|
Nilima_v
| |
| Friday, July 13, 2007 - 9:29 pm: |
|
|
/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=75&post=969757#POST969757 आज्जुका, गम्मत वाटली reply वाचून.
|
ही ही अज्जुका... बाकी बी हा गंभीर लेखक आहे की विनोदी ते सांगा आधी. सात आश्चर्ये या BB वर साडेसातीचा BB बघून मी पडलो होतो हसून हसून बी, हलके घे यार... ईथे काही बोलत बसू नकोस. तुला कोणी मुद्दाम नाऊमेद करतय की नाही यावर विचार करू नकोस. एवढ्यांनी सांगीतले आहे त्यात तथ्य असेल असे धर. आणि मग त्यावर चिंतन करून पुढची गोष्ट झकास लिहून दाखव. always aim high is correct thing.
|
Deshi
| |
| Friday, July 13, 2007 - 9:54 pm: |
|
|
इथे असे बरेच मायबोलीकर आहेत जे post कोणी लिहिली त्यानुसार प्रतिक्रिया देतात>>>>>>>हे अगदी खरय. पंचासारखा स्वानुभव नाही पण rom मध्ये वाचुन कळत. अचाट गोश्टी, कविता व पुचाट प्रतीक्रीया. जसे साष्टांग दंडवत रे बाबा. पण बींची कथा निट मांडली गेली नाही हे पण खरच आहे. त्यांची कथा तिकडे जाईजुई मांडताहेत. बी तुम्हाला सल्ला वैगरे नाही पण तुम्ही एवढा चांगला विषय निवडुन त्याची मांडनी करु शकला नाहीत. कारण विषयाचा जो गाभा आहे तोच तुम्हाला समजला नाही. जसे १५ दिवसात डोहाळे वैगरे बाबी. वर परत एकाच बलात्कारात असे होते तर १५ त कीती हे वाक्य तुम्ही टाकले. म्हणजेच तुम्हाला त्या विषायी काहीही माहीती नाही हे दिसते. ( वा तुम्ही माहीत नाही असे दाखवता आहात). स्प्ष्ट लिहील्याबद्दल दोष घेतो पण राहवले नाही. दरवेळी दुसरे आपल्याला बी म्हनुन त्रास देतात असे म्हणने बरोबर नाही.
|
Pancha
| |
| Friday, July 13, 2007 - 11:35 pm: |
|
|
बी हे ऐक मग कळेल डोहाळे कधी चालु होतात ते: Tere Ghar Aaye Baalgopal
|
झाल का??? ओके! निलिमा, तुम्ही म्हणता ते बरोबर हे! सहज सुचतय म्हणुन टाईपतोय! बी, मी अनेक वेळा पुनरुच्चार केलाय की मी अनुभव किन्वा अनुभुती असल्या खेरीज एकही शब्द उच्चारत नाही वा लिहीत नाही! तुझ्या वरील गोष्टीत (कथेत) नेमका त्याचाच अभाव जाणवला असावा सगळ्यान्ना! एनिवे..... गम्मत म्हणुन सान्गतो, घ्यायच तर घे वा सोडुन दे...! अनुभव प्रत्यक्ष असतो! मात्र अनुभवातून अनुभुती मिळेलच वा जाणवेलच याची खात्री नसते याचे कारण व्यक्ती तितक्या प्रकृती आणि वृत्ती! अनुभुतीला मात्र प्रत्यक्ष अनुभवाची गरज नसते! ज्योतिष शास्त्रानुसार अनुभुती चन्द्राच्या अखत्यारीतला विषय! (आता कृपया कुणी मला सन्दर्भाकरता ज्योतिष विषयान्वरच्या ग्रन्थान्चा सन्दर्भ मागु नये) अनुभुती कशातूनही मिळु वा जाणवु शक्ते! एखाद्या पुर्वी चवीने खाल्लेल्या पदार्थाची आठवण निघताच त्याची चव वा स्वाद जीभेवर पकटुन पुनर्भुतीचा अनुभव कित्येकान्नी घेतला असेल, तीच ती अनुभुती! मात्रा इथे पुर्वी खाल्लेल्या पदार्थाच्या चवीचा प्रत्यक्ष अनुभव मनाच्या कप्प्यात दडलेला असतो तो दृगोच्चर होतो! पुर्वी खाल्लेला पदार्थ याच जन्मात खाल्लेला अस्तो! त्या मागे मागे जात अशा अनेक पुर्वजन्मान्चे सन्चित आत्म्याशी निगडित असते जे कधि न कधि तरल मनाच्या व्यक्तीस अनुभुतीच्या रुपात जाणवत रहाते असा माझा विश्वास हे! मात्र प्रत्यक्ष अनुभवातुन तत्काळ अनुभुती जाणवेलच याची खात्री नसते जसे की, या महिन्याच्या सुरवातीला मी नाशकात साडेचार तासात गेलेलो! त्यावेळचे प्रवासातले अनुभव मला स्तिमित करणारे असले तरी माझ्याच बाजुला बसलेल्या लिम्बीच्या भावाला, तो वेगळ्या मनःस्थितित असल्याने ते कळतही नव्हते! कालच विषय झाला! तीच गाडी, नाशकाहुन परत आलेली, जेव्हा ते दहाव्या करता ओन्कारेश्वरावर निघाले, अन्गणातुन बाहेर काढता काढता गाडी पन्क्चर होत्ये असे त्यान्ना कळले होते, मी काल म्हणले, लक बघा कसे असते? हीच गाडी त्या दिवशी परत येता वा जाताना, काही किलोमिटर अलिकडेच भरधाव वेगात असताना पन्क्चर झाली असती तर???? हे तपशीलात सान्गण्याचे कारण असे की, आम्ही भन्नाट वेगात गेलो नि आलो हा वेगवेगळ्या वयाच्या नि बुद्धीच्या माणसान्करता वेगवेगळ्या अनुभवाचा विषय असेल, अर्थात त्यातुन काय अनुभुती स्विकारायची, जाणवुन घ्यायची हा देखिल प्रत्येकाच्या बुद्धीकौशल्याच्या, विचारशक्तीच्या मकदुराप्रमाणे ठरेल! वरील प्रवास हा माझ्याकरता जीवघेण्या भितीचा होता जरी मीच ड्रायव्हिन्ग करत होतो तर इतरान्ना तेव्हा किन्वा कालान्तराने देखिल तो केवळ एक "प्रवास" वाटला असेल! कित्येकदा आपण जीवघेण्या सन्कटातुन वाचतो, अन वाचलोत हे अनुभवुन देखिल ते जाणवण्या येवढी अनुभुती स्विकारण्याची आपल्या मनाची तयारी नसते येवढे आमचे मन लौकीक औपचारीक आचार विचारान्च्या आहारी गेल्याने कोडगे वा पत्थरी दगडी गेन्ड्याच्या कातड्याचे बनलेले असते. अनुभव नि अनुभुतीचा हा एक विषय झाला अनुभुतीच्या माध्यमातून परकायाप्रवेश (प्रत्यक्षात नव्हे) करणे ही सगळ्यात अवघड बाब! शब्दार्थाने हा "परकायाप्रवेश" अपेक्षित नाही तर त्या त्या व्यक्तीच्या भुमिकेत आपण शिरुन त्या त्या व्यक्तीच्या विचारान्ची, भुमिकेचीक, अनुभवाची अनुभुती घेणे असा त्याचा अर्थ! हे फार कठीण असते, कारण असे करताना आपली "स्वत्वाची" जाणिव काही काळ गुन्डाळुन ठेवणे आवश्यक असते, जे अहन्कारी माणसास शक्य होत नाही! मात्र प्रयत्न पुर्वक, "स्वतःची ठाम भुमिका" थोडी बाजुला ठेवुन दुसर्याच्या परिस्थितीचा त्याच्या ठिकाणि स्वतःला कल्पुन विचार केल्यास त्याला अवगत होणार्या अनुभवान्ची अनुभुती आपणही घेवु शकतो! याचा उपयोग काय????? कोणतीही गोष्ट वा कथा लिहिताना, जर का आम्ही कथेतील पात्राच्या भुमिकेशी समरस होवुन मग लिखाण करत नसलो तर ते तुटक तुटक अपुरे वाटते, बरेचदा ते तृटिन्नी परिपुर्ण असते! कोणतीही कथा लिहिताना, मूळ कथाबीज, थोडक्यात तुम्हाला काय आणि कोणत्या पात्रान्च्या माध्यमातून सान्गायचे आहे त्याची रुपरेषा मनात पक्की तयार असायला लागते! हे म्हणजे आधी कळस मग पाया या प्रमाणेच असते! एकदा का सशक्त कथाबीज आणि पात्रे यान्च्या भुमिका, विचार पद्धती सुनिश्चित झाली की बाकी प्रसन्गोपात माल मसाला हवा तसा कोम्बता वा कोम्बलेला काढता येतो तुला अभ्यासच करायचा असेल तर तमाम हिन्दी मराठी शिनेमे नाटके बघ, आणि बघताना असा विचार करीत रहा की हे असे लिहिले दाखवले आहे, तर अजुन वेगळ्या कोणत्या पद्धतीने लिहिले दाखविले जावु शकले असते??? असा विचार करीत गेलास की आपोआप मनाची विचार करण्याची एक ठेवण बनत जाईल जी भविष्यात अनुभवातील, वा अनुभुतीतील वा अगदीच जुगवलेल्या कथा लिहिण्यास उपयोगी पडेल मला वाटत की आजच्या पुरते येवढे बौद्धिक पुरे! (दात विचकल्या खेरीज रहावतच नाही का अगदी???)
|
लिंब्या, गेलास का तुझ्या जुन्या वळणावर कथेपेक्षा तुझ बौध्दीक मोठ झाल की
|
Nilima_v
| |
| Sunday, July 15, 2007 - 3:32 pm: |
|
|
लिम्बुने हे बरोबर लिहिले आहे. थोड्क्यात त्याला म्हणायचे आहे की जरी बी चि कथा अनुभवाने पुर्ण असली तरी त्याची अनुभूती देण्याच्या बाबतीत ती कमी पडते. हे योग्य सांगितलेत, पण त्याचबरोबर त्यांच्या लेखनात लोककथात सापडणारी गुढ्ता आहे. बर्याचशा गोष्टी का घडतात हे ते सांगत नाहीत पण त्या घडतात. इथे अनेकानी सांगितल्याप्रमाणे जर त्यांनी कथा विस्तारपुर्वक लिहिली तर खुपच फ़रक पडेल. ज़ाईजुईंचा मदत करण्याचा उपक्रम पण स्तुत्यच.
|
Pancha
| |
| Sunday, July 15, 2007 - 4:29 pm: |
|
|
लिम्बुने बरोबर लिहिले आहे
|
Bee
| |
| Monday, July 16, 2007 - 2:38 am: |
|
|
तुम्हा सर्वांचे आभार कसे मानू कळत नाही खरचं
|
|
|