| 
   | 
| दाद!!!! 'पाऊस... नक्की कुठे पडतोय?' ही ओळच एक आभाळभर कविता आहे!!सुभान अल्लाह!!!अप्रतिम!!! इतक्या कमी शब्दात बरसणं.... ग्रेट
   सारंग... कळत जायचं मस्तच...साधी,सोपी,सुंदर कविता!!
 
 
 |  | | Bairagee 
 |  |  |  | Wednesday, July 11, 2007 - 6:44 am: |       |  
 | 
 
 "माझ्या घराच्या कोनाड्यातून ठिबकणारा
 तुझा एकाकी वास?"
 पूर्ववृत्ताशी नाळ काही तोडता येत नाही आणि पुढे जाताना पूर्ववृत्ताला विस्मृतही करायचे आहे. ह्या कोंडीतून, ह्या द्विधेतून ही कविता जन्मास आली आहे--
 "ही माझ्या पिढीची आम्हीच ओढवलेली मुस्कटदाबी,
 आज्जी... माझ्या कातडीवर पसरलेलं
 हे उच्चभ्रूपण सोलवटून मी कसे काय ऐकू
 तुझ्या पान्हाळ ओवीओवींतलं दुधाळ संगीत??"
 मयूर, आज्जी...अतिशय ताकदीची, उत्कट, प्रामाणिक कविता आहे. उत्कट भावनावेगाने प्रसूत होणाऱ्या अभिव्यक्तीला प्रसरणशील  ओबडधोबडपणाचा जन्मजात अभिशापही अनेकदा भोगावा लागतो.  आणि हा ओबडधोबडपणाच अनेकदा त्या अभिव्यक्तीची सौंदर्यखूण ठरते.
 दाद, मस्त,छोटी, लाघवी कविता.
 सारंग, कविता छान आहे.
 
 
 
 
 |  | सारंग कळत जायचं मस्तच. सौमित्र स्टाईल वाटली थोडी.(तंत्रिकदृष्ट्या. कल्पना छानच.)
 माणिक दोलायमान एकदम पर्फेक्ट झालीय रे. भाषा सुंदर आणि कल्पना अवघड असूनही मांडणी अगदी आखीव. शब्द नेमके. ना कमी ना जास्त. वा!
 दाद झुळूक चुकून इथे टाकलीस का?
   
 
 |  | | Zaad 
 |  |  |  | Wednesday, July 11, 2007 - 12:41 pm: |       |  
 | 
 भार
 
 तुझी पालख़ी ज्ञानराया रुपेरी
 पख़ालीस माझ्या मला पाहवेना
 तुझी पालख़ी ज्ञानराया अघोरी
 तिचा भार आता मला वाहवेना.
 
 (झुळूक ऐवजी इथेच टाकावीशी वाटली)
 
 
 |  | | Shyamli 
 |  |  |  | Wednesday, July 11, 2007 - 1:18 pm: |       |  
 | 
 इथल्या कविता लगेचच ओर्कुटावर फिरायला लागतात कविच्या नावाशिवाय
   यासाठी,करता येण्यासारख काहिच नाही का??
   
 
 
 
 |  | | Chinnu 
 |  |  |  | Wednesday, July 11, 2007 - 1:54 pm: |       |  
 | 
 मयुरा अतिशय सुंदर. मलाही ओवीओवीतील संगीत आवडले.
 दाद, तुमचे लिखाण म्हणजे नेहमीच आनंद देणारा ठेवा, हे समिकरणच झालय जसं. वरील कविता खुपच आवडली!
 झाडा, पखाल? अघोरी? माफ करा बरं, पण अज्ञानामुळे पार डोक्यावरून गेली. समजवाल का?
 श्यामली ताई, इथे प्रत्येक कवीने कविता पोस्टतांना खाली आपले नाव लिहीले तर थोडा फार उपयोग होईल असे मला वाटते.
 
 
 
 |  | | Swaroop 
 |  |  |  | Wednesday, July 11, 2007 - 2:20 pm: |       |  
 | 
 चिन्नु, त्याने काय होणार?  copy  करणारा नाव सोडुन बाकी सगळी कविता  copy  करु शकतो ना!
 काहीतरी जालिम उपाय शोधला पाहिजे.....
 
 
 |  | | Vibhas 
 |  |  |  | Wednesday, July 11, 2007 - 9:38 pm: |       |  
 | 
 Radha me Vibhas urf Sandesh - mail me to say hi - sandesh.nadankar@yahoo.com
 
 thanks
 
 
 |  | | Daad 
 |  |  |  | Thursday, July 12, 2007 - 3:09 am: |       |  
 | 
 आशिर्वाद....
 बाई माईना कवेत
 आता माझे पंचप्राण
 जणू ओसंडून जळ
 वाहे बावडी,साचण
 झाले अपुरे परसू
 अन धाकुटे अंगण
 मिळो खेळायास तुला
 सार्या जगाचे प्रांगण
 कासयास बाळा तुला
 घरट्याचेही बंधन
 थिटे पडो दे रे तुझ्या
 भरारीला तारांगण
 ..........
 
 दिला सोपवून हिरा
 अन राहिले कोंदण
 कसा जपावा जपावा
 काये बाहेरील प्राण?
 उमळले फुल, केले
 जगन्मातेला अर्पण
 रिती होऊनीही झाली
 तृप्त तृप्त कमळण
 -- शलाका
 
 
 
 |  | | Mankya 
 |  |  |  | Thursday, July 12, 2007 - 3:22 am: |       |  
 | 
 दाद ...  क्या बात है  !  अतीव सुंदर  !
 काय एक एक सुंदर शब्द अन शब्दरचना .... Simply delighted !!
 धाकुटे अंगण, जगाचे प्रांगण, थिटे पडो तारांगण, काये बाहेरील प्राण, तृप्त तृप्त कमळण ...  एक से बढकर एक  !  व्वाह  !
 पुन्हा एकदा प्रचिती आली तुझ्या शब्दभांडाराची ..  superb !  भावनाही खूपच उत्कट अन अगदी लयबद्ध  !  मान गये  !
 
 संघमित्रा ... Thanks  गं  !
 
 माणिक  !
 
 
 |  | धन्यवाद दाद, चिन्नू... बैरागी तुमच्या प्रतिसादातून कवितेचे अंतरंग तंतोतंत प्रकट झाले आहे त्याबद्दल धन्यवाद...
   माणिक श्यामली....!!!
 दाद... आशिर्वाद सुंदर आहे!
 'मिळो खेळायास तुला
 सार्या जगाचे प्रांगण ' वा! पसायदान!!!!
 
 
 |  | | Kanak27 
 |  |  |  | Thursday, July 12, 2007 - 12:00 pm: |       |  
 | 
 आशिर्वाद , दाद हि अन्गाइ म्हणुन चालेल का ग
 
 
 Deepa
 
 
 |  | | Bairagee 
 |  |  |  | Thursday, July 12, 2007 - 1:23 pm: |       |  
 | 
 दाद, ह्यांची कविता आईने मुलीला (मुलालाही असू शकतात) दिलेले आशीर्वाद आहे हे जवळपास स्पष्ट आहे. मुलीचे नुकतेच लग्न झाले असावे किंवा तिला नुकताच एचवनबी वीज़ा मिळून ती कंपनीतर्फे अमेरिकत जात असावी.'भरारीला तारांगण' पर्यंत मुलीशी हा संवाद सुरू आहे. पण नंतरच्या ओळींनी मी पेचात पडलो आहे.
 दिला सोपवून हिरा
 अन राहिले कोंदण
 कसा जपावा जपावा
 कायेबाहेरील प्राण?
 ह्या सुंदर ओळींपासून स्वसंवाद सुरू  होत असावा, असे वाटले.
 उमळले फुल, केले
 जगन्मातेला अर्पण
 ह्या ओळीही वाचल्या. ह्या ओळीने प्रश्न पडतो की ही 'जगन्माता' कोण? आणि अर्पण केले म्हणजे नक्की काय अर्पण केले? मला तर ह्या ओळी दुसरीकडेच इशारा करीत आहेत असे वाटते. मला तर ह्या ओळी शोकाकुल वाटल्या. कवयित्रीकडून कळल्यास आनंद होईल.
 बाय द वे, कविता आवडली.
 
 
 
 
 
 |  | | Chinnu 
 |  |  |  | Thursday, July 12, 2007 - 1:53 pm: |       |  
 | 
 बैरागी, अहो पोटचं पोर, म्हणजे हिरा आणि शरीराबाहेरचा आपला पंचप्राण असे कवयीत्रीमधल्या आईला वाटते आहे. ती स्वत:ला कोंदण संबोधत आहे.
 हे पोर आता मोठे झाले (उमळले) आणि जग जिंकाया चालले, म्हणजेच आईने महाकष्टी होवून तिचे प्राण(मुल) तिच्यापासून दूरच्या जगात जायला परवानगी व आशिर्वाद देत आहे.
 शलाका बरोबर का गं?
 
 
 |  | माणिक.. माणिक कवित! अप्रतिम! फक्त कवितेच्या शिर्षकाचा पुन्हा पुन्हा विचार करतेय.
 दाद पाउस नक्की कुठे पडतोय.. व्वा!
 आशीर्वाद अगदी पहोचली आणि तिचं रुपही एखाद्या घडीव ओतीव मुर्तीसारखं झालय.
 मयुर आज्जी अगदी खरी. खुपच प्रामाणिक.
 पालखी अघोरी... सद्य परिस्थितीला उद्देशून म्हंटलय का? झाड?
 
 मेघा
 
 
 |  | माणिक अप्रतिम  .
 मयूर  ..  मेघधाराशी सहमत. आज्जी प्रामाणिक .
 शलाका ...
 
   काय बोलणार ?
 
 बैरागी  , मला वाटते स्वसंवाद आहे पण चिन्नू म्हणते त्याप्रमाणे त्याच विषयाला धरून आहे .  बाकी शलाका सांगेलच  .
 
 
 |  | | Bairagee 
 |  |  |  | Thursday, July 12, 2007 - 7:18 pm: |       |  
 | 
 चिन्नू तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. त्याबाबत मुळीच दुमत नाही आणि तुम्ही छान समजावून सांगितले आहे. पण उमळणे म्हणजे प्रसूत होणे.
 उमळले फूल, केले
 जगन्मातेला अर्पण
 आता इथे कवितेचा मूड,प्रवाह थोडासा बदलल्यासारखा वाटला. ह्या अर्पणभावात मला तुम्हाला अभिप्रेत असलेल्या प्राणवियोगासोबत पोटच्या गोळ्यापासून झालेली/होऊ घातलेली  कायमची ताटातूटही दिसली. आणि त्यानंतर ही कविता केवळ आशीर्वाद नसून एका आईने आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी, तान्हुल्यासाठी केलेली प्रार्थना आहे, असेही वाटून गेले. त्यामुळेही प्रत्येक वाचनागणिक कविता अधिकच आवडते आहे.
 
 कविता लिहून झाल्यावर ती वाचकाची होती. तो त्या कवितेत त्याचे अर्थ शोधतो. म्हणून वरील कविता होताना कवयित्रीच्या/कवीच्या मनात माझ्या मनातला अर्थ असेलच, असावाच असे नाही. पण तसा अर्थही होता हे कळले तर एक वाचक म्हणून फार बरे वाटते. तसेच कवयित्री/कवीदेखील वाचकांनी बघितलेले अर्थांचे पदर दिसले की एक त्रयस्थ वाचक म्हणून वेगळा आनंद घेऊ शकतो.अर्थात शलाका सांगतीलच.
 
 आधीच्या प्रतिसादातील एचवनबी विज्याला गंभीरपणे घेऊ नये, ही विनंती.
   
 
 
 |  | | Daad 
 |  |  |  | Thursday, July 12, 2007 - 11:17 pm: |       |  
 | 
 बैरागी,
 "कविता लिहून झाल्यावर ती वाचकाची होती. तो त्या कवितेत त्याचे अर्थ शोधतो."
 क्या बात है! अगदी खरं.
 
 पहिल्या ओळी (दिला सोपवून हिरा च्या आधीच्या) ह्यात आईची आशिर्वचनं आहेत. ह्या कवितेतली आई म्हणतेय की, आपल्या मुलाने जगाच्या कल्याणासाठी झटावं, त्याचं आयुष्य स्वत:च्या घरट्यापुरतं न रहाता, सार्या जगाच्या चिंता, काळज्या त्याने वहाव्यात! ते फक्त आपलं मूल न रहाता जगन्मातेचं व्हावं.
 आणि एकदा हा आशिर्वाद दिल्यावर, आईच्या हृदयाला ही सुद्धा काळजी लागते (बैरागी, स्वसंवाद्-  perfect ), आता कसा जपायचा हा आपण आपल्या हाताने जगाच्या हाती सोपवलेला आपल्या कायेबाहेरचा आपलाच प्राण?  एक फूल फुलवण्याची 'पूजा' (एक समर्थ माणुस घडवण्याचं निष्काम कर्मं) झाल्यावर ते अर्पण करून एखादी कमळवेल रिती होऊनही तृप्तं दिसावी तशी आई होत्ये.
 
 आता हे मी गद्यात लिहिल्यावर कळतय पण पद्यात धड'पद्य'लय, बहुतेक (किंवा नक्की, पोस्टायची घाई केली)!
 माझ्यामते उमलणे ही यौवनात प्रवेशासाठी जास्त वापरलेला शब्द प्रयोग आहे. तसंच कळ्या तोडून कुणीच पूजा करत नाहीत त्यासाठी फूल उमलण्याची वाट बघतो आपण.
 
 काहीच दिवसांपूर्वी स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यावर एक प्रवचन ऐकलं. तेव्हा पासून त्यांच्या आईबद्दल एक कुतुहल डोक्यात घोळत होतं ते कुठेतरी असं डोकावलेलं दिसतय (बहुतेक).
 
 
 
 |  | shalaakaa,
 apratima...!!! shabdan shabd sundar!!! vaah !!!
 
 
 |  | | Pulasti 
 |  |  |  | Friday, July 13, 2007 - 4:40 pm: |       |  
 | 
 माणिक, मयूर, शलाका, बैरागी, सारंग, झाड - अप्रतिम कविता आहेत! विचारातली सशक्तता आणि उत्कटता, शब्दांची निवड आणि भान आणि मांडणीतला परिपक्वपणा...एकदा वाचून समधान होतच नाही!! आधीच्या खूप खूप कविता मिस्स केल्यात मी
  . आता जरा गझलवेड आवरून कविता नियमीत वाचल्या पाहिजेत   -- पुल्ति.
 
 
 |  | 
   |