळशी का रोप...' वगैरे म्हणायला जाणार इतक्यात त्याने टीपॉयच्या खालच्या खणातलं पॅड घेतलं. हसावें का रडावं मला कळेना. 'हा, तुमचा नाव? स ला का', परेशभाई. 'श ला का' माझा क्षीण प्रयत्नं 'अने, नितीनभायचा नाव, नि ती न भाय', परेशभाय. (हं?, मी) आता हा पत्रिका मांडतोय की काय! तो पर्यंत आईने आतून चहा आणि खायला आणलं. चहा बशीत ओतून एका दमात संपवला. 'आमी खेलून ज्याला की स्नेक खातो'... 'आ?', आईच्या हातून ट्रे पडणारच होता. चांगली चकली आणलीये तर हा साप खाणार म्हणतो.... मी गुजरातीत शहाणी झाले होत्ये एव्हाना. 'आई, 'स्नॅक' खेळून आल्यावर खाणार म्हणतोय', मी जमेल तितका स्नकवर जोर देत म्हटलं. 'त्येंला, तुमच्या आईंला, ऐकू कमी येते काय आजकल?' आपल्यामते कुजबुजत विचारलं त्याने. आता त्याला काय सांगणार! त्याचा प्रश्न मलाच ऐकू आला नाही असं मी दाखवलं. ' OK ' मला ताब्यात घेत परेशभाई म्हाणाला, 'निकिताशा कसा वाटते?' 'कसला ताशा?', आई. 'ताशा नही, आँटी, निकीताशा, नी की ता शा', ओरडून बोलत परेशभाई. 'नको, म्हणून सांग गं. आत्ताच प्लेटिंग करून घेतलीये आपली शेगडी.', इती आई. तिला तो गॅसच्या शेगडी बद्दल काही सांगत असल्यासारखा वाटला, बहुतेक. 'निकिताशा 'नको गं' मंग, तनीस कसा हाय? तनीस?', त्याला आईचं नको बर्रोब्बर कळलं. 'तनीस?', मी. 'आमच्यामन्दी असते ना, मनीस? तसाच. हे नवीन नाव हाय, एकदम ब्रॅन्ड न्यू', परेशभाई (हा, हा तनीश! पण आमची नावं कशा टांगली पेडवर?) 'काय प्रकास पडला काय? आ? ते तुमच्या आनि नितीन्भाईच्या नावाचे कुटले कुटले अक्षर घेऊन बनवले नाव आपण. 'अरे, तुमचा आनि नितीनभाईचा डोकरा, ते कळेल नाय समद्याला? तनीस! अरे एकदम फस्क्लास हाय, ठेऊन टाका', परेशभाई. आता मला गोम कुठेय ते कळलं. माझ्याकडून काही पावती मिळत नाही म्हटल्यावर, 'आमचा गुजराती नको, तर नको. बरां ते 'तिलक' कसा वाटत्ये?' वेगळच आहे नाही? चांगलं दिसेल. तिलक म्हटलं की कसं शुभकार्यं पंचारती, औक्षण वगैरे मंगल डोळ्यासमोर येतं. हरकत नाही.... असा विचार करेपर्यंत तो म्हणाला, 'ते तुमच्या घाटी लोकाऽन्च्या होते ना लीडर? लोकमान्य तिलक? होत्ये ना? अरे आमचा बी हिस्टरी चोख होता. त्यांच नाव. आता ह्येला तरी तुमी नाय म्हणु शकत नाय, काय? ह्ये नाव ठेवाच' तो निघून गेल्यावर बाकी सगळे हसत होत्ये. मला हसून येऊनही जोरात हसताही येत नव्हतं. इतकावेळ तिथेच खेळणारा भाचा (तो ईंग्रजी मिडियम मध्ये शिकतोय तिसरीत आणि सेकंड लॅंग्वेज मराठी आहे) अजून दोन नावं घेऊन आला, हीच आयडिया वापरून्- काशी आणि शनी. क्रमश:
|
Daad
| |
| Thursday, July 19, 2007 - 1:11 am: |
| 
|
'बारश्याची उगीच घाई नको, बाळ चांगलं खुटखुटीत होऊदे, तिलाही आराम होईल. मग महिन्याभराने बघू", आज्जेसासूबाई (पुढारलेल्या) म्हणाल्या. त्यांच्यापुढे बोलण्याची कुणाचीच टाप नसत्ये आणि तसा उपयोगही नसतो, त्यांना ऐकू कमीच येतं. चांगला ४.५ किलोचा चा गड्डू, अजून काय खुटखुटीत व्हायचा होता कोण जाणे, मी ही बरीच होत्ये. पण आमच्या पथ्थ्यावरच पडलं होतं म्हणा लांबलेलं बारसं. चांगला महिन्याभरानंतरचा मुहूर्तं धरला. बघितल्याबरोब्बर नाव सुचणार आहे म्हणणारे वडील आणि मामा दोघांचीही बोलती बंद होती. म्हणजे, 'त्याच्या आयुष्यभर आम्ही आणि लोक त्याला सरळ हाक मारतील', असं नाव सुचत नव्हतं त्यांना. मला आणि भावाला प्रचंड दाट जावळ (लहानपणी) असल्याने पहिल्यांदा बघणार्या आई, मावशी बाळाकडे बघून "टकलू गं टकलू" म्हणत होत्या, पण सासूबाईंच्या समोर नाही. माझ्या मोठ्या दिरांचे दोन्ही मुलगे झीरो कट मारूनच आलेले त्यामुळे comparison मध्ये सासूबाईंच्यामते, "ह्याला काय सुर्रेख जावळ आहे नाही?" असा गोंधळ होता. तेल लावताना जरा जरा ओढलं तर नाक येईल, वर. माझ्या भावाच्या जन्मताच असलेल्या फत्तेलष्कर नाकाची रेघ अशी तेल लावून लावूनच वर काढलीये असं आईला अजूनही वाटतं. 'त्यासाठी ह्याला कमीतकमी वीस वर्षं तरी तेल लावून घ्यायला हवं', असं भावाचं मत. तर 'चेहर्याच्या आकाराला बरीक शोभतय हो, नाक', असं नाक उडवत म्हणताना सासूबाईंनी त्याला इतका जवळ धरला होता की चेहरा आणि नाक सोडलयस उरलेलं डोकं त्यांच्या दृष्टीआड होतं. त्यामुळे 'बरीकच बरं' म्हणायचं. तुळतुळीत तेल घातलेलं मोठ्ठच्या मोठ्ठं डोकं, कायम इकडे तिकडे भिरभिरणारे मोटारीच्या दिव्याइतके गोलच्या गोल मोठ्ठे डोळे, अगदीच फताडा हसला तरच दिसणारी उजव्या गालावरची खळी, हातापायावरच्या वळकट्यांसह सगळाच अगदी गोल गोल. महिन्याभरातच कितीही गच्च बांधलं तरी हाताचे झेंडे बाहेर काढण्याची ट्रिक जमलेली त्याला. (त्यामुळे मोकळे हात आणि बांधलेले पाय हलवताना तो मरमेड सारखा दिसतो असं भाच्याचं मत) झणझणीत आवाज आणि भूक लागल्याचा आहे त्यापेक्षा जरा जास्तच कांगावा वगैरे मुळे त्याला नावं बरीच ठेवली गेली.... तेल लावायला येणारी बाई त्याला भिमुश्श्येन म्हणत होती. सासरे आणि त्या माळेतली सगळी पुरुषमंडळी नुसतच, 'अले अले...'. माझे बाबा, गुंजा (छोट्या, नाजुक, गुंजांच्या बियांचा काही संबंध नाही. हा 'गुलाबजाम' चा शॉर्ट्फ़ॉर्म आहे) सासूबाई, 'बल्ल्या'- बल्लवा वरून असावं. माझी मोठ्ठी आत्या, 'गट्या', मोठी काकू, 'गोट्या' धाकटी काकू,'भिल्ला' मोठ्ठ्या जाऊबाई 'गंडोला' मोठे दीर, 'गोबी' आणि माझे पुतणे, 'गब्बू' कुणाला वाटावं की अक्षर 'ग' आलय की काय! 'हे' म्हणजे काही नव्हेच, 'काय सुचत नाहीये नाव. गडी अंगाने उभा नि आडवा खरा. दाजिबा!', (काहीतरीच) मी आपलं त्यातल्या त्यात 'गुड्डू' म्हणत होते. जमेल तसं नावांचं संशोधन चालूच होतं. 'अहो, रूपक ठेवूया का?', माझ्या संगीतातल्या ज्ञानाचं जरा कौतुक बिवतुक आहे घरात सगळ्यांना. आणि आता नावाची चर्चा राजरोस सगळ्यांच्या, अगदी त्याच्याही समोर चालत होती. 'अगं, ', कधी नव्हे ते मला समजावत गडबडीने हे म्हणाले, 'माझ्यावर गेला असता तर ठीक होतं.' 'तुमच्यावर?', मला काय बोलावं सुचेना, 'तुम्हाला आरत्यासुद्धा तालात म्हणता येत नाहीत. रूपक तालाचं नाव म्हणतेय, मी' 'अस्सं होय! मला वाटलं की रूप, रंगाबद्दल म्हणतेयेस.... ओ sssss आलोच!' कुणीही हाक मारत नसताना हे बाहेर पळाले. (विणायच्या सुया भोसकल्या तरच लागतात जरातरी, बहुतेक!) आमचा संवाद ऐकत उरलेला मेथीचा लाडू तोंडात कोंबत भाऊ म्हणाला, 'रूफक? रूफक नोको... आढाचौटाल किंवा फंचोम सोवारी बघ....' 'रूपक नको आडचौताल किंवा पंचम सवारी.....!' जरा चपळाईने, झटकन उठून दणकाही घालता आला नाही मेला. माझाच झपताल झालाय त्याला कोण काय करणार! मुलगा म्हटल्यावर फुलाबिलाची नावं बादच होती. आणि गुड्डूकडे बघून झेंडू किंवा सूर्यफूला शिवाय सुचलं नसतं कुणाला दुसरं काही. त्यातल्यात्यात आईने पत्रिका वगैरे बनवून अक्षर 'क' आल्याचं सागितलं. जरातरी दिशा मिळेल आता नावं शोधायला... पण 'क'सचं काय! क्रमश:
|
Daad
| |
| Thursday, July 19, 2007 - 1:19 am: |
| 
|
'क्ष ची माफी मागून.... पुढची पोस्ट
|
Daad
| |
| Thursday, July 19, 2007 - 1:20 am: |
| 
|
कुणाल्- अगदी जवळच्याच नात्यात होतं ते नाव आणि त्याचं आण्या करतात सगळे कार्तिक्-गणपतीचा भाऊना? त्याच्या देवळात बायकांनी जायचं नसतं वगैरे? नकोच्- इती भावजय. कौस्तुभ्- जोडाक्षर आहे आणि त्याचा शॉर्ट्फॉर्म कोत्या करतात सगळे. कृच्छ- मावस सासूबाईंची सजेशन, ह्यांचा संस्कृतचा अभ्यास आहे (म्हणे). जोरात शिंक आल्यावरही दाबावी लागली तर येणार्या (तोंडातून) आवाजासारखं वाटलं नाव. सासूबाईच नको म्हणाल्या. कीचक किंवा कंस्- बरोब्बर! काणेंचा तेजस, व्हीलन्स आवडतात तोच. कचरा-लगानचा प्रभाव न उतरलेला भाचा. त्याच्या मते 'कचरा रे कचरा रे तेरे काली काले नैना' हे गाणं लगानमध्ये जास्तं चांगलं दिसलं असतं. त्याला समजवण्यात अर्थ नसतो. 'किंकोमारा'- भावजय. हा म्हणे जपानमधला प्रसिद्ध सुमो पहलवान, ह्याच्यावर पोरी (जपानी) मरतात. 'क्षितीज'- हा माझा चुलत दीर मायबोलीवर (का कुठेसं) लिहितो. 'देवनागरीत टायपायचं झालं तर के ने सुरूवात होते ना? मग?' हा खुलासा. ह्याचा तिथला आयडी 'क्ष' आहे! कैटभ्- ह्यांच्या बंगलोरमधल्या टीमलीडरने सुचवलेलं. साऊथ इंडियन आहे ती. मला उगाचच ते कुणा राक्षसाचं असल्यासारखं वाटलं. कैवल्य- मला आवडलं होतं नाव पण ह्यांचा आक्षेप, 'हा दिसतोय आत्ताच भानू तालमीच्या आखाड्यातून आल्यासारखा. उगीच काय, कैवल्य? हे म्हणजे आमच्या आईला अबोली म्हणण्यासारखं...' मला पटलंच अगदी. किरण, कांचन्-हे मुलीची असतात ना ही नावं? मग नको. अगदीच काही सुचलं नाही तर ठेवायच ह्यातलच एक. मग काय करणार? क्रमश:
|
Daad
| |
| Thursday, July 19, 2007 - 1:22 am: |
| 
|
'बाळसं धरलय नाही?' हे माझ्याकडे की गुड्डूकडे बघून ते माहीत नाही पण बारशाला जमलेल्या जवळ जवळ प्रत्येकाच्या नजरेत दिसत होतं. बाळाच्या कानात नाव सांगायला चुलत आत्त्याबाई आल्या होत्या मुद्दाम, हुबळीहून. त्यांच्या मोठ्या सुनेचं नाव कांचन त्यामुळे त्या उठल्या कीच त्यांच्या कानात सांगायचं आणि (त्यांना विचार करायला कशीतरी संधी न देता) मग त्यांनी लगेच बाळाच्या कानात असा बेत होता. भावाने backgound ला जसराजजींचा दिनकी पुरिया लावला होता. दुपारच्या चारेक वाजता आधीचं ओटी भरणं वगैरे सोपस्कार झाले. आता बाळाला पाळण्यात घालायचं. मला आपली उगीचच हुरहुर वाटत होती. काही मनासारखं नाव मिळालेलं नाही. मुलगी असती तर अजून एकदा तरी नाव बदलता आलं असतं तिला. ह्याला म्हणजे काही चान्सच नाही... वगैरे वगैरे मनात विचार येत होते. माझ्या चेहर्याकडे बघून हे सुद्धा मला जरा धीर देत होते. इतक्यात त्याच सीडीचा पुढला ट्रॅक लागला... आणि सुरूवातीलाच पंडितजींनी सांगितलं... राग केदार आणि मी हरखून ह्यांच्याकडे बघितलं! समाप्त.
|
Chinnu
| |
| Thursday, July 19, 2007 - 2:05 am: |
| 
|
शेवटी राग केदार मदतीस आला म्हणायचं.
|
Chetnaa
| |
| Thursday, July 19, 2007 - 2:28 am: |
| 
|
दाद, सहीच जमलय... तुझे सर्वच लिखाण खुप छान असते... आता तुझ्या नावातच दाद आहे,आणखी काय दाद देणार
|
Farend
| |
| Thursday, July 19, 2007 - 2:58 am: |
| 
|
सही आहे, दाद, पूर्ण होईपर्यंत थांबलो होतो. मला आजची पोस्ट्स जास्त आवडली. LOL झालेले ह्याच्यावर पोरी (जपानी) मरतात, आणि तसा उपयोगही नसतो, त्यांना ऐकू कमीच येतं. , एक पेड हाय? न्हानाबी चालेल' कृच्छ चे explanation ही धमाल आहे. कैटभ खरच राक्षसाचं नाव आहे का? गणपतीच्या गाण्यात आहे.
|
Ravisha
| |
| Thursday, July 19, 2007 - 3:21 am: |
| 
|
ह. ह.पु.वा. नव्हे पुरी वाट लागली,हसून हसून मुरकुंडी वळायची वेळ आली असे जे जे काय वाक्प्रचार असतील ना ते सगळे....
|
Ravisha
| |
| Thursday, July 19, 2007 - 3:24 am: |
| 
|
mermaid!!! what an imagination!!! 
|
Mankya
| |
| Thursday, July 19, 2007 - 3:30 am: |
| 
|
दाद .. ह. ह. पु. वा. ! अग कसलं वर्णन केलंयस .. तूफान आहे अगदी तूफान .. Well done !! माणिक !
|
Ksha
| |
| Thursday, July 19, 2007 - 3:32 am: |
| 
|
>>माझ्या मोठ्या दिरांचे दोन्ही मुलगे झीरो कट मारूनच आलेले .. अप्रतिम!! मी घरात एकटाच बसून हसतोय इथे. जखडून ठेवतेस अगदी! आणि माफी वगैरे मागायची काऽऽही गरज नाही! तुला सगळं माफ.. आणि वर दोन राज्य बक्षीस अमोल, कैटभ राक्षसाचंच नाव आहे. मधुकैटभ जोडगोळीतला तो एक.
|
Zakasrao
| |
| Thursday, July 19, 2007 - 4:08 am: |
| 
|
दाद एकदम खास. बाळस धरलय नाही असे अनेक पन्चेस आहेत जबरीच.
|
Saanchi
| |
| Thursday, July 19, 2007 - 4:49 am: |
| 
|
मी मयबोली वरील साहीत्य नेहेमीच वाचते पन प्रतिक्रीय कधी देत नाही. Pअन आज रहावले नाही... एकदम जबरी लिहीले आहेस. जाम हसले आज. Thanks.
|
Alpana
| |
| Thursday, July 19, 2007 - 4:50 am: |
| 
|
मस्त...भन्नाट...काय हसवतेस ग तु....पहाटे काम करायला म्हणुन लवकर उठुन बसले आणी रहावले नही म्हणुन काम सोडुन हेच वाचत बसले...इतकी हसत होते की नवरा घाबरुन जागा झाला.... काय झाले रडतेयेस का म्हणत...आणी मी मायबोलीवर वाचतेय बघितल्यावर डोक्यावर हात मारुन परत झोपला....
|
R_joshi
| |
| Thursday, July 19, 2007 - 4:56 am: |
| 
|
दाद आता ऑफिसमध्ये वाचण अशक्य आहे स्वत:च हसण आवरण जमत नाहि आहे त्यामुळे दुपारी एकांतात वाचुन.... भरपुर हसल्यानंतर प्रतिक्रिया देईन
|
Maudee
| |
| Thursday, July 19, 2007 - 5:47 am: |
| 
|
ख़ूप हसले....कर्कटक, खोडरब्बर, मरमेड, कैटभ.... सगळच दी बेश्ट.
|
Psg
| |
| Thursday, July 19, 2007 - 6:15 am: |
| 
|
जबरी! धमाल लिहिलंय! गुजराथ्यांचं एकदम पटलं
|
|
|