|
Mi_anu
| |
| Thursday, July 12, 2007 - 12:36 pm: |
| 
|
बी राव, सर्वांचा मूळ मुद्दा फक्त कथेत काही तांत्रिक त्रुटी आहेत इतकाच आहे. लग्नानंतर दिवस १ ते इन्फिनीटी या काळादरम्यान कितीही दिवसात राहू शकतात या तुमच्या मुद्द्यावर मतभेद नाहीतच. तुम्ही 'पंधरा दिवसात तिला डोहाळे लागले', म्हणजे तुम्हाला दिवस गेले असे म्हणायचे आहे असे मानले तरी इतक्या लवकर ते कळत नसावे हा सर्वांचा आक्षेप आहे. कथाबीज चांगले आहे हे बहुतेक जण मान्य करतात. पण तुम्हाला जो मुद्दा सांगायचा आहे त्यात काही लॉजिकल त्रुटी आहेत. चीप होणेपुण्यामुंबई विदर्भात काय होते आणी त्या होण्यात काय फरक आहेत हाही मुद्दा मुळ नाही. मुद्दा आहे ते मूळचा चांगला कथाविषय संवादांचा अभाव आणि काही ठिकाणी गंडलेले लॉजिक यामुळे बर्याच जणांना क्लिक झाली नसावी असे वाटते. दुसर्या आयडी वरुन लिहून चांगले प्रतिसाद मिळवायचे म्हणाल तर मी तरी आयडी पाहून प्रतिसाद दिला नव्हता. मायबोलीवरील कथा खूप चांगल्या असतात, मी तितक्याच वाचते. माझी कोणाही आयडीशी मैत्री किंवा शत्रुत्व होण्याइतकी ओळख नाही. माफ करा, विषय ग्र्यांट रोड वगैरे पर्यंत उगाच भरकटत गेला आणि प्रतिसाद देणार्यांना ज्या मूळ त्रुटी आणि तुमच्या कथेतले चांगले मुद्दे सांगायचे होते तो मुद्दा बाजूला पडला. शिवाय मूल आपलेच आहे ही खात्री पटल्यावर तरी त्यांनी तिला घरी परत का नाही आणले, आणि भावना नव्हत्या म्हणायचे तर मग तिला खणनारळ आणि मुलाला काहीबाही का देत राहिले? गावाकडची मनोवृत्ती, सासूचा जाच सर्व मान्य केलं तरी ग्रामीण कथा लिहीताना तुमचा या कथेत तरी पात्रांच्या स्वभावाचा अभ्यास थोडा कमी पडतो असे वाटते आहे या कथेत.
|
Sahi
| |
| Thursday, July 12, 2007 - 2:06 pm: |
| 
|
बी, बघ १ शब्द तो पण प्रतिक्रियेतला तुला पटला नाही तर अशी आखिलाडू व्रुत्त्ती दाखवत मुद्दा सोडुन चिरफ़ाड करत बसला आहेस... असो तुला परत शुभेच्छाच माझ्याकडुन बाय द वे माझा आय डी "साहि" आहे "सही" नाही माझ्या कडुन ह्या विषयाला पुर्णविराम... }
|
Ashwini
| |
| Thursday, July 12, 2007 - 2:30 pm: |
| 
|
बी, आता पुरे. खूप भरकटलास. जरा विचार कर. तुझे कथाबीज चांगले आहे हे सगळ्यांनी मान्य केलेय. अश्या अनेक स्त्रिया तू पाहिल्या असशील आणि त्यांचे दुःख मांडण्याचा तू प्रयत्न केला आहेस हे स्पृहणीय आहे. पण एखादा विषय हा कथा म्हणून मांडण्यासाठी नुसती कळकळ महत्वाची नसते. वरती अनेकांनी सांगितल्याप्रमाणे तो संवादातून, वर्णनातून फुलवावा लागतो. तरच ती कथा बनते. सगळ्या सूचना नीट postitively घेऊन त्यांचा विचार कर. त्याचा तुला खरच फायदा होईल. आणि तुला असं वाटत असलं की तुला मुद्दाम डिवचण्यासाठी कुणीतरी काहीतरी लिहीत आहे तरीही तू पातळी सोडू नयेस. त्याने उलटाच परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे. तू पूर्वी चांगले लिहीले आहेस. तेंव्हा तुला चांगले लिहीता येते यात शंका नाही. थोड्या प्रयत्नांची आवश्यकता आहे.
|
मला वाटतं आता आपण इथे थांबावं! बहुतेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, लेखकाला त्या दिसत आहेतच, त्यतून काय घ्यायचा तो बोध त्याला घेऊ द्यावा. पूर्वी याच संदर्भात घडलेल्या अनेक कटू प्रसंगांची उजळणी आणि नन्तरचे निरुपयोगी post mortems होऊ नयेत हाच एक उद्देश आहे. I hope everybody understands..
|
बी नवर्याने टाकलेल्या बायका हा खूप complicated विषय आहे. तुझ्या या कथेत ही शकू नीट पणे वाचकान्समोर उलगडतच नाही. म्हणजे ती जेन्व्हा नवर्याचे घर सोडून येते तेन्व्हा मुलासाठी हिम्मत करते म्हणावं पण माहेरीही ती सगळी कामं करून शिवाय शिवण काम करून पैसे ही कमवते तरी तिला मुलासकट एकटं रहायला काहि problem आहे बहुतेक. असो. लग्नानंतर आठ पंधरा दिवसात तिला दिवस जाणे possible आहे पण डोहाळे लागणे नाही पूर्वपराक्र्म असल्य्याशिवाय मग ती पुण्या मुंबईची असो वा आणी कुठली. आणि बाळ आपले आहे हे सासरी एकदा पटल्य्यावर आणि शकू च्या जावेलाही मुल नाही म्हटल्यावर सासरचे तिला घरी नेणारच. ती तरीही गेली नाही आणि एकदम अचानक नवर्याच्या शेजघरात घुसली हे काहि पटलं नाही बुवा. म्हणजे इथे ती एकदम week character म्हणून पुढे येते. म्हणजे तुझी कथानाइकाच इथे नीट्पणे मला तरी समजली नाही
|
Pancha
| |
| Thursday, July 12, 2007 - 4:19 pm: |
| 
|
हीच कथा मी एखादा duplicate ID घेऊन लिहिली असती तर इथल्या वाचकांच्या प्रतिक्रिया खूप वेगळ्या असत्या - हे मात्र खरे आहे, स्वानुभाव सांगतो. इथे असे बरेच मायबोलीकर आहेत जे post कोणी लिहिली त्यानुसार प्रतिक्रिया देतात.
|
Madya
| |
| Thursday, July 12, 2007 - 4:43 pm: |
| 
|
बी कथा लिहायचा उद्देश काय आहे? नुसते कथा लिहित रहाणे कि कथा लिहिल्यावर चान्गल्या प्रतिक्रियान्चि अपेक्शा करणे? नुसते कथा लिहायच्या असतिल तर लिहित रहा, कोण काय प्रतिक्रिया देतेय ह्याकडे लक्श्य देवु नको. पण जर चान्गल्या प्रतिक्रियान्चि अपेक्शा असेल तर लोकान्चे अभिप्राय बघ, पटल तर हो म्हण नाहितर सोडुन दे. हाय काय आणि नाय काय. आणि कितिहि <ID> बदलुन लिहिलेस तरि लिहिण्यचि पद्धत बदलणार आहे का? त्यामुळेे सर्वजण ओळखतिलच कोणि लिहिले आहे ते. त्यापेक्शा बि हाच <ID> चान्गला.
|
Madya
| |
| Thursday, July 12, 2007 - 4:52 pm: |
| 
|
प्रयत्ने वाळुचे कण रगडता तेलही गळे. So keep writing.
|
Mansmi18
| |
| Thursday, July 12, 2007 - 5:33 pm: |
| 
|
बापरे, किती ही मारामारी! बी, मी इथल्या कथा नियमित वाचतो. आवडलेल्या कथाना अभिप्राय लिहितो. आवडले नाही तर लिहीत नाही. मी स्वत: आधी काही लिहिले नाही त्यामुळे कुणी कसे लिहावे हे मी कधी सांगत नाही. पण तुम्हाला अभिप्राय दिलेल्यात बरेच अनुभवी लेखक्लेखिका आहेत. त्यांच्या शुद्ध हेतुबद्दल मात्र मला संशय नाही. तुम्ही लिहिता ते लोकानी वाचण्यासाठी लिहिता ना? तुम्हाला आनंद वाटायला हवा कि बरेच लोक तुमचे लिखाण वाचतात. मी तर म्हणेन कि ज्यानी तुम्हाला थोडेसे परखड अभिप्राय लिहिले आहेत त्याना खरच तुम्ही चांगले लिहावे अशी कळकळ आहे आणि त्यामुळे त्यानी तुम्हाला सांगितले. तुम्ही अभिप्राय positively घेण्याऐवजी जर biased होण्याचा आरोप केलात तर तुमच्या पुढच्या लेखाना अभिप्राय लिहायला लोक कचरतील. कृपया लिहिणे थाम्बवु नका. पण मला वाटते तुम्हाला जे लोकाना पटवुन द्यायचय ते तुमच्या पुढच्या साहित्यकृतीतुन दाखवा. पुढील लिखाणाबद्दल तुम्हाला शुभेच्छा.
|
पुर्वी मायबोलीवर 'मायबोलीवरील साहित्याचा घसरलेला दर्जा' यावर मोठा उहापोह (वाचा: मारामारी) झाली होती ना?
|
Deshi
| |
| Friday, July 13, 2007 - 2:48 am: |
| 
|
उहा पोह. सव्या मला उपमा, चहा व पोह्याची आठवन आली. तशी चर्चा झाली असेल तर परत व्ह्यायची वेळ आली आहे. कसल्या भयानक कविता, कथा असतात आजकाल.
|
Zakasrao
| |
| Friday, July 13, 2007 - 3:32 am: |
| 
|
बी, अरे भावड्या(हे आमच्या कोल्हापुरात आम्ही मित्राला वापरतो ते संबोधन) मी कालच प्रतिक्रिया लिहित होतो पण माझ्याइथे मायबोली बंद पडले अचानक. आता येवुन वाचल तर मला जे सांगायच आहे ते बर्याच जणानी इथे आधीच सांगितले आहे. एक पॉजिटिव्ह गोष्ट म्हणजे तुझ्या अलिकडे मी वाचलेल्या सगळ्या कथांपेक्षा ह्या कथेच बीज सशक्त आहे आणि मागच्या कथापेंक्षा ही उजवी आहे. याचा अर्थ तु लोकानी दिलेल्या प्रतिक्रिया वाचुन त्यावर विचार करुन चुका सुधारतोस.पुढच्या वेळी अजुन चांगल लिहिशिल अशी खात्री आहे. पण मला एक कळाल नाही की तुला इथे आलेल्या प्रतिक्रिया म्हणजे पिंक का वाटली? तस वाटल तर तु तुझी प्रगती खुंटुन घेशील. असो कुठे काय समजायच हा तुझी पर्सनल गोष्ट आहे. मी कथेविषयी लिहितो. वरती मी_अनु ने लिहिलेल्या डोहाळे आणि गरोदर राहणे ह्या मुद्द्याला माझ अनुमोदन. ती एक छोटीशी तांत्रिक चुक आहे ती सोडून पुढे गेल्यानंतर मला एकच गोष्ट खटकली ती म्हणजे त्या मुलाच रंग रुप त्याच्या बाबासारखे होते तर मग त्याच्या सासरकडच्यानी तिला का नेले नाही हा उरतोच. कारण तुच लिहिले आहेस की सासु हरकुन गेली इ.इ. बाकी तीच धीट होण हे समजु शकतो पण ते जरा खुलवता आल असत संवादातुन तर बर झाल असत.म्हणजे गोष्ट वाचकाच्या मनात पक्की बसते. ही जी प्रोसेस आहे ती अचानक न होता हळुहळु होत असते ती नीट आली असती तर त्याला कोणी हरकत घेतली नसती. तिच बंडखोर मन आणि तीच सगळी adjustment करणार मन ह्यातल द्वंद यायला हव होत. मला अजुन जे वाटल ते हे कथा बीज सशक्त होत.फ़क्त तु ते फ़ुलवताना कमी पडलास किंवा तुला एकपानी कथा करायची होती म्हणुन तस झाल असेल. सगळ्यात आधी तु स्वत्:वर अशी बंधन नको घालुन घेवुस. तुला जे लिहायच आहे ते कितीहि मोठे होउदे लिहित जा. हे सर्व मित्रत्वाच्या भावनेने लिहिलय. राग मानु नये. आणि हो तुच काय कोणीही कोणताही आयडी घेवुन लिहिले आणि ते चांगले असेल तर त्याला मायबोलीकर चांगलच म्हणतील. त्यात काही कमी असेल तर तसे सांगतील. तु म्हणतोस तसे ID पाहुन लिहिणारे लोक आणि असे प्रसंग फ़ार कमी असतील, आहेत. असो best of luck for next कथा. असो आता एवढी मोठी पोस्ट लिहिलि आहे आता थोडा TP माझ्या स्वभावाला अनुसरुन. अबे! तुझ नशिब समज की मास्तुरे आले नाही इथे. मास्तुरे तुम्ही दिवा घ्या. }
|
Bee
| |
| Friday, July 13, 2007 - 4:18 am: |
| 
|
.. मी सर्वांच्या प्रतिक्रिया वाचल्यात त्या मला कळल्यात आणि मी त्यावर विचार देखील केला. माझ्या कथेला चांगलेच म्हणा असा माझा मुळीच अट्टाहास नाही. मी उर्मी म्हणून अगदी सुमार टाकावू दर्जातली कथा लिहिली. लिहायला आवडत म्हणून लिहिली. खूप जनांनी जसे की नंदीनी, संघमित्रा, अज्जुकाची १ली प्रतिक्रिया, त्यानंतर अनु, मैत्रेयी, मंजु, पूनम (आणखी काही नावे सुटली आहेत.. ) आदींनी मैत्रीपुर्वक कथेला अनुसरुन प्रतिक्रिया लिहिली. काहींना मात्र 'शब्दच्छल, अक्षरच्छल, वाक्यच्छल' करायचा होता. माझा एखादा शब्द चुकला माकला तर त्याचा इथे अगदी कळस होतो. काही जण मी 'बी' आहे म्हणून माझा अपमान करून जातात. त्यांना जर माझ्या लिखाणात रस नसेल तर मी काही मला वाचाच असे म्हणत नाही. त्यांच्या वाटेला मी जात नाही मग माझ्या वाटेला ते का येतात. मी त्यांना १०० वेळा टाळले तरी देखील ते मला त्रास देतातच वर माझीच बदनामी. कुठेतरी सहनशक्तीची सीमा संपून जाते तरी देखील मायबोलिवर मी इतरांपेक्षा खूप खूप सहन करतो ज्याबद्दल कुणाला इथे कल्पना येणार नाही. असो.. हे चालायचच. पण कथा लिहिल्यानंतर कथेच्या बीबीची परत वाट लावू नका. 'लिहिणे' ही एक अवघड कला आहे. इतरांच्या लिखाणावर टिका करणे खूप सोपे आहे पण आपण इतके तरी लिहू शकतो का असा विचार केला तर बहुतेकवेळा नाहीच उत्तर येईल. मग ज्यांना लिहिण्याची उर्मी आहे त्यांना व्यक्त होऊ द्या. मी अनेक लेखकांच्या ते लेखक कसे झालेत ह्यावर खूप काही वाचले आहे. अर्थात मला काही लेखक बिखक मुळीच च च व्हायचे नाहीये. तसे म्हणने एक फ़ार मोठा विनोद होईल. पण त्यांच्या मुलाखती वाचून अशी एक प्रेरणा मिळाली की केवळ ३ काय ३०० कथा लिहून त्या फ़सण्याची जरी वेळ आली तर आपण आपली उर्मी दाबायची नाही. प्रयत्न करत रहायचे. परत एकदा अर्थात मी इथे ३०० कथा वगैरे लिहिणार नाही. त्यामुळे ३०० कथांचा उल्लेख वाचून जीव धापला गेला असेल तर परत श्वास घ्या.. असो.. परत इथे येण्याची वेळ येणार नाही अशी अपेक्षा..
|
Manjud
| |
| Friday, July 13, 2007 - 6:03 am: |
| 
|
बी, परत इथे म्हणजे ह्या BB वर म्हणत असशील तर ठिक आहे. पण त्या इथेचा काही दुसरा अर्थ नसेल अशी मी अपेक्षा करते
|
Ajjuka
| |
| Friday, July 13, 2007 - 6:16 am: |
| 
|
तुझ्या वरच्या लिखाणातून एक जाणवलं ते लिहितेय. मला मोठा लेखक व्हायचं नाहीये, मी कुणी ग्रेट नाही perfect असायला इत्यादी वाक्ये हे फक्त excuses असतात. त्याच्या आड लपण्याने तुझंच नुकसान आहे. आणि Low aim is crime. जेव्हा तू (म्हणजे कोणीही) आभाळाला पोचण्याची इच्छा धरशील तेव्हा कुठे एखादा डोंगरमाथा पार करशील. विचार कर. बाकी तू इथे(म्हणजे गुलमोहर मधे) परत लिहिणे न लिहिणे हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. पण तू इथे लिहू नयेस अश्या विचारांनी कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आणि काही ठळक तपशील चुकल्याचे लोकांनी तुला दाखवले तर ते चुकले हे मान्य करण्यापेक्षा तेच कसे बरोबर आणि मग तुलाच कसे सगळे छळतात असा सूर तू लावलास तेव्हा सगळेच वैतागले. बाकी 'स्वतः लग्न कर आणि सिद्ध कर' असली एक घाणेरडी कॉमेंट वाचली ती मात्र खरंच hitting below the belt होती एवढं नक्की.
|
Bee
| |
| Friday, July 13, 2007 - 6:25 am: |
| 
|
इथे म्हणजे ह्या कथेच्या बीबीवर परत वादानिमित्त यायची गरज पडणार नाही असे म्हणायचे आहे. अज्जुका, मुद्दाम अधिक स्पष्टीकरण दिलेले बरे. कुणी असा अर्थ काढायला नको की बघा ह्याला एक लेखक वगैरे व्हावेसे वाटते आहे. लायकी मात्र काहीच नाही. तेंव्हा आपण आधीच सांगितलेले बरे की स्वान्त्य सुखाय.. लिहिण्याची उर्मी ह्यापायी काहीतरी लिहितो आहे. इथे कधी कुठल्या विषयाला फ़ाटे फ़ुटतील सांगता येत नाही.
|
Nilima_v
| |
| Friday, July 13, 2007 - 4:52 pm: |
| 
|
अरे बी, गेल्या वेळी मी तुझा उपहास केला ही माझी मोठ्ठी चुक झाली. तुझी, हि कथा मला अत्यंत आवड्ली. आता पर्यन्त मायबोलीवर इतक्या गोष्टी वाचल्या. बर्याचशा गोष्टी उगाचच खुप शब्दबंबाळ असतात. पण आपण लिहिलेली गोष्ट, मातीशी ईमान राखून लिहिलेली वाटली. आता उदाहरणार्थ दाद यानि लिहिलेली कथा आपण येथे तुलनेसाठी घेऊया. कथेत भाषा उत्तम आहे, कथा खुलविलेली पण छान, पण एक गोष्ट तुझ्या कथेत जाणवते जी दाद याच्या कथेत नाही ती म्हणजे, वास्तवासी जवळीक. अर्थात तुला अजून सुधारण्यास वाव आहे. गोष्टीत अगदी सगळे "Details" नकोत पण तरिही कथा एवढी लहान पण लिहू नये. आणि काय रे बी वर टीका करण्यारानो, अशा प्रकारच्या अनेक कथा, चेकोव्ह, गोगोल य सारख्या लेखकान्नी लिहिलेल्या आहेत. कथा वाचताना असे तुम्हाला जाणविले नाही की अशा प्रकारची एखादी गोष्ट तुमच्या कामवालीच्या किंवा जवळ्च्या कोणाच्या घरात घडली असेल. शिवाय शेवटी जेव्हा लेखक म्हणतो की ती तिच्या हक्काच्या घरी गेली तेव्हा असे जाणवले नाही, कि खरे, सर्व तिच्या हक्काचेच होते पण तो हक्क घेण्याची मानसीक शक्ति तिला शेवटी आली. बी तु पण इथे जर जास्त विस्तारपुर्वक हे "Transformation" हा तिचा तुट्ण्याचा, घट्ट होण्याच प्रसंग लिहू शकला असतास.
|
Pancha
| |
| Friday, July 13, 2007 - 5:55 pm: |
| 
|
so true, nilima सगळ्यांचा रोख बी ला प्रोत्साहन देण्या ऐवजी त्याला प्रतिकार करण्याकडे आहे. काही मायबोलिकर काहीजणांना डोक्यावर घेतात (टुकार लिहिले तरिही) आणी काहीजणांना पायदळी
|
Ajjuka
| |
| Friday, July 13, 2007 - 6:34 pm: |
| 
|
आज तुम्ही लोकांनी माझे डोळे उघडलेत. इथे मी जाहीर करते नव्हे शपथच घेते की 'बी' हा लेखकू ही मायबोलीला लाभलेली देणगी आहे. चेकॉव्ह वा गोगोल यांच्यापेक्षाही तो फार मोठा लेखक आहे. आणि त्याच्या कथा समजण्याची आपली कुणाचीही लायकी नाही. तेव्हा यापुढे त्याच्या कुठल्याही लिखाणावर चांगली वा वाईट प्रतिक्रिया देण्याची गुस्ताखी मी करू धजणार नाही.
|
Pancha
| |
| Friday, July 13, 2007 - 6:51 pm: |
| 
|
आपली कुणाचीही हे आपले कोण? तुमचा गट तर नव्हे? दिवा घ्या दिवा
|
|
|