|
आला आला पाऊस बोले मेघन अंबरी गरजे-गरजे सौदामीनी चमकुनी चमके शिंपीत गंधीत जल सोनेरी आला आला पाऊस बोले लगबग-लगबग जमले मेळे आम्रतरुन्ना झुले लागले झोका जाऊनी उंच नभाशी आला आला पाऊस बोले रुमझुम करी वनराणीचे पैंजण नाद ऐकुनी नाचे कानन चंचल समीरा मस्तीत हांसे आला आला पाऊस बोले वनराईतुन घनराईतुन निळे पाचुचे पंख उलगडे डोलत-डोलत मत्त मयुरा आला आला पाउस बोले रिमझिम रिमझिम अवती-भवती पानावरती गालावरती अंगणातही रिमझिम रिमझिम आला आला पाऊस बोले आषाढाचे रंग लेऊनी मेघदूत बघ तरुण जाहले मन-मन डोले मन-मन ओले आला आला पाऊस बोले ************************ आपणां सर्वान्ना आषाढाच्या हार्दिक शुभेच्छा![ ]
|
Shyamli
| |
| Monday, July 16, 2007 - 9:53 am: |
| 
|
आषाढाचे रंग लेऊनी मेघदूत बघ तरुण जाहले मन-मन डोले मन-मन ओले आला आला पाऊस बोले >>> waa }
|
Zaad
| |
| Monday, July 16, 2007 - 11:59 am: |
| 
|
चिन्नु, पाणी वाहण्यासाठी रेड्याच्या पाठीवर जे चामड्याचं भांडं असतं त्याला पख़ाल म्हणतात. एखाद्या तत्वप्रणालीच्या किंवा परंपरेच्या प्रभावाने मोहाने माणूस स्वत:चं सर्वस्व सोडून देतो आणि नंतर त्या महान गोष्टीची धुरा त्याला न पेलवल्याने धड इकडे ना धड तिकडे अशी त्याची कुचंबणा होते. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले तो संदर्भ इथे वापरला आहे. मेघधारा, हो. पण सध्याच्याच नाही तर कुठल्याही काळात हे लागू होऊ शकतं. महापुरुषांचा आंधळा अनुयय करणं, ख़ोट्या प्रतिष्ठेसाठी एख़ाद्या परंपरेचा पाईक होणं आयुष्यात आपण काहीतरी (इतरांपेक्षा) वेगळं करायला हवं अशा अनेक कारणांनी माणसं सतत कसल्यातरी प्रणालीची गुलामी करताना दिसतात. अर्थात खरी भक्ती करणारेही असतातच.
|
Avikumar
| |
| Monday, July 16, 2007 - 1:49 pm: |
| 
|
पाऊस ढग दाटुन येतात अन तुझी आठवणही दिशा अंधारुन जातात तसे माझे मनही अधिर पावसाला मग मी समजावु पहातो पाउसही थोडावेळ माझं ऐकत रहातो मित्रा, तु काय नेहमीसारखाच बेधुंद बरसशिल रे माझे डोळे मात्र सखीला पहाण्यासाठी तरसतील रे प्रियेची वाट पहाणारा मीही वेडा चातक ना? प्रेमी जीवांच्या ताटातूटीचे करणार नाहिस तु पातक ना? शपथ तुला तुज प्रियेची तुला आहे प्रितीची आण सखीच्या विरहाने अथवा जातील रे माझे प्राण..... ............ प्रियेच्या भेटीला मग हळवा पाउसही तरसतो.... अन माझ्यासारखाच तोही फक्त डोळ्यांतुनच बरसतो... माझ्यासारखाच तोही फक्त डोळ्यांतुनच बरसतो... अविनाश
|
Zansi
| |
| Monday, July 16, 2007 - 2:40 pm: |
| 
|
खुपच सुंदर कविता ,अविनाश
|
तू न आला............. तू न आला पाऊस ओला आठवणीन्ना भिजवुनी गेला थेंबांच्या जलमोतींसंगे आसवांना बरसुनी गेला तू न आला पाऊस ओला तू न आला मधु-गारवा ह्रदय-सतारी छेडुनी गेला भास तुझा भोवताली तनमनासी स्पर्शुनी गेला तू न आला पाऊस ओला तू न आला परि बरसल्या रेशिमधारा अम्रुतधारा तुला शोधीती त्या वनरानी कुठे हरपला हे प्रियवरा तू न आला पाऊस ओला तू न आला पाऊलवाटा अधिर जाहल्या तुला पाहण्या कधि रे येशील, कधि तू येशिल वेध भेटीचे ह्या वेडीला तू न आला पाऊस ओला तू न आला तरि मी येईन होऊनी जलमयी रिमझिम धारा तुझीया दारी अन ह्रदयी तुझीया बरसुनी जाईन प्रीतधारा तू न आला पाऊस ओला
|
ओला आषाढ ओली धरा मन....... ओला आषाढ ओली धरा ओलावलेला रुतु कोवळा अन पानांफुलांत दरवळला इंद्रधनुषी रंगमेळा! मन........ आषाढ शींपतो सरीवर सरी खुणावीत तुला-मला अन मेघदूती कवनांचा जागवी भावझेला! मन........ चल मग झेलू आषाढ सरी चिंब-चिंब भीजू दोघंही अन गाऊ पाऊस गाणी! मन....... चल भुलवु आषाढ सरींन्ना झेलू पाऊसधारा अन गुंफु थेंबांच्या माला! मन......... चल चल जाऊ पावसात वेचू पाऊसगारा अन बनु चंचल होऊनी त्रुषार्त! मन......... चल येतेस नं???? कां जाऊ मी एकटी????? अन ठेऊन तुला माघारी...... होऊ कां मी रानभररी?????
|
|
|