Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 11, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » निज ज्येष्ठ » काव्यधारा » मराठी गज़ल » Archive through July 11, 2007 « Previous Next »

Milya
Tuesday, July 03, 2007 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक गजल टाकायचे धाडस करत आहे...

रकाने

सरले किती रकाने, उरले किती रकाने
त्यालाच फक्त ठावे, दिधले किती रकाने

पुंजीमधून माझ्या करता वजा व्यथांना
उरते शून्य जरी मी, गणले किती रकाने

माझ्याच बेरजेच्या प्रेमात आज पडलो
आत्मांधळा पुरा मी, दिसले किती रकाने?

कोड्यास जीवनाच्या अडवे उभे फराटे
सुटले न ते कधीही, भरले किती रकाने

शाई म्हणून आसू, कागद म्हणून डोळे
लिहिल्या गझल तुला पण कळले किती रकाने?

छळती भुते मनाला, अजुनी तुझ्या स्मृतींची
फ़िरुनी सजीव होती, पुरले किती रकाने

Shyamli
Tuesday, July 03, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आफताब, आवडली गझल मतला आणि अबोला खास

मानस, मीटर गोड वाटतय ऐकायला,

Shyamli
Tuesday, July 03, 2007 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, मतला जबरी आहे, आवडला :-)
कोड्यास जीवनाच्या अडवे उभे फराटे>>> आडवे का अडवे रे
अडवे म्हणजे अड्वण्यातला वाटतोय. तुला म्हणायचय तो आडवे असेल ना? अर्थात मी चुक असु शकेन cbdg
शाई म्हणून आसू, कागद म्हणून डोळे
लिहिल्या गझल तुला पण कळले किती रकाने?>> वाह! हा शेर मी जरा वेगळा वाचला, मेल करते तुला
मक्ता पण सही आहे
गझल आवडली रे ,लगे रहो :-)

Milya
Tuesday, July 03, 2007 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली अगं माझेही आधी तसेच confusion झाले होते. पण श्ब्दकोशात मला अडवे हाच शब्द मिळाला आडवे च्या ऐवजी.. त्याअर्थी दोन्ही वापरत असावेत असे वाटते

सारंग आणि इतर जाणकार?

Devdattag
Tuesday, July 03, 2007 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या..
खालचा सोडला तर बाकीचे शेर कळले आणि आवडले..:-)
माझ्याच बेरजेच्या प्रेमात आज पडलो
आत्मांधळा पुरा मी, दिसले किती रकाने?


Milya
Tuesday, July 03, 2007 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद देवा :-) अरे काही गहन वगैरे अर्थ नाहीये रे बाबा.. मी स्वत:वरच्याच प्रेमात आज इतका बुडालोय .. इतका आत्ममग्न झालोय की माझ्या बेरजेचे -फ़ायद्याचे सोडून बाकीचे कुठले रकाने - dimensions दिसतच नाहीत ...

ही गजल कार्यशाळेनंतर लगेच लिहिली होती आत्ता post करायचे धाडस केले.. पण मला सुद्धा वाचताना आता खूप त्रूटी दिसत आहेत.

Swaatee_ambole
Tuesday, July 03, 2007 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, जरा स्पष्ट बोलू का?

गज़लमधे रदीफ़ फार काळजीपूर्वक निवडायला हवा. अगदी साधी क्रियापदं जरी रदीफ़ म्हणून आली तरी रदीफ़ असणार्‍या प्रत्येक मिसर्‍यात त्याचा व्यवस्थित अर्थ लागलाच पाहिजे.

आता ' रकाना' म्हणजे स्तंभ (column) . सहसा वृत्तपत्रात उभी एक चतुर्थांश जागा व्यापणार्‍या स्तंभाला रकाना म्हणतात. अर्थ ताणून जास्तीत जास्त वाणिज्यापर्यंत (commerce) नेता येईल. म्हणजे ताळेबंदातील (Balance Sheet) इत्यादिंमधील स्तंभ. मला ( त्यातल्या त्यात ' आत्मांधळा'चा शेर वगळता) कोणत्याच शेरात या रदीफ़ चा संदर्भ लागला नाही. कुठल्याच शेरात उला आणि सानी मिसर्‍यांतील संबंध नीट स्पष्ट झाला नाही. ( उदा., अश्रू / गज़ल आणि रकान्यांचा काय संबंध? रकाने पुरले म्हणजे काय? कोडं हे शब्दकोडं किंवा सुडोकूसारखं असेल तर त्यात रकाने असतील, पण फराटे कसे येतील?)

' उरते शून्य जरी मी' मध्ये वृत्तभंग ( गा गा ल गा ल गा गा - माझ्या माहितीनुसार आनंदकंद वृत्त) होतो आहे.

ह्या basic त्रुटी सुधारल्या की पुढे शेराचा लागणारा अर्थ किती profound आहे, तो अनेकपदरी आहे का, शेर वृत्तांतात्मक तर होत नाही ना हे मुद्दे विचारणीय होतात.

थोड्या अधिक प्रयत्नांनी तू नक्की चांगलं लिहू शकतोस असं वाटलं म्हणून(च केवळ) मला वाटणार्‍या त्रुटी स्पष्ट सांगत आहे.

कदाचित तुला अभिप्रेत असलेले अर्थ मला कळलेच नाहीत असंही झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा चुभूद्याघ्या.


Dineshvs
Tuesday, July 03, 2007 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, स्वाती कदाचित matrix चा संदर्भ आहे का ? मॅट्रिक्स मधे तीनापेक्षाही जास्त मिती, अर्थात काल्पनिक असू शकतात ना ?


Mayurlankeshwar
Wednesday, July 04, 2007 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगली गझल आहे मिल्या... :-)

सरले किती रकाने, उरले किती रकाने
त्यालाच फक्त ठावे, दिधले किती रकाने

'रकाने' हे एकंदरीत आयुष्याला प्रतिक म्हणून मी वाचले आणि शेर कळला... दुसरा काही अर्थ असेल तर तोही सांगशील का?

पुंजीमधून माझ्या करता वजा व्यथांना
उरते शून्य जरी मी, गणले किती रकाने
स्वाती म्हणतेय त्याप्रमाणे हे आनंदकंद वृत्त आहे... सा.मि. मध्ये मीटर चुकले आहे...
उला मिसरा मस्त आहे! आणि मीटर जमले की शेरही खास... 'व्यथांवाचून जगणे निरर्थक' ... हा अर्थ मस्त प्रकट झाला आहे.

माझ्याच बेरजेच्या प्रेमात आज पडलो
आत्मांधळा पुरा मी, दिसले किती रकाने?
अप्रतिम शेर... 'दिसले किती रकाने' हे प्रश्नार्थक का? मला वाटतेय ते 'दिसले किती रकाने!' असं असायला हवं.... तू म्हटल्याप्रमाणे
'इतका आत्ममग्न झालोय की माझ्या बेरजेचे -फ़ायद्याचे सोडून बाकीचे कुठले रकाने - dimensions दिसतच नाहीत ... ' हाच अर्थ मलाही अभिप्रेत आहे. एखाद्या संदर्भात मनाची अवस्था सर्वसाधारण अवस्थेपेक्षा थोडी विचित्र, आश्चर्यकारक असताना आपण Exclamation चिन्ह हे माझं मत(कदाचित चुकीचंही)वापरतो म्हणून मला असं वाटतंय...

कोड्यास जीवनाच्या अडवे उभे फराटे
सुटले न ते कधीही, भरले किती रकाने
संदीग्ध वाटतोय...

शाई म्हणून आसू, कागद म्हणून डोळे
लिहिल्या गझल तुला पण कळले किती रकाने?
नाही कळला.. उमि छान आहे.

छळती भुते मनाला, अजुनी तुझ्या स्मृतींची
फ़िरुनी सजीव होती, पुरले किती रकाने
भूतकाळातल्या घटनांचे संदर्भ आणि रकाने ह्यांची analogy नाही समजलं...


Meghdhara
Wednesday, July 04, 2007 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा!
आत्मांधळा.. च्या बाबतीत मयूरला पुर्ण अनूमोदन..

शाई म्हणून अगदी जवळ पोहोचलेला शेर वाटतोय.. अजून काम करून बघ ना.. तुला लिहिलेल्या भाव गज़ला या तुला निव्वळ रकाने वाटले असं म्हणायचय का? ..
मयूर मक्त्यात रकाने, कितीही संदर्भ पुसायचा प्रयत्न केला तरी.. या अर्थी वाटतोय.. मिल्या?
चू भू द्या घ्या
मेघा



Vaibhav_joshi
Wednesday, July 04, 2007 - 6:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्म्म्म्म्म्म

" गज़ल मध्ये रदीफ़ काळजीपूर्वक निवडायला हवा . "

मला वाटतं स्वातीने गज़ल लिखाणाचं सार एका वाक्यात सांगितलं आहे .

मिल्या .. सर्व शेरांवर प्रत्येकाची मतं मांडून झाली असल्याने मी एकंदर गज़ल लिखाण ( bigger picture ) वर लिहीण्याचा प्रयत्न करतो . " किती रकाने " हा रदीफ़ निवडल्यामुळे ( सुचल्यामुळे ) तो निभावण्याची फार मोठी जबाबदारी येऊन पडली आहे असं मला तरी प्रत्येक शेर मध्ये दिसून आलं .
मतल्यातला अर्थ जरी पोचतो आहे तरीही मतला म्हणून त्या शेरवर एक अतिरिक्त जबाबदारी असते असं मी नेहेमीच मानत आलो आहे . उत्तम मतला ( अर्थपूर्ण आणि आकर्षक ) जी वातावरण निर्मिती करतो त्याला तोड नाही . " किती " हा quantifying शब्द रदीफ़ मध्ये आल्याने आणखीच अवघड झाले आहे .

माझ्याच बेरजांच्या प्रेमात " आज पडलो " सारखा मिसरा काळाच्या बाबतीत दिशाभूल करू शकतो . तो मिसरा सहजपणे " माझ्याच बेरजांच्या प्रेमात राहिलो मी " वगैरे ने रिप्लेस करता येईल असे वाटून गेले .

काही गज़ल लिहून झाल्या की नवनवीन रदीफ़ वापरण्याची उर्मी येण्याचा काळ प्रत्येकाच्याच बाबतीत येत असावा . ( मिल्याच्या बाबतीत हे घडलं नसणार हे नक्की आहे कारण त्याने अजून तितक्या गज़ल लिहीलेल्या माझ्या वाचनात नाहीत ) पण ह्या धोक्यापासून सर्वच गज़लकारांनी सावध रहायला हवे असे मला वाटते . केवळ " आहे " , " होते " रदीफ़ असलेल्या गज़ल सुचतात हा काही अपराध नाही . जे काही सुचंतय ते अर्थपूर्ण आहे का आणि मूळ म्हणजे तो किंवा किमान कुठलाही एक अर्थ वाचकापर्यंत एका वाचनात पोचतो आहे का हे भान सर्वात महत्त्वाचं .

भटांची ह्याच वृत्तातली सदाबहार गज़ल

हे ही असेच होते , ते ही तसेच होते
आपापल्या ठिकाणे सारे ससेच होते

तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही
तू भेटतेस तेव्हा माझे असेच होते

सारखे शेर याच गोष्टीची प्रचीती देतात

याचा अर्थ नवीन / वेगळे रदीफ़ लिहूच नयेत असे नव्हे . आपल्याला जे म्हणायचंय ते पोचायला हवं आणि मुख्य म्हणजे त्याच intensity ने पोचाय्ला हवं असं वाटतं . शेवटी " गज़लकाराला हे म्हणायचं असावं " अश्या पावतीपेक्षा " अरे मला हेच म्हणायचं होतं " सारखी दुसरी पावती नाही . अश्या तृषेने जेव्हा प्रत्येक शब्द लिहीला जातो तेव्हा ती गज़ल / कविता / कलाकृती नक्कीच पोचते असं मला तरी वाटतं .

मिल्याने सहज लिहीलेल्या गज़लमुळे ह्यावर विचार करता आला . मला जे वाटलं ते लिहीण्याचा प्रयत्न केला आहे . आणखी काही मतं असल्यास जाणून घ्यायला आवडेल .


Milya
Thursday, July 05, 2007 - 9:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती : खूप आभार. तू स्पष्ट मते मांडल्यामुळे चुका कळून यायला मदत होत आहे. ही गजल इथे टाकायचा उद्देश तोच होता..

आणि तू आणि वैभव म्हणताय ते पटले की 'किती रकाने' अश्या रदीफ़ला निभावण्यात शेरांची ओढाताण झाली आहे आणि ते संदिग्ध झाले आहेत..

मयुर, मेघा : धन्यवाद आणि आभार. मेघा बरोबर आहे 'शाई' मध्ये मला तूला जे वाटले तेच म्हणायचे आहे... माझ्या डोळ्यातल्या जे भाव होते ते गझलेसारखे होते पण तू त्यांना केवळ एक ठोकळेबाज रकाने (किंवा एक तांत्रिक शब्दाकृती) म्हणून पाहिलेस... पण विचार मला नीट मांडत आला नाही :-(

'शून्य' मध्ये मीटरच गंडल्यामुळे basic मे राडा झाला आहे...

वैभव अगदी गुरुजी बिरुदाला साजेसे मार्गदर्शन केलेस.. सर्वांसाठीच उपयुक्त असे...

Bairagee
Thursday, July 05, 2007 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, वृत्त सांभाळले, अन्त्ययमक, यमक बरोबर आले म्हणजे गझल होत नसते. त्या रचनेला केवळ तांत्रिकदृष्ट्या गझल म्हणता येईल. जे अन्त्ययमक, यमक (हेच कशाला कुठलेही नाम, क्रियापद वगैरे वगैरे) आपण वापरतो आहोत त्याचे प्रत्येक ओळीतले चलन नीट (म्हणजे कानांना बरे आणि व्याकरणदृष्ट्या योग्य) आहे की नाही ते बघायला हवे.
आधीच्या प्रतिसादींनी म्हटल्याप्रमाणे रकान्यांनी गोंधळ केला. रदीफ निवडताना ते आपल्याला निभवता येईल का नाही ते बघावे.
ते कसे बघावे ? तर वेगवेगळी क्रियापदे, यमके त्या अन्त्ययमकाबरोबर वापरून बघावीत. जेवढ्या सहजपणे अधिकाधिक क्रियापदे, यमके वापरता येतील तेवढी मोकळीक अधिक. कवीने स्वतःला प्रश्न विचारावेत. उदा. रकाने दिधता/देता येतील काय, रकाने कळतात काय? यमके, अन्त्ययमके कशी कानांना न खटकत आली पाहिजेत. ती तशी येताहेत काय? वगैरे वगैरे.
आपल्या मनातल्या कल्पना (किमान ५) नीट राबवता येत नसतील तर मग असे अन्त्ययमक( रदीफ) खारीज करावे, जमीन खारीज करावी.
बरेचदा असे होते की एखादा जबरदस्त मतला सुचतो पण पुढे गाडी काही जात नाही. कारण 'जमीन'च 'तंग' असते. 'जमीन' तंग म्हणजे काय असते? तर ५ शेर लिहिण्यापुरती यमके तरी उपलब्ध नसतात किंवा अन्त्ययमक निभवण्याजोगे नसते. अशावेळी ती कल्पना दुसरीकडे राबवावी. शेवटी गझलेचा प्रत्येक शेर ही स्वतंत्र, सार्वभौम कविता आहे. ती ह्या गझलेत आली काय किंवा त्या गझलेत आली काय, सारखेच.


वैभव, मक्त्यात 'तखल्लुस' असायला हवे, हे मलाही आत्ताच कळाले.

जाताजाता
आसवांच्या शाईवरून एक लोकप्रिय (महाविद्यालयात असताना) शेर आठवला. तो असा --
सियाही आँख की लेकर मैं नामा तुमको लिखता हूँ
के तुम नामे को देखो और तुम्हें देखें मेरी आँखें




Sarang23
Thursday, July 05, 2007 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जवळ जवळ सगळ्यांनीच चांगली माहिती दिलीच आहे. मिल्या तुला याचा नक्कीच उपयोग होईल. मी स्वतः त्यांच्या मताशी सहमत आहे... परत काम करून हीच modified गझल इथे टाकलीस तर आणखी मजा येईल... बघ जमल्यास...

बाकी अडवे आणि आडवे ला तुझ्याशी सहमत आहे. पण एकूणच अडवे ऐकायची आपली सवय गेली आहे. जसं की अडगा आणि आडगा... त्यामुळे संदिग्धता असेल तर तडजोडी चालतील असं मला तरी वाटतं...

बैरागी शेर आवडला!


Manas6
Monday, July 09, 2007 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगण्याला काय हवे..?

जगण्याला काय हवे?
आवाहन, नित्य नवे!

बॅंकांना दीर्घ सुट्या,
व्यापारी उर बडवे!

मदतीचा हात कुठे ?
गेले लांबून थवे !

शाखा अन्यत्र नसे,
एकले तरु हिरवे!

छत्री निसटून जाय,
-आणी ती आज सवे!

अमुच्या नशिबात हेच,
"ये, चल घे, गिळ, सटवे!"

-मानस६





Pulasti
Wednesday, July 11, 2007 - 1:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कळेना

मुलांना कसे वाढवावे कळेना
नव्याने कसे मी घडावे कळेना

जमाना असा, सर्व चालून जाते
स्वत:ला कसे पारखावे - कळेना

किती माहिती ही, किती तज्ञ सल्ले
कसे नेमके पाखडावे - कळेना

विजेसारखा आज उत्साह आला!
तरी मी पुन्हा का गळावे - कळेना

विचारी नभा चिंब ही चंद्रमौळी
"कुठे केवढे कोसळावे कळेना?"

पुन्हा वाचले, खोडले शेर सारे
कशाला असे गुरफटावे - कळेना

कडू, तुरट, खारट - असे जगत जाता
कसे शेवटी गोड व्हावे - कळेना

- पुलस्ति

Pulasti
Wednesday, July 11, 2007 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानस आणि आफताब - तुमच्या गज़ला आवडल्या. मिल्याच्या रकान्यावरची चर्चाही आवडली! मागे अशीच चर्चा "वाळवंट" आणि "पीक आहे" या रदीफ़ांवरही झाली होती. मला वाटतं "रदीफ़ निवडताना" असा एक छोटासा संदर्भ-लेख मायबोलीवर किंवा मराठीगझल.कॉम वर ठेवला तर उपयुक्त ठरेल.
-- पुलस्ति.

Milya
Wednesday, July 11, 2007 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुलस्ती : गझल आवडली. जमाना आणि चंद्रमौळी विशेष आवडले..

वीजेचा नीटसा कळला नाही :-(

Shyamli
Wednesday, July 11, 2007 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या,मला समजलेला अर्थ:-अचानक तात्पुरता कुठुनतरी किंवा कसातरी उत्साह येतोही आणि परत आला तसा जातोही. थोडक्यात विजेसारखा चमकुन जातो उत्साह. असा अर्थ असावा CBDG नक्कि काय ते पुलस्ति बोलतीलच.

जमाना ,किती माहिती,आणि शेराच शेर :-) हे शेर आवडले

Chinnu
Wednesday, July 11, 2007 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मानस,

मदतीचा हात कुठे ?
गेले लांबून थवे !

शाखा अन्यत्र नसे,
एकले तरु हिरवे!

हे दोनही शेर छान वाटलेत. मदतीचा हात कुठे मध्ये खंत व्यवस्थित व्यक्त झाली आहे. चल घे, गिळ? तुमचा ह्या शेरामागचा हेतू कळला नाही.
साधी सोपी आणि कमी शब्दातली गझल लिहीणे मला तरी नेहमी कठिण वाटते. तुम्हाला ते लिलया जमते असे वाटते.
पुलस्तीजी, खूप दिवसांनी वाचून छान वाटले. हे शेर विशेष आवडलेत.

पुन्हा वाचले, खोडले शेर सारे
कशाला असे गुरफटावे - कळेना

कडू, तुरट, खारट - असे जगत जाता
कसे शेवटी गोड व्हावे - कळेना

सर्व गुरुजनांना धन्यवाद. वरील चर्चा नवीन गझल लिहीणार्‍यास नक्कीच उपयुक्त आहे.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators